Skip to main content

नाना आणि तनुश्री

लेखक फुकनी यांनी सोमवार, 08/10/2018 01:37 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता सध्या तनुश्री दत्ता चे जे काही गरळ ओकणे चालू आहे त्या विषयी तू नळी वरती बऱ्याच काही चर्चा पाहण्यात आल्या. मला स्वतः ला नाना असे काही करेल असे वाटत नाहीं . तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडेल. https://www.youtube.com/watch?v=EDx1KywLLrQ&t=1969s

वाचने 72571
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by नगरीनिरंजन

मतांतरावरुन व्यक्तिगत दोषारोपणाच्या निष्कर्षांवर येण्यापुर्वी स्त्रीयांच्या बाजूनेही माझे डझनभर पेक्षा अधिक मिपा धागा लेख यादी आहे यची नोंद घेता आल्यास पहावे हि नम्र विनंती. - निष्पक्षता पाळत सहानुभूती बाळगू इच्छिणारा माहितगार
...त्यामुळे आमची सहानुभूति मीटू वाल्या बायांना.....
या किंवा त्या बाजूला पक्षपाती सहानुभूती ठेवण्याचे अधिकार ज्याचे त्याचे. पण सहानुभूती निष्पक्ष राहुनही ठेवता येत असाव्यात सहानुभूती साठी पक्षपातीपणा हा आवश्यक निकष नसावा किंवा कसे ? तेव्हा पक्षपाती सहानुभूती ज्यांच्या त्यांना लखलाभ.
.....पण लैंगिक छळाचा मानसिक परिणाम आयुष्यभर होतो.....
स्त्री असो वा पुरुष ज्यांचा ज्या बाबतीत छळ खरोखर झाला आहे -मग छळ कोणतेही असोते- त्यांच्या पुरतेच लागू होते. ज्यांच्या ज्या तक्रारीच खोट्या असतील त्यांना खुली सुट म्हणजे, खोट्या गोष्टींचे भांडवल करण्याची मानसिकता फोफावण्यास बळ ! किंवा कसे ?
....शिवाय तक्रार केली की लगेच पुरुष आयुष्यातून उठला असं होत नाही;.....
आपण हे ठाम पणे मांडत आहात ? हे वाक्य वस्तुनिष्ठ आहे की ह्या वाक्यातून दिशाभूल केल्या जाण्याच्याही काही शक्यता असू शकतात ? आपली 'आयुष्य' आणि 'आयुष्यातून उठणे' याच्या नेमक्या व्याख्या काय, यावर बरेच काही अवलंबून असावे किंवा कसे ? आपण मानवी समुहातल्या कोणत्याही एका अर्ध्या लोकसंख्येच्या आयुष्याची किंमत दुसर्‍या अर्ध्या लोकसंख्ये पेक्षा कमी लेखु इच्छित आहात किंवा कसे ? बरे ज्या पुरुषांच्या आयुष्याची किंमत आपण कमी लेखू इच्छिता त्यातील - न होवो - खरेच काही आयुष्यातून उठले तर त्यांच्या आयुष्यावर काही महिलांचे मुलांचे अवलंबित्व असू शकते की ठामपणे नसतेच ?
....१०० जणी खोट्या तक्रारी करत असतील तरी खरंच छळ झालेल्या एका स्त्रीला न्याय द्यायला हे सहन केलेच पाहिजे. ....
ड्यू प्रोसेस, महिला आयोग आणि न्यायालयीन मार्ग खोट्या तक्रारींबाबतही सहन केला जातोच ना ! ड्यू प्रोसेस, महिला आयोग आणि न्यायालयीन मार्गांना कुणि नाकारले आहे ? प्रश्न चिन्हे हि मिडिया ट्रायलच्या माध्यमातून होणार्‍या पब्लिक लिंचिंग बद्दल असावित किंवा कसे ? सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या;, भारतीय घटने च्या अनुच्छेद २१ मध्ये अनुस्युत राईट टू डिग्निटीवर जेवढा आधिकार स्त्रीचा असेल तेवढाच एका पुरुषाचाही असेल कि नाही की निष्कलंक व्यक्तीसही कलंकीत म्हणून माध्यमाच्या बळावर पब्लिक धींड काढण्याचे अनिर्बंध आधिकार स्त्रीयांना पोहोचतात ? वस्तुतः मॉडर्न सिव्हीलाईज्ड सोसायटीतील विधीतत्व मिमांसा (ज्युरीस्प्रुडन्स) मधील तत्व अपण म्हणता त्याच्या अगदी विरुद्ध "justice as a concept where an innocent man is not supposed to be framed, even if it means the guilty get away." अशा स्वरुपाचे आहे. आणि हे तत्व जर मान्य नसेल तर न्यायालयात सिद्ध न झालेल्या कोणत्याही खोट्या आरोपावरुन अथवा केवळ शंकेवरुन कुणालाही जेल मध्ये टाकण्याची सरकारला मुक्त लायसन्स मिळेल. आजच्या संगणक युगात कोणत्याही एका स्त्री कडून अगदी पन्नास कोटी पुरुषी लोकसंख्येचा घटक असलेल्या प्रत्येक पुरुषां विरुद्ध आंतरजालावर आरोप लिहिले जाण्यास काही तासांचा अवधी पुरेसा असावा. पण तेवढेही कशाला सर्व पुरुषांच्या कायम स्वरुपी जेलभरोची आयडीयाही अगदीच वाईट नसावी. स्त्रीयांनी त्यांच्या गरजे पुरते पुरुषांना वापरुन घ्यायचे बाकी बाय डिफॉल्ट जेल मध्ये रवानगी, कशी काय वाटते आयडीया ? :)
...निव्वळ खोट्या तक्रारी येतील म्हणून घाबरणारे हे फारच नाजूक पुरूष म्हणायचे....
शुद्ध स्त्रीवादाच्या दृष्टीने, स्त्री-पुरुष समान म्हणायचे आणि नाजुकतेचा मक्ता केवळ स्त्रीयांना द्यायचा ह्यातही छुपा पुरुषसत्ताकवाद असावा किंवा कसे ? बाकी उर्वरीत खंडण वर आलेच आहे.
....पुरुषांनी खोट्या तक्रारींना तोंड का द्यावं असा प्रश्न विचारणाऱयांना छळ हा प्रकार माहित नाही व तो समजून घेण्याची कुवत नाहीय. ...
अगदी अगदी, छळ म्हणजे काय माहित असणे आणि समजून घेण्याच्या कुवतीचा मक्ता केवळ खोट्या तक्रारी करणार्‍यांकडे आणि पक्षपाती सहानुभूती ठेवणार्‍या लांगुलचालन वाद्यांना तेवढा असतो. टाळ्या :)
...चर्चा बरीचशी वाचली. ...
पंचेद्रीयातील कोणतेही अनुभव अनुभवले म्हणजे समजले जातातच का अधिक गहन तात्विक प्रश्न, वाचला तरी समजावयाचा नाही. सांगण्याचा उद्देश हा की वाचले ते पूर्ण समजले असा आमचा कोणताही दावा नाही. वाचलेले सर्व समजणार्‍यांना, वाचलेले सर्व न समजणार्‍या माहितगारांचा प्रणाम.
....तक्रार करणाऱया सर्व स्त्रियांना पाठिंबा दिलाच पाहिजे....
ड्यू प्रोसेस, महिला आयोग ते न्याय प्रक्रीये वापरुन तक्रारी करणार्‍या सर्व स्त्रीयांना पाठींबा आहेच. उर्वरीतांसाठी वैध साशंकता. कायदे विषयक उत्तरदायीत्वास नकार लागू

शिवाय तक्रार केली की लगेच पुरुष आयुष्यातून उठला असं होत नाही; पण लैंगिक छळाचा मानसिक परिणाम आयुष्यभर होतो. त्यामुळे आमची सहानुभूति मीटू वाल्या बायांना. +100

संदर्भ https://en.wikipedia.org/wiki/Me_Too_movement#Criticism १) मी टू मुव्हमेंटच्या सद्य स्थितीतील विवीध मर्यादांवर विवीध स्त्रीवाद्यांनीही तक्रार केली आहे २) सगळ्या पुरुषांविरुद्धच्या सगळ्या प्रकारच्या तक्रारींना एकाच तागडीत मोजले जात असण्या बद्दल साशंकता दिसतात. ३) The hashtag has been criticized for putting the responsibility of publicizing sexual harassment and abuse on those who experienced it, which could be re-traumatizing.[189][190][191] The hashtag has been criticized as inspiring fatigue and outrage, rather than emotionally dense communication. ४) मेट्रोपॉलीटन आहेरे स्त्री वर्गा पुरती मर्यादीत असलेली नॉन मेट्रोपॉलीटन आणि नाहीरे स्त्रीयांच्या मासेस ना अद्याप इनक्लुड न केलेली मुव्हमेंट ५) आरोपांबद्दल वस्तुनिष्ठतेच्या साशंकता आणि पुराव्या अभावी मिडिया ट्रायलने व्यक्तीचरित्रांचे पब्लिक लिंचिंग ६) Overemphasis on specific cases - हाय प्रोफाईल केसेस ना अधिक प्रसिद्धी आणि महत्व मिळते. सर्व सामान्य नियमीत समस्यांची चर्चा बाजूस पडते . वस्तुतः प्रभावी सामाजिक आणि शासकीय निती आणि नियमनासाठी सर्व सामान्य नियमीत समस्यांची चर्चा अधिक महत्वाची असावी. नाहीतर बहुसंख्य स्त्रीयांच्या समस्या बाजूस पडण्याचा धोका संभवतो. संदर्भ इंग्रजी विकिपीडिया लेख Me_Too_movement_(India)#Criticism सिमा मुस्तफा, तवलिन सिंघ, आणि गोविंद कृष्नन यांची टिका. In article "Whoa #MeToo, Hold Your Horses…" journalist Seema Mustafa expresses that while encouragement to share unexpressed feelings is a big achievement of MeToo movement, but it lacks engagement with criticism -- also from those on the same side of the fence -- which would have been helpful in strengthening the women's movement.[127] Where as journalist Tavleen Singh in her column "Fifth column: Why I am not MeToo" in Indian Express criticizes the MeToo movement participants in India as the ‘liberals’ leading the MeToo movement are too illiberal towards even smallest misgivings with their point of view[128] Govind Krishnan V in his Firstpost article "#MeToo: Accusations against men can’t be construed as guilt; calculus of probability should account for innocence" concurs with Seema Mustafa's sentiments saying one limitation of this movement is that MeToo ends up shutting out and disengaging from outside critiques which are intended to strengthen the movement.[129] Govind Krishnan V further says historically, feminism has evolved, precisely because it has shown the ability to be self-reflective. Further says that, Me Too movement needs more nuanced and richer conversations which have space for debate, disagreement and dissent. The movement needs deeper forms of engagement and a collective will to develop a self-critical discourse which can generate essential kind of intellectual spade work. [129] Journalist Seema Mustafa expresses her reservations about tone and tenor of the MeToo movement on the social media. As per Seema Mustafa's opinion it may be a generational gap, or perhaps the trial of both --- the accuser and the accused --- on the social media. This kind of media trial is too unsavory to digest. The next problem Seema Mustafa points out with MeToo movement is its inability to differentiate between the man who is guilty of rape and sexual assault from the man who solicited a woman with a drink, or an unacceptable text message. The movement offers the same ‘punishment’ for all. The same response, and the same reaction. Journalist Govind Krishnan V concurs in his article with Seema Mustafa's this argument saying, there have been too many cases where everything ranging from flirting, opening moves, clumsy passes, sleazy behavior, disrespecting boundaries, married men expressing sexual interest, all have been clumped together under sexual harassment. This remains a challenge of great importance for India’s MeToo, which it has not yet succeeded in overcoming.[129] Seema Mustafa and Tavleen Singh also feel that MeeToo movement as of now is very exclusive, elite and metropolitan in nature and hence fails represent Indian masses inclusion of whom should have been in priority list of the movement.[127][128] Seema Mustafa reminds in her criticism, that old fashioned jurisprudence does warn against collateral damage, and does speak of justice as a concept where an innocent man is not supposed to be framed, even if it means the guilty get away.[127] Seema Mustafa says while most women in Me Too movement may not be lying but still few would name a man for reasons other than harassment may leads to harassment of an innocent and that would be equally unjustifiable. Hence Seema Mustafa rebukes the Me Too movement as too subjective, arbitrary and without due responsibility. [127] Seema Mustafa also strongly criticizes on the point that, MeToo movement has a subjective mob mentality. By doing media trial this mob of Me Too movement denies accused proper chance to defend themselves. Seema Mustafa asks journalists involved in Me Too movement while enquiry and evidence are supposed to be cornerstones of journalistic values, how those basic values are missing in this movement and still on what basis these journalists can be proud of job losses of accused men without due judicial processes.[127] इंग्रजी विकिपीडिया लेख केव्हाही बदलू शकतात उत्तरदायित्वास नकार लागू

आरोप झालेल्या पुरुषांच्या रिअ‍ॅक्शनची दखल घेऊन हलकीशी चिकित्सा करणारा इप्सिता चक्रवर्ती यांचा स्क्रोलवर एक लेख आला आहे, ज्याच्या अधिक चिकित्सेस वाव असावा म्हणून इथे रुमाल टाकून ठेवतो.

पहिले फर्स्ट पोस्टने नाव अनामिक करुन दिलेले एका जेएनयु तथाकथित चळवळ कर्त्या कन्येचे आत्मकथन आहे. ज्यात बलात्कारा विरुद्ध चळवळीचे नेतृत्व करणार्‍या व्यक्तिनेच कसा या जे एन यु कन्येवर अन्याय केला याचे वर्णन आहे. ( बहुधा काही साशंकीत सॉफ्ट कॉर्नरमुळे कन्या अधिकृत तक्रार करु इच्छित नसावी असे लेखावरुन वाटते. ड्यू प्रोसेस आणि न्यायालयासमोर जाणे टाळणे आहे त्यामुळे खरे खोटे देव जाणे ) दुसरे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया : क्विन चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांचा डिफामेशन सुट माननीय मुंबई उच्चन्यायालया समोर सुनावणिस आला. आरोप करणार्‍या महिलेची तक्रार विकास बहल यांच्याशी व्यावसायिक संघर्षासाठी वापरुन घेतली जात असल्याचे माननीय न्यायालयालाही जाणवले तेव्हा महिलेच्या खांद्यावरुन इतरांनी (म्हणजे व्यावसायिक संघर्षकर्त्यांनी) बंदुक चालवू नये, अशी स्पष्ट कल्पना माननीय न्यायालयाने संबंधीतांना दिल्याचे दिसते.
"No one can fire from over her shoulder. The whole movement .. The whole movement is not for that. Not for others to write what they want," said Justice SJ Kathawalla, adding, "We need guidelines in these cases, else all this will be misused and abused and we do not know where we will end up... Authorities can lay down guidelines." संदर्भ टाईम्स ऑफ इंडिया

संपूर्ण चर्चा वाचली चांगली चर्चा चालू आहे, सुरु ठेवा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सारांश काय ?
स्त्रीयांच्या अनुमती (कंसेंट) , नकाराधीकार (व्हीटो नो मीन्स नो) आणि निवडस्वांतंत्र्याचा आदर करा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सारांश २ : व्यक्त जरुर व्हा (पण त्याच वेळी, न्यायदेवतेचा आदर करा, न्यायालयीन निकालाच्या आधी व्यक्तिचारीत्र्याचे मिडिया ट्रायल करुन पब्लिक लिंचींग करु नका. )