Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग १९

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 02/01/2018 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
नववर्षाच्या सुरवातीला ट्रंपने पाकिस्तान बद्दल अत्यंत परखड ट्विट केल्यानंतर लगेच अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी २५.५ कोटी डॉलर्सची मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे. http://m.indiatoday.in/story/after-donald-trump-tweet-us-blocks-militar…

वाचने 40284
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया


https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/is-bmc-probe-in-… शेवट्च्या परिच्छेदात कमिश्नर म्हणतात, काही अधिकार्‍यावर कारवाई न करण्यास राजकीय दबाव येत आहे. असे असेल तर सामान्य माणसांच्या समस्यांचे काय होत असेल याचा अंदाज बांधता येतो. http://epaper.loksatta.com/1489024/indian-express/02-01-2018#page/7/2 व्यवस्थापकांना अटक केल्याची बातमी . मुळ दोषी मोकाट.

ट्रंपने पाकिस्तानविरूद्ध अजून एक पाऊल उचलले असून आता अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी ११५ कोटी डॉलर्सची मदत स्थगित केली आहे. http://indianexpress.com/article/pakistan/donald-trump-administration-s… पाकिस्तानविरूद्ध इतकी भरीव कामगिरी करणारा बहुधा ट्रंप हा पहिलाच अमेरिकन अध्यक्ष असावा. भारताने ट्रंप अध्यक्ष असेपर्यंत अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानविरूद्ध भरीव पावले उचलावीत. सध्या जगात ३ माथेफिरू आहेत - ट्रंप, किम जाँग आणि शि जिनपिंग (भारतातील निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत शेवटची दोन नावे काढून त्याजागी मोदी आणि नेतानयाहूंचे नाव टाकतील). यातील ट्रंप भारताला अनुकूल आहे, शि जिनपिंग भारतविरोधी आहे तर किम जाँग व भारताचा अजिबात संबंध नाही.

In reply to by श्रीगुरुजी

काहीही, हा माथेफिरू तुमच्या दृष्टीने असेल. जगाच्या आणि चिनी लोकांच्या दृष्टीने हा अत्यंत प्रभावशाली नेता, उत्तम राजकारणी, आणि उत्तम प्रशासक आहे. 2013 च्या आसपास जेंव्हा लोक चीन भविष्यात आपली अर्थव्यवस्थेची घोडदौड राखेल का अशी शंका घेत होते, त्यापासून आजपर्यंत सर्वाना यांनी चुकीचं ठरवलं. चीन ची जगात ताकत आणि मान बराच वाढवला. स्वतःच्या देशात स्वतःला tallest leader म्हणून सिद्ध केलं. चीन मध्ये भ्रष्टाचार विरुद्ध सर्वात मोठी आणि परिणामकारक लढाई उभारली. 21 शतकातील महत्वकांक्षी obor प्रकल्प चालू केला. चीन च्या लष्करावर मजबूत पकड बनवली आणि त्याला आधुनिकतेचा आणि आक्रमकतेचा चेहरा दिला. माओ नंतर पार्टी च्या संविधानात स्थान असलेला हा दुसरा राष्ट्राध्यक्ष. अशा अनेक गोष्टी लिहता येतील, तेंव्हा अश्या गोष्टी करणे ते ही छाती न बडवता हे येर्या गबाळ्या च काम न्हवे.

In reply to by अमितदादा

साम्राज्यवादी या दृष्टीकोनातून शि जिनपिंग हा माथेफिरू आहे. माथेफिरूंना देशातून नेहमीच भरपूर पाठिंबा असतो. खोमेनी, हिटलर या माथेफिरूंनाही त्यांच्या स्वतःच्या देशात प्रचंड पाठिंबा होता. शि जिनपिंगची साम्राज्यवाढीची महत्त्वाकांक्षा अतिरेकी स्वरूपाची आहे. भारताच्या तिप्पट भूमी चीनकडे आहे. एवढा मोठा देश असूनही चीनची बकासुरासारखी भूक वाढतच आहे. लष्करी व आर्थिक सामर्थ्य वापरून चीनचे साम्राज्य वाढविणे ही महत्त्वाकांक्षा असणे व त्या दॄष्टीने सातत्याने पावले टाकणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे.

In reply to by श्रीगुरुजी

लष्करी व आर्थिक सामर्थ्य वापरून चीनचे साम्राज्य वाढविणे ही महत्त्वाकांक्षा असणे व त्या दॄष्टीने सातत्याने पावले टाकणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे.
असहमत, साम्राज्यवाद हे माथेफिरूचे लक्षण नाही, इतिहासात अनेक सत्ता साम्राज्यवादी होत्या म्हणून त्या माथेफिरू न्हवत्या. उदारणार्थ> इंग्रज, पोर्तुगीज, अमेरिका. साम्राज्यवाद हा अनैतिक, अयोग्य असेल परंतु माथेफिरू च लक्षण नाही. शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही, त्यांनी त्यांची भूमी मात्र इंच इंचाने जपली. शि जिनपिंगची कार्यपद्धती पहा, त्याचं बोलण पहा आणि मग मत बनवा. चीन भारताचा शत्रू आहे म्हणून शि जिनपिंग यांच्याविषयी थोडीफार असूया असू शकते परंतु त्यांना direct माथेफिरू ठरवू नये कारण त्यांच्यात आणि अमेरिकेचे ट्रम्प तात्या, उत्तर कोरियाचे किंग कॉंग यांच्यात खूपच फरक आहे.

In reply to by अमितदादा

शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही, त्यांनी त्यांची भूमी मात्र इंच इंचाने जपली. शि जिनपिंगची कार्यपद्धती पहा, त्याचं बोलण पहा आणि मग मत बनवा. === डोकलाम मध्ये भारताने थोडा कठोर पावित्रा घेतला म्हणून, नाहितर चीनचे सैन्य थेट आसाम पर्यंत आले असते.

In reply to by प्रसाद_१९८२

डोकलाम मध्ये भारताने थोडा कठोर पावित्रा घेतला म्हणून, नाहितर चीनचे सैन्य थेट आसाम पर्यंत आले असते.
:))) मला वाटले मुंबई पर्यंत आले असते. काहीही मुळात डोकलाम हा भाग भारताला contain करण्यासाठी चीन साठी महत्वाचा असला तरी तो भूतानचा भाग आहे भारताचा न्हवे, त्यामुळे चीन ने भारतच्या भागात घुसखोरी केली न्हवती हे लक्ष्यात घ्या. भारतासारख्या तुल्यबळ राष्ट्राशी चीन छोट्या मोठ्या कुरघोड्या करत राहील परंतु अशी drastic स्टेप काहीही मोठा वाद नसतना अजिबात घेणार नाही.

In reply to by अमितदादा

लष्करी व आर्थिक सामर्थ्य 6 Jan 2018 - 2:36 pm | अमितदादा शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही, त्यांनी त्यांची भूमी मात्र इंच इंचाने जपली. शि जिनपिंगची कार्यपद्धती पहा, त्याचं बोलण पहा आणि मग मत बनवा.
===== या प्रतिसादात तुम्ही कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही असे म्हणता आणि पुढील प्रतिसादात म्हणता "यामुळे चीन ने भारतच्या भागात घुसखोरी केली न्हवती हे लक्ष्यात घ्या" =====
6 Jan 2018 - 2:48 pm | अमितदादा काहीही मुळात डोकलाम हा भाग भारताला contain करण्यासाठी चीन साठी महत्वाचा असला तरी तो भूतानचा भाग आहे भारताचा न्हवे, त्यामुळे चीन ने भारतच्या भागात घुसखोरी केली न्हवती हे लक्ष्यात घ्या.
====== तुम्ही शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही या प्रश्नाला मी उत्तर दिले, अर्थात भारताने डोकलाम मध्ये मध्यस्थी केली नसती तर तो भाग त्यांनी केंव्हाच बळकावला असता. निदान तुम्ही स्वत: दिलेले प्रतिसाद तरी नीट वाचत जा.

In reply to by प्रसाद_१९८२

शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही
हे सत्यच आहे. ते अध्यक्ष व्हायचा चीन ने अगोदर तिबेट, आणि अनेक देशाचे भाग गीळेत माझा वरील प्रतिसाद वाचा. वरील वाक्यात मी शि जिनपिंग अध्यक्ष झाल्यानंतर च बोलतोय.
अर्थात भारताने डोकलाम मध्ये मध्यस्थी केली नसती तर तो भाग त्यांनी केंव्हाच बळकावला असता.
आधी तुम्हीच डोकलाम प्रकरणाची माहिती करून घ्या, हा भाग चीन च्या de-facto ताब्यात आहे पूर्वीपासून शि जिनपिंग अध्यक्ष व्हायच्या अगोदर पासून. चीन च तिथ नेहमी पेट्रोलिंग चालायचं आता वाद झाला तो रस्ते बांधणीमुळे. यामुळे status-qao बदलतो हा भारताचा आक्षेप होता. त्यामुळे शि जिनपिंग अध्यक्ष व्हायच्या अगोदर पासून हा भाग त्यांच्याच ताब्यात आहे.

In reply to by अमितदादा

आधी तुम्हीच डोकलाम प्रकरणाची माहिती करून घ्या, हा भाग चीन च्या de-facto ताब्यात आहे पूर्वीपासून शि जिनपिंग अध्यक्ष व्हायच्या अगोदर पासून. चीन च तिथ नेहमी पेट्रोलिंग चालायचं आता वाद झाला तो रस्ते बांधणीमुळे. यामुळे status-qao बदलतो हा भारताचा आक्षेप होता. त्यामुळे शि जिनपिंग अध्यक्ष व्हायच्या अगोदर पासून हा भाग त्यांच्याच ताब्यात आहे. डोकलाम वाद सुरू झाल्यानंतर चीन म्हणाला होता की रस्तेबांधणी बद्दल भूतानला पूर्वसूचना दिलेली होती. हा जर चीनचाच भाग होता तर इतरांना सांगायची गरजच काय?

In reply to by श्रीगुरुजी

डोकलाम वाद सुरू झाल्यानंतर चीन म्हणाला होता की रस्तेबांधणी बद्दल भूतानला पूर्वसूचना दिलेली होती. हा जर चीनचाच भाग होता तर इतरांना सांगायची गरजच काय?
हा भाग चीन च्या ताब्यात आहे परंतु अधिकृत रित्या चीन चा नाही भूतान हि त्यवर दावा सांगतो , तिथे सीमा रेषा तयार नाही, त्यामुळे चीन ने तशी पूर्व सूचना दिली असावी.

In reply to by अमितदादा

असहमत, साम्राज्यवाद हे माथेफिरूचे लक्षण नाही, इतिहासात अनेक सत्ता साम्राज्यवादी होत्या म्हणून त्या माथेफिरू न्हवत्या. उदारणार्थ> इंग्रज, पोर्तुगीज, अमेरिका. साम्राज्यवाद हा अनैतिक, अयोग्य असेल परंतु माथेफिरू च लक्षण नाही. शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही, त्यांनी त्यांची भूमी मात्र इंच इंचाने जपली. शि जिनपिंगची कार्यपद्धती पहा, त्याचं बोलण पहा आणि मग मत बनवा. साम्राज्यवाद हे माथेफिरूचेच लक्षण आहे. उदा. हिटलर. चीन अनेक आघाड्यांवर प्रयत्न करीत असतो. शक्य असेल तिथे आर्थिक सामर्थ्यावर, नाहीतर निव्वळ दमदाटी करून दबाब आणून किंवा मग लष्करी सामर्थ्य वापरून. आपल्याकडे मुळातच प्रचंड भूमी असताना शेजारील राष्ट्रांची भूमी बळकावण्याचा सातत्याने प्रयत्न करणे व त्यासाठी शक्य ते सर्व मार्ग वापरणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे. तिबेट गिळंकृत करून ढेकर दिल्यानंतर चीनची नजर आता इतर प्रदेशांकडे वळली आहे. चीनने भारताप्रमाणे व्हिएटनामचाही काही भाग गिळला आहे. चीनने याआधी भूतानला भूमी अदलाबदलीची लालूच दाखवून डोकलामची भूमी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर चीनने लष्करी सामर्थ्ये वापरण्याचा प्रयत्न केला. भारताने डोकलाममध्ये विरोध केल्यामुळे तो प्रयत्न फसला. मागील आठवड्यातच चीनने अरूणाचलप्रदेश मध्ये घुसखोरी करून आपला माथेफिरूपणा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. साम, दाम, दंड, भेद असे सर्व प्रकार वापरून साम्राज्यविस्तार करायचा हेच चीनचे धोरण आहे.

In reply to by श्रीगुरुजी

चीन ने तिबेट गिळला, भूतान, भारताप्रमाणे व्हिएटनामचाही काही भाग गिळला आहे. परंतु हे सर्व शी हे अध्यक्ष व्हायच्या आधी झालेलं आहे त्यांच्या काळात नाही (माझं मूळ statement पहा). भारतीय सीमेवरची घुसखोरी हि नियमित गोष्ट आहे, याच कारण त्यांचा खोडसाळपणा आणि न ठरलेलीसीमा रेषा हे आहे, अध्यक्ष माथेफिरू आहेत हे नाही. चीन साम्राज्यवादी आहे हे मान्यच आहे. मान्य हे नाही कि साम्राज्यवाद हे माथेफिरूचेच लक्षण आहे. तुम्ही हिटलर च उदाहरण दिल मग मी दिलेल्या उदाहरणातील किंवा इतिहासातील अनेक साम्राज्यवादी सत्ता माथेफिरू होत्या का? तेंव्हा तुमच्या analysis शी सहमत नाही हे नोदावतो.

In reply to by अमितदादा

शि जिनपिंग यायच्या आधी चीनचे जे साम्राज्यवादी धोरण होतं तेच धोरण जिनपिंगने पुढे सुरू ठेवलं आहे. साम्राज्यवाद व येनेकेनप्रकारेण दुसर्‍या देशांची भूमी बळकावणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे. ते एखाद्या व्यक्तीचे असले किंवा देशाचे असले तरी तो माथेफिरूपणाच आहे. जगातील प्रसिद्ध माथेफिरू हे हुकुमशहा होते किंवा साम्राज्यवादी तरी होते (हिटलर, खोमेनी, चेंगीजखान इ.). परंतु प्रत्येकाने साम्राज्य वाढीसाठी एकसमान पद्धतच वापरली असे नाही. हिटलरने शस्त्रांच्या जोरावर साम्राज्यवाढीचा प्रयत्न केला. ब्रिटिश व चिनी हे जास्त धूर्त असल्याने आधी आर्थिक सामर्थ्य वापरून आणि नंतर लष्करी सामर्थ्य वापरून त्यांनी साम्राज्यवाढ केलेली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ब्रिटिश व चिनी हे जास्त धूर्त असल्याने आधी आर्थिक सामर्थ्य वापरून आणि नंतर लष्करी सामर्थ्य वापरून त्यांनी साम्राज्यवाढ केलेली आहे.
आता तुम्ही अत्यंत योग्य वाक्य वापरले आहे. तर end conclusion काय तर सर्व साम्राज्यवादी माथेफिरू नसतात, काही धूर्त आणि चानाक्ष्य असतात. ढोबळमानाने दोन विभाग १. माथेफिरू साम्राज्यवादी> हिटलर, खोमेनी, चेंगीजखान इ. २. धूर्त, बुद्धीमान आणि चाणाक्ष साम्राज्यवादी> चीन, अमेरिका, बहुतांश युरोपिअन राष्ट्रे इ शि जिनपिंग आणि त्याचं सध्याचा चीन दुसर्या प्रकारात मोडतो.

In reply to by अमितदादा

मी आधी लिहिलेली वाक्ये खालीलप्रमाणे आहेत. साम्राज्यवाद व येनेकेनप्रकारेण दुसर्‍या देशांची भूमी बळकावणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे. ते एखाद्या व्यक्तीचे असले किंवा देशाचे असले तरी तो माथेफिरूपणाच आहे. मार्ग कोणताही वापरला तरी सातत्याने साम्राज्यवाद हेच धोरण ठेवून त्याप्रमाणे कृती करणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अवघड आहे...बर गुरुजी शि जिनपिंग हे माथेफिरू आहेत, चीन चे पूर्वीचे सर्व अध्यक्ष माथेफिरूच होते. एव्हडच काय माथेफिरू हाच मेन criteria आहे चीन च्या अध्यक्ष निवडीचा. आणि सर्व साम्राज्यवादी हे माथेफिरूच असतात.

In reply to by अमितदादा

असहमत, साम्राज्यवाद हे माथेफिरूचे लक्षण नाही,
असं काय म्हणता? असलेल्या देशाचे छिन्न विछ्छिन्न तुकडे पडल्यावर राग येणे हे आणि केवळ हेच एक माथेफिरूचे लक्षण आहे.

In reply to by अमितदादा

काल गुरुजींना असेच 'शी जिनपिंग माथेफिरू कसे?' विचारायचे राहून गेले. आज हि चर्चा पहिली, गुरुजी तुमच्या शी जिनपिंग यांना माथेफिरू कॅटेगरीत टाकण्याशी सहमत नाही. बाकी दोघे माथेफिरू आहेत हे सगळ्या जगाला मान्य असायला हरकत नसावी.

In reply to by आनंदयात्री

लिस्टमधलं कोणीच माथेफिरू इ नाही. किम जोंग चं शक्यता आहे पण आपल्यापुढे त्याची केवळ त्याच्या शत्रूंनी निर्माण केलेली प्रतिमा आहे. ================= १. आज दोन कोरिया चर्चा करत आहेत. २. दोन्ही देशाच्या बिछडलेल्या लोकांना भेटू द्यायचा एक कार्यक्रम मागे झालेला. ३. उ कोरीया नेहमी ट्रुससाठी तयार असतो. त्यांच्या भारतातील राजदूताची भूमिका तर अत्यंत रास्त होती. ================ (गुरुजी, बघा, आपल्या दोघांचा अलायन्स तुटला.) गुरुजींची अख्खी लिस्टच चूक आहे.

In reply to by arunjoshi123

>>किम जोंग चं शक्यता आहे पण आपल्यापुढे त्याची केवळ त्याच्या शत्रूंनी निर्माण केलेली प्रतिमा आहे. असे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागे थरूरांनी कुठेतरी म्ह्टल्याप्रमाणे, किम जोंग जे करतोय ते करत राहणे हि त्याची राजकीय अपरिहार्यता आहे. तुम्ही सद्दामचे जे करू शकलात तसे काही माझ्याबरोबर करण्याचा विचारही करू नका, असा संदेश त्याने यशस्वीरीत्या पोचवला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पाकिस्तानविरूद्ध इतकी भरीव कामगिरी करणारा बहुधा ट्रंप हा पहिलाच अमेरिकन अध्यक्ष असावा. भारताने ट्रंप अध्यक्ष असेपर्यंत अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानविरूद्ध भरीव पावले उचलावीत.
हे वाचा. https://www.loksatta.com/agralekh-news/trump-threatens-to-cut-pakistan-…

In reply to by अभिजीत अवलिया

अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी मदत थांबवल्याने, बहुतेक लोकसत्ताच्या संपादकांच्या पोटावर पाय आलेला दिसतोय म्हणूच इतक्या पोटतिडीकेने ते काहिही बरळत आहेत. === कैच्या कै अग्रलेख आहे तो.

In reply to by प्रसाद_१९८२

मला त्या अग्रलेखात फारसे नवल वाटले नाही.चुकीने वागणाऱ्याने चुकीचे वागू नये म्हणून त्याला सतत बाबापुता करून चुचकारत गोंजारत राहावे ह्या मानसिकतेतून तो लेख आलेला आहे.मध्यपूर्वेतील देशांचा इतिहास आणि माहिती आपल्याशिवाय इतर कोणाला नाही हा गंड कुबेरांना आहे.ते हळूहळू स्वमग्नतेतल्या कोशात पोहोचत चाललेले आहेत.

In reply to by अभिजीत अवलिया

तो अग्रलेख जाऊ द्या.. पण मला एक प्रामाणिक प्रश्न आहे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने कोणाहीबद्दल काहीही बोलायला ट्विटरसारखं साधन का वापरावे? ट्विटर हा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे का? ट्विटरवरचं ट्विट कधीही उडवत येतं. रंगबदलू राजकारण्यांच्या या दुनियेत ट्रम्प तात्यांनी "मी असं बोललोच नव्हतो." असं म्हटलं तर काय.. मुळात मोठ्या पदावरची ही माणसं ट्विटर वापरतातच कशासाठी?

In reply to by चिनार

अहो नुसतं ट्विट उडवण्याबद्दल काय सांगता, इकडे अक्खा छापील स्वरूपातला अग्रलेख परत मागे घेता येतो. ह. घ्या.

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा यांनी जे लिहिले आहे ते महत्वाचे आहे. पक्ष, व्यक्ती याबद्दल नाहक आपुलकीतून ते लिहिलेले नाही.

वसंत डावखरे वारले. अधिक माहिती : http://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-ncp-leader-vasant-davkhar… या निमित्ताने डावखऱ्यांनी मुंबऱ्याची इशरतजहा नामे दहशतवादी तरुणी गचकल्यावर तिच्या घरी जाऊन एक लाख रुपयांची मदत केल्याची आठवण झाली. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हो, मलापण तीच गोष्ट आठवली. आता ह्यापुढे दहशतवाद्यांच्या नावे रुग्णवाहिका कोण चालू करणार ?(एकजण आहे म्हणा.)

देशात आधार कार्ड ची सक्ती झाल्यावर ८०,००० शिक्षक ऐकापेक्षा जास्त (प्रसं गी तिनसुद्धा) शाळा काॅलेज मध्ये पुर्ण वेळ नौकरी करतात अस आढळुन आले आहे !! m.timesofindia.com/india/aadhaar-helped-identify-80000-ghost-teachers-in-higher-education-institutions/articleshow/62383881.cms

अर्थव्यवस्था Govt lowers forecast: GDP growth to hit four-year-low at 6.5% Sunil Kumar Sinha, Principal Economist, India Ratings & Research, said, “Instead of accelerating from 7.1 per cent (GDP growth witnessed in FY17), the GDP growth is likely to slip by 60 basis points in the current fiscal. The predominant narrative would be to attribute this slowdown to the adverse impact of demonetisation and implementation of GST. No doubt both these measures have had adverse impact on the GDP growth and were more pronounced in case of manufacturing sector. आजकाल अर्थव्यवस्थेवरील कोणतीही बातमी gst च्या चुकीच्या अमलबजावणी मुळे आणि नोटबंदी च्या मुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ सांगितल्याशिवाय पूर्ण होत नाही, मग ते अर्थतज्ञ असो व पत्रकार. यावरून या दोन घटकांची सर्वमान्यता लक्ष्यात यावी.

ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे. दाऊदला पाकिस्तानातून फरफटत आणणार होते त्याचे काय झाले?

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांचा कारावास आणि 5 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालूंना या प्रकरणी जामीन मिळणार नाही. दंड भरला नाही, तर लालूंना सहा महिने अधिक तुरुंगात राहावं लागेल. http://abpmajha.abplive.in/india/lalu-prasad-yadav-sentenced-to-3-years…

In reply to by प्रसाद_१९८२

९०० कोटींचा घोटाळा केलेल्या व्यक्तीला ५ लाख रुपये दंड फक्त? त्यांनी काय कुणाची कोंबडी चोरली आहे काय? गेला बाजार ९०० कोटींचा १ टक्का जरी यांच्या खिशात गेला असेल तरी ते ९ कोटी होतात.

In reply to by आनन्दा

हे सार्वजनिक गुपित आहे. मेवानीला पुढे आणून गुजरातमध्ये भाजपला शह देणे हाच काँग्रेसचा हेतू आहे. यापूर्वी काँग्रेसने उ. प्र. मध्ये हाच खेळ खेळला होता काशीरामला पुढे आणले होते. अर्थात काशीरामने उ. प्र. मध्ये काँग्रेस संपविली. गुजरातमध्ये काँग्रेसने मेवाणीला जास्त ढील दिली तर तिथूनही काँग्रेस संपेल.

नवीन पिढीच्या शीख तरुणांमध्ये खलिस्तान चळवळी बद्दल आस्था वाढत चालीय का याबाबत माझ्या मनात नेहमी शंका येत असते, याबाबत इथे मी पूर्वी एक प्रतिसाद लिहला होता. पंजाब पेक्षा परदेशातील शीख तरुण जास्त कट्टर आणि भारत विरोधी होत चालले आहेत असे दिसते. 1. काही दिवसांपूर्वी कॅनडा मधील गुरुद्वारा नि भारतीय दुतावसातील अधिकाऱ्यावर गुरुद्वारात येण्यात बंदी घातली आहे. कॅनडा मधील अनेक गुरुद्वारा हे खलिस्तानी कट्टरवादी संघटनांचे अड्डे आहेत. 2. कॅनडा मधील हे लोन अमेरिकेत पसरले आहे, अमेरिकेतील 96 गुरुद्वारा नि भारतीय अधिकारी, संघाचे आणि शिवसेने चे कार्यकर्ते यांना बंदी घातलीय. 16 more gurdwaras in Canada, 96 in US ban entry of Indian officials 3. ब्रिटन मध्ये सुद्धा अनेक गुरुद्वारानी हीच भूमिका घेतलीय. तसेच एका सरकारी सर्वेमध्ये जवळपास 20% शीख लोकांनी आपलं मूळ भारतीय आहे हे सांगण्यास नकार दिला. 4. अनेक शीख लोकांना पूर्वी त्यांचे खलिस्तान चळवळीशी संबंध होते म्हणून भारतात यायला बंदी आहे. ही बंदी उठवावी असे त्यांचे मागणे आहे आणि मोदी नि तसे आश्वासन दिलेलं पण जे अजून पूर्ण झालेलं नाही त्यामुळे अनेक जुन्या लोकात नाराजी आहे. 5. पंजाब मधील शीख तरुणांच्या मध्ये RSS आणि शिवसेना ह्या संघटनाबद्दल तिरस्कार आहे. अनेक rss नेत्यांच्या हत्या होतात आणि आरोपी सापडले जात नाहीत किंवा त्यांना शिक्षा होत नाही. मध्यनतरी rss च्या पंजाब प्रमुखांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तेंव्हासुद्धा ना rss कडून तीव्र प्रतिक्रिया आली ना bjp कडून. 6. पंजाब मधील तरुणांच्या मध्ये सुद्धा असंतोष वाढत चाललाय असे मला वाटते, देशात आणि देशाबाहेर शीख तरुणांमध्ये विष पेरण्यात पाकिस्तान चा मोठा हातभार आहे. सरकार ने योग्य ती पावले उचलली पाहिजेत आणि ते ती उचलली असावीत अशी आशा आहे.

In reply to by अमितदादा

अमितदादा, भारतीयांना विशेषत: शिवसेनेस गर्भागारात प्रतिबंध करणारे तथाकथित शीख फाट्यावर मारायच्या लायकीचे आहेत. १९८४ च्या शीखविरोधी दंगलींचा हवाला देऊन ते बंदी घालू इच्छितात. पण याच दंगलीत बाळासाहेबांनी मुंबईतल्या शिखांचा केसही वाकडा होऊ दिला नाही. सगळे शीख याप्रती आवर्जून कृतज्ञता व्यक्त करतात. मग शिवसेनेस बंदी कशासाठी? खाल्ल्या ताटात हा#णे म्हणतात ते हेच. जणू वाहेगुरूंना फार संतोष होणारे अशाने. आ.न., -गा.पै.

In reply to by अमितदादा

परदेशातील विशेषतः कॅनडातील शिखांचा पूर्वीपासूनच खलिस्तानला सक्रीय पाठिंबा होता. खलिस्तानी अतिरेक्यांना आर्थिक पुरवठा मुख्यत्वेकरून कॅनडा व इंग्लंडमधील शिखांकडून होत होता. १९८५ मध्ये एअर इंडिया कॅनडाहून भारतात येणार्‍या कनिष्क विमानात बाँब ठेवून पाडणारे कॅनडातील शीख होते. खलिस्तान चळवळ १९९५ मध्ये मृत झाली तरीसुद्धा कॅनडा व अमेरिकेतील गुरूद्वारातून ती चळ्वळ जिवंत ठेवण्याचे प्रयत्न सुरूच होते. अमेरिकेत स्थायिक झालेला गुरमीत सिंग औलख नावाचा शीख अमेरिकेत सातत्याने भारतविरोधी व खलिस्तानच्या बाजूने प्रचार करीत होता. तो स्वतःला कौन्सिल ऑफ खलिस्तानचा स्वयंघोषित अध्यक्ष मानायचा. अमेरिकेतील खासदारांना सातत्याने पत्रे लिहून भारतविरोधी गरळ ओकणे, अमेरिका व कॅनडातील गुरूद्वारांना भेटी देऊन खलिस्तानचा प्रचार करून आर्थिक सहाय्य मिळवायचे, तेथील वर्तमानपत्रातून लेख लिहून भारतात शिखांवर अत्याचार सुरू आहेत याचा प्रगोगंडा करायचा हे त्याचे उद्योग १९९५ नंतरही सुरू होते. इंग्लंडमधील शीख सुद्धा यात मागे नव्हते. खलिस्तानचा स्वयंघोषित अध्यक्ष जगजितसिंग चौहान याला इंग्लंडने आश्रय दिला होता व भारताने अनेकवेळा मागणी करूनसुद्धा इंग्लंडने त्याचे भारतात प्रत्यार्पण केले नव्हते. त्यामुळे अमेरिका, कॅनडा, इंग्लंड इ. देशातील खलिस्तानवाद्यांचा प्रचार नव्याने सुरू झाला नसून तो ८० च्या दशकापासून सुरू आहे. २००७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग कॅनडाला एका कार्यक्रमात गेले असताना व्यासपीठाच्या मागे टांगलेल्या बॅनरवर खलिस्तानबद्दल लिहिले होते. त्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर "मी तो बॅनर पाहिलाच नव्हता" अशी सारवासारव अमरिंदर सिंगांनी केली होती. १९९० च्या दशकात मी सिंगापुरमध्ये असताना कॅबची वाट पहात होतो. माझ्यानंतर एक म्हातारा शीख एका चिनी व्यक्तीबरोबर आला. ते दोघेही कॅबची वाट पाहू लागले. लांबून कॅब येताना दिसल्यावर मी पुढे आल्याचे पाहून तो म्हातारा चवताळला. कॅबमध्ये मीच आधी चढणार असे त्याने सांगायला सुरूवात केली. मी आधी आलो आहे हे त्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तो भडकून भारताला शिव्या द्यायला लागला. भारतीय सैनिकांनी पंजाबमध्ये शिखांना मारून टाकले, आमच्या महिलांवर बलात्कार केले, आम्ही खलिस्तान मिळविणारच असे तो जोरजोरात बडबडायला लागला. त्यांच्या बरोबरचा चिनी त्याच्या संतापामुळे स्वतःची करमणूक करून घेत होता. ९० च्याच दशकात अमेरिकेतील डेट्रॉईटमध्ये माझ्या बरोबर एक शीख तरूण काम करीत होता. तो दर रविवारी कॅनडातील गुरूद्वारात जाऊन खलिस्तान चळवळीची पत्रके घेऊन यायचा. त्याने ती पत्रके स्वतःच्या क्युबिकलमध्ये सुद्धा ठेवली होती. आपल्या गाडीवर मागच्या बाजूला त्याने "इंडीया आउट ऑफ खलिस्तान" असे रंगवून घेतले होते. त्याच्या म्हणण्यानुसार कॅनडात खलिस्तानवाद्यांची स्वतःची रेडीओवर काही एफएम वाहिन्या आहेत व त्यावर नियमितपणे खलिस्तानचा प्रचार केला जातो. माझ्या कंपनीतील इतर भारतीयांनी त्याच्यावर बहिष्कार टाकून त्याला एकटे पाडल्यावर त्याने आमच्यात येऊन प्रचार करणे थांबविले होते. एकंदरीत खलिस्तानला परदेशातील शिखांचा पूर्वीपासूनच पाठिंबा होता व खलिस्तान सत्यात येणार यावर ते अजूनही आशावादी आहेत. सुदैवाने पंजाबमधील स्थानिक शिखांनी वस्तुस्थितीचा स्वीकार करून खलिस्तानची मागणी सोडून देऊन शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु परदेशातील शिखांना अजूनही आशा आहे.

एन.पी.ए चे ऑगस्ट १७ पर्यंतच्या डेटाचे एक अ‍ॅनॅलिसिस वाचनात आले: - - ३८ बँकांचे बॅड लोन [ग्रॉस एन.पी.ए]- ८ लाख कोटींहून जास्त. एकूण बँकांकडून दिल्या जाणार्‍या लोन्स च्या ११% पर्यंत ही रक्कम आता जाते. ९०% बँका सरकारी. - मार्च १४ मधे हा आकडा २.५ लाख कोटीं पर्यंत होता. सप्टें १५ मधे हा आकडा ३.५ लाख कोटींपर्यंत होता. - तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी २०१६ मधे Asset Quality Review (AQR) सुरू केला. यामुळे बँकांना बॅड लोन्स चा खरा आकडा जाहीर करणे भाग पडले, जे बॅलन्स शीट मधे दाखवल्या जात नव्हते. त्यानंतर ७ क्वार्टर्स मधे हा आकडा दुप्पटीहून जास्त झालेला आहे. नेट एन.पी.ए कमी असणार. कारण त्यात बँकांनी बॅलन्सशीट मधे केलेली सोय धरून ते कमी करण्यात येते. अर्थात् त्यासाठीचा फॉर्म्युला बराच मोठा आहे. पण याचा अर्थ एवढा की जेवढी प्रोव्हीजन बँकेला यासाठी करावी लागणार तेवढा त्यांच्यावर येणारा ताण वाढत जाणार. सद्यस्थिती, त्यावरील काही उपाय आणि त्याचबरोबर या स्थितीचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यांची माहिती शोधावी म्हणतो.

विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगाडिया काल बेपत्ता होते. राजस्थान पोलिसांना एका जुन्या केससंदर्भात ते हवे होते. त्यांच्या घरी राजस्थान पोलिस पोहोचले असताना तोगाडिया घरी नाहीत असे समजले आणि बराच काळ ते बेपत्ता होते. रात्री ते बेशुध्द अवस्थेत सापडले. शुध्दीवर आल्यानंतर पोलिस आपला एनकाऊंटर करणार होते असे ते म्हणाले. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/plan-was-being-made-… तोगाडिया आणि मोदींचे अजिबात पटत नाही ही अगदी जगजाहिर गोष्ट आहे. तोगाडिया आता मोदींविरोधात काही बोलले तर समस्त बुबुडाविपुमाधवि ब्रिगेड तोगाडियांच्या बाजूने बोलायला लागेल आणि आयरनी परत एकदा शंभर नाही तर हजारदा मरेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

तोगाडिया आता मोदींविरोधात काही बोलले तर समस्त बुबुडाविपुमाधवि ब्रिगेड तोगाडियांच्या बाजूने बोलायला लागेल आणि आयरनी परत एकदा शंभर नाही तर हजारदा मरेल.
सुरवात झालेलीच दिसते. आज हार्दिक पटेल आणि काँग्रेस नेते अर्जुन मोधवाडिया यांनी तोगाडियांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आहे. एकूणच मोदी या एका माणसाला विरोध करायचा म्हणून सगळे (दोन्ही बाजूंचे) विरोधक हातमिळवणी करताना दिसत आहेत. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा विरूध्द इतर सगळे अशी लढत झाली होती त्याप्रकारेच २०१९ मध्ये मोदी विरूध्द इतर सगळे अशी लढत होईल असे दिसते. विरोधकांशी भाजपमधील अडवाणी, यशवंत सिन्हा, शांताकुमार इत्यादी म्हातार्‍यांनी हातमिळवणी केली तरी आश्चर्य वाटू नये.

In reply to by कपिलमुनी

तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे? डोकलाममधे असे काही झालेच नाही? किंवा काहीतरी झाले, पण चीनने माघार वगैरे काही घेतली नाही, तरीही आपण उगाच तसे म्हणत आहोत ?

In reply to by प्रदीप

तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे? डोकलाममधे असे काही झालेच नाही? किंवा काहीतरी झाले, पण चीनने माघार वगैरे काही घेतली नाही, तरीही आपण उगाच तसे म्हणत आहोत ?
तसे नाहीए, चीनने तात्पुरती माघार घेऊन वापस येऊन अपेक्षेपेक्षा त्यांनी आधीपेक्षा जास्तच तयारी केली आहे.

In reply to by माहितगार

काय नक्की अभिप्रेत आहे ते. कारण त्यांनी 'फेक' शब्द वापरलाय, म्हणून विचारतोय. वास्तवात चीनने, आपण ह्या प्रकरणात इतके नेट लावू, असे जमेस धरलेच नव्हते. तेव्हा ह्या प्रकरणात खरे तर त्यांचा 'लॉस ऑफ फेस' झाला. आता ते पुढे काहीतरी कुरापत काढणार, ह्याविषयी कुणाच्याही मनांत संदेह नसावा. तेव्हा आपणही तशी तयारी ठेवली असेलच, अथवा तशी ती सुरू असेल. इथे हेही लक्षात घेतले पाहिजे की झाल्या प्रकरणी आपल्या सरकारने कुठेच कसलाही गाजावाजा केला नाही. अतिशय संयत प्रकारे आपण (म्हणजे आपल्या सरकारने) हे सर्व प्रकरण हाताळले. आणि हे 'आप'ण समजत नसलो, तरी जगास ते समजले आहे. आता कधीतरी पुन्हा गेल्या वेळेसारखीच परिस्थिती उदभवेल, तेव्हा आपल्याकडील अनेकजण 'पाहिलंत, कसली माघार, कसले काय' असे काहीतरी म्हणणार! जागतिक राजकारणात, गल्लीतील गणिते लागू नाहीत, हे त्यांना कोण सांगणार?

In reply to by प्रदीप

जागतिक राजकारणात, गल्लीतील गणिते लागू नाहीत, हे त्यांना कोण सांगणार? बैलाचा डोळा ! खरं तर हे सगळे माहिती असले तरीही, भारतात हीच मानसिकता (देशाचे हित गेले खड्ड्यात असे मनातल्या मनात म्हणत) गल्लीपासून दिल्लीपर्यंत दाखवली जात आहे (दुर्दैवाने) ! (कपाळावर हात मारणारी स्मायली) :(

In reply to by प्रदीप

ते कपिलमुनी मोदी रुग्ण आहेत. मोदी विरुद्ध लिहिण्यासाठी काहीतरी शोधात असतात. फेक ऑर्गझम सारखे शब्दप्रयोग करून सनसनाटी निर्माण करण्याचा हा भंपक प्रयत्न आहे. चीन काही डॉकलामवरून कायमचा परत जाईल अशी अंधश्रद्धा सरकारची किंवा लष्कराची अजिबात नाही. याला कडेलोटाचे राजकारण(BRINKMANSHIP) म्हणतात. तेंव्हा तो परत तेथे येईल हि शक्यता १०० % होतीच म्हणून भारताने आपले "टेहळणी उपग्रह" तेथे केंद्रित केलेले आहेत. त्यातूनच आलेल्या बातम्या आहेत या. भारत सरकार काय करते ते पाहू असा त्यांचा विचार आहे. उगाच काहीतरी सनसनाटी करून जीव रमवायचा झालं. दुर्लक्ष करा

In reply to by सुबोध खरे

केले असते, पण पोरकटपणाला काही सीमा असावी? मी चीनच्या उंबरठ्यावर रहातो, आणि ते तीन-चार महिने त्यांची चाललेली उलाघाल अतिशय जवळून पहात होतो. 'धरताही येत नाही, सोडताही येत नाही' अशी त्यांची परिस्थिती झाली होती. नेहमीप्रमाणे दात-ओठ खाऊन चिनी ऑपेरातील पात्रांचे बरेच ठणठणाटी प्रयोग झाले. त्या सर्वात, आपले सरकार अतिशय शांत होते. अर्थात पडद्याआड त्यांचे संपर्क झाले असणार, काही मार्ग काढण्याचे प्रयत्न झाले असणार. अशा प्रसंगी समोरच्याला 'सुटकेचा मार्ग' (एस्केप रूट) ठेवणे जरूर आहे, कारण त्यांना त्यांच्या जनतेस तोड दाखवायचे आहे. ते सर्व आपण अतिशय मुत्सद्दीपणे निभावून नेले. ह्याचे नीट समजून, कौतुक करायचे का नुसतेच तिरस्करणीय उद्गार काढत बसायचे?

In reply to by सुबोध खरे

मोदींना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करता यावी यासाठी त्यांच्या काळात भारतावर काहीतरी संकट येऊन भारताचे नुकसान व्हावे यासाठी अनेकजण कासावीस झाले आहेत. यासाठी ते चीन, पाकिस्तानशी हातमिळवणीही करीत आहेत. 'नवरा मेला तरी चालेल, पण सवत रंडकी व्हायला पाहिजे' ही देशद्रोही मानसिकता यामागे आहे.

In reply to by कपिलमुनी

केजरीवालच्या उदयानंतर बऱ्याच जणांना सच्ची लोकशाही अवतरल्याचा अॉर्ग्याझम झाला होता.काळाच्या कसोटीवर तो अॉर्ग्याझम भंपक आणि दिखावू होता हे सिद्ध झाल्याने त्यांना नैराश्याचा जो प्रचंड असा झटका बसलाय त्यातून हे नवेनवे शोध लावले जाताहेत. माझं "अॉर्ग्याझम" वांझोटं ठरलं,मग काय झालं ? त्याच कसोटीवर बाकीच्याची मापे काढण्याचा निसर्गदत्त अधिकार मला आहे.

त्रिपुरात 18 फेब्रुवारी, मेघालय-नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान! पुन्हा ते कामधन्दे सोडून प्रचार करत बसणार

In reply to by कपिलमुनी

>>> पुन्हा ते कामधन्दे सोडून प्रचार करत बसणार त्यांना कामधंदे होते कधी? म्हणून तर दोनदोन महिने Bangkok ला मुक्काम ठोकतात किंवा चुकुन भारताच्या दौ-यावर असले तर सद-यावरून जानवे परीधान करून दिसेल त्या देवळात घुसतात.

iCreate मधील आय (i) हे अक्षर लहान का ठेवण्यात आले आहे, यासंदर्भात माहितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आय (i) चे मोठे होणे क्रिएटिव्हिटीमध्ये अडथळा आणणारे होते. त्यामुळे iCreate मधील i हा लहान करण्यात आला आहे. तसचे, यामध्ये जर आय (i) मोठा असता तर यामध्ये महत्वाचा असा अहंकार आडवा आला असता. यामुळे सुरुवातीपासूनच लहान आय करुन मोठी स्वप्ने पाहिली आहेत.

अग्नी ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची पाचवी आणि शेवटची (संपूर्ण अणूशस्त्रसकटची) चाचणी आज यशस्वी झाली. हे आता ट्रकवर बसवलेल्या नळकांड्यातून डागले गेले आणि आता फक्त लष्करातर्फे होणाऱ्या (user trial) केल्या की ते लष्करात समाविष्ट केले जाईल. याचा टप्पा चीनच्या सर्वात दूर भागात पोहोचण्याइतका आहे त्यामुळे आता भारत अख्ख्याचीनभर कोठेही क्षेपणास्त्र पाठवू शकतो. https://timesofindia.indiatimes.com/india/india-test-fires-nuclear-capa…

In reply to by सुबोध खरे

https://www.nytimes.com/2018/01/18/world/asia/india-ballistic-missile-i… China has criticized India’s development of the Agni 5 in the past. After an early test of the missile, Du Wenlong, a researcher at the Chinese Academy of Military Science, told the Global Times that the Agni 5 had a strike range of about 5,000 miles, rather than 3,000 miles. He said the Indian government had deliberately played down its range “to avoid causing concern to other countries.” कांगावा सुरु झाला आहे, पण हे खरे असेल तर बसू दे बोंबलत.