मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निश्चलनीकरण सर्वेक्षण

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
निश्चलीकरण या अत्यंत धाडसी व महत्वाच्या निर्णयाला नुकतेच १ वर्ष पूर्ण झाले. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी संध्याकाळी ८ वाजता जाहीर केल्यानंतर देशात प्रचंड खळबळ माजली होती. काळा पैसा बाहेर काढणे, बनावट चलनाला आळा घालणे अशी काही प्रमुख उद्दिष्टे या निर्णयामागे होती असे सांगण्यात आले होते. या निर्णयाला काही जणांनी प्रचंड पाठिंबा दिला तर काही जणांनी कडाडून टीका केली. आज एक वर्षानंतर सुद्धा हेच चित्र कायम आहे. निश्चलीकरणामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, अनेकांचे प्रचंड नुकसान झाले, देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली, देशाच्या प्रगतीचा वेग मंदावला, अनेक उद्योगधंदे बंद पडले असे दावे अनेकजण करीत असताना या निर्णयामुळे काहीही नुकसान झाले नाही, रोखरहीत व्यवहार वाढल्याने भ्रष्टाचार कमी झाला, बनावट चलन नष्ट झाले, मालमत्ता करासारखी अनेक थकित बिले वसूल झाली, बँकांकडे मोठ्या प्रमाणात चलन जमा झाल्याने व्याजाचे दर कमी झाले इ. दावे या निर्णयाचे समर्थक करीत आहेत. आज एक वर्ष उलटल्यानंतर याच विषयावर मिपांकरांची मते जाणून घ्यावीत या उद्देशाने हे सर्वक्षण करीत आहे. खालील प्रश्नांवर ० ते १० या कक्षेत प्रश्नांचे मूल्यांकन करता येईल. ० गुण = उद्दिष्ट अजिबात साध्य झाले नाही/अजिबात नाही १ गुण = उद्दिष्ट अगदी किंचित प्रमाणात साध्य झाले/अगदी किंचित २ गुण = उद्दिष्ट अगदी थोड्या प्रमाणात साध्य झाले/अगदी थोड्या प्रमाणात . . ५ गुण - अर्धे उद्दिष्ट पूर्ण झाले (किंवा अर्धे उद्दिष्ट अपूर्ण आहे)/मध्यम प्रमाणात . . ८ गुण - उद्दिष्ट बर्‍याच प्रमाणात साध्य झाले/बर्‍याच प्रमाणात ९ गुण - उद्दिष्ट बहुतांशी साध्य झाले/खूप जास्त प्रमाणात १० गुण - उद्दिष्ट पूर्ण साध्य झाले/अत्यंत जास्त प्रमाणात असे गुणांकन करता येईल. गुणांकन करताना फक्त गुण न देता त्याविषयी सविस्तर स्पष्टीकरण, स्वानुभव इ. आकडेवारीनिशी लिहिल्यास जास्त चांगले. प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते? प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले? प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का?

वाचने 39176 वाचनखूण प्रतिक्रिया 207

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी Fri, 12/15/2017 - 15:37
त्यात कसला विरोधाभास? तळाचा फलंदाज पोकळ बांबू घेऊन फलंदाजीला येणे आणि शेकाटून घेणे हाच खरा विरोधाभास.

In reply to by arunjoshi123

मार्मिक गोडसे Fri, 12/15/2017 - 11:45
ह्यात तुम्ही पार्श्वभाग सोडून उरलेले मोदी असं लिहिलं आहे का? अता खोटं का बोलताय? सारवासारव का करताय? मी जे काही म्हटलेच नाही तर सारवसारवी करायचा प्रश्नच येत नाही. हां! तुमच्या जिभेला तो भाग चाटायची सवय झाली असल्याने जळी - स्थळी, काष्ठी - पाषाणी तेच दिसत असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. ???? तुमच्याकडच्या पाककृती आम्हाला नै ठाऊक. घरच्यांना विचारुन बघा नक्की काय चाटवले होते ते. पोकळ बांबू स्वतःच्याच काही कामासाठी घेतला होता का मग शब्दशः अर्थ नसतो घ्यायचा. "डोळ्यात झणझणीत अंजन घातले" म्हणजे खरोखरच मांडीवर डोके घेउन डोळ्यात अंजन घालत नाही, तसं. काऊंटरपार्टिला कसं काय देणं घेणं नाही?

In reply to by मार्मिक गोडसे

arunjoshi123 Fri, 12/15/2017 - 12:22
मी जे काही म्हटलेच नाही तर सारवसारवी करायचा प्रश्नच येत नाही.
तुम्ही काय म्हटलेच नाही? पोकळ बांबू घेऊन सात्विक संतापाने, तावातावाने मोदी यायची वाट बघत तुम्ही का थांबला होतात? तुमचा पोकळ बांबू एक एक्झॉटिक पीस ऑफ आर्ट आहे का जो मोदींना दाखवायचा होता? गांधीनगरच्या व्हायब्रंट गुजरातच्या एक्स्पोमधे तुमच्याकडे बांबू प्रदशनार्थ मांडायला स्टॉल हवा म्हणून मागणी करायला सँपल म्हणून घेऊन गेला होतात का? आणि नेमके मोदी ज्या चौकात नोटबंदीच्या त्रासाची शिक्षा घ्यायला जाणार तिथेच या मागण्या मांडण्याचं औचित्य काय? --------------- तो पार्श्वभाग तुम्हाला अभिप्रेत नव्हता असं म्हणताय तर मी मानतो. जास्त हेत्वारोप करू नये. पण मोदींना पोकळ बांबूच्या फोकाने मारायचं नव्हतं पोकळ बांबूचं फोक नेलं कशाला हे काही समजत नाही. तुम्हाला सर्वत्र पोकळ बांबूचे फोक घेऊन फिरायची सवय आहे का? मंजे ते रामदास स्वामी हातात एक छडी टाईप घेऊन फिरायचे तसे? इस पोकळ बांबू के फोक का राज क्या है? ===================================== तुम्हाला मोदींना मारायचं नव्हतं असं एकदा म्हणता. एकदा "मी पार्श्वभाग कुठे म्हणालो" असं म्हणता, मंजे तुम्हाला अन्यत्र कुठे मारायचं होतं! एकदा मंता मला मारायचा कायदेशीर अधिकार नाही. आता नक्की काय ते कळेल का? पलटी मारायची ट्रेनिंग कुठल्या शिबिरात घेतली? आणि कुठे कुठे मारणे अभिप्रेत होते ते सांगा, मी काही गृहितक करणार नाही. ====================================
हां! तुमच्या जिभेला तो भाग चाटायची सवय झाली असल्याने जळी - स्थळी, काष्ठी - पाषाणी तेच दिसत असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे.
चाटण्यासंबंधित सगळे उल्लेख बघा. अगदी सर्वात पहिल्या उल्लेखापासून. हा तिसरा --चौथा असेल. तुम्हीच करताय सारे उल्लेख! नीट बघा! ब्रह्मतत्व अखील ब्रह्मांडात भरून दिसल्याप्रमाणे सर्वत्र "तेच दिसणे" हे मला लागू होत नाही. ======================================
घरच्यांना विचारुन बघा नक्की काय चाटवले होते ते.
ही भाषा, ही मानसिकता तथाकथित पुरोगामी संस्कृतीची ओळख आहे. असो, आपले सर्व कुटुंबीय आम्हाला आदरणीय आहेत आणि आम्ही कधी त्यांचेबद्दल असा घाणेरडा विचार करणार नाही.

In reply to by arunjoshi123

मार्मिक गोडसे Fri, 12/15/2017 - 12:33
जिथे तिथे माझे नाव घेवून तुम्ही पोकळ बांबूचा उल्लेख करून नको ते शब्द माझ्या तोंडी घालत होता म्हणून मला खुलासा करावा लागला. कोण बाह्या वर खाली करतंय किंवा कोण लग्न का करत नाही ह्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही आणि तुम्ही हे मला सांगन्याचे प्रयोजन काय?

In reply to by मार्मिक गोडसे

arunjoshi123 Fri, 12/15/2017 - 14:02
जिथे तिथे माझे नाव घेवून तुम्ही पोकळ बांबूचा उल्लेख करून नको ते शब्द माझ्या तोंडी घालत होता म्हणून मला खुलासा करावा लागला.
मोदी ज्या चौकात शिक्षा भोगायला जाणार तिथे सुप्रसिद्ध पोकळ बांबूचे फोक घेऊन जाण्याची भाषा तुम्हीच प्रथम केलीत. वर मी तुमच्या लेखातला कोट तशास तसा दिला आहे. तो पुन्हा वाचा. मी प्रामाणिकपणे सांगतो, मला तुमच्या तोंडी नको ते कोणतेही शब्द घालायची मुळ्ळिच इछ्छा नाही (तुमची माझ्या तोंडात काय काय घालताय केव्हाचे, तरी). ================= सुप्रसिद्ध बांबूचे फोक घेऊन उभे राहणे, नेहमी नेहमी बाह्या सरसावणे ही चांगली लक्षणं नाहीत असं माझं अहिंसावादी मत आहे. तुम्ही भक्तांना वाटेल ती विशेषणे लावता आणि लोकांच्या कुटूंबियांचे अवमानास्पद उल्लेख करता हे अयोग्य आहे. हीच का ती पुरोगामीता? आणि तुमच्या प्रतिसादांना टाळ्या वाजवणारे मित्र तुम्हाला भाषा सांभाळायला का नाही सांगत? आम्ही तुमचा आणि तुमच्या घरच्यांच्या चरित्रांचा आदर करू इच्छितो म्हणून तुम्ही आमच्या साज्जन्याचा अवाजवी फायदा नाही घेतला पाहिजे. तुमच्या पहिल्या काही प्रतिसादांत तुम्हाला मला "पार्श्वभाग चाटणारा" म्हणायचे हे देखिल माझ्या लक्षात आलं नाही इतकी तुमची प्रतिमा चांगली धरून चालत होतो मी. आता शेवटी तुम्ही सुस्पष्ट लिहिलेत तेव्हा कळलं कि तुमची मानसिकता कशी आहे. =============== प्रामाणिकपणे म्हणा ना, तो लेख लिहित होतात तेव्हा बांबूने मोदींना मारायची मनोमन इच्छा होती. पंतप्रधानांबद्दल अशी जाहीर ईच्छा व्यक्त केल्याबद्दल काय करता येईल ते पाहू.

In reply to by मार्मिक गोडसे

arunjoshi123 Fri, 12/15/2017 - 14:18
जिथे तिथे माझे नाव घेवून
देशाच्या पंतप्रधानांना "व्यक्तिगत भौतिक इजा" ती ही "स्वतःच्या व्यक्तिगत पातळीवर" करायची इच्छा आपण व्यक्त केलीत असा माझा आरोप आहे, ते ही मिपासारख्या जाहिर मंचावर. हे थोडं अति आहे. ------------- आणि तुम्ही सांगतही नाही फोकाचं काम काय होतं. म्हणून आमच्या लाडक्या पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेसाठी, पदाच्या प्रतिष्ठेसाठी हे कार्य हाती घेणं आवश्यक वाटतं.

In reply to by arunjoshi123

मार्मिक गोडसे Fri, 12/15/2017 - 15:10
देशाच्या पंतप्रधानांना "व्यक्तिगत भौतिक इजा" ती ही "स्वतःच्या व्यक्तिगत पातळीवर" करायची इच्छा आपण व्यक्त केलीत असा माझा आरोप आहे, ते ही मिपासारख्या जाहिर मंचावर. हे थोडं अति आहे. वेड पांघरून पेडगावला जावू नका. मी न उल्लखलेले शब्द माझ्या तोंडी कोणी घातलेय? त्यावर मी मिपावरच खुलासा केला आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

arunjoshi123 Fri, 12/15/2017 - 15:30
मागो, तुम्ही न उल्लेखलेला "पार्श्वभागावर मारायचं होतं" हा शब्द केव्हाच मागे घेतला आहे. पण तो पोकळ बांबू कशाला घेतला होतात? ============= पोकळ बांबू कशाला? त्मच्या खुलास्यामधे तुम्ही पोकळ बांबू कशाला ते लिहिलं नाही. कुठे मारणार नाही ते लिहिलं आहे, मारणार नाही (खरंतर मंजे कायद्याने मारू शकत नाही असं) असा खुलासा केला आहे. पण पोकळ बांबू कशाला हा खुलासा नै केला. ====================== पुन्हा - पोकळ बांबू घेऊन मी थांबलोच होतो असं तुम्हीच सर्वप्रथम म्हणाला होतात ना? ते मी नाही ना म्हटलं? मग त्याचं प्रयोजन काय? तुम्हाला जे जे म्हणायचं नव्हतं ते ते सर्व मी मान्य करतोय. आप बस मुझे वो चौराहे में पोकळ बांबू का फोक धारण करने का राज बताव। ===================================== कि भारत या लोकशाही देशात प्रत्येक नागरिकास कोणत्याही चौकात कोणत्याही वेळी कितीही वेळ कोणत्याही प्रकारचे पोकळ बांबूचे फोक घेऊन उभे राहण्याचा घटनादत्त अधिकार आहे म्हणून उभे राहीला होतात?

In reply to by मार्मिक गोडसे

arunjoshi123 Fri, 12/15/2017 - 14:24
तुम्ही हे मला सांगन्याचे प्रयोजन काय?
राहुल गांधी पुरोगाम्यांचे एवढे मोठे पक्षाध्यक्ष असूनही फक्त बाह्या सरसावतात. तुम्ही एक सामान्य पुरोगामी असून देखील पोकळ बांबूचे फोक मिरविता. ही काय पद्धत झाली? असं मला म्हणायचं होतं. ============================ तुमच्या मनात काय आलं? नक्कीच कायतरी सॉलिड आलं असणार. बाह्या सरसावून काय काय करतात बरे??!!!

In reply to by arunjoshi123

मार्मिक गोडसे Fri, 12/15/2017 - 15:18
तुम्ही एक सामान्य पुरोगामी असून देखील पोकळ बांबूचे फोक मिरविता. ही काय पद्धत झाली? असं मला म्हणायचं हो स्वतःला एक सामान्य पुरोगामी हे मी कधी म्हटले आहे? तुमच्या मनात काय आलं? नक्कीच कायतरी सॉलिड आलं असणार. बाह्या सरसावून काय काय करतात बरे??!!! माझ्या मनातले जाउ द्या , तुमच्या मनात काय आले ते मला कशाला सांगताय? कुणी बाह्या सरसावो अथवा बिना लग्नाचा राहो. हे तुम्ही मला कशाला सांगत आहात ह्याचा प्रथम खुलासा करा. त्याचा आणि माझा काय संबंध?

In reply to by मार्मिक गोडसे

arunjoshi123 Fri, 12/15/2017 - 16:22
स्वतःला एक सामान्य पुरोगामी हे मी कधी म्हटले आहे?
तुम्ही स्वतःला लावाल तितकीच विशेषणे योग्य असतात असं नाही. मी कधी म्हटलं कि तुम्ही स्वतःला एक सामान्य पुरोगामी म्हटलं आहे. तुम्हाला एक सामान्य पुरोगामी मी म्हणत आहे.

In reply to by arunjoshi123

मार्मिक गोडसे Fri, 12/15/2017 - 19:31
अहो ती बोलायची पद्धत आहे. न्यायव्यवस्थे पेक्षा अजून लोकांकडून वरचा मार खाईन असं म्हणायचं होतं. हो का? पंतप्रधानांनी तुमच्या कानात असे सांगितले का? छान छान. "भर चौकात मला हाणा", "माझी धिंड काढा" हे सामान्य वाक्प्रचार आहेत. चौकात पोकळ बांबू घेऊन थांबणे हा वाक्प्रच्चार नाही. असं कोणी सांगितले तुम्हाला? 'पोकळ बांबू' हा वाक्प्रचार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्रास वापरला जातो, आणि तो शब्दश: घेतला जात नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे Fri, 12/15/2017 - 19:48
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्रास वापरला जाणारा हा वाक्प्रचार फारसा सन्माननीय कारणासाठी वापरला जात नाही हे हि आपल्याला माहीत असावे.

In reply to by मार्मिक गोडसे

arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 14:24
परंतू बरेचसे पळून जातील किंवा आयुष्यभर गुंगारा देत बसतील.
आर्थिक गुन्हेगार असे नसतात. टॅक्स वाचवायला कोणी संसार सोडतं का?

In reply to by मार्मिक गोडसे

arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 14:36
नवीन काळा पैसा निर्मितीही व्यवस्थीत चालू आहे
नाय नाय. जुनाच कसा पचेल याची चिंता आहे. ============ सरकार इतक्या कंपन्या विकायला काढत आहे त्या घ्यायला लोकांकडे पैसे नाहीत. ================ लोक फक्त २०% ते २५% ने कमिशन देऊन जुने काळे पैसे पांढरे करून बसलेत. ========================= पुण्यात मला २०१२ मधे घर घ्यायचं होतं. रेडी टू मूव. साला, एकही घर बिना ब्लॅक कंपोनंटची विकायला कोणी तयार नव्हता. मी कॅपिटल गेन्स टॅक्स इतकी अमाउंट जास्त देतो म्हटलं तरी आम्हाला कॅशच हवी म्हणायचे. आता मी मुद्दाम खवचटपणे काळे पैसे किती म्हणून एजंटांना विचारतो. सध्याला १००% पांढरे पैसे लागतात घर घ्यायला.

In reply to by arunjoshi123

मार्मिक गोडसे Fri, 12/15/2017 - 19:57
आता मी मुद्दाम खवचटपणे काळे पैसे किती म्हणून एजंटांना विचारतो. सध्याला १००% पांढरे पैसे लागतात घर घ्यायला. एजंट हुशार आहे. खवचट माणसे बरोबर तो दूर ठेवतो. काळे पैसे घेताणाचा त्या घराचा काय भाव होता आणि १०० % पांढरे पैसे घेताना त्याच घराचा काय भाव सांगितला?(चौ. फुटाचा)

In reply to by मार्मिक गोडसे

arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 14:43
सरकारला नवीन मूर्खपणा करायलाही बराच वाव आहे.
नवनविन मूर्खपणे (मूर्खपणाचं अनेकवचन) करायला मौनि गुलाम, परदेशी हेर रिमोट कंट्रोल आणि एक पप्पू असलं डेडली त्रिकूट लागतं. ============== २००४ ते २०१४ मधे असले भारी भारी मूर्खपणे झालेले आहेत की तुम्ही तो तुमचा सुप्रसिद्ध बांबुचा फोक घेऊन चौकातच मुक्काम ठोकावा.

In reply to by arunjoshi123

प्रसाद_१९८२ Fri, 12/15/2017 - 17:22
२००४ ते २०१४ मधे असले भारी भारी मूर्खपणे झालेले आहेत की तुम्ही तो तुमचा सुप्रसिद्ध बांबुचा फोक घेऊन चौकातच मुक्काम ठोकावा. === == जबरी....

सुबोध खरे गुरुवार, 12/14/2017 - 13:45
पूर्वग्रह न ठेवता वाचून पहा एक उदाहरण प्रत्यक्ष घडलेले -- एक व्यावसायिकाने निश्चलनीकरणानंतर ३२ लाख रुपये आपल्या खात्यात भरले. यांचे उत्पन्न आतापर्यंत साधारण ८ लाख रुपये वर्षाला (आयकर विवरण पत्राप्रमाणे). २०१६-१७ मध्ये यांचे उत्पन्न ४० लाख रुपये होतात. याना आयकर खात्याची नोटीस आली त्याप्रमाणे त्यांनी सांगितले कि हे उत्पन्न मागच्या चार वर्षाचे होते पण ते भरायचे "राहून गेले". आयकर खात्याने ते मान्य केले आणि या ३२ लाख रुपयावर त्यांना कर भरायला लावला. आयकर खात्याला अशा "सूचना" आहेत कि शक्यतो दंडात्मक कार्यवाही करू नका.( no cursive action -- माणसं चुकतात त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घ्यायचा प्रयत्न करा). आता हे ३२ लाख रुपये गेल्या चार वर्षाचे उत्पन्न आहे म्हणजे दर वर्षी यांचे उत्पन्न पूर्वी जाहीर केलेले ८ लाख आणि अधिक आठ लाख दर वर्षीचे मिळून १६ लाख होतात. आता या व्यावसायिकाला पुढच्या वर्षी उत्पन्न कमी दाखवणे शक्य होणार नाही. म्हणजे यापुढे हा माणूस आपले उत्पन्न खरे दाखवण्याचा प्रयत्न करेल (अन्यथा आपल्यावर आयकर खात्याची "नजर" आहे हे त्याच्या मनात परत परत येत राहते). पुढच्या वर्षी या माणसाला आपले उत्पन्न १६ लाखाच्या आसपास दाखवून त्यावर "कर" भरावा लागेल अन्यथा आपला व्यवसाय कमी कसा झाला याचे समर्थन आयकर खात्याला द्यावे लागेल. याच राहून गेलेल्या उत्पन्नासाठी कारणे दाखवा नोटीस त्याच्या "सी ए" ला पण पाठवली गेली आहे. म्हणजे तो सी ए परत अशी "चुकून झालेली" चूक करणार नाही. इतकी वर्षे काळ्या पैशाचा व्यवहार सुरळीत "चालू होता" त्यामुळे बरीच अन्यथा "प्रामाणिक" माणसे सुद्धा "मोहापायी" यात गोवली गेली आहेत. असाच एक मध्यम वर्गीय माणूस ज्याने आपले घर विकले त्यात त्याने ५० लाख रुपये चेकने घेतले आणि ३० लाख रुपये रोखीत घेतले. कारण ८० लाख चेकने देणारे ग्राहक मिळत नव्हते. मध्येच निश्चलनिकरण झाले आता याचे ३० लाख रुपये काय करावे हे त्याला सुचेना. भावाला मेहुण्याला इ लोकांना त्यांच्या खात्यात भरायला येऊनही शेवटी २५ लाख उरले. (अडीच लाखापेक्षा जास्त पैसे कोणीच स्वीकारायला तयार नव्हते.) अखेर हे पैसे त्याने खात्यात भरले. आयकर खात्याने एकंदर स्थिती पाहून त्याला २५ लाखावर ३० % दराने आयकर लावला आणि दंडात्मक कार्यवाही न करता सोडून दिले. अशा अनेक सत्य कथा आता बाहेर येत आहेत. हीच माणसे आता परत अशा व्यवहारात पडणार नाहीत कारण अशी डेमोक्लीसची तलवार डोक्यावर ठेवून सामान्य माणसे जगू इच्छित नाहीत. सिंगापूरला गेल्यावर भारतीय माणसे इकडे तिकडे थुकत नाहीत किंवा सिग्नल वर पोलीस उभा असेल तर लोक सिग्नल तोडायला जात नाहीत. तशी स्थिती निर्माण करणे हा निश्चलनीकरणाचा एक हेतू आहे. हि केवळ अर्थक्रांती नसून नैतिक क्रांती आहे असे मी याचसाठी म्हणतो. काळा चष्मा घातलेल्या लोकांना काहीच गोष्ट नीट दिसत नाही त्यांना सोडून देऊ.

In reply to by सुबोध खरे

तेजस आठवले गुरुवार, 12/14/2017 - 19:32
+१
डेमोक्लीसची तलवार डोक्यावर ठेवून सामान्य माणसे जगू इच्छित नाहीत. तशी स्थिती निर्माण करणे हा निश्चलनीकरणाचा एक हेतू आहे.
+१

In reply to by गामा पैलवान

विशुमित Fri, 12/15/2017 - 18:55
ज्यांनी २०-२५ % कमिशन देऊन काळ्याचे पांढरे केले त्यांना कसे पकडणार मग ?? ज्यांच्या नावे अघोषित संपत्ती आहे, सापडून सापडून किती सापडतील ज्याचे कोणी वाली नाही आहे ते. बाकी बोक्यांचं काय ??

babu b Fri, 12/15/2017 - 19:11
नोटाबंदी इतकी यशस्वी झाली की मोदीनी गुजरात प्रचारात नोटाबंदीला अनुल्लेखाने मारले.

In reply to by सिंथेटिक जिनियस

हाहाहाहा...खूप भारी वाटतं बिरोधी लोकांचा जळफळाट होताना बघून...भाजप हरलं तरी हरकत नाही...पण दांभिक लोकांचा भाजप जिंकण्याच्या नुसत्या कल्पनेनेदेखील जळफळाट व्हावा हे लैच भारीये!!

In reply to by सिंथेटिक जिनियस

सुबोध खरे Sat, 12/16/2017 - 00:02
..पण दांभिक लोकांचा भाजप जिंकण्याच्या नुसत्या कल्पनेनेदेखील जळफळाट व्हावा हे लैच भारीये!! किती ती जळजळ अरे अरे डायजीन घ्या.इनो पुरणार नाही.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Sat, 12/16/2017 - 15:44
नानासाहेब नेफळ्याचे नाव आता "सिंथेटिक जिनियस" ऐवजी "पॅथेटिक फसिशिअस (Pathetic Facetious)" असे ठेवण्यात येत आहे.

In reply to by सिंथेटिक जिनियस

श्रीगुरुजी Fri, 12/15/2017 - 22:50
बरोबर. यंत्रात एका बाजूने बटाटे टाकून दुस-या बाजूने सोने काढणा-या पप्पूवाणीवरच तुम्ही विश्वासार्हता ठेवणार.

In reply to by श्रीगुरुजी

कमाल आहे या हिंदुत्ववाद्यांची,एक यज्ञ करा सगळी संकटे दूर होतील असे गाजर दाखवून बहुजनांना हजारो वर्ष लुबाडणारे" गाजराचे ठोक व्यापारी "दुसर्याचे लॉजिक काढत बसले आहेत.

In reply to by सिंथेटिक जिनियस

श्रीगुरुजी Fri, 12/15/2017 - 23:43
मोठ्या प्रयासाने मिळालेला हा आयडी सुद्धा जायची चिन्हे आहेत. तो गेलाच तर सगळी भिस्त माईसाहेबवरच.

गामा पैलवान Sat, 12/16/2017 - 01:14
सिंथेटिक जिनियस,
एक यज्ञ करा सगळी संकटे दूर होतील असे गाजर दाखवून बहुजनांना हजारो वर्ष लुबाडणारे" गाजराचे ठोक व्यापारी "दुसर्याचे लॉजिक काढत बसले आहेत.
तुम्हांस लुबाडलं असेल पण म्हणून एव्हढे हज्जारो वर्षे लुबाडले जायला बहुजन मूर्ख होते काय? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

arunjoshi123 Mon, 12/18/2017 - 12:01
सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा उत्क्रांतीचा मंत्र आहे. एक सजीव आपल्यापेक्षा कमी अ‍ॅडवांटेज असलेल्या दुसर्‍या सजीवाला पिढ्यान पिढ्या शोषण करणारच! ============ उत्क्रांती झिंदाबाद.

In reply to by नितिन थत्ते

arunjoshi123 Mon, 12/18/2017 - 17:23
कसं आहे थत्ते सायेब, १६ मे २०१४ लाच मोदींनी भारतात कुठे कुठे कुठली राज्य आहेत, शेजारी कोणते देश आहेत, देशाभोबती समुद्र कोणते आहेत, केंद्र सरकारमधे कोणती मंत्रालयं आहेत, दिल्लित हिवाळ्यात किति तापमान असते हे पहिल्यांदा पाहिले. ---------- तसे ते एके सकाळी उठले तेव्हा ते पंतप्रधान झालेले त्यांना आढळले, तेव्हा त्यांनी पाहिलं कि हि पोस्ट काय असते, आपल्याला का याच्यावर बसवतायत, इ इ.

In reply to by नितिन थत्ते

arunjoshi123 Mon, 12/18/2017 - 17:49
पण तुमच्या मूळ प्रतिसादापेक्षा कमी असंबद्ध नक्कीच आहे. याच्यावर कोणतीही बेट लावायला तयार आहे. ======================== पेमेंट डीजिटायझेशन हा भारत सरकारचा बर्‍यापैकी जुना प्रयत्न आहे. तो काँग्रेसच्या काळात खूप स्लो चालू होता. पण त्याचं लिगल फ्रेमवर्क काँग्रेसनी बनवलं. त्याचे लोकल एक्सपेरिमेंट काँग्रेसनी केले. देशव्यापी स्वरुपाचा मसुदा काँग्रेसने बनवला. ------------ ते काय मोदिंनी उठून एका रात्रीत केलं नाही.

In reply to by arunjoshi123

नितिन थत्ते Mon, 12/18/2017 - 20:06
मुळात पेमेंट डिजिटायझेशन हे उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबरच्या भाषणात सांगितलंच नव्हतं. नोटबंदीची कथित उद्दिष्टं तर साध्य होत नाहीत आणि इम्प्लिमेंटेशनचा बोजवारा* उडाला आहे हे लक्षात आल्यावर कॅशलेस-लेसकॅशची पुडी सोडली गेली. त्यामुळे माझ्यामते ते भीम अ‍ॅप वगैरे ८ नोव्हेंबरला असण्याची गरज नव्हती. ते इंडिपेंडंटली याच्या गतीने झालं असतं. परंतु इथले चमचे लेसकॅश-डिजिटल पेमेंटला उत्तेजन हे उद्दिष्ट असल्याचं सांगत आहेत. म्हणून ते उद्दिष्ट असेल तर भीम अ‍ॅप (ज्यात मनी ट्रान्सफरसाठी चार्ज लागत नाही ते) नोटबंदीपूर्वी तयार हवं होतं एवढंच मी म्हणतो आहे. *बोजवारा उडालाच नाही असाही इथल्या चमच्यांचा दावा आहेच हे मला महिती आहे.

In reply to by नितिन थत्ते

arunjoshi123 Tue, 12/19/2017 - 17:45
मुळात पेमेंट डिजिटायझेशन हे उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबरच्या भाषणात सांगितलंच नव्हतं.
थत्तेचाचा, त्यांनी डिमॉनेटायझेशन मुळे देशाचा जीडीपी वाढेल असं पण भाषणात सांगीतलं नव्हतं. ======================= आता "मला मूल होणार आहे" असं सांगताना त्याचं शिक्षण होणार, त्यांचं लग्न होणार आहे हे सगळं सांगितल्याशिवाय ती बातमी कळतच नाही असा काही प्रकार आहे का?

In reply to by नितिन थत्ते

arunjoshi123 Wed, 12/20/2017 - 16:52
तुम्ही क्लेम नाही केलं, त्यांनी म्हटलं नाही, पण ते अंतर्भूत आहेच. उद्द्या वाढला नाही तर का वाढला नाही असं तुम्ही विचारू शकता आणि "मि कधी वाढेल असं म्हणालो?" असं ते म्हणू शकत नाहीत. ============== होप अंतर्भूत मंजे काय ते पोचलं.

In reply to by नितिन थत्ते

मार्मिक गोडसे Tue, 12/19/2017 - 18:23
मुळात पेमेंट डिजिटायझेशन हे उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबरच्या भाषणात सांगितलंच नव्हतं. पंतप्रधानांनी भक्तांच्या कानात सांगितलं होतं. त्यामुळे बिल्डर टरकून आहेत भक्तांना, रिस्क घेत नाहीत, भक्तांकडून १००% पांढरे पैसेच मागतात.