पुण्यात रुपाली/वैशाली मध्ये "उपमा" घेतला तर तो पांढरा स्वच्छ असतो..
मात्र घरी उपमा केला की तो तांबूस रंगाचा असतो..
रवा भाजण्याचे त्यांचे टेकनिक निराळे असते का?
असेल ते नेमके काय असावे??


वाचने
10694
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
वैशालीच्या उपम्यात चक्क काजू
वैशालीच्या उपम्यात चक्क काजू असतात?
हो. काही प्रॉब्लेम आहे का ?
In reply to वैशालीच्या उपम्यात चक्क काजू by अभ्या..
हो.
काही प्रॉब्लेम आहे का ?
घरातला उपमा भाजलेल्या
घरातला उपमा भाजलेल्या रव्यापासून बनवतात...
हाटेलात रवा भाजतात का ? याचा शोध घेऊन पहा....
लावा तर्कशास्त्र
उकळत्या पाण्यात
In reply to लावा तर्कशास्त्र by नाखु
वैशाली/रुपाली मधे रवा उकळत्या पाण्यात शिजवित असावेत .
इथे अंदाज विचारण्यापेक्षा
इथे अंदाज विचारण्यापेक्षा वैशालीच्या शेफला विचारले तर खात्रीचे उत्तर मिळेल !
काही ठिकाणी चक्क पांढरा
काही ठिकाणी चक्क पांढरा थपथपीत लगदासुद्धा असतो.
मायक्रोवेव्ह मध्ये रवा भाजत
मायक्रोवेव्ह मध्ये रवा भाजत असतील ?
नाही, पण त्यात सुद्धा रवा तांबुस होइ पर्यंत भाजायचा असतो !
रवा वाफेवर भाजत असतील ?
रवा भाजत नाहीत,फक्त गरम करतात
रवा भाजत नाहीत,फक्त गरम करतात त्यामुळे पांढरा दिसतो.
फक्त गरम ?
In reply to रवा भाजत नाहीत,फक्त गरम करतात by कंजूस
फक्त गरम करतात ?
मग शिजतो का व्यवस्थित ?
हे असलं करून बघितलंय का कुणी ?
वैशालीचा उपमा घ्यायला लोक
वैशालीचा उपमा घ्यायला लोक पैसे देतात पण घरच्या उपम्याला फुकट खातात म्हणून घरचा उपमा वैशालिच्या उपम्यावर जळतो आणि तो लाल होतो
हाहाहा
In reply to वैशालीचा उपमा घ्यायला लोक by टवाळ कार्टा
हाहाहा
हा हा हा ...
In reply to वैशालीचा उपमा घ्यायला लोक by टवाळ कार्टा
हा हा हा ...
हॉटेलमध्ये रवा भाजत नाहीत
हॉटेलमध्ये रवा भाजत नाहीत त्यामुळे थोडा चिकटपणा असतो पहा त्याला.
सांजा व उपमा, यात काय फरक
सांजा व उपमा, यात काय फरक असतो ?
रव्याला दुसरे नाव सांजा आहे
In reply to सांजा व उपमा, यात काय फरक by पगला गजोधर
रव्याला दुसरे नाव सांजा आहे बहुतेक.
पण माझी एक लहानपणी समज होती. हळद घालून करतो तो सांजा आणि बिन हळदीचा उपमा.
हळद घालून करतो तो सांजा आणि
In reply to रव्याला दुसरे नाव सांजा आहे by जागु
हळद घालून करतो तो सांजा आणि बिन हळदीचा उपमा. >> हे बरोबर वाटतेय. + उपमामधे कांदा, इतर भाज्या, उडीद डाळ वगैरे असते. सांजा म्हणजे फक्त फोडणी आणि मिरच्या... हे मी आपलं अंदाजानेच सांगतेय :D
आमच्याकडे पण हळद-तिखट घालून
In reply to रव्याला दुसरे नाव सांजा आहे by जागु
आमच्याकडे पण हळद-तिखट घालून केलेल्या रव्याला "सांजा" म्हणतात आणि बिनहळदीचा तो उपमा.
सामान्यपणे आधी रवा खरपूस
In reply to सांजा व उपमा, यात काय फरक by पगला गजोधर
सामान्यपणे आधी रवा खरपूस भाजून, त्यात थोडं थोडं गरम पाणी घालून मंद आचेवर शिजवलेल्या पदार्थाला सांजा म्हणतात
आधी पाणी उकळवून, त्यात 'थोडासा भाजलेला' रवा ओतून वाफेवर शिजवलेला पदार्थ म्हणजे उपमा
उपम्याबद्दल बरीच माहिती मिळाली .
उपम्याबद्दल बरीच माहिती मिळाली . "प्रेमाला उपमा नाही हे" गाणे व त्यावरुन बेतलेला पीजे आठवला .
देवांच्या प्रेमाला (कु प्रेमा
In reply to उपम्याबद्दल बरीच माहिती मिळाली . by सिरुसेरि
देवांच्या प्रेमाला (कु प्रेमा देव ) फक्त कांदेपोहे रचतात !
रुचतात
In reply to देवांच्या प्रेमाला (कु प्रेमा by पगला गजोधर
*रुचतात
उपमा व उप्पीट यांत काय फरक
उपमा व उप्पीट यांत काय फरक आहे ?
:D सेमच. सौथ इंडियन लोकं उपमा
In reply to उपमा व उप्पीट यांत काय फरक by पगला गजोधर
:D सेमच. सौथ इंडियन लोकं उपमा म्हणतात आणि मराठी लोकं उप्पीट म्हणतात...
https://en.m.wikipedia.org/wiki/Upma
उपम्याला कीती उपमा मिळाल्या.
उपम्याला कीती उपमा मिळाल्या.
कालिदासाची उपमा
In reply to उपम्याला कीती उपमा मिळाल्या. by जागु
कालिदासाचा उपमा या आलन्काराचा उपयोग सर्वात जास्त चांगला, असे एका सुभाषितात म्हटले आहे.
उपमा कालिदासस्य भारवेर अर्थगौरवं
दण्डिन: पदलालित्यम माघे सन्ति त्रयो गुण:
पहिला फोटो छान आहे
धाग्यातला पहिला फोटो छान आहे.
उपमा कालिदासस्य
उपमा कालिदासस्य
तिखट शिरा
काही मंडळी तिखट शिरा म्हणताना हि ऐकलीत.
उपमा तो उपमाच. मग प्रेमाचा
उपमा तो उपमाच. मग प्रेमाचा असो वा कालिदासांचा.
आम्हाला मात्र खायच्या उपम्यातच रस. त्याला मात्रा कशाचीही उपमा देऊ नका.
सांजा हा पिवळ्या रंगाचा असतो. आधी फोडणी करून त्यात रवा भाजतात आणि मग पाणी घालून शिजवतात.
खरा उपमा आधी रवा भाजून वेगळा ठेवतात. नंतर फोडणी करून त्यात कांदा फुलकोबी मटार छान शिजवून नंतर पाणी घालून उकळतात आणि थोडा थोडा रवा घालून ढवळतात. त्याने पांढरा उपमा अगदी वैशाली सारखाच होतो बरं का.......
अभिनंदन !
In reply to उपमा तो उपमाच. मग प्रेमाचा by sayali
अभिनंदन !
सगळे मिपाकर रवा वेगळा भाजतात तो तांबूस होतो, पण सायलीतै जेव्हा रवा भाजतात, त्यानं उपमा पांढराच होतो !
शिकरेट सांगा की तै !
रवा भाजताना खालच्या शेगाडीचा
In reply to अभिनंदन ! by चौथा कोनाडा
रवा भाजताना खालच्या शेगाडीचा गॅस पेटवू नये...
हाहाहा
In reply to रवा भाजताना खालच्या शेगाडीचा by पगला गजोधर
. रेसिपीबद्दल आदर आहे. पण प्रतिसाद मस्तच.
शिकरेट मैत नै पण माझ्या घरी,
In reply to अभिनंदन ! by चौथा कोनाडा
शिकरेट मैत नै पण माझ्या घरी, माझ्या लहानपणापासन उपमा पण पांढरा व मोकळा होतो, मी केला तरीही ;)-पण हल्ली खूप क्वचीत करतो. घरची पारंपारीक पद्धत गॅसच्या एका बर्नरवर आधी आधणाचे पाणी उकळी येण्यास ठेवत; त्याच वेळी दुसर्या बर्नरवर, रवा आधी तुपात (डालडा असण्याच्या काळात चक्क डालड्यात) स्वतंत्र पणे कढईत भाजत, (फारही कमी वेळ भाजल्याचे आठवत नाही पण तुपात भाजल्यामुळे लाल कमी होत असेल आणि मोकळाही होत असेल का ?-मोक्ळा होण्यासाठी रव्याजाडसर की बारीक याचा संबंध असावा पण तो नेमका माहित नाही)
पुढच्या स्टेपला जीरा, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची , -पण हळद नाही-बाकीची सामुग्री उपलब्धता आणि आवडी प्रमाणे ज्यात टमाटे, हिरवे वाटाण्यांचा समावेश होऊ शकेल, उपमा झाल्या नंतर पेरण्यास कोथींबीर सर्व करताना सोबत लिंबाची फोड , दही, किंवा रायता-कोशींबीर. फोडणीत आधणचे पाणी अधी टाकायचे की रवा ? नेमके आठवत नाही पुन्हा ट्रायल करून पहावे लागेल.
वनस्पती तूप / तूप आणि
In reply to शिकरेट मैत नै पण माझ्या घरी, by माहितगार
वनस्पती तूप / तूप आणि तेलाच्या रंगानेही फरक पडत असण्याची शक्यता असू शकतात त्या प्रयोग करून पहाव्या लागतील असे वाटते.
काय जाहले पुढे, पांढर्या
काय जाहले पुढे, पांढर्या उपम्याचे ?
नाहीय कुणी इथं मिपावर शेफ ?
....
हॉटेलवाले रवा भाजत नाहीत.
मलाही हॉटेल पद्धत आवडते.