मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताज्या घडामोडी - भाग १४

गॅरी ट्रुमन · · काथ्याकूट
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा. मागच्या वर्षी सर्जिकल स्ट्राईकनंतर नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाणचे कोर्ट मार्शल करण्यात येऊन तीन महिन्यांची शिक्षा देण्यात आली आहे. लष्कराच्या नियमांनुसार अशी सीमा ओलांडून जाणे हा शिस्तीचा भंग आहे. त्यामुळे असे कोर्ट मार्शल केले गेले आहे असे दिसते. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/chandu-babulal-chohan-gets-punishment-under-court-martial/articleshow/61233799.cms

वाचने 39738 वाचनखूण प्रतिक्रिया 182

In reply to by तर्राट जोकर

अभिदेश Sat, 11/04/2017 - 01:26
ह्याच न्यायाने पहिला प्रतिसाद पण तुमचा नाहीच तो लोकसत्तेचा आहे , तो तुमच्या नावावर का म्हणून खपवताय. तुम्ही तरी कुठे अभ्यास करून प्रतिसाद लिहिलाय. आधी स्वतः अभ्यास करून प्रतिसाद लिहा मग दुसर्याकडून अपेक्षा करा.

In reply to by अभिदेश

श्रीगुरुजी Sat, 11/04/2017 - 09:35
अगदी बरोबर! 'असंतांचे संत' हा अग्रलेख मागे घेऊन बिनशर्त माफी मागणारे गिरीश कुबेर सर्वज्ञानी असल्याच्या थाटात त्यांचीच वाक्ये चोरून स्वतःच्या नावावर खपविली आहेत.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Sat, 11/04/2017 - 09:29
चोरी उघडकीस आल्यावर कसा तिळपापड झालाय! चोराच्या उलट्या बोंबा!! चोरी करून पिचकाऱ्या टाकण्यापेक्षा हुल्लडबाजी कितीतरी पटीने श्रेष्ठ!!!

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर Sat, 11/04/2017 - 12:31
चोर? डोकं ठिकाणावर आहे का? कशाची चोरी? अभिदेश. कन्टेन्ट वर बोला राजे.... नीतीआयोगाने केलाय हो अभ्यास. मोदींच्या अध्यक्षतेखाली. ना लोकसत्ताने ना मी. आता तो नीतीआयोगाचाच अभ्यास खोटा असेल तर तसं सांगा. त्याबद्दल तर तोंड उचकटत नाही. लोकांना अभ्यास करायचं सांगतायत. तोंडावर पडलात सगळे म्हणून हुल्लडबाजी चालू आहे. दुसरं येतं तरी काय? सगळे भाजपचे समर्थक बुडाला आग लागली तरी वा मोदीजी वा काय थंड लागतंय म्हणून कसनुसं हस्तायत. हा हा हा विकास येडा झालाय.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर Tue, 11/07/2017 - 16:57
तुमचं आमचं सगळ्यांचं होमग्राउंड एकच आहे. मिपा..... त्याच्याबाहेर ना तुम्हाला कोणी ओळखत ना मला. आता मिपाला काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा.

In reply to by तर्राट जोकर

अभिदेश Mon, 11/06/2017 - 22:19
मी काय म्हणतोय ते समजलं नाही ,किंवा समजून सुद्धा मुद्दाम न समजल्यासारखं करताय. माझा मूळ प्रश्न होता की तुम्ही तुमचा प्रतिसाद लोकसत्तेमधून जशाचा तसा उचलला आणि ते तुम्ही कुठेही लिहिलं नाही. म्हणजे ही चोरी झाली की नाही ? उगाच कन्टेन्ट , अभ्यासपूर्ण वगैरे आव आणू नका.

In reply to by अभिदेश

नितिन थत्ते Tue, 11/07/2017 - 13:18
त्यांनी जो प्रतिसाद लोकसत्तेतून "चोरी" केल्याचा आरोप आहे तो त्यांनी अवतरणचिह्नात टाकलेला आहे. परत एकदा पहा. उगाच काहीतरी रेटत राहू नये.

In reply to by नितिन थत्ते

पुंबा Tue, 11/07/2017 - 14:16
एक्झॅक्टली हेच म्हणायचे होते. अवतरणचिन्हातला भाग लेखकाची स्वत:ची कृती नाही हे अध्याहृत असते. त्यामुळे ही चोरी ठरत नाही असे मावैम. एवढेच की ते मुळ लिखाण कोणाचे हा प्रश्न तसाच राहतो, मुळ कर्ता अश्या प्रसंगी प्रताधिकारभंगाचा गुन्हा दाखल करू शकतो किंवा नाही याची कल्पना नाही.

In reply to by पुंबा

तर्राट जोकर Tue, 11/07/2017 - 17:07
थत्तेसाहेब, पुंबासाहेब, बरोबर आहे तुमचे. पण पुचाट मुद्दे रेटत राहायचे कारण उघड आहे. मूळ मुद्दा चर्चिला जाऊ नये, त्यावर लवकरात लवकर माती टाकून भाजपचा खोटेपणा कसा लपवता येईल याची मरणाची धडपड. ही मंडळी स्वतःला जास्त शहाणी आणि जेम्सबाँड समजतात, पण अवतरणचिन्ह वापरले म्हणजे काय याची साधी अक्कल नाही.

In reply to by तर्राट जोकर

विशुमित Tue, 11/07/2017 - 17:32
पण पुचाट मुद्दे रेटत राहायचे कारण उघड आहे. मूळ मुद्दा चर्चिला जाऊ नये, त्यावर लवकरात लवकर माती टाकून>>> ==>> हे मात्र अगदी खरे आहे. सोयीचं पकडायचं फक्त.

In reply to by विशुमित

मार्मिक गोडसे Tue, 11/07/2017 - 17:44
सोयीचं पकडायचं फक्त. सोयीचं पकडायलाही हरकत नाही, परंतू तेथेही गृहपाठ न केल्याने तोंडावर आपटतात तेव्हा कीव येते ह्या बुचाऱ्यांची.

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे Tue, 11/07/2017 - 18:39
जोकर बुवा "मूळ प्रतिसाद लोकसत्तेच्या लेखातील आहे हे लिहायचे राहिले" एवढे स्वच्छ मनाने म्हणाला असतात तर एवढे फाटे फुटले नसते.

In reply to by तर्राट जोकर

अभिदेश Tue, 11/07/2017 - 21:03
ह्याला म्हणतात गिरा तो भी टांग उपर ... अजूनही तुम्ही स्वतःचे म्हणणे काय ते स्वतःच्या भाषेत मांडू शकलात नाही. एकूण फक्त शिवराळ भाषेत लिहिणे एवढंच तुम्हाला जमते हे कळाले. आपली पातळी दाखऊन दिल्याबद्दल आभारी आहे.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Tue, 11/07/2017 - 22:51
मूळ मुद्दा ज्यांचा आहे त्यांनी विचारलं तर देऊ आम्ही उत्तर. नाहीतर उद्या कोणीही सोम्यागोम्या उठेल आणि दुसऱ्याच्या मुद्द्यावर तिसऱ्यालाच प्रश्न विचारायला लागेल.

प्रसाद_१९८२ Wed, 11/01/2017 - 10:44
तीन रेल्वे स्थानकांवर लष्कर बांधणार पूल! http://prahaar.in/%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a4%b7/ ==== अशी कोणती आपात्कालीन परिस्थिती ओढावली की उपनगरिय रेल्वेच्या स्थानकावर पादचारी पुल उभारायला थेट सैन्याला बोलवावे लागले. रेल्वेचे अधिकारी व रल्वे प्रशासन इतके निष्क्रिय झालेय की जो पुल भारतीय लष्कर दोन महिन्यात बांधू शकतो. ते काम रेल्वेचे इंजिनीयर वा अधिकारी करु शकत नाहीत.

पुंबा Wed, 11/01/2017 - 14:36
लोकसत्ता वर्शानुवर्षे 'सर्वकार्येशु सर्वदा' हा उपक्रम करत असते. या मध्ये समाजात विधायक कार्य करणार्‍या, सरकारी मदत न मिळणार्‍या/अपुरी मिळणार्‍या सामाजिक संस्थांना त्यांच्या विशिष्ट गरजा पुर्ण करण्यासाठी त्यांच्या वतीने वाचकांकडून मदत मागितली जाते. यंदा लोकसत्तेकडे वाचकांनी सव्वा दोन कोटी रूपयांचे दान जमा केले आहे. ११ संस्थांना हे पैसे वाटले जाणार आहेत. गेली सात वर्षे हा उपक्रम सतत चालू आहे, सात वर्षात सुमारे ७२ संस्थांना मराठी दात्यांनी मदतीचा हात दिला आहे, कित्येक संस्था यामुळे उभ्या राहिल्या, लोकांपर्यंत या संस्थांचे काम पोहोचल्यामुळे संस्थांच्या कामाकडे समाजाचे लक्षदेखिल राहिले. दानशूर धनिक समाजकार्याला मदत करत असतातच(थोडे का होईना). मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्गातील लोकदेखिल या दानयज्ञात मागे राहत नाहीत हे लोकसत्तेच्या उपक्रमात सहभागी होणारे हजारो लोक सिद्ध करतात.

विशुमित गुरुवार, 11/02/2017 - 14:28
फिगरपेक्षा ‘त्या’ फिगरकडे जास्त लक्ष द्या, सौंदर्यवतीच्या उत्तराची जगभरात चर्चा. या महिलांनी ‘त्या’ आकड्यांपेक्षा आतापर्यंत देशात किती महिलांवर अत्याचार झाले, याची आकडेवारी समोर ठेवली. देशातल्या किती महिला बलात्कार, अॅसिड हल्ले, घरगुती हिंसाचार, विनभंगाला बळी पडल्या त्याची आकडेवारी प्रत्येक स्पर्धकांनी जगासमोर मांडली. ‘या जगात प्रत्येकजण महिलेच्या फिगरविषयी बोलतो पण महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा विषय निघाला की सगळेच गप्प होतात. महिला अत्याचारांची आकडेवारी किती मोठी आणि महत्त्वाची आहे, हे सौंदर्यवतीच्या फिगरपेक्षा जाणून घेणं आवश्यक आहे’ असं मत प्रत्येकीनं मांडलं. http://www.loksatta.com/trending-news/miss-peru-2018-pageant-contestants-highlight-violence-against-women-1579433/

अभिजीत अवलिया Fri, 11/03/2017 - 08:59
दुर्गम सीमाभागांमध्ये रस्तेबांधणी करणा-या ‘बॉर्डर रोड आॅर्गनायजेशन’ या लष्कराच्या अखत्यारीतील संघटनेने लडाख भागात चीनच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर, मोटारवाहने जाऊ शकतील, असा जगातील सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बांधण्याची कामगिरी फत्ते केली आहे. हिमालय पर्वतराजींतील उमलिंगला शिखरावरून पार जाणारा हा रस्ता समुद्रसपाटीपासून १९,३०० फूट उंचीवर आहे. http://www.lokmat.com/national/highest-road-built-army-army-army-army-completed-challenging-work-schedule/?utm_source=spikeD&utm_medium=LT&utm_campaign=adgebra

गामा पैलवान Fri, 11/03/2017 - 13:46
अधिक माहिती : https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/hot-and-fit-sunny-leone/articleshow/61473249.cms पॉर्नस्टार आता योगगुरू बनणार. नाही. या बातमीमुळे आजिबात खचून जायचं नाही. पॉर्नस्टार आता योगगुरू बनणार असली तरी कोणी योगगुरू मात्र पॉर्नस्टार बनणार नाहीयेत. त्यामुळे चिंता करू नये. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अभिजीत अवलिया Fri, 11/03/2017 - 14:38
पॉर्नस्टार योगगुरू झाला/झाली किंंवा योगगुरू पॉर्नस्टार झाला/झाली तरी बाकीचे का खचतील किंंवा चिंंता करतील?

मार्मिक गोडसे Fri, 11/03/2017 - 14:17
मागे एक चर्च शिक्षिका पोर्नस्टार बनली होती. स्वतःच्या मुलांच्या संगोपणासाठी एक शिक्षिका पोर्नस्टार बनली होती.ज्यांना आर्थिक सुरक्षा महत्त्वाची वाटते ते आपले क्षेत्र बदलतात.

विशुमित Fri, 11/03/2017 - 15:46
हत्येचा त्रीव्र निषेद..!! काश्मीरमध्ये भाजप नेते गोहर अहमद यांची दहशतवाद्यांकडून हत्या. बातमी नुसार यापूर्वी एजाज अहमद यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. एजाज अहमद हा एक काश्मिरी युवक होता. तो भारतीय सैन्यात होता. -- आर्मी कॅम्पसाठी पॉटर म्हणून काम करणाऱ्या ओळखीच्या काश्मिरी मुलावर झालेल्या हल्ल्याची आठवण ताजी झाली. भावपूर्ण श्रद्धांजली..!! http://www.loksatta.com/desh-videsh-news/in-kashmir-bjp-leader-gohar-ahmad-murdered-by-terrorists-1580049/

अमितदादा Fri, 11/03/2017 - 20:25
TMC चे एक मोठे नेते मुकुल रॉय यांनी भाजप मध्ये प्रवेश केलाय. मुकुल रॉय हे पश्चिम बंगाल मध्ये गाजलेल्या शारदा आणि नरडा स्कॅम मधील एक संशयित आरोपी आहेत. भाजप ने ह्या स्कॅम विरोधात मुकुल रॉय आणि ममता यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली होती, आता त्याच मुकुल रॉय यांना पक्षामध्ये प्रवेश दिला आहे, थोडक्यात काय राजकारण आणि सत्ता महत्वाची, नितीमत्ता गेली उडत. मुकुल रॉय यांना CBI आणि ED अनेक वेळा चौकशी साठी बोलावले होते, एप्रिल २०१७ मध्ये CBI ने त्यांच्यासहित १३ आरोपीवरती केस दाखल केलीय. (batami). आणखी एका वाल्याचा वाल्मिकी करायचा चालू आहे. पंतप्रधान जेंव्हा म्हणतात भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई चालू आहे तेंव्हा, भ्रष्टाचाराविरुद्ध म्हणजे नेमकं कुणाविरुद्ध हे काय कळत नाही.

In reply to by अमितदादा

पुंबा Tue, 11/07/2017 - 14:18
अगदी खरेय. रॉय यांचा तपास आता राजकिय मांडवलीत विरून जाईल असे वाटते. भाजपचे वाट्टेल त्या लोकांना पावन करून घेण्याचा वीट आला आहे. लोकांना किती गृहीत धरावं याला काही मर्यादा!

गामा पैलवान Fri, 11/03/2017 - 20:41
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/bakhar-book-publish/articleshow/61471421.cms आँ ? मग पाकिस्तान कुठनं पैदा झाला जी ? आन येव्हड्या म्होट्या बिरटिस साम्राज्यात भारताबिगर येक बी अखंड राष्ट्र दिसंना. नुस्ते तुकडेताकडे तिच्यायला. मंग भारताची येकी तरी काय म्हून बिरटिसांनी पैदा केली म्हनायची ? -गा.पै.