Skip to main content

ताज्या घडामोडी: भाग ८

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 27/07/2017 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद आल्याने प्रतिसाद एका पानात रहावे यासाठी नवीन धागा सुरु करीत आहे. धाग्याची सुरूवात http://indianexpress.com/article/india/gujarat-congress-three-mlas-join… या बातमीने करीत आहे. गुजरातमध्ये वाघेलांपाठोपाठ अजून ३ कॉग्रेस आमदारांनी (बळवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल, पी आय पटेल) राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. डिसेंबर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या ३ आमदारांपैकी २ पटेल आहेत. मागील दीडदोन वर्षे पटेलांना राखीव जागा द्यावात यासाठी गुजरात पेटविण्याचे प्रयत्न झाले. त्याचा काहीसा फटका भाजपला बसला होता. या पार्श्वभूमीवर २ पटेल आमदारांनी भाजपत जाणे ही भाजपसाठी आनंदाची बातमी आहे.

वाचने 42850
प्रतिक्रिया 215

प्रतिक्रिया

In reply to by वरुण मोहिते

अमित शहा सारख्या फालतू माणसाबद्दल तर बोलावेसे पण वाटत नाही क्काय क्काय फालतु पणा केलाय ह्या माणसाने ते बघायला, ऐकायला, वाचायला आवडेल. ५-१० वर्षे ऐश मग पक्ष परत त्याच ठिकाणी भाजप . कुठली ऐश ? पक्षा साठी राब राब राबण ह्याला ऐश म्हणतात ? मोहिते तुमचे प्रतिसाद संतुलीत असायचे, आता ते जिलसी कडे झुकतायत. बर तुमच्या थयथयाटाने किंवा आमच्या समर्थनाने षष्प फरक पडणार नाहिये. जंता नाम का प्रानी बौत श्याना हो चला है. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

पक्ष कसा वागेल आणि इथले पक्षसमर्थक कसे वागतील हे अत्यंत भिन्न मुद्दे आहेत. इथले पक्षसमर्थक कसे वागतील ही बिनमहत्त्वाची नि गौण बाब आहे. ताज्या घडामोडींत त्यावर फार चर्चा आवश्यक नाही.