Skip to main content

प्रस्ताव: मिसळपाव बॅज

Published on शुक्रवार, 12/08/2016
नमस्कार मिपाकर मित्रांनो, सहजच एक कल्पना आली, आपण मिपाकर बरीच भटकंती करत असतो, किंवा गावातल्या गावातही फिरत असतोच, असंख्य मिपाकर तुमच्या अवतीभवती वावरत असतील पण आपली ओळख होत नाही. जर आपण आपल्या वाहनावर दुचाकी व चारचाकी असो, मिसळपाव चा बॅज लावला तर ... हि कल्पना मला टीम बीएचपी ह्या वेबसाईट वरून सुचली, ते लोक आपल्या गाड्यांना असा बॅज लावतात, व अशा बॅज असणाऱ्या वाहन चालकांना मित्रत्वाची वागणूक देतात, आपण तयार असाल तर मिपा रंगभूषा मंडळ या साठी पुढाकार घेऊ शकते, आपले सल्ले व कल्पना जरूर कळवा! धन्यवाद!

वाचन संख्या 16267
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

मी समजा असा बॅज लावून वर्ध्याला गेलो तर मला बॉडीगार्ड घेवून जावे लागेल. ;) हलके घ्या वो काका... (व्हायरसश्री) मोदक.

भारी आयड्या! डिझाईनविषयी सुचवणी: "मिनिमलिस्टिक" डिझाईन असावं.

In reply to by आदूबाळ

तेच आहे डोक्यात! अगदी सूचक असावं, कोडवर्ड टाईप!

टि-शर्ट बनवा ना सर. घेतिल मंडळी विकत! सोलापुरचे साहेब देतिल डिझाईन बनवुन बघा पटतय का...

मायबोली वर जसे दरवर्षी टिशर्ट देण्यात येतात व मिळालेल्या पैशातील काही हिस्सा एकाद्या गरजू संस्थेला देणगी म्हणून दिला जातो तसाच एकादा उपक्रम इथे ही करता येईल.

In reply to by प्रसाद_१९८२

टीशर्टवरच्या संदेशासाठी / डिझाईनसाठी मतं मागवता येतील. उदा० प्रकार १: पाठीवर चपलांचं चित्र प्रकार २: पैठणीचा असतो तसा 'फिरता रंग'. पाठीवर "मी डूआयडी आहे नाही" प्रकार ३: "अच्चं झालं तल..." ...

In reply to by मोदक

नाही. मोकलायासाठी वेगळं डिझाईन डोक्यात आहे. मोकलायाचा वर्डक्लाऊड. त्यात विशेष भावलेले शब्द मोठे / ठळक. उदा. जाड ठशातले शब्द मोठे निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा

कल्पना चांगली आहे, मला GOT मधल्या सीन ची आठवण झाली , आर्या लोखंडाचे नाणे दाखवून valar मोरघुलीस म्हटल्यावर कसा जहाजाच्या कप्तानाने सलाम ठोकला, तसाच काहीसे करायला हवे. अवांतरः मोकालया दाही दिशा वाचला नाहीये कशावर आहे?

In reply to by साधा मुलगा

अवांतरः मोकालया दाही दिशा वाचला नाहीये कशावर आहे?
अर्रर्र फार हाय कम्बख्त तुने पी हि नही

आपल्याला टी शर्ट किंवा बॅज किंवा दोन्ही एकत्र पण चालेल.

मस्त! काही हिट वाक्य:- "वाढदिवसाच्या शुभेच्छा!" "मी पयला" "बशीवला टेम्पोत" "मिपाकर म्हणुन शरम वाटली" "इंचा इंचाने धागा लढवु" "टक्याचे वर्‍हाड" अशी वेगवेगळी मिपा फेम वाक्य टाका बॅजेसवर!!

पोकेमॉन गो च्या धर्तीवर बॅचवर 'मिसळपाव भो भो' अशी टॅगलाईन लिवा.

नाविन्यपूर्ण कल्पना आहे. अभ्याकडून ष्टिकर्स करून घेऊयात. आयडिया चांगली आहे. टीशर्ट्स नकोत बुवा! एकच टीशर्ट बाहेर कसा नेहमी वापरणार.

In reply to by रेवती

वेगळी वेगळी ष्टिकर्स बनवून ते आपापल्या शर्टखाली (अंगात घातलेला नाय बरं का) ठेवून पितळी तांब्यात गरम लाल कोळसे घालून तांब्या शर्टवर फिरवायचा म्हणजे शर्ट वर मस्त ष्टिकर उमटतं.

In reply to by एस

तेच अगदी सर्व बाबतीत ओके ठरतं. लोगो फक्त इथे येणार्‍यांनाच माहिती, नवीन कोणी उत्सुकतेने विचारपूस केली तर सांगताही येईल. ज्याला काही समजलं नाही त्याच्यासाठी गूढच राहिल. =))

In reply to by संदीप डांगे

लोगो बद्दल गुप्तता पाळायची असेल तर तो फक्त खफ वर प्रसिद्ध करू किंवा मग त्याच्यासाठी फक्त सदस्यांना प्रवेश केल्यावर दिसणाऱ्या धाग्यावरच दाखवू. बाकी डांगे साहेब कल्पना लायी भारी आहे.

छान कल्पना आहे.. "दा विन्ची कोड" वाचल्यापासून मला आपणही कुठल्या तरी सिक्रेट ब्रदरहूडममध्ये असावे असे फार वाटत होते. यानिमित्ताने - खास करुन मिनिमलिस्टीक डिझाईनमुळे तसं काहीतरी साध्य झाल्यासारखं वाटेल. :)

अभ्या वगैरे मंडळी अर्थातच या संधीचं सोनं करतील, पण आमच्या नापीक डोक्यातून ही low hanging फळं!

In reply to by बहुगुणी

आहहह, बहुगुणीसाहेब जब्बरदस्तच कि. सीआरव्हीवर मिपाचा लोगो बघून असं भरून आलं मन कि काय सांगू. अशा कोर्पिओ, इंडेव्हर, फोरचूनर, कॅप्टिव्हा, ऑडया, मर्क लागल्यात कट्ट्याला. सगळ्यावर लोगो झळकताहेत मिपाचे अशा स्वप्नात डुबलो...... आमच्या पॅशनमधले पेट्रोल संपलेय, जरा बाटली हुडकतो. ;)

In reply to by बहुगुणी

बाहेरची गोल ताटली काढून फक्त अक्षरस्वरूपातलं "मिपा" ठेवायचं. ब्याकग्राऊंड गडद असेल तर पांढरं, एरवी काळं.

In reply to by आदूबाळ

हीहेहेहे डिझाईन आयड्याला सहमत. मात्र ताटली शब्दावर जीव बसला. शेजारी ताटली बाटली अशे काही शिंबोलीक घ्यावे का आबासाहेब?

सुंदर कल्पना...

एक मिपाकर दुसय्राला आढळण्याची शक्यता फारच कमी आहे.बॅज लहान असला तर कट्ट्याला वगैरे जमताना गर्दीत न्याहाळण्याने गैरसमज वाढण्याची शक्यता अधिक.पास.

गाडीवर स्टिकर लावण्याची कल्पना आवडली, माझी ऑर्डर नोंदवून ठेवा, नक्की सामिल होणार

बॅज लावून फारिनला गेलो तर तिथला सर्व खर्च तिथले बॅज होल्डर करणार का ? जमलंच तर एकवेळचं तिकीट ?

In reply to by तिमा

तुम्ही अजून सर्वस्व पणास लावू शकणारे मिपासाधक बनलेले दिसत नाही आहात. मिपा व मिपाकर तुमच्या साठी काय करतात यापेक्षा तुम्ही मिपासाठी काय करु शकता याबाबत विचार करा. डांगेण्णा, अभ्या, नीमो यांच्या सारखे दोन चार लोक्स विमान प्रवास करुन लंडन दौरा करुन मिपा बाबत लोकप्रसार आणि अभ्यास करतील. त्यांच्यासाठी मदत निधी गोळा करायचा. मी माझे १०१ (काय ते नंतर कळिवतो) जाहीर करतो.

In reply to by उडन खटोला

चैयला, साधं पुण्याला कट्टे केले तरी टीटीएमएम दिलीय. खर्चाची बातच सोडा. ;) आमचं धण्यामालकाची मात्र गोष्ट येगळीय, ते पैसे काढू देत नाहीत.

In reply to by अभ्या..

TTMM =)) =)) टिटीएमेम म्हणजे जनतेला आपला "निस्पृहपणा" दाखवायचा एक आदर्श मौका!!, म्हणजे बघा, माझ्या अमृततुल्याचे पैशे मीच देणार!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू आत्ताच सांगतो, कट्टा करायचा असेल तर पुण्याऐवजी सोलापूराला ये. आमच्यात पाव्हण्याला गायछापबी काढू देत नाहीत.

In reply to by बोका-ए-आझम

गायछापवाल्यांची चेष्टा करू नये बोका भाऊ ;) अभ्या लेका काय आठवण काढलास रं!!! अहाहा

In reply to by लालगरूड

या निमित्त मिपाचा लोगो असलेले चांदीचे पेले बनवावे अशी आग्रही मागणी करतो. तसाही मिपावर चांदिच्या पेल्यांचा बराच जुना इतिहास आहे. पैजारबुवा,

लोगो मध्ये एक फाटा अन टेम्पो बसवता येतो का ते बघावं. सोबत लुलुलू दुदुदु ह्ये बी जोडा. बढिया घोषवाक्य,आच्चा आच जाल तर किंवा अस कनेक्शन आहे तर किंवा अजून कै. सगळ्यात वर 4-5 देवांचे फोटू. मंग मिपा वरल्या 5-7 म्हराजांची किरपा वगैरे, ई. ई. ज्रा साह्येब लोकायच्ये फोटू येऊ द्या. कस विंटरण्याशनल वाटलं पायज्येल. दोनी बाजूनी दोन-दोन स्कार्पिओ चे फोटू, आड्या बी चालत्यांन. ह्या सगळ्यात मिपावरल्या लेडीज-बायांना ईसरु नगा. तुमाला अजून कै टाकाच आसन तर टाका. आन जमलं तर मिसळीचा एक मोठ्ठा फोटू बी टाका. अन ह्ये सगळं वारलीत बनवा.चला लागा कामाला. चार दिवसात एक कोपि पाठवा प्रुफ तपासून आर्डर देण्यात येईल. पेमेंट उसाचं बिल आलं कि दिउ. काम एकदम झ्याक झालं पायज्येल बगा. बाबा योगीराज ब्यानर वाले.

वाटप झाल्यावर "मिपासिस" मधे दाखल होणार्या युवक युवती वर एक अमर लेख येउ द्यात.

कल्पना चांगली आहे. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या शर्टांवर, साडी किंवा ड्रेसवर वापरता येईल असा असा असावा.

पण स्कोर सेटल होण्याचा हि धोका आहे. सध्या फक्त भासमान स्कोअर सेटल होतात, पण प्रत्यक्ष स्कोअर सेटल होण्याची शक्यता वाढीला लागेल. माझे आपले $.०२.