✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रस्ताव: मिसळपाव बॅज

स
संदीप डांगे यांनी
Fri, 08/12/2016 - 13:42  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकर मित्रांनो, सहजच एक कल्पना आली, आपण मिपाकर बरीच भटकंती करत असतो, किंवा गावातल्या गावातही फिरत असतोच, असंख्य मिपाकर तुमच्या अवतीभवती वावरत असतील पण आपली ओळख होत नाही. जर आपण आपल्या वाहनावर दुचाकी व चारचाकी असो, मिसळपाव चा बॅज लावला तर ... हि कल्पना मला टीम बीएचपी ह्या वेबसाईट वरून सुचली, ते लोक आपल्या गाड्यांना असा बॅज लावतात, व अशा बॅज असणाऱ्या वाहन चालकांना मित्रत्वाची वागणूक देतात, आपण तयार असाल तर मिपा रंगभूषा मंडळ या साठी पुढाकार घेऊ शकते, आपले सल्ले व कल्पना जरूर कळवा! धन्यवाद!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16178 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

टि शर्ट नको बाबा! आमच्या

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/18/2016 - 17:03 नवीन
टि शर्ट नको बाबा! आमच्या सुटलेल्या पोटाला शोभत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

great

DeepakMali
Sat, 08/13/2016 - 01:58 नवीन
सुंदर कल्पना...
  • Log in or register to post comments

एक मिपाकर दुसय्राला आढळण्याची

कंजूस
Sat, 08/13/2016 - 07:27 नवीन
एक मिपाकर दुसय्राला आढळण्याची शक्यता फारच कमी आहे.बॅज लहान असला तर कट्ट्याला वगैरे जमताना गर्दीत न्याहाळण्याने गैरसमज वाढण्याची शक्यता अधिक.पास.
  • Log in or register to post comments

बापरे.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/18/2016 - 17:04 नवीन
१६ सेकंदांपेक्षा जास्त न्याहाळू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

छान कल्पना ...

अभिजीत अवलिया
Sat, 08/13/2016 - 08:23 नवीन
छान कल्पना ...
  • Log in or register to post comments

उत्तम कल्पना,

भंकस बाबा
Sat, 08/13/2016 - 09:21 नवीन
गाडीवर स्टिकर लावण्याची कल्पना आवडली, माझी ऑर्डर नोंदवून ठेवा, नक्की सामिल होणार
  • Log in or register to post comments

हे बघा बरं कसं वाटतंय?

चतुरंग
Sat, 08/13/2016 - 12:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

प्रस्तावाला आणुमोदन!

तुषार काळभोर
Sat, 08/13/2016 - 12:19 नवीन
यातून प्रचारही होईल अन् सदस्यांना हुच्चभ्रु होण्याची संधी ;)
  • Log in or register to post comments

अनुमोदन

भाग्यश्री कुलकर्णी
Sat, 08/13/2016 - 13:20 नवीन
अनुमोदन
  • Log in or register to post comments

बॅज

तिमा
Sat, 08/13/2016 - 13:32 नवीन
बॅज लावून फारिनला गेलो तर तिथला सर्व खर्च तिथले बॅज होल्डर करणार का ? जमलंच तर एकवेळचं तिकीट ?
  • Log in or register to post comments

तुम्ही अजून सर्वस्व पणास लावू

उडन खटोला
Sat, 08/13/2016 - 13:38 नवीन
तुम्ही अजून सर्वस्व पणास लावू शकणारे मिपासाधक बनलेले दिसत नाही आहात. मिपा व मिपाकर तुमच्या साठी काय करतात यापेक्षा तुम्ही मिपासाठी काय करु शकता याबाबत विचार करा. डांगेण्णा, अभ्या, नीमो यांच्या सारखे दोन चार लोक्स विमान प्रवास करुन लंडन दौरा करुन मिपा बाबत लोकप्रसार आणि अभ्यास करतील. त्यांच्यासाठी मदत निधी गोळा करायचा. मी माझे १०१ (काय ते नंतर कळिवतो) जाहीर करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

चैयला, साधं पुण्याला कट्टे

अभ्या..
Sat, 08/13/2016 - 14:00 नवीन
चैयला, साधं पुण्याला कट्टे केले तरी टीटीएमएम दिलीय. खर्चाची बातच सोडा. ;) आमचं धण्यामालकाची मात्र गोष्ट येगळीय, ते पैसे काढू देत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला

TTMM =)) =))

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 08/13/2016 - 14:03 नवीन
TTMM =)) =)) टिटीएमेम म्हणजे जनतेला आपला "निस्पृहपणा" दाखवायचा एक आदर्श मौका!!, म्हणजे बघा, माझ्या अमृततुल्याचे पैशे मीच देणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बापू आत्ताच सांगतो, कट्टा

अभ्या..
Sat, 08/13/2016 - 14:10 नवीन
बापू आत्ताच सांगतो, कट्टा करायचा असेल तर पुण्याऐवजी सोलापूराला ये. आमच्यात पाव्हण्याला गायछापबी काढू देत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

चुन्याचं काय? गायछाप बरोबरचा

उडन खटोला
Sat, 08/13/2016 - 14:36 नवीन
चुन्याचं काय? गायछाप बरोबरचा चुना कोण लावतं? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

राजेश.

अभ्या..
Sat, 08/13/2016 - 14:38 नवीन
राजेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला

जे गायछाप खात नाहीत

बोका-ए-आझम
गुरुवार, 08/18/2016 - 02:14 नवीन
त्यांना काय काय काढू देत नाहीत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पैशे ओ बोकामालक. दुसरे कै नै.

अभ्या..
गुरुवार, 08/18/2016 - 17:06 नवीन
पैशे ओ बोकामालक. दुसरे कै नै. तुमचा सोफाएआझम बनवायला सांगू काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

गायछापवाल्यांची चेष्टा करू

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 08/19/2016 - 19:12 नवीन
गायछापवाल्यांची चेष्टा करू नये बोका भाऊ ;) अभ्या लेका काय आठवण काढलास रं!!! अहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

गायछापवाल्यांची चेष्टा करू

महासंग्राम
Sat, 08/20/2016 - 15:34 नवीन
गायछापवाल्यांची चेष्टा करू नये
एकदम बरोबर बोलले बापू तुमी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

सध्या तर जमाना असाय की गायीशी

अभ्या..
Sat, 08/20/2016 - 15:49 नवीन
सध्या तर जमाना असाय की गायीशी संबधित कशाचीच चेष्टा करु नये. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

ब्याज बिल्ला वाटपानिमित्तं

भीमराव
Sat, 08/13/2016 - 13:34 नवीन
ब्याज बिल्ला वाटपानिमित्तं मिपां अतिमहां कट्टां सुद्धां करतां येईल कीं बरें कशें!
  • Log in or register to post comments

खिशाला लावायला मागे पिन किंवा

लालगरूड
Sat, 08/13/2016 - 14:03 नवीन
खिशाला लावायला मागे पिन किंवा क्लिप असलेला धातूचा बॅज बनवा
  • Log in or register to post comments

हीहेहेहे, नाणीजपीठ आठवले.

अभ्या..
Sat, 08/13/2016 - 14:09 नवीन
हीहेहेहे, नाणीजपीठ आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

या निमित्त

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 08/13/2016 - 14:12 नवीन
या निमित्त मिपाचा लोगो असलेले चांदीचे पेले बनवावे अशी आग्रही मागणी करतो. तसाही मिपावर चांदिच्या पेल्यांचा बराच जुना इतिहास आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

का जुन्या दुधाळ भावना आटवताय?

अभ्या..
Sat, 08/13/2016 - 14:13 नवीन
का जुन्या दुधाळ भावना आटवताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

(No subject)

लालगरूड
Sat, 08/13/2016 - 14:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

(No subject)

लालगरूड
Sat, 08/13/2016 - 14:18 नवीन
  • Log in or register to post comments

redeagle

लालगरूड
Sat, 08/13/2016 - 14:23 नवीन
Image removed.redeagle
  • Log in or register to post comments

अभ्या भावड्या

बाबा योगिराज
Sat, 08/13/2016 - 14:46 नवीन
लोगो मध्ये एक फाटा अन टेम्पो बसवता येतो का ते बघावं. सोबत लुलुलू दुदुदु ह्ये बी जोडा. बढिया घोषवाक्य,आच्चा आच जाल तर किंवा अस कनेक्शन आहे तर किंवा अजून कै. सगळ्यात वर 4-5 देवांचे फोटू. मंग मिपा वरल्या 5-7 म्हराजांची किरपा वगैरे, ई. ई. ज्रा साह्येब लोकायच्ये फोटू येऊ द्या. कस विंटरण्याशनल वाटलं पायज्येल. दोनी बाजूनी दोन-दोन स्कार्पिओ चे फोटू, आड्या बी चालत्यांन. ह्या सगळ्यात मिपावरल्या लेडीज-बायांना ईसरु नगा. तुमाला अजून कै टाकाच आसन तर टाका. आन जमलं तर मिसळीचा एक मोठ्ठा फोटू बी टाका. अन ह्ये सगळं वारलीत बनवा.चला लागा कामाला. चार दिवसात एक कोपि पाठवा प्रुफ तपासून आर्डर देण्यात येईल. पेमेंट उसाचं बिल आलं कि दिउ. काम एकदम झ्याक झालं पायज्येल बगा. बाबा योगीराज ब्यानर वाले.
  • Log in or register to post comments

भारी आयडीया आहे....

जावई
Sat, 08/13/2016 - 15:04 नवीन
आपलीपण आर्डर घ्या साहेब..
  • Log in or register to post comments

विनंती

विनायक प्रभू
Sat, 08/13/2016 - 17:04 नवीन
वाटप झाल्यावर "मिपासिस" मधे दाखल होणार्या युवक युवती वर एक अमर लेख येउ द्यात.
  • Log in or register to post comments

मस्त

सविता००१
गुरुवार, 08/18/2016 - 10:35 नवीन
आयडिया
  • Log in or register to post comments

कल्पना आवडली.

मुक्त
गुरुवार, 08/18/2016 - 11:06 नवीन
कल्पना आवडली. आपली 5-50 ची ऑर्डर बुक करा.
  • Log in or register to post comments

चांगली कल्पना.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/18/2016 - 17:08 नवीन
कल्पना चांगली आहे. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या शर्टांवर, साडी किंवा ड्रेसवर वापरता येईल असा असा असावा.
  • Log in or register to post comments

बॅज लोगो

मराठी कथालेखक
Sat, 08/20/2016 - 15:49 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

या उपक्रमाचे काय झाले?

साधा मुलगा
Wed, 12/28/2016 - 19:06 नवीन
या उपक्रमाचे काय झाले? हे विचारायला धागा वर काढला आहे.
  • Log in or register to post comments

आठवण करुन देण्यासाठी धन्यवाद!

संदीप डांगे
Wed, 12/28/2016 - 19:14 नवीन
आठवण करुन देण्यासाठी धन्यवाद! :-)
  • Log in or register to post comments

आईडियाची कल्पना छान आहे

सर टोबी
Wed, 12/28/2016 - 19:34 नवीन
पण स्कोर सेटल होण्याचा हि धोका आहे. सध्या फक्त भासमान स्कोअर सेटल होतात, पण प्रत्यक्ष स्कोअर सेटल होण्याची शक्यता वाढीला लागेल. माझे आपले $.०२.
  • Log in or register to post comments

अण्णा मनावर घ्याच.

आदूबाळ
गुरुवार, 12/29/2016 - 01:22 नवीन
अण्णा मनावर घ्याच.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा