Skip to main content

मिपा मराठीतील प्रथम क्रमांकाचे संकेत स्थळ

लेखक एकुलता एक डॉन यांनी सोमवार, 23/05/2016 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज सहज alexa वर भटकंती करायला गेलो होतो, ज्यांना हा प्रकार माहीत नसेल तर थोडक्यात alexa एक संस्था आहे जे अन्तर जालावरील संस्थळाचा आढावा ठेवतात व सरवाधिक भेट होणार्या संस्थलांचा अग्रक्रम ठरवतात आज २२/५/२०१6 नुसार क्रमवारी http://www.alexa.com/topsites/category/Top/World/Marathi mipa आत्ता ह्या वर्तमान पत्रे आणि शासकीय स्थळ वगळले तर राहते एकाच मिपा मिपा मिपा एकाच नंबर

वाचने 36617
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

मिपाकरांचे अभिनंदन! मिपा अजून लोकप्रिय होण्यासाठी सर्वांचा हातभार असाच लागू दे, तसेच मिपाची अजून भरभराट होऊ दे.

ये धतड ततड...... वाह. सर्व नव्या जुन्या मिपाकरांचे अभिनंदन.

मिपा बेस्ट होते, बेस्ट आहे आणि बेस्ट राहिल. प्रश्नच नाही.

मिपाकरांचे अभिनंदन! मिपा अजून लोकप्रिय होण्यासाठी सर्वांचा हातभार असाच लागू दे, मिपाची अजून भरभराट होऊ दे.

मस्त बातमी...

मन वढाय वढाय... ...अभिनंदन मिपा आणि मिपाकर

एकुलता एक डॉन, आपण कोणते क्रायटेरीया लावले होते हे सिलेक्शन करायला? वरील लिंक मध्ये काही उलगडा होत नाही, किंबहूना ती लिंकच चालत नाही, होमपेजवर लँड होते आहे.

In reply to by पाषाणभेद

http://www.alexa.com/topsites/category/Top/World/Marathi एक महाराष्ट्र राज्य सरकारची आहे, एक गुगल इनपुट टूल्स आहे, सात बातम्यांविषयक आहेत (वृत्तपत्रे/वाहिन्या), दहाव्या क्रमांकाला मिपा आहे.

कृपया संपादक मंडळीतील कोणीतरी लिंक बदलून द्यावी सदर चूक माझी नसून मराठी मध्ये keyboard ची आहे लिंक

ही साईट लई अफाट डाटा दाखवतिय राव! मिपाचं जागतिक स्थान (रँक) = 142,818 भारतातलं = 12,324 आणि हे महत्वाचं: Top Keywords from Search Engines Which search keywords send traffic to this site? (कोणते शब्द सर्च केल्यावर येणार्‍या रिजल्ट्सपैकी लोक मिपा.कॉमवर येतात) लई बेक्कार है... 1. misal pav 86.12% 2. कथा 5.82% 3. नवरा बायको शरीरसंबंध 2.81% 4. misal paw 1.04% 5. misalpav 0.87% आर ओ एफ एल!! जवळ जवळ ३% लोक्स तिसर्‍या क्रमांकावरील शब्द सर्च करतात, व येणार्‍या रिजल्ट्स पैकी मिपा.कॉम निवडतात! (अजून एखादा पडद्यामागचा विभाग असल्यास, सदस्यत्वासाठी कोणाशी संपर्क करावा, ते कळवावे ;) )

In reply to by तुषार काळभोर

च्यायला, नवरा बायकोचे शरीर संबध शोधत लोक मिपावर पोहोचतात काय ? रोचक प्रकरण वाटलं. :/ -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, नवरा बायकोचे शरीर संबध शोधत लोक मिपावर पोहोचतात काय ? रोचक प्रकरण वाटलं. :/
म्हणजे बघा आपल्या काकांची ख्याती किती दूरपर्यंत पोहोचली आहे :)

In reply to by गॅरी ट्रुमन

ग्याट्रु, नशीब हो मिपाकरांचे. लोकांना शरीरसंबंध शोधायला नवराबायकोंच बरे सापडले. इतर ठिकाणी लोकं कशात शरीरसंबंध शोधायला जातात ते विचारू नका! ;-) आ.न., -गा.पै.

In reply to by तुषार काळभोर

त्या अल्गोरिथम ने अविनाश कुळकर्णी ह्यांची "वारुळ" वाचुन पुढे असा विभाग निघेल हे गृहीत धरले असावे काय? :D

अर्थात, मिपाला लोकप्रिय करण्यात, खेडूत्,पिडां, बहूगूणी, सर्वसाक्षी, रामदास, चित्रगुप्त, मोदक, श्रामो (अद्याप तरी लेखरुपाने इथेच आहेत), सुबोध खरे, डॉ. सुहास म्हात्रे, बोका, जॅक डॅनियल, मिका, बिका, गवि, माप, असंख्य बल्लव आणि सुगरणी, स्पा आणि आत्मबंध, टका, पैजारबुवा, नाखू, अभ्या..,बॅटमॅन, मृत्युंजय, जयंत कुलकर्णी...... आणि अनाहितांचा, फार मोठा हातभार आहे. अनावधनाने काही नावे राहिली असल्यास क्षमस्व. मिपा ही एकमेव साईट अशी आहे की, जिथे स्त्रीयांना खास असे वेगळे व्यासपीठ उपलब्ध आहे.

In reply to by मुक्त विहारि

मला नक्का हो बसवू या दिग्गजांच्या रांगेत...बाकीचे लिहितात त्याच्या नखभर पण लिहित नाही मी (क्वांटिटी आणि क्वालिटी...दोन्ही बाबतीत)

In reply to by मुक्त विहारि

तिथं तर लै गोंधळ असतो मुविकाका. मला रात्रीपर्यंत बॅनर करायचे हे म्हैतच नसते. ;) असो. आमची जानू यायची वेळ झाली. ;)

In reply to by अभ्या..

स्वतःचा वेळ खर्च करून आणि एकही पैसा मोबदला म्हणून न घेता, बॅनर बनवता, म्हणूनच म्हणालो.

In reply to by मुक्त विहारि

कलावंत किंवा कलाकारांबरोबर आम्हा इतर सेवकांचा उल्लेख केल्याने संकोचलो आहे. मिपा कल्लामंदीर (डोअरकीपर समकक्ष पात्र) नाखु द्वारपाल. द्वारपाल.(तिकीटे पहून जाग्यावर बसवायचा काम अस्लेला स्वयंसेवक)

In reply to by टवाळ कार्टा

मग त्या लेखांना एतके प्रतिसाद कसे मिळाले? असो, प्रतिसादांच्या संख्येवरून लेखाचे महत्व आणि शतकांच्या संख्येवरून फलंदाजांचे महत्व ठरत नाही.

In reply to by मुक्त विहारि

त्यांपेक्षा यांचा हात आहे मिपाला लोकप्रिय करण्यात प्रकार पहिला- नेफळे,केंजळे,माई,दरेकर,मोगा,हितेश,सचीन,जिनियस, फिलाॅसाॅफर,मुग्धा,ग्रेटथिंकर, प्रकार दुसरा- तर्राट जोकर,तुडतुडी प्रकार तिसरा-(दुर्मिळ प्रजाती) संजय क्षीरसागर प्रकार चौथा - इतर भांडकुदळ आयडी

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

पातेल्याला विसर्लात? आणि तुम्ही वरच्यापैकी कुठल्या कॅटेगरीत येता? का तुम्ची स्वयंभू नविन कॅटेगरी? :)

सर्व मिपाकरांचे अभिनंदन. संपादक मंडळ, प्रशासक व मिपाधनी यांचे विशेष अभिनंदन. -गा.पै.

सर्व लेखक आणि प्रतिसाद लिहिणारे मिपाकर यांचं हे यश आहे, तेव्हा सर्व मिपाकरांचे मराठी संकेतस्थळात पहिला नंबर आल्याबद्दल अभिनंदन. :) -दिलीप बिरुटे

अरे वा! छान वाटले ही माहिती वाचून. सर्व मिपाकरांचे अभिनंदन :)

साधारणतः दोन वर्षांपुर्वी म्हणजे एप्रिल २०१४ मध्ये ए.ए.डॉनच्याच एका धाग्यावर मी प्रतिसादातून अलेक्सा रँकींगच्या तेव्हाच्या स्थितीचे विश्लेषण मांडले होते, ज्यांना मागच्या स्थितीशी सद्य आकडेवारीची तुलना करावयाची आहेत त्यांच्यासाठी माझ्या जुन्या प्रतिसादांचे दुवे. *अलेक्सा रँकींग- (माझे विश्लेषण भाग-१) * अलेक्सा रँकींग- (माझे विश्लेषण भाग-२) * अलेक्सा रँकींग- (माझे विश्लेषण भाग-३)

होय त्यावेळी मायबोली वर होती सध्या मात्र मिपा

सर्व मिपाकरांसाठी आनंदाची गोष्ट. मिपाचे आद्य संस्थापक तात्या अभ्यंकर उर्फ विसोबा खेचर यांचे कुणालाच स्मरण नाही का?

सर्व मिपाकरांचे अभिनंदन! :)

गेल्या ५ वर्षापासुन मी मिपा वर आहे, खुप नविन वाचायला मीळते येथे. बरच्स शीकायला देखिल मीळतं, कध्ही कधी तर मुळ लेखांपेक्शा प्रतीसादा मध्ये देखील बरीच उपयुक्त माहीती मीळते. सर्व मिपा सद्स्य आणी मालक यानी हा ध्वज उंच धरुन ठेवलाय.