Skip to main content

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ४

लेखक जेपी यांनी मंगळवार, 15/03/2016 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/32572 भाग २ http://www.misalpav.com/node/34076 भाग ३ **************************************************** मागील भागात १०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्यामुळे हा नवा धागा काढत आहे. **************************************************** प्रश्न - आपल्याकडे जलव्यवस्थापना बद्दल शिक्षण / प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम उपल्ब्ध आहेत आहेत का ? असे अभ्यासक्रम कुठल्या संस्थेत उपल्ब्ध आहेत त्याची थोडक्यात महिती मिळेल का ? (उदा.संस्थेचे नाव,ठिकाण्,अभ्यासक्रम) ======================================================================= प्रतिसादासाठी धन्यवाद.

वाचने 41117
प्रतिक्रिया 206

प्रतिक्रिया

In reply to by मराठी कथालेखक

बंद बिंद नाही झाला हो. माझ्याकडे आहे. कल्याणच्या पाठारे नर्सरीतून आणला होता गेल्या वर्षी. २०-२५ फुले दिली आत्तापर्यंत. गेल्या दोन महिन्यांपासून मात्र फूल नाही.

In reply to by सुनील

१००% बंद नसेलहि पण रस्त्यावर जे फुलविक्रेते असतात त्यांच्याकडे वासाचे गुलाब अजिबात मिळत नाहित.

साबुदाणा खिचडी रामबाण पाककृती हवीये. होना, माझी साबुदाणा खिचडी नेहमी चुकते. कधी कोरडी तर कधी लिग्दा होतो. काहीतरी सोपा उपाय सांगा. मला आता जास्त खटपट करण्यात रस राहिला नाही. खूप वेळा चुकलो आहे.

In reply to by गोंडस बाळ

साबुदाणा हा एक अत्यंत निकृष्ट, खाण्याच्या लायकीचा नसलेला पदार्थ आहे. तो खावू नये हेच चांगले.

In reply to by गोंडस बाळ

गोंडस बाळ, मुळात शाबुदाणा चांगल्या क्वालिटीचा मिळाला तर खिचडी खराब होत नाही. याबाबत एखाद्या सुपर मार्केटमध्ये घेतलेला, चांगल्या पॅकिंगचा, महाग किंमतीचा शाबुदाणा देखील चांगलाच असेल याची खात्री नाही. असा शाबुदाणा देखील बाद निघतो याचा मला अनुभव आहे. साबुदाणा आपल्या खात्रीच्या दुकानदाराकडून कायम विकत घ्यावा. मी साता-याला कधी गेलो की मग एकदमच दोन तीन किलो घेऊन ठेवतो. सुट्टा पण अतिशय चांगल्या क्वालिटीचा मिळतो. अर्थात मी उपास बिलकुल करत नाही की साबुदाणा अगदी प्रत्येक आठवड्यात खात नाही. वर म.क. यांनी म्हटल्याप्रमाणे तो आरोग्याला चांगला नाहीयेच.

In reply to by गोंडस बाळ

साबुदाणा या पाककृतीचे सर्व यश तो भिजवण्यात सामावलेले आहे. साबुदाणा भिजवताना पाण्याचे कर्रेक्ट प्रमाण तुम्हाला जमले तर तुम्ही पाकृ आयपीएलच्या सेमिफायनलीत गेलात असे समजायला हरकत नाही. हा (साबुदाणा) साधारण आठ तास भिजला की उपसून मोकळा करून अर्धा तास ठेवायचा आणि मग त्याला मीठ साखर लावून ठेवायचे. मग छानपैकी कढईत मस्तपैकी भरपूर तूप घालावे आणि हिरव्यागार मिरच्यांची जिऱ्यासहित फोडणी करावी. (गॅस पेटता असावा याची खबरदारी घेणे ) मग त्यात अघळपघळ बचकभर शेंगदाण्याचा कूट घालावा आणि मग भिजवलेल्या साबुदाण्याला त्यात लोळवावे. इथे मावेओ असेल तर साबुदाणे कढईशी चिकटपणा न करता मऊसूत सळसळीतपणा धारण करतात. आणि मग काय, वर खोबरे कोथिंबीर पेरा आणि हाणा !

In reply to by रुस्तम

पसरट भांड्यात साबुदाणे घालून एकदा धुवून पूर्ण पाणी काढावे. मग साबुदाण्याच्या वर न येईल इतपत पाणी घालून चार ते सहा तास झाकून ठेवावे. हे झाले जनरल. पण प्रत्येक साबुदाण्यात पाण्याचे प्रमाण हे त्याच्या क्वालिटीवर अवलंबून असते. भिजल्यावर मोकळा झाला पाहिजे इतपतच पाणी घालावे. साबुदाणा नवीन आणला की एकदा ट्रायल घेतल्याशिवाय अंदाज येत नाही.

In reply to by लालगरूड

१) वजन-उंची २) डोळे-कान क्षमता ३) रक्त-लघ्वी घटक तपासणी, रक्तदाब ४) फुफ्फुसांची क्षमता ५) ईसीजी (दोन वर्षांपूर्वी फक्त ४०+ कर्मचा-यांना करावा लागायचा, आता प्रत्येकाचा करतात)

In reply to by लालगरूड

ते दातांत फट किती आहे त्यावर अवलंबून असावे!! बादवे, त्याला सिमेंट म्हणतात पण ते खरेच सिमेंट असते का?

In reply to by सुनील

पावडर आणि लिक्विड मिक्स करुन बनवला जाणारा आणि सेट झाल्यावर ती जागा भरुन कडक होणारा पदार्थ म्हणजे सिमेंट. मग ते दाताचे असो की बांधकामाचे! दातासाठी वेगवेगळ्या प्रकारची सिमेंट वापरली जातात.अर्थातच बिनविषारी!यातले काॅमनली दिसणारे पांढरे सिमेंट हे झिंक आॅक्साइड पावडर आणि युजिनाॅल हे लिक्विड मिक्स करुन बनवले जाते.

काही दिवसांपुर्वी मला कोणातरी चांदोबा मासिकाचे सर्व जुने अंक एकत्र करुन PDF स्वरुपांत पाठविले होते. येथुन पुढे माझ्या ओळखीच्या सदस्यांस त्यांच्या वाढदिवशी त्याच महिन्यातील जुना चांदोबा टाचुन शुभेच्छादर्शक मेल करावी, अशी कल्पना मनांत आली.. पण.दुर्दैवाने आता ती PDF फाईलच मिळत नाही. कोणाकडे असल्यास मला ही फाईल परत मिळु शकेल का ??

In reply to by सुनील

रागावु नका सुनिलराव..पण असे 'उंटावर' बसुन सल्ले देणे खुप सोपे असते.. वस्तु हरवली असे म्हटल्यावर 'नेमकी कूठे हरवली ??' असे विचारण्यासारखे. 'काही दिवसांपुर्वी मला 'कोणीतरी' ... या शब्दातच मला ती व्यक्ती आठवत नसल्याची कबुली दिली आहे... असे आठवत असते तर येथे कशाला आलो असतो ?? असो. आपल्या महत्वपुर्ण सल्याबद्दल धन्यवाद. आपली विनंतीही लक्षात ठेवली आहे.

In reply to by प्रसाद भागवत

मिपावर याआधी "चांदोबा"वर बरेच लेख येऊन गेलेत. त्याबद्दलच्या आठवणी अनेक जणांनी शेअर करून झाल्यात. त्यात एक सामाईक दुवा म्हणजे, दरवेळी चंदामामा.कॉम का ORG ची लिंक दिली जायची व पब्लिक खुश होऊन दुवा परत करायचे. ;) चांदोबा प्रकरणच तसे खास होते म्हणा. आता ते डोमेन चालत नाहीये, एक्सपायर झाल्याचे दिसतेय. त्यामुळे खूपच निराशा होतेय. तुम्हाला खरच जर त्या पीडीएफ मिळाल्या तर त्या प्लीज शेअर करा. खूप दुवा मिळतील. :) तुम्हाला त्या पीडीएफ लवकर मिळो हीच प्रार्थना! Sandy

एखादा शतकी /द्विशतकी (पक्षी : पेटलेला) धागा असतो. धाग्यासमोर "२२६ , १४ नवीन " असे काहीतरी दिसते. फक्त नवीन प्रतिसाद पहायला मिळावे म्हणून मी "१४ नवीन" वर टिचकी मारतो. धाग्याचे पहिले पान उघडून नवीन प्रतिसादांतल्या सर्वात वरच्या प्रतिसादापाशी मी आपोआप पोहोचतो. त्यानंतर "नवीन" शब्दामुळे त्या पानावरील सगळे नवीन प्रतिसाद मला सहज सापडतात. पण काही नवीन प्रतिसाद दुसर्‍या पानावर असतात म्हणून मी दुसर्‍या पानावर जातो , पण आता तिथे कोणत्याही प्रतिसादासमोर "नवीन" हा शब्द दिसत नाही. त्यामुळे नवीन प्रतिसाद शोधणे थोडे कठीण जाते. इतर (कसलेले, मुरलेले, मातब्बर ई) मिपाकर अशा परिस्थितीत कसा मार्ग काढतात ?

In reply to by मराठी कथालेखक

फाइण्ड इन पेज हा ऑप्शन वापरतो, त्यात तारिख किंवा वेळ टाकून नव्याचा शोध घेता येतो.

आजच वाचलेल्या माहितीनुसार कोणताही सजीव जर त्याने १००% शुध्द ऑक्सिजन श्वास घेण्यास वापरला तर जिवंत राहू शकत नाही. कारण तसे केले तर शरीरातला नॉर्मल gas balance बिघडेल. म्हणजे जगण्यासाठी सगळे वायू महत्वाचे आहेत. मग फक्त ऑक्सिजनला प्राणवायू का म्हणतात?

औरंगाबाद येथील "वाल्मी" हि शासकीय संस्था, भूमी व जलव्यवस्थापन बाबतच्या विविध कार्यशाळा घेत असते. या मुख्यत्वेकरून शासकिय अभियंत्यांसाठी असतात. मात्र काही कार्यशाळा या पाणी वापर संस्थेच्या सदस्यांसाठी, प्रगतिशील शेतकरी, महिला शेतकरी व सामान्य शेतकरी यांचेसाठी देखील उपलब्ध आहेत.

माझे घर मुलाने खडुने रंगवुन ठेवले आहे. कमीत कमी खर्च, वेळ आणि कष्ट ह्या दृष्टीने घर साध्या रंगाने एक हात मारुन रंगवणे बरे की संपुर्ण घराला एक प्लेन वॉलपेपर लावणे बरे? दोन्ही मध्ये किती खर्च येईल? ११००स्केफुट चे घर आहे. ।यावरुन अंदाज काढा भिंतींचा

In reply to by पिलीयन रायडर

वॉलपेपर कमीत कमी १००० रु रोल पासुन विकतात, एका वॉलपेपरमध्ये अंदाजे ५२ स्क़.फुट जागा व्यापली जाते. म्हणजे हा खर्च ११०० स्क़.फुट. ला खुप होईल. त्यापेक्षा फक्त एखाद्या भिंतीपुरता वॉलपेपर लावा, व बाकी भिंतीला साधा रंग द्या.. स्वत: करणार आहात का ? मी स्वत:चा Flat रंगवला आहे पेण्ट आणून.. खरडणे वैगरे नसेल तर सोप्पे आणि मज्जेदार काम आहे.. ते टेक्ष्चर काढणे तर खुप सोप्पे आहे. लोक्स त्यासाठी ५००० रु का मोजतात हा मला प्रश्न आहे. :)

In reply to by ब़जरबट्टू

नक्की करायला आवडलं असतं पण सध्या बाकी इतर खुप कामे आहेत आणि रंग तर द्यावा लागणारे. मला कामचलाउ रंग हवाय तेव्हा अगदी साधे काहीही चालेल.

अगोदरचा रंग साधा डिस्टेंपरच असेल तर एक दोन हात वरच्या वर खालून चार फुट देता येईल.प्लास्टीकवर प्लास्टीकच द्यावा लागेल तो एक लिटर डबा रु २४० एका खोलीला पुरेल.डिस्टेंपर १६०रु चा असतो.फक्त खालीच पट्टा मारावा लागेल.नंतर तीन वर्षांनी सर्वच काम देता येईल.

In reply to by कंजूस

अगोदरचा बिल्डरने मारुन दिलेला साधाच रंग आहे. आणि खरंच फक्त खालुन ४ फुटापर्यंतच खराब आहे. पण मग रंगाचे दोन पट्टे दिसणार नाहीत का? आणि हा रंग घासुनच लावावा लागतो की डायरेक्ट लावतात?

In reply to by पिलीयन रायडर

अगोदरच्या रंगाचा छोटा पापुद्रा रंगवाल्याकडे ( ज्यांच्याकडे मिक्सर आहे,)न्या. त्याला मिळती अथवा तीच डिस्टेंपर शेड दोन मिनीटात करून देतात ( १६० + २० रु ) घेतात.एका खोलीस एक लिटर पुरेल खालून चारफुट.घासू नका.पहिल्या चितारकामापेक्षा नक्कीच चांगलं दिसेल.

जूनच्या पहिल्या आठवड्यात दमणला (आणि जवळपासची ठिकाणे) दोन - तीन दिवसांची कौटुंबिक सहल करण्याबद्दल सल्ला हवा होता. चांगली जागा आहे का? मुलांना आवडेल असे काही आहे का?

In reply to by अगम्य

दमण हे वापी रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेस दहाबारा किमी परीसरांत पसरलं आहे.आता तिथे काही चिल्ड्रेन पार्क झाली आहेत.नानी आणि मोटी दमण जवळजवळ आहेत.पुर्वी हाभाग दारुड्यांचा अड्डा होता आता तसं नाहीये. मी गेलेलो नाही पण माहितीपत्रक आहे. वापी पुर्वेस बारा किमीवर "दादरा गार्डन" उर्फ छान बाग आहे.बोटींग स्वस्त आणि बारा महिने असतं.एक गोल तळं आणि मध्ये बेट त्यावर बदकं ठेवलीत.बाग बुधवारी बंद असते. इथून अठरा किमीवर आणखी एक खानवेल नावाची बाग आणि झु आहे. आहे. पुढे एक धरण तलाव आहे.दादरा गार्डनास दोन वेळा गेलो आहे. दादरा नगर हवेलीचा उत्सव २८ जुलैच्या आसपास असतो. ापी स्टेशनला खारे शेंगदाणे फार विकले जातात.बदकांना हे शेंगदाणे फार आवडतात.

In reply to by अगम्य

मला माहित असलेले दमणचे काही प्रेक्षणीय स्थळे: नानी दमणः १. देवका बिच २. अवर लेडी ऑफ द सी चर्च व आजूबाजूचा परीसर मोटी दमणः १. दमण फोर्ट - आतमध्येच १-२ चर्च आणि गार्डन आहेत. २. ओल्ड लाईट हाऊस ३. किल्ल्याच्या बाहेर देखील ३-४ चर्चेस आहेत.

In reply to by चिनार

=)) =)) लै भारी. मग त्या सगळ्या लेखमालेचं परिक्षण करणारे धागे, मग त्या धाग्यांचीही लेखमाला. बढिया आइडिया है.

In reply to by चिनार

अरे मंग पौन घ्या. जगात दोन प्रकारची मानसं हायेत. सैराट पाह्यलेले आणि सैराट न पाह्यलेले. तीसर्‍या प्रकारची पण आहेत, सैराट पाहून न आवडलेले. चौथ्या प्रकारची पण आहेत, सैराट न पाहताच सैराट न आवडलेले. =))

In reply to by तर्राट जोकर

पाचवा प्रकार पन हाय ना भौ... शिनेमा गेला गाढवाच्या गावात** पन झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिङ्गाट ....

In reply to by तर्राट जोकर

बाकी तजो भौ झ्याक लिहीता तुम्ही. त्या गुरुजींच्या मागे कायले वेळ घालवता? लेखणीत दम हाये तुमच्या...त्याचा उपेग करा.. कृ.ह.घ्या.

In reply to by प्रचेतस

वल्ली भौ ! मित्राने १००० वर्षचं सांगितले होते. मी १५०० वाढवले..म्हनल हा.का.ना.का. तुम्ही म्हणता तर १०००० करू. बाकी तुमचा इतिहासाचा अभ्यास दांडगा हाय तर १०००० वर्षापूर्वी सैराटची ष्टोरी एखाद्या शिलालेखावर सापडली तर सांगजा आम्हाले..

कृपया या वा नंतर येणार्‍या पुढच्या धाग्याचा वापर नवीन प्रश्नकर्त्यांनी करावा ही विनंती. क्षुल्लक माहिती/प्रश्नासाठी एकोळी, चारोळी इ. धागे काढू नयेत.

द्विशतका साठी धागाकर्त्याला एक छोटा नेटपॅक(पुढील धाग्यासाठी) देऊन सत्कार करण्यात येत आहे.

In reply to by जेपी

हा धागा तुमचाच हाये!

मला घरातली धूळ, जळमटं इ. साफ करण्यासाठी एक व्हॅक्युम क्लीनर घ्यायचा आहे. परवडेबल असावा. कोणता ब्रॅण्ड घ्यावा? त्यात काही प्रकार असतात का? उदा. कार व्हॅ. क्ली. घरातल्या साफसफाईसाठी वापरता येतो की अधिक पॉवरचा घ्यावा? वॉटेज काय असतं इ. इ.