https://www.misalpav.com/node/32572 भाग २
https://www.misalpav.com/node/34076 भाग ३
****************************************************
मागील भागात १०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्यामुळे हा नवा धागा काढत आहे.
****************************************************
प्रश्न - आपल्याकडे जलव्यवस्थापना बद्दल शिक्षण / प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम उपल्ब्ध आहेत आहेत का ?
असे अभ्यासक्रम कुठल्या संस्थेत उपल्ब्ध आहेत त्याची थोडक्यात महिती मिळेल का ?
(उदा.संस्थेचे नाव,ठिकाण्,अभ्यासक्रम)
=======================================================================
प्रतिसादासाठी धन्यवाद.
वाचने
41588
प्रतिक्रिया
206
मिसळपाव
प्रतिक्रिया
मॅन्युफॅक्चरिंग मधला अनुभव
In reply to private company मध्ये मेडिकल by लालगरूड
१) वजन-उंची
२) डोळे-कान क्षमता
३) रक्त-लघ्वी घटक तपासणी, रक्तदाब
४) फुफ्फुसांची क्षमता
५) ईसीजी (दोन वर्षांपूर्वी फक्त ४०+ कर्मचा-यांना करावा लागायचा, आता प्रत्येकाचा करतात)
शंकर महादेवन यांच्या चाहत्यांसाठी पुण्यात
मैफल
'ड' जीवनसत्व कोणकोणत्या
'ड' जीवनसत्व कोणकोणत्या शाकाहारी पदार्थातून मिळू शकेल?
शाकाहारी अधिक चकटफू
In reply to 'ड' जीवनसत्व कोणकोणत्या by श्रीगुरुजी
सूर्यप्रकाश शाकाहारीच असतो शिवाय चकटफू!!
फिरा नि मिळवा ड जीवनसत्त्व!!!
लोणी
In reply to 'ड' जीवनसत्व कोणकोणत्या by श्रीगुरुजी
लोणी
दातामध्ये white filling ची
दातामध्ये white filling ची cost किती आहे
सिमेंट?
In reply to दातामध्ये white filling ची by लालगरूड
ते दातांत फट किती आहे त्यावर अवलंबून असावे!!
बादवे, त्याला सिमेंट म्हणतात पण ते खरेच सिमेंट असते का?
पावडर आणि लिक्विड मिक्स करुन
In reply to सिमेंट? by सुनील
पावडर आणि लिक्विड मिक्स करुन बनवला जाणारा आणि सेट झाल्यावर ती जागा भरुन कडक होणारा पदार्थ म्हणजे सिमेंट. मग ते दाताचे असो की बांधकामाचे!
दातासाठी वेगवेगळ्या प्रकारची सिमेंट वापरली जातात.अर्थातच बिनविषारी!यातले काॅमनली दिसणारे पांढरे सिमेंट हे झिंक आॅक्साइड पावडर आणि युजिनाॅल हे लिक्विड मिक्स करुन बनवले जाते.
धन्यवाद
In reply to पावडर आणि लिक्विड मिक्स करुन by अजया
धन्यवाद.
काही दिवसांपुर्वी मला कोणातरी
काही दिवसांपुर्वी मला कोणातरी चांदोबा मासिकाचे सर्व जुने अंक एकत्र करुन PDF स्वरुपांत पाठविले होते.
येथुन पुढे माझ्या ओळखीच्या सदस्यांस त्यांच्या वाढदिवशी त्याच महिन्यातील जुना चांदोबा टाचुन शुभेच्छादर्शक मेल करावी, अशी कल्पना मनांत आली.. पण.दुर्दैवाने आता ती PDF फाईलच मिळत नाही.
कोणाकडे असल्यास मला ही फाईल परत मिळु शकेल का ??
त्यांनाच पुन्हा विचारा
In reply to काही दिवसांपुर्वी मला कोणातरी by प्रसाद भागवत
ज्यांनी तुम्हाला दिली होती त्यांनाच पुन्हा विचारा!
(आणि मिळाल्यास मलाही पाठवा!!)
रागावु नका सुनिलराव..पण असे
In reply to त्यांनाच पुन्हा विचारा by सुनील
रागावु नका सुनिलराव..पण असे 'उंटावर' बसुन सल्ले देणे खुप सोपे असते.. वस्तु हरवली असे म्हटल्यावर 'नेमकी कूठे हरवली ??' असे विचारण्यासारखे. 'काही दिवसांपुर्वी मला 'कोणीतरी' ... या शब्दातच मला ती व्यक्ती आठवत नसल्याची कबुली दिली आहे... असे आठवत असते तर येथे कशाला आलो असतो ?? असो. आपल्या महत्वपुर्ण सल्याबद्दल धन्यवाद. आपली विनंतीही लक्षात ठेवली आहे.
पाठवणार असलात तर मीही रांगेत.
In reply to काही दिवसांपुर्वी मला कोणातरी by प्रसाद भागवत
पाठवणार असलात तर मीही रांगेत.
मिपावर...
In reply to काही दिवसांपुर्वी मला कोणातरी by प्रसाद भागवत
मिपावर याआधी "चांदोबा"वर बरेच लेख येऊन गेलेत. त्याबद्दलच्या आठवणी अनेक जणांनी शेअर करून झाल्यात. त्यात एक सामाईक दुवा म्हणजे, दरवेळी चंदामामा.कॉम का ORG ची लिंक दिली जायची व पब्लिक खुश होऊन दुवा परत करायचे. ;) चांदोबा प्रकरणच तसे खास होते म्हणा. आता ते डोमेन चालत नाहीये, एक्सपायर झाल्याचे दिसतेय. त्यामुळे खूपच निराशा होतेय. तुम्हाला खरच जर त्या पीडीएफ मिळाल्या तर त्या प्लीज शेअर करा. खूप दुवा मिळतील. :)
तुम्हाला त्या पीडीएफ लवकर मिळो हीच प्रार्थना!
Sandy
मिपावर चांगल्या कथा कादंबरी
मिपावर चांगल्या कथा कादंबरी यांची लिंक द्या कोणीतरी
शिंपीणिचं घरटं
In reply to मिपावर चांगल्या कथा कादंबरी by लालगरूड
शिंपीणिचं घरटं
चांदोबा मासिकाचे सर्व जुने
चांदोबा मासिकाचे सर्व जुने अंक मलाही हवे आहेत. कुणाकडे असतील तर कृपया मलाही पाठवा.
मिपावर येणारी एक अडचण
एखादा शतकी /द्विशतकी (पक्षी : पेटलेला) धागा असतो. धाग्यासमोर "२२६ , १४ नवीन " असे काहीतरी दिसते. फक्त नवीन प्रतिसाद पहायला मिळावे म्हणून मी "१४ नवीन" वर टिचकी मारतो. धाग्याचे पहिले पान उघडून नवीन प्रतिसादांतल्या सर्वात वरच्या प्रतिसादापाशी मी आपोआप पोहोचतो. त्यानंतर "नवीन" शब्दामुळे त्या पानावरील सगळे नवीन प्रतिसाद मला सहज सापडतात. पण काही नवीन प्रतिसाद दुसर्या पानावर असतात म्हणून मी दुसर्या पानावर जातो , पण आता तिथे कोणत्याही प्रतिसादासमोर "नवीन" हा शब्द दिसत नाही. त्यामुळे नवीन प्रतिसाद शोधणे थोडे कठीण जाते.
इतर (कसलेले, मुरलेले, मातब्बर ई) मिपाकर अशा परिस्थितीत कसा मार्ग काढतात ?
फाइण्ड इन पेज हा ऑप्शन वापरतो
In reply to मिपावर येणारी एक अडचण by मराठी कथालेखक
फाइण्ड इन पेज हा ऑप्शन वापरतो, त्यात तारिख किंवा वेळ टाकून नव्याचा शोध घेता येतो.
कसलेले, मुरलेले, मातब्बर सापडले!
In reply to फाइण्ड इन पेज हा ऑप्शन वापरतो by तर्राट जोकर
राम राम!
Sandy
तजो, फाइण्ड इन पेज हे ऑप्शन
In reply to फाइण्ड इन पेज हा ऑप्शन वापरतो by तर्राट जोकर
तजो, फाइण्ड इन पेज हे ऑप्शन कसे वापरायचे?
Ctr+F हो..
In reply to तजो, फाइण्ड इन पेज हे ऑप्शन by मार्मिक गोडसे
Ctr+F हो..
धन्यवाद!
In reply to Ctr+F हो.. by पिलीयन रायडर
धन्यवाद!
आजच वाचलेल्या माहितीनुसार
आजच वाचलेल्या माहितीनुसार कोणताही सजीव जर त्याने १००% शुध्द ऑक्सिजन श्वास घेण्यास वापरला तर जिवंत राहू शकत नाही. कारण तसे केले तर शरीरातला नॉर्मल gas balance बिघडेल. म्हणजे जगण्यासाठी सगळे वायू महत्वाचे आहेत. मग फक्त ऑक्सिजनला प्राणवायू का म्हणतात?
प्राणवायू म्हणजे फक्त निव्वळ
In reply to आजच वाचलेल्या माहितीनुसार by अभिजीत अवलिया
प्राणवायू म्हणजे फक्त निव्वळ ऑक्सिजन नसावे. बाकी डॉक्टर सांगतील
जलव्यवस्थापन
औरंगाबाद येथील "वाल्मी" हि शासकीय संस्था, भूमी व जलव्यवस्थापन बाबतच्या विविध कार्यशाळा घेत असते. या मुख्यत्वेकरून शासकिय अभियंत्यांसाठी असतात. मात्र काही कार्यशाळा या पाणी वापर संस्थेच्या सदस्यांसाठी, प्रगतिशील शेतकरी, महिला शेतकरी व सामान्य शेतकरी यांचेसाठी देखील उपलब्ध आहेत.
माझे घर मुलाने खडुने रंगवुन
माझे घर मुलाने खडुने रंगवुन ठेवले आहे. कमीत कमी खर्च, वेळ आणि कष्ट ह्या दृष्टीने घर साध्या रंगाने एक हात मारुन रंगवणे बरे की संपुर्ण घराला एक प्लेन वॉलपेपर लावणे बरे? दोन्ही मध्ये किती खर्च येईल? ११००स्केफुट चे घर आहे. ।यावरुन अंदाज काढा भिंतींचा
पेण्ट बेस्ट...
In reply to माझे घर मुलाने खडुने रंगवुन by पिलीयन रायडर
वॉलपेपर कमीत कमी १००० रु रोल पासुन विकतात, एका वॉलपेपरमध्ये अंदाजे ५२ स्क़.फुट जागा व्यापली जाते. म्हणजे हा खर्च ११०० स्क़.फुट. ला खुप होईल. त्यापेक्षा फक्त एखाद्या भिंतीपुरता वॉलपेपर लावा, व बाकी भिंतीला साधा रंग द्या..
स्वत: करणार आहात का ? मी स्वत:चा Flat रंगवला आहे पेण्ट आणून.. खरडणे वैगरे नसेल तर सोप्पे आणि मज्जेदार काम आहे.. ते टेक्ष्चर काढणे तर खुप सोप्पे आहे. लोक्स त्यासाठी ५००० रु का मोजतात हा मला प्रश्न आहे. :)
नक्की करायला आवडलं असतं पण
In reply to पेण्ट बेस्ट... by ब़जरबट्टू
नक्की करायला आवडलं असतं पण सध्या बाकी इतर खुप कामे आहेत आणि रंग तर द्यावा लागणारे. मला कामचलाउ रंग हवाय तेव्हा अगदी साधे काहीही चालेल.
अगोदरचा रंग साधा डिस्टेंपरच
अगोदरचा रंग साधा डिस्टेंपरच असेल तर एक दोन हात वरच्या वर खालून चार फुट देता येईल.प्लास्टीकवर प्लास्टीकच द्यावा लागेल तो एक लिटर डबा रु २४० एका खोलीला पुरेल.डिस्टेंपर १६०रु चा असतो.फक्त खालीच पट्टा मारावा लागेल.नंतर तीन वर्षांनी सर्वच काम देता येईल.
अगोदरचा बिल्डरने मारुन दिलेला
In reply to अगोदरचा रंग साधा डिस्टेंपरच by कंजूस
अगोदरचा बिल्डरने मारुन दिलेला साधाच रंग आहे. आणि खरंच फक्त खालुन ४ फुटापर्यंतच खराब आहे. पण मग रंगाचे दोन पट्टे दिसणार नाहीत का? आणि हा रंग घासुनच लावावा लागतो की डायरेक्ट लावतात?
अगोदरच्या रंगाचा छोटा
In reply to अगोदरचा बिल्डरने मारुन दिलेला by पिलीयन रायडर
अगोदरच्या रंगाचा छोटा पापुद्रा रंगवाल्याकडे ( ज्यांच्याकडे मिक्सर आहे,)न्या. त्याला मिळती अथवा तीच डिस्टेंपर शेड दोन मिनीटात करून देतात ( १६० + २० रु ) घेतात.एका खोलीस एक लिटर पुरेल खालून चारफुट.घासू नका.पहिल्या चितारकामापेक्षा नक्कीच चांगलं दिसेल.
दमण
जूनच्या पहिल्या आठवड्यात दमणला (आणि जवळपासची ठिकाणे) दोन - तीन दिवसांची कौटुंबिक सहल करण्याबद्दल सल्ला हवा होता. चांगली जागा आहे का? मुलांना आवडेल असे काही आहे का?
दमण हे वापी रेल्वे स्टेशनच्या
In reply to दमण by अगम्य
दमण हे वापी रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेस दहाबारा किमी परीसरांत पसरलं आहे.आता तिथे काही चिल्ड्रेन पार्क झाली आहेत.नानी आणि मोटी दमण जवळजवळ आहेत.पुर्वी हाभाग दारुड्यांचा अड्डा होता आता तसं नाहीये. मी गेलेलो नाही पण माहितीपत्रक आहे.
वापी पुर्वेस बारा किमीवर "दादरा गार्डन" उर्फ छान बाग आहे.बोटींग स्वस्त आणि बारा महिने असतं.एक गोल तळं आणि मध्ये बेट त्यावर बदकं ठेवलीत.बाग बुधवारी बंद असते. इथून अठरा किमीवर आणखी एक खानवेल नावाची बाग आणि झु आहे. आहे. पुढे एक धरण तलाव आहे.दादरा गार्डनास दोन वेळा गेलो आहे. दादरा नगर हवेलीचा उत्सव २८ जुलैच्या आसपास असतो.
ापी स्टेशनला खारे शेंगदाणे फार विकले जातात.बदकांना हे शेंगदाणे फार आवडतात.
मला माहित असलेले दमणचे काही
In reply to दमण by अगम्य
मला माहित असलेले दमणचे काही प्रेक्षणीय स्थळे:
नानी दमणः
१. देवका बिच
२. अवर लेडी ऑफ द सी चर्च व आजूबाजूचा परीसर
मोटी दमणः
१. दमण फोर्ट - आतमध्येच १-२ चर्च आणि गार्डन आहेत.
२. ओल्ड लाईट हाऊस
३. किल्ल्याच्या बाहेर देखील ३-४ चर्चेस आहेत.
सैराटवर एखादी लेखमाला सुरु
सैराटवर एखादी लेखमाला सुरु करण्याची विनंती संपादक मंडळाला करू इच्छितो !
=)) =)) लै भारी. मग त्या
In reply to सैराटवर एखादी लेखमाला सुरु by चिनार
=)) =)) लै भारी. मग त्या सगळ्या लेखमालेचं परिक्षण करणारे धागे, मग त्या धाग्यांचीही लेखमाला. बढिया आइडिया है.
गेल्या २५०० वर्षात असा सिनेमा
In reply to =)) =)) लै भारी. मग त्या by तर्राट जोकर
गेल्या २५०० वर्षात असा सिनेमा झाला नाहीये म्हणतात !
मी अजूनतरी पहिला नाही.
अरे मंग पौन घ्या.
In reply to गेल्या २५०० वर्षात असा सिनेमा by चिनार
अरे मंग पौन घ्या.
जगात दोन प्रकारची मानसं हायेत. सैराट पाह्यलेले आणि सैराट न पाह्यलेले. तीसर्या प्रकारची पण आहेत, सैराट पाहून न आवडलेले. चौथ्या प्रकारची पण आहेत, सैराट न पाहताच सैराट न आवडलेले. =))
पाचवा प्रकार पन हाय ना भौ...
In reply to अरे मंग पौन घ्या. by तर्राट जोकर
पाचवा प्रकार पन हाय ना भौ...
शिनेमा गेला गाढवाच्या गावात** पन झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिङ्गाट ....
हा ना राव. भुललोच पा.
In reply to पाचवा प्रकार पन हाय ना भौ... by चिनार
हा ना राव. भुललोच पा.
बाकी तजो भौ झ्याक लिहीता
In reply to हा ना राव. भुललोच पा. by तर्राट जोकर
बाकी तजो भौ झ्याक लिहीता तुम्ही. त्या गुरुजींच्या मागे कायले वेळ घालवता?
लेखणीत दम हाये तुमच्या...त्याचा उपेग करा..
कृ.ह.घ्या.
धन्यवाद. ;)
In reply to बाकी तजो भौ झ्याक लिहीता by चिनार
धन्यवाद. ;)
फक्त २५०० वर्षेच?
In reply to गेल्या २५०० वर्षात असा सिनेमा by चिनार
फक्त २५०० वर्षेच?
अहो १०००० वर्षात झाला नाही आणि १०००० वर्षे पुढेही होणार नाही असं म्हणा.
वल्ली भौ !
In reply to फक्त २५०० वर्षेच? by प्रचेतस
वल्ली भौ !
मित्राने १००० वर्षचं सांगितले होते. मी १५०० वाढवले..म्हनल हा.का.ना.का.
तुम्ही म्हणता तर १०००० करू.
बाकी तुमचा इतिहासाचा अभ्यास दांडगा हाय तर १०००० वर्षापूर्वी सैराटची ष्टोरी एखाद्या शिलालेखावर सापडली तर सांगजा आम्हाले..
अजूनतरी सापडली नाय,
In reply to वल्ली भौ ! by चिनार
अजूनतरी सापडली नाय,
चित्रलिपीतच असंन कदाचित कुठं असली तर.
ते आर्चीमाय चित्रलिपीत कशी
In reply to अजूनतरी सापडली नाय, by प्रचेतस
ते आर्चीमाय चित्रलिपीत कशी दिसत असेन ह्याचा विचार करतोय !
सुरसुंदर्यांची शिल्प
In reply to ते आर्चीमाय चित्रलिपीत कशी by चिनार
सुरसुंदर्यांची शिल्प डोळ्यांसमोर आणा.
सैराटच्या सैरावैरा धावणाऱ्या
सैराटच्या सैरावैरा धावणाऱ्या धाग्यांनी विणलेल्या गोणपाटामुळे मिपा कुठे नेवून ठेवलाय दिसेना !
फोनच्या सिमकार्ड साइजबद्दल
फोनच्या सिमकार्ड साइजबद्दल https://www.quora.com/What-are-the-different इथे वाचले.
https://www.quora.com/What-are-the-different
sim card link link
sim card link link दुरुस्ती
https://www.quora.com/What-are-the-different-types-of-SIM-cards
कृपया या वा नंतर येणार्या
कृपया या वा नंतर येणार्या पुढच्या धाग्याचा वापर नवीन प्रश्नकर्त्यांनी करावा ही विनंती. क्षुल्लक माहिती/प्रश्नासाठी एकोळी, चारोळी इ. धागे काढू नयेत.
200
द्विशतका साठी धागाकर्त्याला एक छोटा नेटपॅक(पुढील धाग्यासाठी) देऊन सत्कार करण्यात येत आहे.
मालक...
In reply to 200 by जेपी
हा धागा तुमचाच हाये!
मला घरातली धूळ, जळमटं इ. साफ
मला घरातली धूळ, जळमटं इ. साफ करण्यासाठी एक व्हॅक्युम क्लीनर घ्यायचा आहे. परवडेबल असावा. कोणता ब्रॅण्ड घ्यावा? त्यात काही प्रकार असतात का? उदा. कार व्हॅ. क्ली. घरातल्या साफसफाईसाठी वापरता येतो की अधिक पॉवरचा घ्यावा? वॉटेज काय असतं इ. इ.
Car vaccum cleaner
In reply to मला घरातली धूळ, जळमटं इ. साफ by एस
घरात वापरण्याजोगा नसतो