पाच सप्टेंबर (२०१५) ला चेतन भगत यांचा टाइम्स ऑफ इंडीया वर एक ब्लॉग लेख आला होता. Flying kisses, angry grunts: Stop happy-angry dance between India and Pakistan, invade them with culture
अनेक भारतीय लोक पाकीस्तान आणि मध्यपुर्वेतील मुलतत्ववादाबाबत सातत्याने आतून खदखदत राहतात. अगदी अजीत डोवालांनी अलिकडे हैदराबादेत पोलीस अकॅडेमीत बोलताना अनेक आंतरराष्ट्रीय संघर्ष युद्धाच्या माध्यमातून सोडवण्याच्या पलिकडे गेले आहेत असे काहीसे सांगितले हि खदखद व्यक्त करताना पुरेसे लक्षात घेतले जात नाही असे वाटते. (अर्थात त्यांनी पुढे अंतर्गत सुरक्षा अधिक चिंतेचा विषय आहे वगैरे मांडले आहे इत्यादी अर्थात तो या धाग्याचा मुख्य विषय नाही) आणि दुसर्या देशात जाऊन सर्वसामान्य भारतीयास खदखद व्यक्त करत राहण्यापलिकडे फारसे काही करताही येत नाही.
चेतन भगत यांनी त्यांच्या ब्लॉग मधून वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीयांनी पाकीस्तानवर सांस्कृतीक आक्रमण (निर्यात/प्रभाव वाढवणे या अर्थाने) केले पाहीजे अर्थात येथे चेतन भगतांना सांस्कृतीक जबरदस्ती अभिप्रेत नसावी. जी भारतीय संस्कृती ते घेऊ शकतात ती त्यांना देत राहणे आणि सांस्कृतीक माध्य्मातून मत परिवर्तन घडवणे. ज्यांना हे मत चटकन पटलेले नाही त्यांनी चेतन भगतांचा ब्लॉग मूळातून वाचणे गरजेचे आहे कारण मी त्यांच्याच पद्धतीने नेमक्या शब्दात येथे मांडणी करू शकेन असे नाही.
व्यक्तीशः बहुतांशाने मला चेतन भगतांचा हा विचार पटतो. त्यांनी सिनेमा संगित आदीचे उदाहरण दिले आहे तेच मला तत्वज्ञानाबाबतीतही वाटते. आज विकिपीडियासारखा ज्ञानकोश उर्दू आणि अरेबीक भाषातही आहे आणि आम्ही आमच्या सांस्कृतीक आणि तत्वज्ञान विषय इतर भाषिकांपर्यंत त्यांच्या स्वतःच्या भाषातून इफेक्टीव्हली पोहोचवण्याचे सकारात्मक प्रयत्न करण्यात कमी तर पडत नाही आहोत ना ?
अर्थात या सांस्कृतीक निर्यातीला काही मर्यादा निश्चीत आहेत हे खरे कारण काहीच मर्यादा नसत्या तर भारत एकसंघ असतानाच भारतीय संस्कृतीची लागण होऊन आज समोर दिसणारे प्रश्न दिसलेच नसते. गोल फिरुन याचा अर्थ असाही काढावयास नको हे शक्यच असणार नाही आणि म्हणून संघर्ष हाच एकमेव मार्ग शिल्लक राहतो;-पण या धाग्यापुरता संघर्षाचा विचार आपण बाजूला ठेऊ- तर या धागा लेखाचा एक उद्देश भारतीय संस्कृती पोहोचवली आणि स्विकारली जाण्यात येणारे नेमके अडथळे कोणकोणते आहेत आणि हे अडथळे पार करण्याचे कोणकोणते मार्ग उपलब्ध होऊ शकतात ?
तर एकुण चेतन भगत यांच्या पाकिस्तान विषयक दृष्टीकोणाकडे आपण कसे बघता ?
वर्गीकरण
वाचन संख्या
5886
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
हि नवीन कल्पना नाही.
योगाच्या माध्यमातून मोदींनी
In reply to हि नवीन कल्पना नाही. by sagarpdy
आम्ही शक्यतो चेतन भगत
व्यक्तिलक्ष्य तर्कदोष ?
In reply to आम्ही शक्यतो चेतन भगत by आदूबाळ
बरोबर.
In reply to व्यक्तिलक्ष्य तर्कदोष ? by माहितगार
बरोबर
In reply to बरोबर. by आदूबाळ
हे तर आधी पासुन होतय... ;)
चेतन भगतला दिसतंय ते ....
In reply to हे तर आधी पासुन होतय... ;) by मदनबाण
त्याचं म्हणणं असं की भारत
In reply to चेतन भगतला दिसतंय ते .... by गामा पैलवान
जर रिझल्ट मिळणार असतील तर
In reply to त्याचं म्हणणं असं की भारत by मदनबाण
मला वाटतं असे १०००० कोटी
In reply to जर रिझल्ट मिळणार असतील तर by माहितगार
कोणत्याही आयडीयालॉजीला केवळ
In reply to मला वाटतं असे १०००० कोटी by मदनबाण
कोणत्याही आयडीयालॉजीला केवळ
In reply to कोणत्याही आयडीयालॉजीला केवळ by माहितगार
मला वाटते आपण क्वोट केलेल्या
In reply to कोणत्याही आयडीयालॉजीला केवळ by मदनबाण
नाही ! पिसाळलेल्या कुत्र्याला
In reply to मला वाटते आपण क्वोट केलेल्या by माहितगार
आज पाकिस्तानात कितीशी किंमत
In reply to चेतन भगतला दिसतंय ते .... by गामा पैलवान
ती जबाबदारी भारताची का म्हणून?
In reply to आज पाकिस्तानात कितीशी किंमत by माहितगार
वाक्यदुरुस्ती
In reply to ती जबाबदारी भारताची का म्हणून? by गामा पैलवान
तो ब्लॅाग न वाचताच उत्तर देतो
चेतन भगत काय म्हणतोय आणि लालू
In reply to तो ब्लॅाग न वाचताच उत्तर देतो by कंजूस
आतून प्रगती
In reply to चेतन भगत काय म्हणतोय आणि लालू by माहितगार
भारताच्या आर्थिक ताकदीने आणि
In reply to आतून प्रगती by राही
ह्या विषयावर खूप आधी मी लेख
कोण चेतन भगत? धन्यवाद.
+१
In reply to कोण चेतन भगत? धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
बहुतांशाने मला चेतन भगतांचा
बहुतांशाने मला चेतन भगतांचा हा विचार पटतो. त्यांनी सिनेमा संगित आदीचे उदाहरण दिले आहे तेच मला तत्वज्ञानाबाबतीतही वाटते. आज विकिपीडियासारखा ज्ञानकोश उर्दू आणि अरेबीक भाषातही आहे आणि आम्ही आमच्या सांस्कृतीक आणि तत्वज्ञान विषय इतर भाषिकांपर्यंत त्यांच्या स्वतःच्या भाषातून इफेक्टीव्हली पोहोचवण्याचे सकारात्मक प्रयत्न करण्यात कमी तर पडत नाही आहोत ना ?भारत आणि पाकिस्तान या देशांतील सद्य वस्तूस्थितींतील मूलभूत फरक समजला की या मतातील फोलपणा समजाऊन द्यायची गरज नाही. समजा भारताने १०,००० कोटीच्या भारतीय संस्कृती पाकिसानी लोकांना समजावून द्यायला सुरुवात केली. ते सगळे तिथल्या अतिरेकी संघटनां (ज्यांचे बोलविते धनी पाक सैन्य व आयएसआय आहे; शिवाय ज्या सैन्यविरोधी अतिरेकी संघटना आहेत त्यांच्यामते तर इस्लाम सोडून इतर संस्कृतींचा प्रसार म्हणजे केवळ कुफर) हातावर हात ठेवून गप्प बसतील का? त्यांनी दोनचार अतिरेकी हल्ले केले की बहुसंख्य असलेले पण अतिरेक्यांना तोंड देण्याची हिंमत आणि ताकद नसलेले लोक घरात निमूटपणे बसून राहतील. त्या हल्ल्यांना इंटॉलरन्स म्हणणार्यांना गोळ्या घातल्या तरी तेथिल वकील त्याचा हार घालून सत्कार करतील (पाकिस्तानी पंजाबाच्या गव्हर्नरचा त्याच्याच रक्षकाने अश्याच कारणाने भर दिवसा खून केला तेव्हा हेच झाले होते. त्या वकीलांचा म्होरक्या आज न्यायाधिश झाला आहे !) मुख्य म्हणजे या विषयात एक गोष्ट लोक नेहमी विसरतात... भारत-पाक प्रकरण वरवर धार्मिक वाटले तरी खरे तर त्याचा पाया "अर्थ व सत्ता" आहे. जर भारत-पाक संबंधसुधारले तर पाकिस्तानातील (आणि भारतातीलही) अनेक दुकाने बंद होतील... आणि सतत मिळणारा प्रचंड पैसा आणि हातात असलेली सत्ता कोण सुखासुखी जाऊ देईल ???!!!इए काका मास्टरस्ट्रोक प्रतिसाद
In reply to बहुतांशाने मला चेतन भगतांचा by डॉ सुहास म्हात्रे
भारत पाकिस्तान ह्या दोन
अधिक माहिती खालील दुव्यावर...
चेतन भगत कोण?