✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चेतन भगत यांच्या पाकिस्तान विषयक दृष्टीकोणाकडे आपण कसे बघता ?

म
माहितगार यांनी
Tue, 11/24/2015 - 11:39  ·  लेख
लेख
पाच सप्टेंबर (२०१५) ला चेतन भगत यांचा टाइम्स ऑफ इंडीया वर एक ब्लॉग लेख आला होता. Flying kisses, angry grunts: Stop happy-angry dance between India and Pakistan, invade them with culture अनेक भारतीय लोक पाकीस्तान आणि मध्यपुर्वेतील मुलतत्ववादाबाबत सातत्याने आतून खदखदत राहतात. अगदी अजीत डोवालांनी अलिकडे हैदराबादेत पोलीस अकॅडेमीत बोलताना अनेक आंतरराष्ट्रीय संघर्ष युद्धाच्या माध्यमातून सोडवण्याच्या पलिकडे गेले आहेत असे काहीसे सांगितले हि खदखद व्यक्त करताना पुरेसे लक्षात घेतले जात नाही असे वाटते. (अर्थात त्यांनी पुढे अंतर्गत सुरक्षा अधिक चिंतेचा विषय आहे वगैरे मांडले आहे इत्यादी अर्थात तो या धाग्याचा मुख्य विषय नाही) आणि दुसर्‍या देशात जाऊन सर्वसामान्य भारतीयास खदखद व्यक्त करत राहण्यापलिकडे फारसे काही करताही येत नाही. चेतन भगत यांनी त्यांच्या ब्लॉग मधून वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीयांनी पाकीस्तानवर सांस्कृतीक आक्रमण (निर्यात/प्रभाव वाढवणे या अर्थाने) केले पाहीजे अर्थात येथे चेतन भगतांना सांस्कृतीक जबरदस्ती अभिप्रेत नसावी. जी भारतीय संस्कृती ते घेऊ शकतात ती त्यांना देत राहणे आणि सांस्कृतीक माध्य्मातून मत परिवर्तन घडवणे. ज्यांना हे मत चटकन पटलेले नाही त्यांनी चेतन भगतांचा ब्लॉग मूळातून वाचणे गरजेचे आहे कारण मी त्यांच्याच पद्धतीने नेमक्या शब्दात येथे मांडणी करू शकेन असे नाही. व्यक्तीशः बहुतांशाने मला चेतन भगतांचा हा विचार पटतो. त्यांनी सिनेमा संगित आदीचे उदाहरण दिले आहे तेच मला तत्वज्ञानाबाबतीतही वाटते. आज विकिपीडियासारखा ज्ञानकोश उर्दू आणि अरेबीक भाषातही आहे आणि आम्ही आमच्या सांस्कृतीक आणि तत्वज्ञान विषय इतर भाषिकांपर्यंत त्यांच्या स्वतःच्या भाषातून इफेक्टीव्हली पोहोचवण्याचे सकारात्मक प्रयत्न करण्यात कमी तर पडत नाही आहोत ना ? अर्थात या सांस्कृतीक निर्यातीला काही मर्यादा निश्चीत आहेत हे खरे कारण काहीच मर्यादा नसत्या तर भारत एकसंघ असतानाच भारतीय संस्कृतीची लागण होऊन आज समोर दिसणारे प्रश्न दिसलेच नसते. गोल फिरुन याचा अर्थ असाही काढावयास नको हे शक्यच असणार नाही आणि म्हणून संघर्ष हाच एकमेव मार्ग शिल्लक राहतो;-पण या धाग्यापुरता संघर्षाचा विचार आपण बाजूला ठेऊ- तर या धागा लेखाचा एक उद्देश भारतीय संस्कृती पोहोचवली आणि स्विकारली जाण्यात येणारे नेमके अडथळे कोणकोणते आहेत आणि हे अडथळे पार करण्याचे कोणकोणते मार्ग उपलब्ध होऊ शकतात ? तर एकुण चेतन भगत यांच्या पाकिस्तान विषयक दृष्टीकोणाकडे आपण कसे बघता ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5880 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

हि नवीन कल्पना नाही.

sagarpdy
Tue, 11/24/2015 - 12:33 नवीन
हि नवीन कल्पना नाही. अमेरिकनायझेशन हा तसाच प्रकार आहे.
  • Log in or register to post comments

योगाच्या माध्यमातून मोदींनी

माहितगार
Tue, 11/24/2015 - 13:28 नवीन
योगाच्या माध्यमातून मोदींनी जराशी सुरवात केली आहेच. पाकने नसले तरी इराणी लोक योगा स्विकारु लागल्याचे वाचनात आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

आम्ही शक्यतो चेतन भगत

आदूबाळ
Tue, 11/24/2015 - 12:47 नवीन
आम्ही शक्यतो चेतन भगत यांच्याकडे बघायचे टाळतो...
  • Log in or register to post comments

व्यक्तिलक्ष्य तर्कदोष ?

माहितगार
Tue, 11/24/2015 - 13:23 नवीन
व्यक्तिलक्ष्य तर्कदोष ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

बरोबर.

आदूबाळ
Tue, 11/24/2015 - 15:19 नवीन
बरोबर. उद्या कमाल आर खानने वेदान्तावर अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला तरी तो वाचावासा वाटणार नाही. विचारसरणीत तर्कदोष नसणे यापेक्षा कॉमन सेन्स असणे हे मूल्य जास्त महत्त्वाचं वाटतं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

बरोबर

माहितगार
Tue, 11/24/2015 - 16:32 नवीन
बरोबर पण कॉमन सेन्स कॉमन असतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हे तर आधी पासुन होतय... ;)

मदनबाण
Tue, 11/24/2015 - 13:12 नवीन
अजुन बरेच आहे... ;) चेतन भगत तू-नळी सर्च करत नाहीत की काय ? ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev
  • Log in or register to post comments

चेतन भगतला दिसतंय ते ....

गामा पैलवान
Tue, 11/24/2015 - 13:52 नवीन
मदनबाण, भारतीय संस्कृतीने पाकिस्तान व्यापणे हे अगोदरपासून होतंय. चेतन भगतला माहिती असणारच. त्याचं म्हणणं असं की भारत शासनाने यासाठी साधारण १०००० कोटी रुपयांच्या अधिकृत योजना सुरू कराव्यात. जेणेकरून त्याच्यासारख्या लेखकांना सुगीचे दिवस येतील! ;-) शिवाय हे बघा चेतन महाशय काय म्हणतात : >> We often make the mistake of clubbing all constituents of Pakistan together when we say >> ‘Pakistan did this’ or ‘Pakistan doesn’t listen’. भारतीय जनतेला अडाणखोट समजून ऱ्हायलेत काय चेतनभाऊ? ते ज्या प्रगतीशील (aspirational) पाकिस्तान्यांच्या जोरावर पाकिस्तान काबीज करू पाहतात त्या लोकांना आज पाकिस्तानात कितीशी किंमत आहे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

त्याचं म्हणणं असं की भारत

मदनबाण
Tue, 11/24/2015 - 13:57 नवीन
त्याचं म्हणणं असं की भारत शासनाने यासाठी साधारण १०००० कोटी रुपयांच्या अधिकृत योजना सुरू कराव्यात. जेणेकरून त्याच्यासारख्या लेखकांना सुगीचे दिवस येतील! ;-) हा.हा.हा... :) भारतीय जनतेला अडाणखोट समजून ऱ्हायलेत काय चेतनभाऊ? ते ज्या प्रगतीशील (aspirational) पाकिस्तान्यांच्या जोरावर पाकिस्तान काबीज करू पाहतात त्या लोकांना आज पाकिस्तानात कितीशी किंमत आहे? काय म्हणता ते ? हं एकदम ट्रू ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

जर रिझल्ट मिळणार असतील तर

माहितगार
Tue, 11/24/2015 - 14:06 नवीन
जर रिझल्ट मिळणार असतील तर १०००० कोटी रुपये मोठी गोष्ट आहे का ? आणि चेतन भगत असो का जून कुणी जो कुणी रिझल्ट देईल त्याच्यांवर एवढे पैसे ओवाळून टाकण्यास खरेच काय हरकत आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मला वाटतं असे १०००० कोटी

मदनबाण
Tue, 11/24/2015 - 14:11 नवीन
मला वाटतं असे १०००० कोटी रुपये पाकड्यांवर खर्च करण्या पेक्षा आपल्या देशातील डोके फिरलेल्यांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात यावेत, ज्याची जरा जास्तच गरज आहे ! संदर्भ :- अतिरेक्याच्या अंतयात्रेला अलोट गर्दी ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

कोणत्याही आयडीयालॉजीला केवळ

माहितगार
Tue, 11/24/2015 - 14:15 नवीन
कोणत्याही आयडीयालॉजीला केवळ आयडीयालॉजीच हरवू शकते असे ऐकुन आहे. त्यासाठीचे उपचार भावनिक सोबत व्यावहारीकही असावयास नकोत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

कोणत्याही आयडीयालॉजीला केवळ

मदनबाण
Tue, 11/24/2015 - 14:18 नवीन
कोणत्याही आयडीयालॉजीला केवळ आयडीयालॉजीच हरवू शकते असे ऐकुन आहे. त्यासाठीचे उपचार भावनिक सोबत व्यावहारीकही असावयास नकोत का ? आयडीयालॉजी जर देशद्रोह असेल तर तिथे "शॉक" ट्रिटमेंटच दिली पाहिजे ! तशी आयडीयालॉजी हिटलरची सुद्धा होतीच की ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

मला वाटते आपण क्वोट केलेल्या

माहितगार
Tue, 11/24/2015 - 14:23 नवीन
मला वाटते आपण क्वोट केलेल्या माझ्या वाक्यातच त्याचे उत्तर सामावले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

नाही ! पिसाळलेल्या कुत्र्याला

मदनबाण
Tue, 11/24/2015 - 14:51 नवीन
नाही ! पिसाळलेल्या कुत्र्याला जर गोजांरायला गेलात तरी तो चावतोच हे आपण लक्षात ठेवायला हवे ! पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र आहे, ज्याच्या बरोबर आपण अघोषीत युद्ध लढत आहोत आणि शहीदांचे आकडे अजुनही रोज मोजत आहोत. प्रश्न फक्त हाच उरलाय की असे अजुन किती शहीद या देशाला हवेत ? अवांतर :- काही व्हिडीयो { बहुधा आधी दिले असावेत } इथे देउन जातो. मला बर्‍याच वेळा वाटते :- हॅव वी फरगॉट टु रिटालियेट विथ फुल फोर्स ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

आज पाकिस्तानात कितीशी किंमत

माहितगार
Tue, 11/24/2015 - 14:00 नवीन
आज पाकिस्तानात कितीशी किंमत आहे?
त्यांची किंमत वाढवणे हे भारतीय स्ट्रॅटेजीच लक्ष्य असावयास नको काय ? आणि ह्या स्ट्रॅटेजीक व्ह्यूचा अभाव असेल तर अडाणखोट विशेषणा बाबत पुर्नविचाराची अंमळ गरज असू शकेल का ? :) (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

ती जबाबदारी भारताची का म्हणून?

गामा पैलवान
Wed, 11/25/2015 - 13:04 नवीन
माहितगार, प्रगतीशील पाकिस्तान्यांची किंमत वाढवायची जबाबदारी भारताची का म्हणून? फाळणीच्या वेळी पाकिस्तानातल्या तसंही पाहता मुस्लिमांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली नव्हती. त्यामुळे भारतीय-पाकिस्तानी जनतेत सौहार्द नांदवण्याची टूम मुळातून निरर्थक आहे. पाकिस्तान उत्पन्न व्हायची कारणं वेगळी आहेत. चेतन भगतांच्या १०००० कोटींच्या उपायाने त्या कारणांचा निरास होणार नाहीये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

वाक्यदुरुस्ती

गामा पैलवान
Wed, 11/25/2015 - 13:08 नवीन
वाक्यदुरुस्ती :- वरच्या प्रतिसादातील एक वाक्य कृपया असं वाचावं : तसंही पाहता फाळणीच्या वेळी पाकिस्तानातल्या मुस्लिमांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली नव्हती. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

तो ब्लॅाग न वाचताच उत्तर देतो

कंजूस
Tue, 11/24/2015 - 14:24 नवीन
तो ब्लॅाग न वाचताच उत्तर देतो.इकडे बय्राच जणांना { बिचाय्रा} पाकिस्तानाबद्दल कणव आहे.तेही इंदू संस्कृतीचाच भाग आहेत.त्यांनी स्वत:ची सामाजिक,आर्थिक प्रगती करावी.आम्ही त्यांना उचलून पैसे कशाला पुरवायचे?आमच्या इकडे असलेली स्त्रियांना मिळणारी असमानतेची वागणूक दूर करण्यासाठी आम्ही काही ज्योतिबा फुले इम्पॅार्ट नाही केले.देवळांत सर्वांना प्रवेश मिळत नव्हता यासाठी सानेगुरूजी पुढे आले.विधवा विवाह निर्मुलन आमच्यातल्याच कोणी केले.त्यांना अमुक मदत करा ही हाक निवडणुकीच्यावेळी का देतात? ,मुलायम,लालू यांना अनाही अधूनमधून मदत करण्याची उबळ येत असते.
  • Log in or register to post comments

चेतन भगत काय म्हणतोय आणि लालू

माहितगार
Tue, 11/24/2015 - 14:30 नवीन
चेतन भगत काय म्हणतोय आणि लालू-मुलायम-किंवा अजून कुणीच्या लांगूलचालनात जमीन अस्मानचा फरक आहे. त्यांची प्रगती आतूनच होऊ द्यावी हा नेहरूवादी विचार आहे. चेतन भगत सुचवताहेत ते साम-दाम मधील दुसर्‍या क्रमांकाचा उपाय एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

आतून प्रगती

राही
Tue, 11/24/2015 - 14:46 नवीन
"त्यांची प्रगती आतून होऊ द्यावी" आणि आपण त्याला पडद्याआड हातभार लावीत असावे, हीच खरी स्ट्रॅटेजी आहे. आपण अफ्घानिस्तानमध्ये ती यशस्वीपणे राबवीतही आहोत. इतरही अनेक ठिकाणी आपले इन्टरेस्ट्स आणि प्रभावक्षेत्र निर्माण करणे ही पूर्वीपासूनचीच स्ट्रॅटेजी आहे. मला फार पूर्वीपासून वाटत आले आहे की भारताच्या आर्थिक ताकदीने आणि सुव्यवस्थेने जे साधेल ते मिलिटरी ताकदीपेक्षा कितीतरी अधिक असेल. आर्थिक यशाने जग दिपते. महाजनांचे अनुकरण आपोआपच होऊ लागते. आज बॉलीवुड हा आपल्या हातातला हुकमी एक्का आहे .(पाकिस्तानी मालिका पाहिल्या तर हे जाणवल्याशिवाय राहात नाही.) पण तो जपूनच वापरायचा असतो. भारतीय संस्कृती लादली जातेय, भारत हा 'बिग ब्रदर'सारखा वागतोय असा समजही होता नये. ही तारेवरची कसरत भारत आज अनेक वर्षे करत आला आहे हे चेतन भगतांना आणि इतरांनाही माहीत नसेल असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

भारताच्या आर्थिक ताकदीने आणि

माहितगार
Tue, 11/24/2015 - 14:52 नवीन
भारताच्या आर्थिक ताकदीने आणि सुव्यवस्थेने जे साधेल ते मिलिटरी ताकदीपेक्षा कितीतरी अधिक असेल.
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

ह्या विषयावर खूप आधी मी लेख

निनाद मुक्काम …
Tue, 11/24/2015 - 15:34 नवीन
ह्या विषयावर खूप आधी मी लेख लिहिला होता. म्हणूनच पाकिस्तानी कलावंतांना भारतात कला सादर करू देण्यास माझा विरोध नाही तर पूर्णपणे समर्थन आहे , आवळा देऊन कोहळा काढायचा. त्यांच्या नव्या पिढीला हिंदू चालीरीती जीवनपध्धती ह्याच्याबद्दल वाटणारी आपुलकी व भारत हा सुबत्ता असलेला सर्व दृष्ट्या पाकिस्तानहून मोठा देश आहे हे बॉलीवूड हेआपल्या प्रसार माध्यमाने तेथील तरुण पिढीच्या गळी उतरवत आहेत त्यामुळे ८० ते ९० च्या दशकात आमच्या लहानपणी अमेरिका अमेरिकन ड्रीम्स जे हॉलीवूड ने आमच्या माथी मारले त्यामुळे अमेरिका म्हणजे .... असा जो एक भक्तीभाव आमच्या ठायी रुजला तोच भक्तीभाव आता मी पाकिस्तानी तरुणाच्या डोळ्यात भारताविषयी पाहतो. त्यांच्याशी संवाद साधतांना हे प्रकर्षाने जाणवते.
  • Log in or register to post comments

कोण चेतन भगत? धन्यवाद.

परिकथेतील राजकुमार
Tue, 11/24/2015 - 16:27 नवीन
कोण चेतन भगत? धन्यवाद.
  • Log in or register to post comments

+१

मुक्त विहारि
Tue, 11/24/2015 - 21:02 नवीन
अगदी हेच म्हणायला आलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बहुतांशाने मला चेतन भगतांचा

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/24/2015 - 20:53 नवीन
बहुतांशाने मला चेतन भगतांचा हा विचार पटतो. त्यांनी सिनेमा संगित आदीचे उदाहरण दिले आहे तेच मला तत्वज्ञानाबाबतीतही वाटते. आज विकिपीडियासारखा ज्ञानकोश उर्दू आणि अरेबीक भाषातही आहे आणि आम्ही आमच्या सांस्कृतीक आणि तत्वज्ञान विषय इतर भाषिकांपर्यंत त्यांच्या स्वतःच्या भाषातून इफेक्टीव्हली पोहोचवण्याचे सकारात्मक प्रयत्न करण्यात कमी तर पडत नाही आहोत ना ? भारत आणि पाकिस्तान या देशांतील सद्य वस्तूस्थितींतील मूलभूत फरक समजला की या मतातील फोलपणा समजाऊन द्यायची गरज नाही. समजा भारताने १०,००० कोटीच्या भारतीय संस्कृती पाकिसानी लोकांना समजावून द्यायला सुरुवात केली. ते सगळे तिथल्या अतिरेकी संघटनां (ज्यांचे बोलविते धनी पाक सैन्य व आयएसआय आहे; शिवाय ज्या सैन्यविरोधी अतिरेकी संघटना आहेत त्यांच्यामते तर इस्लाम सोडून इतर संस्कृतींचा प्रसार म्हणजे केवळ कुफर) हातावर हात ठेवून गप्प बसतील का? त्यांनी दोनचार अतिरेकी हल्ले केले की बहुसंख्य असलेले पण अतिरेक्यांना तोंड देण्याची हिंमत आणि ताकद नसलेले लोक घरात निमूटपणे बसून राहतील. त्या हल्ल्यांना इंटॉलरन्स म्हणणार्‍यांना गोळ्या घातल्या तरी तेथिल वकील त्याचा हार घालून सत्कार करतील (पाकिस्तानी पंजाबाच्या गव्हर्नरचा त्याच्याच रक्षकाने अश्याच कारणाने भर दिवसा खून केला तेव्हा हेच झाले होते. त्या वकीलांचा म्होरक्या आज न्यायाधिश झाला आहे !) मुख्य म्हणजे या विषयात एक गोष्ट लोक नेहमी विसरतात... भारत-पाक प्रकरण वरवर धार्मिक वाटले तरी खरे तर त्याचा पाया "अर्थ व सत्ता" आहे. जर भारत-पाक संबंधसुधारले तर पाकिस्तानातील (आणि भारतातीलही) अनेक दुकाने बंद होतील... आणि सतत मिळणारा प्रचंड पैसा आणि हातात असलेली सत्ता कोण सुखासुखी जाऊ देईल ???!!!
  • Log in or register to post comments

इए काका मास्टरस्ट्रोक प्रतिसाद

होबासराव
Wed, 11/25/2015 - 00:14 नवीन
सगळ काहि ह्या प्रतिसादात आल. इए काका (डॉ सुहास म्हात्रे) मास्टरस्ट्रोक आहे तुमचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

भारत पाकिस्तान ह्या दोन

संदीप डांगे
Tue, 11/24/2015 - 21:30 नवीन
भारत पाकिस्तान ह्या दोन देशांमधले आर्थिक संबंध बघता राजनैतिक संबंध व वृत्तपत्रातून येणार्‍या बातम्यांमधून जनमानसात असलेल्या प्रतिमेला तडा जाईल. व्यापारी हितसंबंध अबाधित राहतील व राजनैतिक हितसंबंधही अबाधित राहतील अशी दुहेरी चाल खेळून दोन्ही देश परस्परहितसंबंधही व्यवस्थित राखून आहेत. बाकी दोन्ही कडची सामान्यजनता एकमेकांबद्दल वैराची धार परजत राहते ते दोन्हीकडच्या राज्यकर्त्यांसाठी आवश्यक आहे. जर दोन्ही देशांमधे सर्वच पातळीवर वाईट संबंध असतील तर दोन देशांमधले होणारे सर्वच्या सर्व व्यवहार सपशेल बंद असते. तसे होतांना दिसत नाही. बातम्यांमधून जे चित्र उभे राहते ते नेहमीच खरे असते असे नाही.
  • Log in or register to post comments

अधिक माहिती खालील दुव्यावर...

संदीप डांगे
Tue, 11/24/2015 - 21:32 नवीन
http://commerce.nic.in/pressrelease/pressrelease_detail.asp?id=2349
  • Log in or register to post comments

चेतन भगत कोण?

यशोधरा
Wed, 11/25/2015 - 00:16 नवीन
चेतन भगत कोण?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा