मतदानात अग्रक्रम पद्धती अवलंबावी
सध्या मतदानात first passing the post ही प्रणाली अंगिकारलि जाते.
याचा अर्थ जास्त मते पडेल तो निवडून येतो.पण यामदधये अनेक वेळेला विशेष
करून स्थानिक स्वराज्य संस्था इ.त फक्त १०/१५ टक्के सारखी मते पडून उमेदवार
विजयी होतो . मतदान जर ५०/६०टक्के झाले असेल तर विजयी उमेदवार जास्तीत जास्त
९ टक्के मतदारांचं प्रतिनिधीत्व करतो. सुध्रु ढ व सशक्त लोकशाहीत हे उचित नाही.
यासाठी प्रेफरनशिअल मतदान पद्धती अंगिकारावी असे मला वाटते.देशाच्या राष्ट्र्पतींच्या
निवडणुकीत हीच पद्धती अवलंबिली जाते . यामध्ये जरी एकच उमेदवार निवडून द्यायचा
असला तरी ,उभे राहिलेल्या सर्वच उमेदवाराना आपल्या पसंती नुसार आपण क्रमांक द्यायचे
असतात.
या पद्धतीत सर्वात जास्त मते, पडलेला उमेदवार निवडून येइलच असे सांगता येत नाही. जोपर्यंत
५० टक्क्याहून अधिक मते (अग्रक्रम १,मध्ये नसल्यास अग्रक्रम २,इ. ची मते,विचारात घेउन वगैरे)
मिळत नाहीत ,तो पर्यंत कोणीहि विजयी होता नाही.
अद्यापीहि बहुसंख्येने अशिक्षित असलेल्या जनतेला ही पद्धती किचकट वाटेल, त्याना पचनी
पडणार नाही असा आक्षेप कांही जण घेतील , परंतु निवडणूक प्रक्रीयेत अनेक आमूलाग्र बदल
उदा. उमेदवारागणित पेट्या ते शिक्के ते बटण दाबणे आणि अनेक ,आपण पचनी पाडलेले आहेत,
त्यामुळे यातहि कांही अडचण येउ नये.तरीही सध्या फक्त क्र.१ व २ व ३ अग्रक्रम पर्याय सुरू करावेत.
यामुळे खालील गोष्टी साध्य होण्यास मदत होइल.
१) निदान ५०टक्क्यांच्या इच्छेचा उमेदवार निवडून येइल.
२) निवडणुकीतील भ्रष्टाचाराला कांहीसा आळा बसेल.
३) कोणीहि उठावे निवडणूकीला उभे राहावे हेही कमी होइल.
४)मतदान अधिक होइल.
५) निवणुकितिल पैशाचा प्रभाव कमी होइल.
६)बर्यापैकी चांगल्या माणसांचा ,उमेदवार म्हणून सहभाग वाढेल.
७)कदाचित एकास एक लढती होतील.
यावर चर्चा व्हावी.मिपा वर अनेक प्रकांड पंडित आहेत. म्हणून हा धागा काढला आहे.
निवडणूक आयोग रि.अॅंड.डे. कीती करता माहीत नाही.
नगरपालिका व महानगरपालिका मध्ये असं नेहमी घडतं कि first passing the post वाल्या
उमेदवाराला जेमतेम एक सप्तमांश मत पडतात आणि तो निवडून येतो,डीपॉझिट राखायला
एक षष्ठांश मत लागतात.
ही परिस्थिती बदलली पाहिजे असं मला वाटतं.
जनहित याचिका यावर होउ शकते काय?
वर्गीकरण
वाचने
4266
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
हि किचकट पद्धत नाही जमणार राव
मला व्यक्तिशः अग्रक्रम पद्धत
१. मतदानाच्या दोन फेर्या
गेल्या भारतीय लोकसभा
In reply to १. मतदानाच्या दोन फेर्या by डॉ सुहास म्हात्रे
बाकी काही असो, क्र. १
प्रथमदर्शनी तरी पटत नाही
व्यवहार्य नाही
मतदान सोपे करता आले तर करावे
एवढे उपद्व्याप करण्यापेक्षा
दोनंच व्यक्ति उमेदवार असतील
रविवारी १ नोव्हे.ला कोल्हापूर