✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'उरा'तली सर!

म — मेघवेडा, Tue, 07/03/2012 - 21:11
नेमेचि येतो मग पावसाळा. पाऊस आला की मान्सूनइतकाच मुसळधार बरसणार्‍या वर्षाकवितांचा पाऊसातच आपली माझी एक बारकीशी सर. :) परवा मुंबईत मान्सूननं आगमनाची वर्दी दिल्याचं वाचलं. मागोमाग विविध सोशल नेटवर्क्सवर उष्म्यानं जीवाची काहिली झालेल्या तमाम मुंबैकरांनी नि:श्वास टाकल्याचंही वाचलं. मनात पाऊसकवितांची उजळणी सुरू झाली. आणि बोरकरांच्या एका द्विपदीवर मन येऊन अडलं ते तिथंच उरलं. त्यातून निर्माण झालेली ही 'उरातली' सर! (अर्थात, यातल्या बोरकरांच्या ओळी ओळखालच.) :)
पाहुन जळता धरेस ग्रीष्मानलदाहें निष्ठूर दाटुन येई मनी नभाच्या कृष्णमेघकाहूर तहानलेला चातक कोठे आर्त आळवी सूर कैवल्याने वरूणाचे का भरू नये मग ऊर? बरसे रस पिकल्या अम्भोदांतुन टापूर-टुपूर सुगंधमृण्मय अभिनव नाजुक पसरे सर्वदूर दिशादिशांतुन आषाढाच्या श्यामघनांना पूर तृणाप्रमाणे मनेंहि होती चंचल तृष्णमयूर कुडा सुरंगी कवळा मुसळी पुंगळी संकासूर पेव फुलांचे फुलता उमले भूवर सौख्यांकुर! इंद्रधनू-वर दृष्टिस पडता नभोमंडपी दूर हरितवनश्रीलेपित सृष्टी वधू लाजुनी चूर! सोनसळी लेऊन नव्हाळी साळि नर्तनातूर, शेतांमधुनी फुले तृप्तिचा पीत वर्ण भरपूर! भद्र भादवा घेऊन ये सौभाग्याचा सिंदूर निरोप देती वर्षाराणी हासे मधुरमधूर!

प्रतिक्रिया द्या
12935 वाचन

💬 प्रतिसाद (38)

अ स्स ल मे व्या !!

सुहास..
Tue, 07/03/2012 - 21:17 नवीन
अ स्स ल मे व्या !!
  • Log in or register to post comments

सु आणि रे आणि ख !!!!

गणपा
Tue, 07/03/2012 - 21:20 नवीन
नावाला जागलास मित्रा. :)
  • Log in or register to post comments

सलाम...!सलाम...!सलाम...!

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/03/2012 - 22:13 नवीन
Image removed. सलाम...!सलाम...!सलाम...!
  • Log in or register to post comments

+१००००००

पियुशा
Fri, 07/06/2012 - 12:51 नवीन
+१००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

वा रे मेघवेड्या!

पैसा
Tue, 07/03/2012 - 22:13 नवीन
उन्हाळ्याचा ताप असह्य झाल्यावर पहिला पाऊस येतो आणि सगळं वातावरण बदलून जातं, तसं वाटलं तुझी कविता वाचून.
  • Log in or register to post comments

+१

अस्मी
Wed, 07/04/2012 - 12:09 नवीन
आणि सगळं वातावरण बदलून जातं, तसं वाटलं तुझी कविता वाचून.
अगदी.. खूप सुंदर आणि नादमय कविता..तू नेहमी लिहीत राहा. -अस्मिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

छान

नंदन
Tue, 07/03/2012 - 22:19 नवीन
बोरकरांच्या ओळी 'मध्यवर्ती' ठेवून केलेली रचना आवडली :). पहिली द्विपदी 'तन्नि:श्वास श्रवुनि रिझवी कोण त्याच्या जिवासी'ची आठवण करून देणारी. कवितेतले चेतनागुणोक्ती, अनुप्रास अलंकार आणि फुलांची अस्सल नावं हे 'अच्च' बोरकर परंपरेतलं! जियो!!
  • Log in or register to post comments

आवडली हे वे सां न ल.

सूड
Tue, 07/03/2012 - 23:41 नवीन
आवडली हे वे सां न ल.
  • Log in or register to post comments

मस्त रे मेव्या... खूप

सागर
Tue, 07/03/2012 - 23:53 नवीन
मस्त रे मेव्या... खूप दिवसांनी तुझी एक झकास कविता वाचली... :) इंद्रधनू-वर दृष्टिस पडता नभोमंडपी दूर हरितवनश्रीलेपित सृष्टी वधू लाजुनी चूर! या ओळी तर क्या बात है.... ;)
  • Log in or register to post comments

उत्तम कविता!

चतुरंग
Tue, 07/03/2012 - 23:58 नवीन
आषाढातल्या पहिल्या पावसाची चातकप्रतीक्षा (दवणीय शब्दाबद्दल माफ करशीलच ;) ) आणि त्यापुढला वरुणराजाचा प्रवास सुरेख चितारला आहेस. (बाकीबाबप्रेमी)रंगा
  • Log in or register to post comments

मस्त!

बहुगुणी
Wed, 07/04/2012 - 03:40 नवीन
इंद्रधनू-वर दृष्टिस पडता नभोमंडपी दूर हरितवनश्रीलेपित सृष्टी वधू लाजुनी चूर! ..... सुंदर ओळी! सर्वच रचना picturesque आहे, चित्रगुप्तांनी आणि त्यांच्यासारख्या प्रतिभावंत कलावंतांनी या कवितेला चित्ररुप द्यावं असं सुचवावसं वाटतं! मेघवेड्या: या निमित्ताने 'बोरकरी' पावसावरच्या आणखी एका लेखाची आठवण करून दिलीस...
  • Log in or register to post comments

अनुमोदन

अमृत
Wed, 07/04/2012 - 09:04 नवीन
कविता आवडली. || चित्रगुप्तांनी आणि त्यांच्यासारख्या प्रतिभावंत कलावंतांनी या कवितेला चित्ररुप द्यावं असं सुचवावसं वाटतं! || - या वाक्याशी सहमत. अमृत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

छान

सहज
Wed, 07/04/2012 - 06:17 नवीन
कविता आवडली. मेवे ध्वनिमुद्रीत करुन फित चढवा.
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतिम.

प्रचेतस
Wed, 07/04/2012 - 07:00 नवीन
निव्वळ अप्रतिम.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर रचना. परत परत

कवितानागेश
Wed, 07/04/2012 - 08:32 नवीन
अतिशय सुंदर रचना. परत परत वाचली.
  • Log in or register to post comments

मेघवेडा साहेब. खरच खुप सुंदर रचना आहे.

निश
Wed, 07/04/2012 - 11:39 नवीन
मेघवेडा साहेब. खरच खुप सुंदर रचना आहे. खुपच अप्रतिम.
  • Log in or register to post comments

खल्लास!!!

प्रभो
Wed, 07/04/2012 - 12:03 नवीन
खल्लास!!!
  • Log in or register to post comments

सु रे ख !

पहाटवारा
Wed, 07/04/2012 - 12:04 नवीन
कडक ऊन्हात सह्याद्रितल्या कुठल्या तरि गडावर नाहितर डोंगरावर चढत जावे .. ऊन्हे ऊतरायच्या आतच एकदम आभाळ भरून यावे .. अन बरोबरिच्या कुणाच्या तरि "चला पावसाच्या आत खाली ऊतरूया".. असल्या हट्टाला न जुमानता तिथेच कुठेतरि कडे-कपार्‍यांमधे थांबून धूम पावसाचे रूप अन तुषार अंगावर झेलून जेव्हा हळू हळू खाली ऊतरत येताना .. मधेच एखादि छोटिशी वाडि अन पायर्‍या पायर्‍यांची शेती बघत , एकदम तुमची हि कविता समोर दिसावी .. नाहितर ... दे धूम पावसात गाडि हाकत घाटमाथ्यावर येउन थाम्बावे .. पावसाचा जोर जरा कमी झालेला पाहून , गाडि रस्त्याच्या कडेला लावावी .. अन पावसाची थोडिशी रिप रिप अंगावर झेलत एक फेरफटका बाजूच्या माळरानावर मारायला निघावे .. तेव्हा तुमची हि कविता एक्दम भेटावी .. वाह .. मे वे .. मन एकदम फ्रेश करून टाकलेत ..
  • Log in or register to post comments

+1 असच म्हणते

जाई.
Wed, 07/04/2012 - 14:30 नवीन
+1 असच म्हणते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पहाटवारा

हा धागा स्पेशली रेकमेंड झाला

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/04/2012 - 14:22 नवीन
हा धागा स्पेशली रेकमेंड झाला म्हणून उघडला ... आणि सार्थक झालं! अप्रतिम आहे रे हे मेव्या! नंदन आणि पहाटवारा यांचे प्रतिसादही आवडले.
  • Log in or register to post comments

अप्रतिम...!!

विकाल
Wed, 07/04/2012 - 14:49 नवीन
अप्रतिम...!!
  • Log in or register to post comments

मस्त

स्मिता.
Wed, 07/04/2012 - 15:37 नवीन
इकडे उन्हाचा उकाडा असूनही कविता वाचताना आजूबाजूला पाऊस कोसळत असल्याचा भास झाला :)
  • Log in or register to post comments

कविता आवडली. पण समजायला अवघड

मृत्युन्जय
Wed, 07/04/2012 - 15:42 नवीन
कविता आवडली. पण समजायला अवघड आहे आणि यातला शृंगार रस नाही झेपला.
  • Log in or register to post comments

+१, अर्थात कवितेला समजुन घेणं

५० फक्त
Wed, 07/04/2012 - 16:06 नवीन
+१, अर्थात कवितेला समजुन घेणं थोडंसं अवघडच आहे मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

छान ! आता याचं रसग्रहण करुन

नाना चेंगट
Wed, 07/04/2012 - 18:10 नवीन
छान ! आता याचं रसग्रहण करुन लेख लिहायचा वादा पूर्ण करावा !!
  • Log in or register to post comments

दा .. प्रच्चंड आवडेश. अरे

प्रीत-मोहर
Fri, 07/06/2012 - 13:29 नवीन
दा .. प्रच्चंड आवडेश. अरे लिखाणाची फ्रिक्वेंसी वाढवलीस तरी चालेल :) कोटीभास्कर आणि पहाटवारा यांचे प्रतिसादही आवडले आहेत :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

मेघवेडा
Fri, 07/06/2012 - 15:03 नवीन
समस्त रसिकजनांचे मनःपूर्वक आभार. नंदन - स्तुतीनं मेंदू ढिला होतो असं अलीकडेच कुठेतरी वाचलं! ;) आणि आपण तर मला तडक बोरकरांच्या परंपरेत नेऊन ठेवलंत. मेंदू निखळला तर जबाबदारी तुमची. ;) बहुगुणी - लिंकबद्दल धन्यवाद. सुरेखच लेख आहे. सहजमामा - वेळ मिळेल तेंव्हा नक्की ध्वनिमुद्रण करीन. पहाटवारा - :) कार्यकर्ते - कोण तो रेकमेंडर? मृत्युंजय - यातली गत तर नाही ना? ;) वाटत नाही म्हणा तसं तुमचं लेखन वगैरे बघून. नाना - आपणच रसग्रहण करावेत अशी नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

मेव्या, किती सुंदर लिहिलं

यशोधरा
Fri, 07/06/2012 - 15:20 नवीन
मेव्या, किती सुंदर लिहिलं आहेस!
  • Log in or register to post comments

व्वा!

स्वाती दिनेश
Sat, 07/07/2012 - 17:49 नवीन
सुंदर कविता! स्वाती
  • Log in or register to post comments

केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर ...

सुनील
Sat, 07/07/2012 - 18:37 नवीन
छान कविता. खूप आवडली. नानासाहेबांचे रसग्रहणदेखिल मस्तच!
  • Log in or register to post comments

आपण तर निशब्द

jaypal
Sun, 07/08/2012 - 00:11 नवीन
Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

खूपच सुंदर कविता! जियो मेवे!

नगरीनिरंजन
Sun, 07/08/2012 - 10:54 नवीन
खूपच सुंदर कविता! जियो मेवे!
  • Log in or register to post comments

खरोखरच सुंदर काव्य!!

भरत कुलकर्णी
Sun, 07/08/2012 - 15:22 नवीन
खरोखरच सुंदर काव्य!!
  • Log in or register to post comments

फारच सुंदर

चैतन्य दीक्षित
Mon, 07/09/2012 - 09:25 नवीन
अतिशय सहज, वृत्तबद्ध आणि सकस काव्य वाचायला मिळाले. जियो! जियो!
  • Log in or register to post comments

"सकस" हा शब्द चैतन्य

स्पंदना
Mon, 07/09/2012 - 17:44 नवीन
"सकस" हा शब्द चैतन्य दिक्षितां कडुन उधार घेउन सुद्धा शब्द अधुरे वाटताहेत. मेवे अगदी "हलवा" कविता. सुरेख, नाजुक शब्द रचना अन चित्रदर्शी काव्य. पुन्हा पुन्हा वाचाव अन उरी साठवाव.
  • Log in or register to post comments

अस्सल

स्पा
Tue, 07/10/2012 - 12:00 नवीन
अस्सल मेवे ब्रांड... मस्तच रे
  • Log in or register to post comments

सुंदर

sneharani
Tue, 07/10/2012 - 13:29 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments

भारी

अहिरावण
Fri, 05/10/2024 - 19:17 नवीन
भारी
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा