Skip to main content

गंध फुलांचा गेला सांगून

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 26/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावच्या दर्दी वाचकांना आवाहन. वेगवेगळ्या ऋतूंमधली वेगवेगळी फुले, त्यांचे विविध रंग अन सुवास! शिवाय त्या सुवासांबरोबर त्या सणांच्या अन सभारंभांच्या आठवणी... आठवणींची कुपी उघडली की असे अनेक सुवास तरळत बाहेर येतात. गुगल करून खूप शोधले, पण जशी हवी तशी, भारतातल्या फुलांची माहीती, अगदी महिन्यानुसार कुठेच मिळाली नाही. उगाच फुलवाल्यांच्या जाहिरातींनी भटकावले, किंवा अगम्य ईंग्लीश अथवा चायनीज नावे मिळाली. मिसळपावचे माहितगार वाचक महिना- भारतात मिळणारी फुले/फळे अशी माहीती इथे जमा करू शकतील असे वाटले, म्हणून इथे आलो आहे. चला तर, जमवू या... पारिजातक... ऑगस्ट सप्टेंबर (गणपतीत मिळतात हे आठवते आहे.) ..............

वाचने 27662
प्रतिक्रिया 52

प्रतिक्रिया

दसर्‍याचा आणि दिवाळीतला झेंडू. शरद, हेमंत, शिशिर या तीनही ऋतुत रात्री रातराणीचा सुगंध असतोच. उन्हाळ्यात अनंत आणि मोगरा.

बहुतेक पावसाळ्यादरम्यान बहरते !!

वेडावून टाकणार्‍या गंधाच्या पांढर्‍या शुभ्र नाजूक लांब देठाच्या फुलांची ही उंचच उंच झाडे दिवाळीच्या आधीपासून तीन-चार महिने बहरत राहतात, हल्ली फारशी दिसत नाहीत :-( बुचाची फुले Indian Cork tree

In reply to by बहुगुणी

फर्ग्युसन कॉलेजला याची भरमसाठ झाडं आहेत. फिजिक्स डिपार्टमेंटच्या समोर एक भलं मोठं झाड होतं याचं, ते काही वर्षांपूर्वी वादळात पडलं. अजून आठवण येते तिथून कधी जावं लागलं तर.. :(

In reply to by पिशी अबोली

पुणे युनिव्हर्सिटीत पण चिक्कार आहेत. जानेवारीत सकाळी लवकर फिरायला गेलं की मस्त धुन्द सुगन्ध येत राहतो. :)

पावसात फुलणारा सोनचाफा, तेरडा, आणि अनेक गवतातील फुले.. यातील तेरड्याला आरतीच्या तबकाला लावून तबक सुंदर सजवता येते. त्यामुळे गणपतीच्या सणाची आठवण आहे याची. कोंकणीतील 'वागचापको' किंवा 'वागाची नाकटां' ज्याला मराठीत बहुधा 'हळदीकुंकवाची फुले' म्हणतात, तीपण पावसात फुलतात.. पाऊस बहुतेक संपताना केवडा फुलतो..त्या झाडीत जाऊन केवडा आणणे हे कष्टकर्मच आहे..

In reply to by पिशी अबोली

केवडा नाव वाचून एकदम केवडा अन सुर्‍या अन मुकुंद जोश्या आणि सगळीच्या सगळी शाळा आठवली.

In reply to by पिशी अबोली

कळलावी म्हणजे नागलखडी किंवा नागकांडी. यालाच नागकिटा, नागकडा, नागखडी/डा असेही म्हणतात. ही वनस्पती विषारी असते (विशेषतः तिचे मूळ) म्हणून आणि तिची फुले (पानेही) पिवळीजर्द-थोडी लाल छटा असलेली- असतात म्हणून तिच्या नावात नाग असतो. इंग्लिशमध्ये ग्लोरी लिली, ग्लोरिओसा सुपर्बा. कळलावी हे नाव तुरळक प्रमाणातच प्रचारात होते. पण साधारणतः पंचवीस-तीस वर्षांपूर्वी पदभ्रमण-दुर्गभ्रमणासाठी तरुणांचे गट जंगलात फिरू लागले आणि या वनस्पतीतल्या अल्कलॉइड्सचा बाळंतपणाच्या कळा येण्यासाठी कुठल्यातरी आदिवासीपाड्याच्या रिमोट जंगलकोपर्‍यात कधीकाळी केला जात असलेला उपयोग आणि त्यामुळे तिथे वापरले गेलेले कळलावी हे नाव त्यातल्या बाळंतपणाच्या संदर्भामुळे थोडे आकर्षक आणि सनसनाटी वाटून तेच भटकंतीच्या मराठी संदर्भपुस्तकांमधून दिसू लागले आणि बघता बघता लोकप्रिय झाले. वनस्पतितज्ज्ञ हे देशी नावांबद्दल फारसे आग्रही नसतात कारण वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावे प्रचलित असतात. त्यामुले स्टँडर्ड म्हणून इंग्लिश नॉमेन्क्लेचर वापरणे योग्यच आहे. पण नागकांडी-नागखडी सारखी सुंदर नावे प्रचारात असताना कळलावी सारखे नाव रूढ व्हावे ह्याचे एक मराठीभाषाप्रेमी म्हणून दु:ख होते. वाघनखी नावाचीही एक वनस्पती असते.

फोटो आणि आठवणी! अगदी सुवास मनात दरवळला! धन्यवाद!

म्हवाच्या फुलांचा दरवळ आवड्तो :-)

त्याचा हलका सुगंध छान वाटतो.. पांढर्‍याशुभ्र निशिगंधाचा एक गुच्छ खोलीत असेल तर लगेच लक्षात येत नाही त्याच्या काहीशा साध्याशा विशेष आकर्षक नसलेल्या रुपामुळे.. पण तो दरवळ हलकेच जाणवत राहतो. कोणी जालावरून प्रतिमा टाकल्यास आधीच धन्यवाद.देऊन ठेवतो...

उन्हाळ्यात रात्री फुलाणारा मोगरा.... उन्हाळ्यात जास्त पण इतरही वेळेस बहरणारा चाफा... पावसाळ्यात फुलणारी जाई, जुई, नेवाळी, चमेली... नवरात्राच्या वेळी बहर येणारी शेवंती... बकुळ कधी बहरतो माहित नाही... ईतरही कित्ती कित्ती फुले आहेत ज्यांना सुगंधी म्हणता येणार नाही पण त्यांचा स्वत:चा एक वेगळा गंध असतो, श्रावणात सोळा प्रकारच्या फुलांमध्ये ही हमखास असतात ( पण सुगंधी नसल्यामुळे नावे दिली नाहीत ).

श्रावणात कितीतरी (२४?) प्रकारची पत्री वाहतात त्यातली पानंही सुगंधी असतात. दवणा, मरवा यांचा तर सुंदरच असतो गंध.

In reply to by कवितानागेश

आघाड्याची पानं, दुर्वा पत्री म्हणून गौरीगणपतीच्या पुजेसाठी आणली जातात. तरी आणखी एका फुलाचे नाव आठवत नाहीये.

बारमाहि असणारा लाल ,पांढरा जास्वंद ,त्याला सुंगध नाही पण मन मोहवतो सकाळी

मोगरा वर्गातली किंवा मोगर्‍याशी साधर्म्य असलेली अनेक फुले. मोगरा, बटमोगरा, हजारीमोगरा, जाई, जुई, चमेली, सायली, नेवाळी, मोतिया, कुंती-कामिनी, कुंद, कुसर, मदनबाण, मल्लिगे वगैरे. चाफ्याचे सर्व प्रकार. अगदी खुरचाफ्यालाही मंद वास असतो. सोनचाफा, कवठी चाफा, हिरवा चाफा, नागचाफा, भुईचाफा (ह्याचा कंद जमिनीत असतो आणि लिलीसारखे दांड्यातून फूल येते.) सोनटक्का, कृष्णकमळ, अनंत/तगर, सुरंगी (फक्त चैत्रात फुलते). कैलासपतीच्या फुलालाही मंद वास असतो पण फळे मात्र दुर्गंधदायक. शेवंती-गोंड्यालाही आपापला गंध असतो. बाकी केवडा, बकुळ, तुळस, सब्जा, दवणा, पाचू, माली ह्यांचा वरती उल्लेख झालाच आहे

उन्हाळ्याच्या सुरुवातीस करवंदांच्या जाळीवर फुललेली फुलं पण थेट मोगरा , जाई जुई यांच्याशी स्पर्धा करतात . घेवड्याच्या वेलीवरच्या फुलाना पण एक वेगळाच सुगंध असतो .

उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेले भलेमोठे वृक्ष पण फुल्लानी बहरतात नाव माहित नाही , पण त्यांच्या सुगंध वेडावणारा असतो . दाढीच्या ब्रश सारखी मौ मौ फुलं येतात. पिवळा आणि गुलाबी असे दोन रंग असतात .

In reply to by स्पा

गुलाबी असणारा तो पर्जन्यवृक्ष. पिवळसर हिरवट असणारा तो शिरीष. दोघं जवळपास सारखेच दिसतात. पण फुलांच्या स्ट्रक्चरमधे थोडा फरक असतो आणि वासपण किंचित वेगळा असतो. शिरीषकुसुमम् म्हणजे कालिदासाची नायिकांसाठीची फेवरिट उपमा... :) मी लहानपणी या दोन्ही फुलांना दाढीचा ब्रश म्हणूनच ओळखायचे.. :)

In reply to by स्पा

त्या फुलाना शिरीष असे नाव आहे. ( काही लो क्याला लॅबर्नम असेही म्हणतात. पण ल्याबर्नम ला जर्द पिवळी कडुनिंबासारखी फुले येतात)

सगळ्या फुलांचा मंद दरवळ पसरला... छान धागा! स्वाती

दवण्याचा गंध मला फार आवडतो... किंचीत गुढता भारली असावी असाच काहीसा वाटतो तो गंध. पाचुचा गंध काही केल्या आता आठवत नाहीये... बाकी सोनटक्क्याची नाजुक फुल आणि तसाच त्याचा नाजुक सुगंध. सुरंगीच्या गजर्‍याचा गंध तर अफलातुन असतो... :)

In reply to by सूड

पाचूचे तुरे असतात. पानांसकट डोक्यात घालतात. http://www.maayboli.com/node/22479 इथे जागूने त्याबद्दल लिहिले आहे. फोटो आहेतच! मला आवडतात मे महिन्यात थोडेच दिवस येणारी बकुळीची (ओवळीची) फुले आणि सुरंगी. मोगर्‍यासारखीच थोड्या दिवसांत सगळ्या वर्षाचं फुलून घेणारी!

कुडा kuda सुरंगी surangi कवळा kavala मुसळी musalee पुंगळी pungalee संकासूर sankasoor पेव pev सर्व पावसाळी रानफुले. झैरात सुरू : कुडा सुरंगी कवळा मुसळी पुंगळी संकासूर पेव फुलांचे फुलता उमले भूवर सौख्यांकुर झैरात संपली.

In reply to by मेघवेडा

फोटो अप्रतिमच..सगळे सुगंध दरवळले... कवळ्याची फुलं आवडतात, नाव माहीत नव्हतं... :) फक्त सुरंगी पावसात फुलत नाही...

मस्त चाललाय धागा पुढे ! या सगळ्यात बकुळीच्या फुलांची आठवण कशी नाही झाली कोणाला. फुले ताजी असतानाचा दरवळ सुकल्यावरही अनेक आठवडे कायम राहतो... माझा आवडता सुगंध !

काल पानशेत परिसरात भटकंती करत असताना टिपलेले हे पावसाळी फुलांचे फोटो! पावसा इतकेच फ्रेश! :) https://fbcdn-sphotos-e-a.akamaihd.net/hphotos-ak-ash4/998733_493796434039981_461479096_n.jpg ======================================================= https://fbcdn-sphotos-g-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/1094944_493796610706630_694515544_n.jpg ======================================================= https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-prn2/954677_493796277373330_1765677103_n.jpg ======================================================= https://fbcdn-sphotos-d-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/556731_493796540706637_2142679919_n.jpg ========================================================

प्राजक्त / पारिजातक चा अजून उल्लेख नाही? संपूर्ण झाड औषधी गुणधर्म असलेले ... फूल, पान, साल , एवढेच नाही तर त्याचे सान्नीध्यही औषधी जरा आणि मरणास दूर ठेवणारा असे म्हटले जाते. आणि फुलांचा गन्ध आणि अंगणातील गोल सडा तर ... वा........ किणकिनाट

एकदम सुगंधीत झालेला धागा आवडला :) अमोल केळकर

दसरा जवळ आला. झेंडू/गोंडा आता एकदम फॉर्मात येतील... :) आणि फुलांचा नसला, तरी आत्ता तयार झालेल्या शेतांचा आणि वाढलेल्या गवताचा वासही मस्त वाटतोय..