Skip to main content

पुण्यातली प्रेक्षणीय-स्थळे ?

लेखक बन्याबापू यांनी सोमवार, 19/12/2011 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा करानों ! काय सांगु यार..गेले चार-पाच वर्ष कुठेच फिरलो नाही.घर ते कॉलेज बाकी वेळच नाही मिळाला कुठे फिरायला.आता कॉलेज सुरू झाले तर कुठेतरी एकटेच फिरायला जायची हुक्की आली.म्हणुन लगेच पुण्यात भावाला ला कॉल करुन सांगितले " मी येणार आहे पुण्याला..आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊ ! भावाने लगेच 'हो' बोलला.तसे एका मैत्रिणीला ही भेटायचे आहे म्हणुन जात आहे.माझी फक्त एकच मैत्रीण आहे आणि तिला जर मी आता पुण्यात जाऊन नाही भेटलो तर पुन्हा कधी आयुष्यात भेटु नाही शकणार..कारण (आता सांगत नाही..जावू दे )..तर मित्राणो..मला सांगा ना 'पुण्यात प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत ? तिथे कसे जायचे ? जवळपास ठिकाणे च सांगा ? किल्ले बघायला..त्यांचा इतिहास जाणून घ्यायला मला खुप आवडते.तर,पुण्यात कोणते किल्ले आहेत जवळपास ? मी आता शनिवारी सकाळी पुण्यात येईन.माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीला भेटेन..खुप बोलणार आहे तीचाशी..कारण ती मला पुन्हा कधीच भेटणार नाहीये.मला तुम्ही मदत करा..मला जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे..खुप फिरायचे आहे..माझ्या गोड मैत्रिणीला पण मनभरून पाहीन ..खुप बोलेन..खुप आनंद देईन तिला.मी गेले ३ वर्षापासून मिपा चा नियमित वाचक आहे.आज जे मनात आले ते लिहिले..काहीच वाटत नाहीये..असे वाटत आहे "घरातल्यानाच विचारत आहे मी " .आणि हो मित्राणो..मी जरी बाहेर फिरत नसलो तरी मिपा वर खुप काही चांगले बघायला..वाचायला..अनुभव..संस्कार मिळत आहे मला..मी खुप मनापासुन आभार मानतो तुम्हासर्वांचे ! तुम्ही सगळे 'मिपा' कर खरेच खुप चांगले आहात..गोड आहात.

वाचने 32985
प्रतिक्रिया 153

प्रतिक्रिया

पुण्यात प्रेक्षणीय असे बरेच काही आहे. (सजीव- निर्जीव, फुकट - सशुल्क, स्थिर- चलित ई.) तुला काय काय प्रेक्षणीय वाटते ते सांगितलस तर माहिती देणे सोपे होईल.

In reply to by मी-सौरभ

चला बन्याबापु तुमची पुणे ट्रिप सुरु झालि ,तुमच्या प्रश्नाला आता किमान एक हजार पुणेरी थाटातिल उत्तरे मिळ्णार.....

पुण्यातली प्रेक्षणीय-स्थळे याचेपुढे ? टाकल्याबद्दल आणि प्रश्णचिन्ह अयोग्य जागी टाकले असल्याने उत्तर देण्याची गरज नाही.

सन्माननिय परिकथेतील राजकुमाराशी संपर्क साधावा. ते या विष्यातले उत्तम जाणकार आहेत. उलट एकदाका त्यांना भेटायला त्यांच्या कार्यालयात गेलात की तिथे बरीच 'प्रेक्षणीय-स्थळे' स्वतःहुन चालून लालेली दिसतील आणि तुमचे इतरस्त्र जाण्याचे कष्ट वाचतील.

In reply to by गणपा

सालं जो उठतो तो स.प.रा. याच्या कॅफेकडे येणार्‍या चंचल प्रेक्षणीय स्थळांबद्दल बोलतो. मी गेलो तर तिच्यामारी (सॉरी सॉरी, तद माताय) कुणीच दिसलं नाय! आता स.प.रा जर प्रेक्षणीय वगैरे वाटला तर प्रश्न वेगळा ;)

In reply to by अन्या दातार

>>> आता स.प.रा जर प्रेक्षणीय वगैरे वाटला तर प्रश्न वेगळा .. संविधानाने कायदा मंजूर केल्याने त्याची मोकळीक घेता की काय अन्याराव तुम्ही? बन्या अरे फुरसूंगी सारखी मोकळी ढाकळी जागा सोडून उगा कशाला गर्दीत घेवून फिरतोस मैत्रीणीला पुण्यात? दोन दिवस मिळालेच आहेत तर निट साजरे कर तिच्याबरोबर. ट्ट्ट्टॉक्क!

In reply to by पाषाणभेद

मी मोकळीक घेणार असं थोडीच म्हणालोय पाभे! ते वाक्य इतरांसाठी होते. आपल्याला पुण्यात कुठे फिरायचे वगैरे असले फालतू प्रश्न पडतच नाहीत मुळी.

तुंम्हाला काय काय प्रेक्षणीय वाट्टं ते कळवा,म्हणजे तशी यादी देता येइल. ;-) नायतर पुणे दर्शन बस मधुन एखाद्या अट्टल पुणेकराला बरोबर घेउन फिरा.म्हणजे बस तुंम्हाला पुण्यातल्या दर्शनीय जागा दाखवेल,आणी जाता जाता पुणेकर तुंम्हाला प्र-दर्शनीय स्थळं दाखवेल ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

आणी जाता जाता पुणेकर तुंम्हाला प्र-दर्शनीय स्थळं दाखवेल
भटजीबुवा, तुम्ही तुमची सोय पाहत आहात का? ;) ते त्यांच्या गोड मैत्रिणीला घेउन फीरायचं म्हणत आहेत. पुण्यातले गणपती आणि मारुती पाहायचे आहेत असे कुठं म्हणाले आहेत?

In reply to by धन्या

भटजीबुवा, तुम्ही तुमची सोय पाहत आहात का? >>> :-D आंम्ही कुठे म्हटलं कि ते 'दाखवणारे' आंम्ही असू , आणी असलो तर असु देत की..!तुंम्हाला का यायला लागलय कुत्सित हसू :-p अवांतर-पुण्यातले गणपती/मारुती सोडुन द्या...आंम्हाला एकट्याला आणी दोघांना निवांत भेट द्यावयाची असल्यास अशी इतर ठिकाणंही माहित आहेत म्हंटल...! ;-)

In reply to by पक पक पक

ओंकारेश्वर्,वैकुंठ इत्यादी इत्यादी..........? ओssssss ती ठिकाणं आंम्हा भूतयोनीतील अत्रुप्तांसाठी :ghost: राखीव आहेत,ती आंम्ही तुम्हाला कशी दाखवू...? :evil: वेडपट...माणुस कुठले..!? ;-) (चवताळलेला) :evil: अत्रुप्त आत्मा :ghost:

In reply to by अत्रुप्त आत्मा

च्यायला तुमचा दशक्रिया विधी झाला नाहि कि काय ........?तसेही तुमचे प्रतिसाद वाचुन बन्याबापु आत्तापर्यंत निधन पावले असतीलच .दोघांचा दहावा एकदम करुन घ्या,म्हणजे तुम्हिही शांत व्हाल आणी बापूंच्या आत्म्याला सद्गगती लाभेल...

In reply to by पक पक पक

@-च्यायला तुमचा दशक्रिया विधी झाला नाहि कि काय ........? :-D त्याचा भूत होण्याशी कुठे संमंध असतो.. ;-) @-तसेही तुमचे प्रतिसाद वाचुन बन्याबापु आत्तापर्यंत निधन पावले असतीलच . माझे प्रतिसाद वाचुन निधन पावले,हे म्हणण खरं असेलही पण तुमचे प्रतिसाद वाचून त्यांना सदगती नक्की मिळाली असेल. @-दोघांचा दहावा एकदम करुन घ्या,म्हणजे तुम्हिही शांत व्हाल आणी बापूंच्या आत्म्याला सद्गगती लाभेल... मी भडकलेलो नाही,प्रतिसाद गमतिनी लिहिलावता,त्यामुळे शांत होण्याची गरज मला नाहिये...

In reply to by अत्रुप्त आत्मा

दशक्रिया विधी झाला नाहि तर आत्मे अत्रुप्त राहतात असा समज आहे.त्या मुळे ते लवकरात लवकर उरकुन घ्या आणि मुक्त व्हा.....

In reply to by प्रचेतस

अस आहे का..?बर ! मग त्यांना वैकुंठ आणि ओंकारेश्वरा वरच विहार करु दे न ,त्या बन्याबापुंच का झाड धरायला लागले आहेत...

In reply to by पक पक पक

वैकुंठ म्हणजे साक्षात विष्णूलोक, ओंकारेश्वर म्हणजे साक्षात कैलास. ही दोन्ही ठिकाणे म्हणजेच मोक्षप्राप्तीची स्थानं. तिकडे विहार करून त्यांना मोक्ष नाही का मिळणार, अत्रुप्त आत्म्याला मोक्ष नकोय हो, त्यांना अत्रुप्तीच्या असीम अवकाशात स्वच्छंदपणे विहार करू द्या की जरा. जी झाडं धरायची ती धरू द्या.

In reply to by प्रचेतस

वैकुंठ म्हणजे साक्षात विष्णूलोक, ओंकारेश्वर म्हणजे साक्षात कैलास आता हि दोन ठिकाणे बन्याबापुंना पण दाखवा एवढेच म्हणालो होतो हो मि , पण त्यावरुनच हा आत्मा खवळ्ला , त्याला वाट्ले बन्याबापु त्याच्या मैत्रिणी बरोबर ह्या प्रदेशात अतिक्रमण घडवुन आणत आहे ,त्या मुळे त्याला शांत करायच्या हेतुने हा सल्ला दिला गेला...बाकि तुमची भुतदया पाहुन माझे ह्रुदय भरुन आले.त्यांच्या बद्द्लचे तुमचे प्रेम बघता मि माझा आग्रह मागे घेत आहे.....

In reply to by पक पक पक

त्या मुळे त्याला शांत करायच्या हेतुने हा सल्ला दिला गेला...
तुमच्या सल्ल्याने थोडीच तो शांत होणार आहे तो? अहो अत्रुप्त आहे तो. इतका सहज त्रुप्त कसा होईल?
बाकि तुमची भुतदया पाहुन माझे ह्रुदय भरुन आले.
गल्लत करताय हो तुम्ही भूतयोनी वेगळी आणि आत्मे वेगळे. भूताला मुक्ती मिळते पण आत्मा अमर असतो. आणि हो, तुमचे हृदय भरून आले तर पटकन डॉक्टरला दाखवून घ्या बरे आधी नाहीतर तुमचाच आत्मा फटकन मोकळा व्हायचा आधी. ;)

In reply to by प्रचेतस

अहो अत्रुप्त आहे तो. इतका सहज त्रुप्त कसा होईल. एकंदरीत चर्चेतुन असे दिसते आहे कि अत्रुप्त आत्मा आत्तातरी शांत आहे ,पण तुम्च्या सारखे काही समंधच अधिक त्रस्त झाले आहेत्.असो पण आता माझ्या जिवावर बेतले आहे तर मग मि काढता पाय घेतो.पण मग भुत योनी वेगळी आत्मा वेगळा असे काहितरी तुम्ही बडबडलात ते कसे.आत्म्याला चेहरा नसतो मग त्या अत्रुप्त आत्म्याच्या प्रतिसादात असलेले चेहरे तुम्चे आहेत का...?

In reply to by पक पक पक

एकंदरीत चर्चेतुन असे दिसते आहे कि अत्रुप्त आत्मा आत्तातरी शांत आहे
सध्या शांत असला तरी प्रकट होणारच ना केव्हा ना केव्हातरी.
पण तुम्च्या सारखे काही समंधच अधिक त्रस्त झाले आहेत्.
आम्ही समंध, कमाल आहे ब्वा तुमची? आम्ही आपले साधेसुधे आहोत हो.
सो पण आता माझ्या जिवावर बेतले आहे तर मग मि काढता पाय घेतो
तेच तुमच्यासाठी बरे हो. पण ते डॉक्टरला दाखवायचं विसरू नका हो.
आत्म्याला चेहरा नसतो मग त्या अत्रुप्त आत्म्याच्या प्रतिसादात असलेले चेहरे तुम्चे आहेत का...?
आमचे तर नाहीत ब्वा. कदाचित तुमचे असावेत. काहीवेळा ते चेहरे पकपकत असल्याचा भास होतो मात्र.

In reply to by प्रचेतस

आमचे तर नाहीत ब्वा. कदाचित तुमचे असावेत नाही हो माझे कसे असतील दोन तिन प्रकारचे आहेत्....तुम्चेच दोघा तिघांचे असावेत्.मि तर साधा माणुस आहे.

In reply to by पक पक पक

समंधांपेक्षा तुम्ही त्रस्त वाटताय पक पक पक , साहजिक आहे म्हणा. तुम्ही तुमचा आयडी सार्थक करताय !! अभिनंदन. वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

In reply to by सूड

ह्ये कुठुन आल मध्येच ......? धन्यवाद पण माझा वाढदिवस नाहि आज्.असो तुम्ची जयंति कधी ते सांगा ,नक्की साजरी करु...

In reply to by पक पक पक

>>? धन्यवाद पण माझा वाढदिवस नाहि आज... अस्सं?? मग अभ्यास वाढवा. मोठे व्हा !! पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

In reply to by पक पक पक

ते वैकुंठ नि ओंकारेश्वर राहुदेत. तुम्ही का त्यांच्या मागे लागत आहात? कोई पुरानी दुश्मनी? ;)

In reply to by अन्या दातार

अरे वा अन्या भौ बरेच दिवस आपली गाठ-भेठ नाहि. कसे आहात आपण.आणि असे मधेच कसे भुता सारखे प्रकट झालात.काय मुळव्याधीचा त्रास परत सुरु झाला कि काय..?

In reply to by पक पक पक

काय मुळव्याधीचा त्रास परत सुरु झाला कि काय..?
तुम्हाला मुळव्याध झाल्याची लक्षणे तुमच्या प्रतिसादांवरुन वाटत आहेत; म्हणून जरा जमालगोटा द्यायला आलो ;) इलाज पडला की कळेलच आम्हाला.

In reply to by अन्या दातार

तुम्हाला मुळव्याध झाल्याची लक्षणे तुमच्या प्रतिसादांवरुन वाटत आहेत. नाहि हो मला तसा काहि त्रास नाहि,पण तुमच्या आजारा बाबत आपली मागे एकदा चर्चा झाली होती ना.आणी बरेचदा तुमची मुळ्व्याध उपटल्यावर तुम्ही माझ्या कडुनच उपचार करवुन घेता ना..?विसरभोळे पणा चांगला नाहि अन्याभौ,बाकि वयोमाना नुसार हे प्रकार होणारच.

In reply to by पक पक पक

डू नॉट फीड द ट्रोल्स असे काहिसे वाचलेले आठवतंय. त्यामुळे नो कॉमेंट्स. या धाग्यावरचा हा माझा शेवटचा प्रतिसाद. चर्चा अति-अवांतराकडे नेण्यात मला स्वारस्य नाही.

In reply to by पक पक पक

त्यांना वैकुंठ आणि ओंकारेश्वरा वरच विहार करु दे न ,त्या बन्याबापुंच का झाड धरायला लागले आहेत... >>> का हो पकाऊ ...मी कोणाचं झाड धरेन नायतर मुळं ...आपण माझी पारंबी कशाला निष्कारण ओढताय?... मी आपल्या आधी वाटेला तरि गेलो होतो का? कशाला वाद वाढवताय उगा..?

बेसिक शंकांचे निरसन केल्यास पुण्याविषयी गायडन्स देण्याचा प्रयत्न केला जाईल. १) मैत्रिणीला मनभरुन भेटून मग एकटेच फिरणार आहात की मनभरुन भेटण्यासाठीच विविध ठिकाणांचा बॅकड्रॉप हवाय? २) मैत्रिणीला शेवटचे भेटण्याची वेळ आहे हे सांगण्याच्या तुमच्या टोनवरुन एकूण सर्व लक्षात येत आहे.. त्यामुळे ते वेगळं सांगायची गरज नाही. पण शंका उरतेच मित्रा, की सर्वात आवडती, गोड इ. मैत्रीण शेवटच्यांदा भेटण्याची वेळ येईपर्यंत परिस्थिती असताना इतिहास आठवत किल्ले कसले फिरतोस..?

In reply to by गवि

मैत्रिणीला शेवटचे भेटण्याची वेळ आहे हे सांगण्याच्या तुमच्या टोनवरुन एकूण सर्व लक्षात येत आहे.. त्यामुळे ते वेगळं सांगायची गरज नाही. पण शंका उरतेच मित्रा, की सर्वात आवडती, गोड इ. मैत्रीण शेवटच्यांदा भेटण्याची वेळ येईपर्यंत परिस्थिती असताना इतिहास आठवत किल्ले कसले फिरतोस..? अराररा .. गविनी पार टेम्प्युत बसवला कि हो बन्याला =))

In reply to by स्पा

गप्प रे. शेवटची भेट अशी ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीने अनुभवण्याची गंमत तुम्हा मुंबैकरांना काय कळणार !! ;)

In reply to by मृत्युन्जय

तुम्ही मुंबैस फतरे म्हणा नाहीतर आणि काही.. आम्ही ठाणेकर असल्याने आमच्या कातडीस त्यातले काही लागत नाही.. शिवाय अगदी मुंबईकर असतो तरी प.पू. पु.ल. यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबईचा जाज्वल्य अभिमान असलाच पाहिजे अशी अट मुंबईकर होण्यासाठी आवश्यक नाहीच आहे. ती अट पुण्याला.. तिथे जाज्वल्य अभिमान पाहिजे..

In reply to by गवि

अगदी अगदी.... पुणेकरांना वाटते की मुंबईला शिव्या घातल्या की मुंबईकरांना राग येईल. परत एकदा पुलं वाचा म्हणावे....

In reply to by मृत्युन्जय

तेच की !! त्यांची सोन्यासारखी मयतरीण पुण्यात असेल तर त्या मुंबैच्या बॅण्डस्टॅण्ड ला काय आग लावायची ?? ;)

In reply to by सूड

गप्प रे. शेवटची भेट अशी ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीने अनुभवण्याची गंमत तुम्हा मुंबैकरांना काय कळणार ????? एवढ्या लवकर मुंबईला विसराल याची अपेक्षा नव्हती बदलापुरकर.

In reply to by किसन शिंदे

>>एवढ्या लवकर मुंबईला विसराल याची अपेक्षा नव्हती बदलापुरकर. "बाटलेला फकीर मोठ्याने बांग देतो" अशी म्हण उगाच आहे का ? ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>"बाटलेला फकीर मोठ्याने बांग देतो" अशी म्हण उगाच आहे का ? काय की !! सध्या व्हेन यू आर ईन रोम .....काहीसं म्हणतात त्याचं पालन करतोय. ;)

In reply to by सूड

म्हणजे अजून सुंता झाली नाही म्हणायची.. होईल होईल... :-) पण पुढे मागे जेव्हा परत याल तेव्हा आम्ही तुळशीचे पान तयार ठेऊ. अवांतर :- रोम चे नाव घेऊ नका, सध्या बदनाम आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

@-"बाटलेला फकीर मोठ्याने बांग देतो" अशी म्हण उगाच आहे का ?>>> खिक्क... :-D

In reply to by अत्रुप्त आत्मा

बाटलेला फकीर मोठ्याने बांग देतो" अशी म्हण उगाच आहे का ?
मी या प्रतिसादाला धर्मनिरपेक्ष करु इच्छितो.. "धर्मबदल केलेला एक साधक मूळ धर्मीयापेक्षा मोठ्या आवाजात धार्मिक आराधनेतील उच्चारण करतो.." कसे??? ( माझ्या लहानपणी रत्नागिरी टाईम्स आणि तत्सम पेपरांत किंवा रेडिओवर दंगलीच्या बातम्या अशा यायच्या "एका धार्मिक गटाच्या मिरवणुकीमुळे दुसर्‍या धार्मिक गटाच्या प्रार्थनास्थळी प्रार्थनेच्या वेळेस शांतताभंग झाल्याने तणाव उत्पन्न झाला.. " इ इ. )

In reply to by गवि

गवि, एखाद्या पोलिसस्टेशनच्या शांतता समितीत आहे का तुम्ही? अशीच प्रगती करत राहिलात तर नोबेलचा शांतता पुरस्कार मिळेल.

In reply to by सूड

ऐतिहासिक ठिकाणी ईतिहास जाणून घेण्याऐवजी स्वतःच घडवायची चांगली संधी असते असं जाणकार सांगताना ऐकलय मी ;)

In reply to by गवि

>>..पण शंका उरतेच मित्रा, की सर्वात आवडती, गोड इ. मैत्रीण शेवटच्यांदा भेटण्याची वेळ येईपर्यंत परिस्थिती असताना इतिहास आठवत किल्ले कसले फिरतोस..? ठार मेलो.. पुरता प्याक करुन टेंपुत बसवला गवि तुम्ही.. आणि तेही तुम्हाला (व्हाया सर्व मिपाकर) "गोड" म्हणत असतांना..

In reply to by गवि

१) मैत्रिणीला मनभरुन भेटून मग एकटेच फिरणार आहात की मनभरुन भेटण्यासाठीच विविध ठिकाणांचा बॅकड्रॉप हवाय? -मैत्रिणीला मनभरुन भेटणार मगच एकटा फिरायला जाणार आहे. २) सर्वात आवडती, गोड इ. मैत्रीण शेवटच्यांदा भेटण्याची वेळ येईपर्यंत परिस्थिती असताना इतिहास आठवत किल्ले कसले फिरतोस..? - तीचाशी भेटल्यानंतर एकटा काय करू म्हणता मग ?

In reply to by बन्याबापू

तीचाशी भेटल्यानंतर एकटा काय करू म्हणता मग ? एरवडा एक चांगले ठिकाण आहे अशा परिस्थीतीत जायला...........

In reply to by बन्याबापू

>>मैत्रिणीला मनभरुन भेटणार मगच एकटा फिरायला जाणार आहे. मित्रा, मग किल्ल्यावर काय, साधा पर्वतीवर पण जाऊ नकोस. नावावर जाऊ नकोस, पर्वती छोटेसे टेंगुळ आहे, पण ते असो. तर मुद्दा असा की उडी मारायचा मोह व्हावा अशी ठिकाणे टाळ. (सदर सल्ला ५०% मस्करी आणि ५०% गंभीरपणे दिला आहे)

In reply to by बन्याबापू

>>मैत्रिणीला मनभरुन भेटणार मगच एकटा फिरायला जाणार आहे. मित्रा, मग किल्ल्यावर काय, साधा पर्वतीवर पण जाऊ नकोस. नावावर जाऊ नकोस, पर्वती छोटेसे टेंगुळ आहे, पण ते असो. तर मुद्दा असा की उडी मारायचा मोह व्हावा अशी ठिकाणे टाळ. (सदर सल्ला ५०% मस्करी आणि ५०% गंभीरपणे दिला आहे)

सिहंगड ला वगैरै जावुन ईतर प्रेक्षणीय बघण्यापेक्षा (अगदी आडबाजुला, प्रेक्षणीय आणि शांत) १ ) एम्प्रेस बॉटनिकल गार्डन, रेसकोर्स २ ) कस्तुरबा गांधी हॉल, पूणे - नगर रोड ३ ) महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड ४ ) पाताळेश्वर लेणी , जंगली महाराज रोड ५ ) ओंम नम शिवाय, येरवडा ६ ) एम.जी. रोड , कॅम्प ( तिथेच लाल देऊळ ! ) ७ ) नाला पार्क, कोरेगाव पार्क ८ ) ओशो कम्युन सेंटर, कोरेगाव पार्क जरा दुर जायचे असेल तर १ ) बनेश्वर , पुणे -बँगलोर हाय वे २ ) रांजण खळगी , शिरुर ३ ) शिवापुर दर्गा , पुणे बँगलोर हाय वे ४ ) मल्हारगड, सासवड (तिथेच दिवे घाट) ५) बोपदेव घाट, कनिफनाथ ६ ) निळकंठेश्वर , पानशेत अजुन बरेच आहेत ....

In reply to by किसन शिंदे

@रांजण खळगे शिरूरमध्ये नाही निघोजमध्ये आहेत.>> असू द्या हो किसनराव....पाण्यात उतरायला मिळाल्याशी मतलब...! ;-)