✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुण्यातली प्रेक्षणीय-स्थळे ?

ब
बन्याबापू यांनी
Mon, 12/19/2011 - 23:58  ·  लेख
लेख
नमस्कार मिपा करानों ! काय सांगु यार..गेले चार-पाच वर्ष कुठेच फिरलो नाही.घर ते कॉलेज बाकी वेळच नाही मिळाला कुठे फिरायला.आता कॉलेज सुरू झाले तर कुठेतरी एकटेच फिरायला जायची हुक्की आली.म्हणुन लगेच पुण्यात भावाला ला कॉल करुन सांगितले " मी येणार आहे पुण्याला..आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊ ! भावाने लगेच 'हो' बोलला.तसे एका मैत्रिणीला ही भेटायचे आहे म्हणुन जात आहे.माझी फक्त एकच मैत्रीण आहे आणि तिला जर मी आता पुण्यात जाऊन नाही भेटलो तर पुन्हा कधी आयुष्यात भेटु नाही शकणार..कारण (आता सांगत नाही..जावू दे )..तर मित्राणो..मला सांगा ना 'पुण्यात प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत ? तिथे कसे जायचे ? जवळपास ठिकाणे च सांगा ? किल्ले बघायला..त्यांचा इतिहास जाणून घ्यायला मला खुप आवडते.तर,पुण्यात कोणते किल्ले आहेत जवळपास ? मी आता शनिवारी सकाळी पुण्यात येईन.माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीला भेटेन..खुप बोलणार आहे तीचाशी..कारण ती मला पुन्हा कधीच भेटणार नाहीये.मला तुम्ही मदत करा..मला जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे..खुप फिरायचे आहे..माझ्या गोड मैत्रिणीला पण मनभरून पाहीन ..खुप बोलेन..खुप आनंद देईन तिला.मी गेले ३ वर्षापासून मिपा चा नियमित वाचक आहे.आज जे मनात आले ते लिहिले..काहीच वाटत नाहीये..असे वाटत आहे "घरातल्यानाच विचारत आहे मी " .आणि हो मित्राणो..मी जरी बाहेर फिरत नसलो तरी मिपा वर खुप काही चांगले बघायला..वाचायला..अनुभव..संस्कार मिळत आहे मला..मी खुप मनापासुन आभार मानतो तुम्हासर्वांचे ! तुम्ही सगळे 'मिपा' कर खरेच खुप चांगले आहात..गोड आहात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32901 वाचन

💬 प्रतिसाद (153)

प्रतिक्रिया

मित्रा..

मी-सौरभ
Tue, 12/20/2011 - 00:05 नवीन
पुण्यात प्रेक्षणीय असे बरेच काही आहे. (सजीव- निर्जीव, फुकट - सशुल्क, स्थिर- चलित ई.) तुला काय काय प्रेक्षणीय वाटते ते सांगितलस तर माहिती देणे सोपे होईल.
  • Log in or register to post comments

चला बन्याबापु तुमची पुणे

पक पक पक
Tue, 12/20/2011 - 18:20 नवीन
चला बन्याबापु तुमची पुणे ट्रिप सुरु झालि ,तुमच्या प्रश्नाला आता किमान एक हजार पुणेरी थाटातिल उत्तरे मिळ्णार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

व्वा

मी-सौरभ
Wed, 12/21/2011 - 15:19 नवीन
एकच उपप्रतिसाद???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

निषेढ

चिंतामणी
Tue, 12/20/2011 - 00:48 नवीन
पुण्यातली प्रेक्षणीय-स्थळे याचेपुढे ? टाकल्याबद्दल आणि प्रश्णचिन्ह अयोग्य जागी टाकले असल्याने उत्तर देण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments

अजुन एक बन्या बापु !

बन्या बापु
Tue, 12/20/2011 - 01:58 नवीन
अजुन एक बन्या बापु ! तुर्तास एवधेच लिहितो :-)
  • Log in or register to post comments

जे एम रोड.

इंटरनेटस्नेही
Tue, 12/20/2011 - 02:53 नवीन
जे एम रोड. ;)
  • Log in or register to post comments

सन्माननिय परिकथेतील

गणपा
Tue, 12/20/2011 - 03:12 नवीन
सन्माननिय परिकथेतील राजकुमाराशी संपर्क साधावा. ते या विष्यातले उत्तम जाणकार आहेत. उलट एकदाका त्यांना भेटायला त्यांच्या कार्यालयात गेलात की तिथे बरीच 'प्रेक्षणीय-स्थळे' स्वतःहुन चालून लालेली दिसतील आणि तुमचे इतरस्त्र जाण्याचे कष्ट वाचतील.
  • Log in or register to post comments

गणपा यु टू???

अन्या दातार
Tue, 12/20/2011 - 07:20 नवीन
सालं जो उठतो तो स.प.रा. याच्या कॅफेकडे येणार्‍या चंचल प्रेक्षणीय स्थळांबद्दल बोलतो. मी गेलो तर तिच्यामारी (सॉरी सॉरी, तद माताय) कुणीच दिसलं नाय! आता स.प.रा जर प्रेक्षणीय वगैरे वाटला तर प्रश्न वेगळा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

>>> आता स.प.रा जर प्रेक्षणीय

पाषाणभेद
Tue, 12/20/2011 - 08:42 नवीन
>>> आता स.प.रा जर प्रेक्षणीय वगैरे वाटला तर प्रश्न वेगळा .. संविधानाने कायदा मंजूर केल्याने त्याची मोकळीक घेता की काय अन्याराव तुम्ही? बन्या अरे फुरसूंगी सारखी मोकळी ढाकळी जागा सोडून उगा कशाला गर्दीत घेवून फिरतोस मैत्रीणीला पुण्यात? दोन दिवस मिळालेच आहेत तर निट साजरे कर तिच्याबरोबर. ट्ट्ट्टॉक्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

मी मोकळीक घेणार असं थोडीच

अन्या दातार
Tue, 12/20/2011 - 08:46 नवीन
मी मोकळीक घेणार असं थोडीच म्हणालोय पाभे! ते वाक्य इतरांसाठी होते. आपल्याला पुण्यात कुठे फिरायचे वगैरे असले फालतू प्रश्न पडतच नाहीत मुळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

>>तिथे बरीच

सूड
Tue, 12/20/2011 - 09:57 नवीन
>>तिथे बरीच 'प्रेक्षणीय-स्थळे' स्वतःहुन चालून लालेली दिसतील चालून लालेली ? म्हण्जे नक्की कशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

तुंम्हाला काय काय प्रेक्षणीय

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/20/2011 - 09:06 नवीन
तुंम्हाला काय काय प्रेक्षणीय वाट्टं ते कळवा,म्हणजे तशी यादी देता येइल. ;-) नायतर पुणे दर्शन बस मधुन एखाद्या अट्टल पुणेकराला बरोबर घेउन फिरा.म्हणजे बस तुंम्हाला पुण्यातल्या दर्शनीय जागा दाखवेल,आणी जाता जाता पुणेकर तुंम्हाला प्र-दर्शनीय स्थळं दाखवेल ;-)
  • Log in or register to post comments

आणी जाता जाता पुणेकर

धन्या
Tue, 12/20/2011 - 09:37 नवीन
आणी जाता जाता पुणेकर तुंम्हाला प्र-दर्शनीय स्थळं दाखवेल
भटजीबुवा, तुम्ही तुमची सोय पाहत आहात का? ;) ते त्यांच्या गोड मैत्रिणीला घेउन फीरायचं म्हणत आहेत. पुण्यातले गणपती आणि मारुती पाहायचे आहेत असे कुठं म्हणाले आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

भटजीबुवा, तुम्ही तुमची सोय

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/20/2011 - 12:59 नवीन
भटजीबुवा, तुम्ही तुमची सोय पाहत आहात का? >>> :-D <<< आंम्ही कुठे म्हटलं कि ते 'दाखवणारे' आंम्ही असू , आणी असलो तर असु देत की..!तुंम्हाला का यायला लागलय कुत्सित हसू :-p अवांतर-पुण्यातले गणपती/मारुती सोडुन द्या...आंम्हाला एकट्याला आणी दोघांना निवांत भेट द्यावयाची असल्यास अशी इतर ठिकाणंही माहित आहेत म्हंटल...! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अत्रुप्त

पक पक पक
Tue, 12/20/2011 - 18:24 नवीन
अत्रुप्त आत्मा...... ओंकारेश्वर्,वैकुंठ इत्यादी इत्यादी..........?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ओ पक पक पक

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/20/2011 - 18:54 नवीन
ओंकारेश्वर्,वैकुंठ इत्यादी इत्यादी..........? ओssssss ती ठिकाणं आंम्हा भूतयोनीतील अत्रुप्तांसाठी :ghost: राखीव आहेत,ती आंम्ही तुम्हाला कशी दाखवू...? :evil: वेडपट...माणुस कुठले..!? ;-) (चवताळलेला) :evil: अत्रुप्त आत्मा :ghost:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

च्यायला तुमचा दशक्रिया विधी

पक पक पक
Tue, 12/20/2011 - 19:52 नवीन
च्यायला तुमचा दशक्रिया विधी झाला नाहि कि काय ........?तसेही तुमचे प्रतिसाद वाचुन बन्याबापु आत्तापर्यंत निधन पावले असतीलच .दोघांचा दहावा एकदम करुन घ्या,म्हणजे तुम्हिही शांत व्हाल आणी बापूंच्या आत्म्याला सद्गगती लाभेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आंतरजालीय महा निर्वाण

सूड
Tue, 12/20/2011 - 22:50 नवीन
गपा की राव !! कशाला बिचार्‍याला आंजामनि करायला भाग पाडताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

सगळ्यांना गप बसवता आहात

पक पक पक
Wed, 12/21/2011 - 18:29 नवीन
सगळ्यांना गप बसवता आहात ,तुम्हि काय मिपा वरती सम्नवयक आहात का...? कि लोकसभेचे सभापति आहात....?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@-च्यायला तुमचा दशक्रिया विधी

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/20/2011 - 23:05 नवीन
@-च्यायला तुमचा दशक्रिया विधी झाला नाहि कि काय ........? :-D त्याचा भूत होण्याशी कुठे संमंध असतो.. ;-) @-तसेही तुमचे प्रतिसाद वाचुन बन्याबापु आत्तापर्यंत निधन पावले असतीलच . माझे प्रतिसाद वाचुन निधन पावले,हे म्हणण खरं असेलही पण तुमचे प्रतिसाद वाचून त्यांना सदगती नक्की मिळाली असेल. @-दोघांचा दहावा एकदम करुन घ्या,म्हणजे तुम्हिही शांत व्हाल आणी बापूंच्या आत्म्याला सद्गगती लाभेल... मी भडकलेलो नाही,प्रतिसाद गमतिनी लिहिलावता,त्यामुळे शांत होण्याची गरज मला नाहिये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

दशक्रिया विधी झाला नाहि तर

पक पक पक
Wed, 12/21/2011 - 18:24 नवीन
दशक्रिया विधी झाला नाहि तर आत्मे अत्रुप्त राहतात असा समज आहे.त्या मुळे ते लवकरात लवकर उरकुन घ्या आणि मुक्त व्हा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

त्यांचे सुख अत्रुप्तीतच आहे

प्रचेतस
Wed, 12/21/2011 - 18:30 नवीन
त्यांचे सुख अत्रुप्तीतच आहे हो. कशाला उगाच त्यांच्या अत्रुप्तीवर गदा आणताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

अस आहे का..?बर ! मग त्यांना

पक पक पक
Wed, 12/21/2011 - 19:44 नवीन
अस आहे का..?बर ! मग त्यांना वैकुंठ आणि ओंकारेश्वरा वरच विहार करु दे न ,त्या बन्याबापुंच का झाड धरायला लागले आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वैकुंठ म्हणजे साक्षात

प्रचेतस
Wed, 12/21/2011 - 21:08 नवीन
वैकुंठ म्हणजे साक्षात विष्णूलोक, ओंकारेश्वर म्हणजे साक्षात कैलास. ही दोन्ही ठिकाणे म्हणजेच मोक्षप्राप्तीची स्थानं. तिकडे विहार करून त्यांना मोक्ष नाही का मिळणार, अत्रुप्त आत्म्याला मोक्ष नकोय हो, त्यांना अत्रुप्तीच्या असीम अवकाशात स्वच्छंदपणे विहार करू द्या की जरा. जी झाडं धरायची ती धरू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

वैकुंठ म्हणजे साक्षात

पक पक पक
Wed, 12/21/2011 - 22:11 नवीन
वैकुंठ म्हणजे साक्षात विष्णूलोक, ओंकारेश्वर म्हणजे साक्षात कैलास आता हि दोन ठिकाणे बन्याबापुंना पण दाखवा एवढेच म्हणालो होतो हो मि , पण त्यावरुनच हा आत्मा खवळ्ला , त्याला वाट्ले बन्याबापु त्याच्या मैत्रिणी बरोबर ह्या प्रदेशात अतिक्रमण घडवुन आणत आहे ,त्या मुळे त्याला शांत करायच्या हेतुने हा सल्ला दिला गेला...बाकि तुमची भुतदया पाहुन माझे ह्रुदय भरुन आले.त्यांच्या बद्द्लचे तुमचे प्रेम बघता मि माझा आग्रह मागे घेत आहे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

त्या मुळे त्याला शांत

प्रचेतस
Wed, 12/21/2011 - 22:43 नवीन
त्या मुळे त्याला शांत करायच्या हेतुने हा सल्ला दिला गेला...
तुमच्या सल्ल्याने थोडीच तो शांत होणार आहे तो? अहो अत्रुप्त आहे तो. इतका सहज त्रुप्त कसा होईल?
बाकि तुमची भुतदया पाहुन माझे ह्रुदय भरुन आले.
गल्लत करताय हो तुम्ही भूतयोनी वेगळी आणि आत्मे वेगळे. भूताला मुक्ती मिळते पण आत्मा अमर असतो. आणि हो, तुमचे हृदय भरून आले तर पटकन डॉक्टरला दाखवून घ्या बरे आधी नाहीतर तुमचाच आत्मा फटकन मोकळा व्हायचा आधी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

अहो अत्रुप्त आहे तो. इतका सहज

पक पक पक
Wed, 12/21/2011 - 23:01 नवीन
अहो अत्रुप्त आहे तो. इतका सहज त्रुप्त कसा होईल. एकंदरीत चर्चेतुन असे दिसते आहे कि अत्रुप्त आत्मा आत्तातरी शांत आहे ,पण तुम्च्या सारखे काही समंधच अधिक त्रस्त झाले आहेत्.असो पण आता माझ्या जिवावर बेतले आहे तर मग मि काढता पाय घेतो.पण मग भुत योनी वेगळी आत्मा वेगळा असे काहितरी तुम्ही बडबडलात ते कसे.आत्म्याला चेहरा नसतो मग त्या अत्रुप्त आत्म्याच्या प्रतिसादात असलेले चेहरे तुम्चे आहेत का...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

एकंदरीत चर्चेतुन असे दिसते

प्रचेतस
Wed, 12/21/2011 - 23:07 नवीन
एकंदरीत चर्चेतुन असे दिसते आहे कि अत्रुप्त आत्मा आत्तातरी शांत आहे
सध्या शांत असला तरी प्रकट होणारच ना केव्हा ना केव्हातरी.
पण तुम्च्या सारखे काही समंधच अधिक त्रस्त झाले आहेत्.
आम्ही समंध, कमाल आहे ब्वा तुमची? आम्ही आपले साधेसुधे आहोत हो.
सो पण आता माझ्या जिवावर बेतले आहे तर मग मि काढता पाय घेतो
तेच तुमच्यासाठी बरे हो. पण ते डॉक्टरला दाखवायचं विसरू नका हो.
आत्म्याला चेहरा नसतो मग त्या अत्रुप्त आत्म्याच्या प्रतिसादात असलेले चेहरे तुम्चे आहेत का...?
आमचे तर नाहीत ब्वा. कदाचित तुमचे असावेत. काहीवेळा ते चेहरे पकपकत असल्याचा भास होतो मात्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

आमचे तर नाहीत ब्वा. कदाचित

पक पक पक
Wed, 12/21/2011 - 23:24 नवीन
आमचे तर नाहीत ब्वा. कदाचित तुमचे असावेत नाही हो माझे कसे असतील दोन तिन प्रकारचे आहेत्....तुम्चेच दोघा तिघांचे असावेत्.मि तर साधा माणुस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आजकाल साधी माणसंच वेगवेगळे

प्रचेतस
गुरुवार, 12/22/2011 - 08:31 नवीन
आजकाल साधी माणसंच वेगवेगळे मुखवटे लावून फिरत असतात हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

समंधांपेक्षा तुम्ही त्रस्त

सूड
Wed, 12/21/2011 - 23:17 नवीन
समंधांपेक्षा तुम्ही त्रस्त वाटताय पक पक पक , साहजिक आहे म्हणा. तुम्ही तुमचा आयडी सार्थक करताय !! अभिनंदन. वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

ह्ये कुठुन आल मध्येच ......?

पक पक पक
Wed, 12/21/2011 - 23:28 नवीन
ह्ये कुठुन आल मध्येच ......? धन्यवाद पण माझा वाढदिवस नाहि आज्.असो तुम्ची जयंति कधी ते सांगा ,नक्की साजरी करु...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>? धन्यवाद पण माझा वाढदिवस

सूड
Wed, 12/21/2011 - 23:34 नवीन
>>? धन्यवाद पण माझा वाढदिवस नाहि आज... अस्सं?? मग अभ्यास वाढवा. मोठे व्हा !! पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

ते वैकुंठ नि ओंकारेश्वर

अन्या दातार
Wed, 12/21/2011 - 21:34 नवीन
ते वैकुंठ नि ओंकारेश्वर राहुदेत. तुम्ही का त्यांच्या मागे लागत आहात? कोई पुरानी दुश्मनी? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

अरे वा अन्या भौ बरेच दिवस

पक पक पक
Wed, 12/21/2011 - 22:18 नवीन
अरे वा अन्या भौ बरेच दिवस आपली गाठ-भेठ नाहि. कसे आहात आपण.आणि असे मधेच कसे भुता सारखे प्रकट झालात.काय मुळव्याधीचा त्रास परत सुरु झाला कि काय..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

काय मुळव्याधीचा त्रास परत

अन्या दातार
Wed, 12/21/2011 - 22:28 नवीन
काय मुळव्याधीचा त्रास परत सुरु झाला कि काय..?
तुम्हाला मुळव्याध झाल्याची लक्षणे तुमच्या प्रतिसादांवरुन वाटत आहेत; म्हणून जरा जमालगोटा द्यायला आलो ;) इलाज पडला की कळेलच आम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

तुम्हाला मुळव्याध झाल्याची

पक पक पक
Wed, 12/21/2011 - 22:49 नवीन
तुम्हाला मुळव्याध झाल्याची लक्षणे तुमच्या प्रतिसादांवरुन वाटत आहेत. नाहि हो मला तसा काहि त्रास नाहि,पण तुमच्या आजारा बाबत आपली मागे एकदा चर्चा झाली होती ना.आणी बरेचदा तुमची मुळ्व्याध उपटल्यावर तुम्ही माझ्या कडुनच उपचार करवुन घेता ना..?विसरभोळे पणा चांगला नाहि अन्याभौ,बाकि वयोमाना नुसार हे प्रकार होणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

डू नॉट फीड द ट्रोल्स असे

अन्या दातार
Wed, 12/21/2011 - 22:54 नवीन
डू नॉट फीड द ट्रोल्स असे काहिसे वाचलेले आठवतंय. त्यामुळे नो कॉमेंट्स. या धाग्यावरचा हा माझा शेवटचा प्रतिसाद. चर्चा अति-अवांतराकडे नेण्यात मला स्वारस्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

त्यांना वैकुंठ आणि

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/21/2011 - 23:19 नवीन
त्यांना वैकुंठ आणि ओंकारेश्वरा वरच विहार करु दे न ,त्या बन्याबापुंच का झाड धरायला लागले आहेत... >>> का हो पकाऊ ...मी कोणाचं झाड धरेन नायतर मुळं ...आपण माझी पारंबी कशाला निष्कारण ओढताय?... मी आपल्या आधी वाटेला तरि गेलो होतो का? कशाला वाद वाढवताय उगा..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

बेसिक शंकांचे निरसन केल्यास

गवि
Tue, 12/20/2011 - 09:50 नवीन
बेसिक शंकांचे निरसन केल्यास पुण्याविषयी गायडन्स देण्याचा प्रयत्न केला जाईल. १) मैत्रिणीला मनभरुन भेटून मग एकटेच फिरणार आहात की मनभरुन भेटण्यासाठीच विविध ठिकाणांचा बॅकड्रॉप हवाय? २) मैत्रिणीला शेवटचे भेटण्याची वेळ आहे हे सांगण्याच्या तुमच्या टोनवरुन एकूण सर्व लक्षात येत आहे.. त्यामुळे ते वेगळं सांगायची गरज नाही. पण शंका उरतेच मित्रा, की सर्वात आवडती, गोड इ. मैत्रीण शेवटच्यांदा भेटण्याची वेळ येईपर्यंत परिस्थिती असताना इतिहास आठवत किल्ले कसले फिरतोस..?
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Tue, 12/20/2011 - 09:58 नवीन
मैत्रिणीला शेवटचे भेटण्याची वेळ आहे हे सांगण्याच्या तुमच्या टोनवरुन एकूण सर्व लक्षात येत आहे.. त्यामुळे ते वेगळं सांगायची गरज नाही. पण शंका उरतेच मित्रा, की सर्वात आवडती, गोड इ. मैत्रीण शेवटच्यांदा भेटण्याची वेळ येईपर्यंत परिस्थिती असताना इतिहास आठवत किल्ले कसले फिरतोस..? अराररा .. गविनी पार टेम्प्युत बसवला कि हो बन्याला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गप्प रे. शेवटची भेट अशी

सूड
Tue, 12/20/2011 - 10:10 नवीन
गप्प रे. शेवटची भेट अशी ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीने अनुभवण्याची गंमत तुम्हा मुंबैकरांना काय कळणार !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

-१ मुंबईत ऐतिहासिक वास्तू

गवि
Tue, 12/20/2011 - 10:13 नवीन
-१ मुंबईत ऐतिहासिक वास्तू किंवा मैत्रिणी नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

- १ काय उपयोग त्या फतर्‍या

मृत्युन्जय
Tue, 12/20/2011 - 10:30 नवीन
- १ काय उपयोग त्या फतर्‍या मुंबईचा जर तिच्यात बन्याबाप्पूंची गोग्गोड मयतरिण नसेल तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

-२

गवि
Tue, 12/20/2011 - 10:43 नवीन
तुम्ही मुंबैस फतरे म्हणा नाहीतर आणि काही.. आम्ही ठाणेकर असल्याने आमच्या कातडीस त्यातले काही लागत नाही.. शिवाय अगदी मुंबईकर असतो तरी प.पू. पु.ल. यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबईचा जाज्वल्य अभिमान असलाच पाहिजे अशी अट मुंबईकर होण्यासाठी आवश्यक नाहीच आहे. ती अट पुण्याला.. तिथे जाज्वल्य अभिमान पाहिजे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

+५० फक्त

स्पा
Tue, 12/20/2011 - 10:48 नवीन
+५० फक्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अगदी अगदी.... पुणेकरांना

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/21/2011 - 09:04 नवीन
अगदी अगदी.... पुणेकरांना वाटते की मुंबईला शिव्या घातल्या की मुंबईकरांना राग येईल. परत एकदा पुलं वाचा म्हणावे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आली का हरीदासाची कथा मुळापदावर.

चिंतामणी
Wed, 12/21/2011 - 10:03 नवीन
:p :-p :tongue:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

याला जित्याची खोड म्हणतात हो

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/21/2011 - 11:31 नवीन
याला जित्याची खोड म्हणतात हो ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

तेच की !! त्यांची सोन्यासारखी

सूड
Tue, 12/20/2011 - 11:12 नवीन
तेच की !! त्यांची सोन्यासारखी मयतरीण पुण्यात असेल तर त्या मुंबैच्या बॅण्डस्टॅण्ड ला काय आग लावायची ?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा