Skip to main content

पुण्यातली प्रेक्षणीय-स्थळे ?

लेखक बन्याबापू यांनी सोमवार, 19/12/2011 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा करानों ! काय सांगु यार..गेले चार-पाच वर्ष कुठेच फिरलो नाही.घर ते कॉलेज बाकी वेळच नाही मिळाला कुठे फिरायला.आता कॉलेज सुरू झाले तर कुठेतरी एकटेच फिरायला जायची हुक्की आली.म्हणुन लगेच पुण्यात भावाला ला कॉल करुन सांगितले " मी येणार आहे पुण्याला..आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊ ! भावाने लगेच 'हो' बोलला.तसे एका मैत्रिणीला ही भेटायचे आहे म्हणुन जात आहे.माझी फक्त एकच मैत्रीण आहे आणि तिला जर मी आता पुण्यात जाऊन नाही भेटलो तर पुन्हा कधी आयुष्यात भेटु नाही शकणार..कारण (आता सांगत नाही..जावू दे )..तर मित्राणो..मला सांगा ना 'पुण्यात प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत ? तिथे कसे जायचे ? जवळपास ठिकाणे च सांगा ? किल्ले बघायला..त्यांचा इतिहास जाणून घ्यायला मला खुप आवडते.तर,पुण्यात कोणते किल्ले आहेत जवळपास ? मी आता शनिवारी सकाळी पुण्यात येईन.माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीला भेटेन..खुप बोलणार आहे तीचाशी..कारण ती मला पुन्हा कधीच भेटणार नाहीये.मला तुम्ही मदत करा..मला जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे..खुप फिरायचे आहे..माझ्या गोड मैत्रिणीला पण मनभरून पाहीन ..खुप बोलेन..खुप आनंद देईन तिला.मी गेले ३ वर्षापासून मिपा चा नियमित वाचक आहे.आज जे मनात आले ते लिहिले..काहीच वाटत नाहीये..असे वाटत आहे "घरातल्यानाच विचारत आहे मी " .आणि हो मित्राणो..मी जरी बाहेर फिरत नसलो तरी मिपा वर खुप काही चांगले बघायला..वाचायला..अनुभव..संस्कार मिळत आहे मला..मी खुप मनापासुन आभार मानतो तुम्हासर्वांचे ! तुम्ही सगळे 'मिपा' कर खरेच खुप चांगले आहात..गोड आहात.

वाचने 32985
प्रतिक्रिया 153

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

पाण्यात का खळग्यात? का खळग्यातल्या पाण्यात :-D चुकलं चुकलं...वल्ली.. तुमचं बरोब्बर...खळग्यातल्या पाण्यात,तुंम्ही अनुभवी माणसं राव ;-)

जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे.. हॉटेल श्रेयस - आपटे रोड हॉटेल ओकवुड - भांडारकर रोड होटेल एकांत - लवासा सिटी वरील सर्व ठिकाणी हुच्च मध्यमवर्गीयांसाठी आहेत. आपले बजेट सांगावे म्हणजे योग्य ती ठिकाणे सांगता येतील. पुण्यात मस्ती करण्याजोगी अजुनही काही छाण ठिकाणे आहेत पण आपण मैत्रिणीसोबत असल्याकारणाने कदाचित गरज पडणार नाही. खुप फिरायचे आहे.. झेड ब्रिज (हो हेच नाव आहे आणी हे नाव त्याच्या आकारामुळे पडले आहे. गैरसमज नको) खडकवासल्याची भिंत खडकवासल्याच्या पुढील मैदाने सिंहगड आणि हि छत्री न्यायला विसरायचे नाही बर का.

In reply to by मृत्युन्जय

खडकवासल्याची भिंत खडकवासल्याच्या पुढील मैदाने सिंहगड आणि हि छत्री न्यायला विसरायचे नाही बर का >>>. लई अनुभव ब्वा !! पेपर पण न्या बर का ! (नाय म्हणजे ड्रेस, कपडे मातकटले की बाप ओळखतो की कार्ट/कार्टी कुट गेल होत ते ;) )

In reply to by सुहास..

>>पेपर पण न्या बर का ! (नाय म्हणजे ड्रेस, कपडे मातकटले की बाप ओळखतो की कार्ट/कार्टी कुट गेल होत ते) हा तुमचा अनुभव वाटतं ;) पण मुळात कुठंतरी मातीत लोळत जावेच कशाला? खडकवासल्याच्या आजूबाजूला हाटेलं नाहीत का? ;)

In reply to by अन्या दातार

अरे तसं नव्हे अन्या, पेपर न्या म्हणजे १. तिथल्या सिन सिनेरीचे रेखा चित्रे काढुन मिपाचे कलादालन सम रुद्ध करता येईल २. उगाचच तिथला निसर्ग खराब का करा, त्यापेक्षा कागद वापरलेला चांगला ३. गेला बाजार, विमानं करुन उडवायला येतिल. आता खडकवासला आणि पेपर यावरुन एक अतिशय सालस सोज्वळ सभ्य (क्रिडारसिकांच्या भाषेत - सचिन टाईप) जोक आठवला आहे, पण जाउ दे. ......

In reply to by ५० फक्त

आता खडकवासला आणि पेपर यावरुन एक अतिशय सालस सोज्वळ सभ्य (क्रिडारसिकांच्या भाषेत - सचिन टाईप) जोक आठवला आहे, पण जाउ दे. ...... व्यनि करावा अशी नम्र बिनंत्यी.

In reply to by सोत्रि

माझ्याही मनावर कोवळे परीणाम करणारा हा व्यनी करावा ;)

In reply to by अन्या दातार

पण मुळात कुठंतरी मातीत लोळत जावेच कशाला? खडकवासल्याच्या आजूबाजूला हाटेलं नाहीत का? असं नाही लेका. मातीत पण मस्ती करता येतेच की. बन्याबापूंना मस्ती करायची आहे ना? बाकी सुहासराव ते पेपराचं क्लीयर केल म्हणुन बराय बर का नाहीतर आम्हाला वाटले की खडकवासल्याची भेळ खाउन अजीर्ण झाले तर बरे असेल म्हणुन सांगताय की काय. नाही म्हणजे कधीकधी गैरसोय झाली की .......... हॅ हॅ हॅ. बाकी बन्याबप्पू दिसत नाहीत कुठे, मयतरीण भेटली की काय त्यांना?

In reply to by सुहास..

आणि हि छत्री न्यायला विसरायचे नाही बर का मुम्बईत सेन्ट्रल लाईन वर सकाळी बर्‍याच छत्र्या दिसतात. विशेषतः ठाणे कुर्ल्या दरम्यान

In reply to by मृत्युन्जय

पुण्यात मस्ती करण्याजोगी अजुनही काही छाण ठिकाणे आहेत पण आपण मैत्रिणीसोबत असल्याकारणाने कदाचित गरज पडणार नाही.
=)) =)) =)) हेच म्हणतो.

In reply to by स्पा

स्पा, मी आजवर एकदाही खडकवासल्याला गेलेलो नाही. सहज चौकशी केली रे. आता जर गेलो कुणाबरोबर तिथे, तर खायचे वांदे नकोत म्हणून रे :P ____________________________________________________________ अप्रसन्न

In reply to by दिपक

पुण्यातच आहे. आणि एकदम 'खास' आहे. नवीन पिढीचा स्वातंत्र्याचा उन्मुक्त आविष्कार पाहायचा असेल तर सारसबागेला पर्याय नाही.

पेशवे पार्क आहे का अजून? असेल तर ते ही पहा. नाहीतर हिंजवडी आय टी पार्क, मगरपट्टा सिटी आहेच.

In reply to by चिरोटा

>>नाहीतर हिंजवडी आय टी पार्क, मगरपट्टा सिटी चिरोट्या, अरे त्याला मस्ती करायला आणि मैत्रीणी बरोबर फिरायला या पेक्षा चांगल्या जागा वर दिल्या आहेत... आय टी पार्कात जाण्यापेक्षा राजीव गांधी पार्कात जा..........

>>>.मला सांगा ना 'पुण्यात प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत ? तिथे कसे जायचे ? जवळपास ठिकाणे च सांगा ? किल्ले बघायला..त्यांचा इतिहास जाणून घ्यायला मला खुप आवडते.तर,पुण्यात कोणते किल्ले आहेत जवळपास ? १)वल्लींनी मार्ग दाखवला आहे. http://www.misalpav.com/node/20144 २)नाहीतर "राजगड" गाठावा. साखरप्याला उतरून पायी चोरवाटेने गड चढावा. जमल्यास बालेकील्यावर जावे. सगळा गड फिरावा. दोन दिवस लागतील त्यासाठी. ३) गेला बाजार सिंहगड आहेच. तीथल्या गर्दीचे काय करायचे हे मात्र तु बघुन घे. :) :-) :smile:

In reply to by चिंतामणी

३) गेला बाजार सिंहगड आहेच. तीथल्या गर्दीचे काय करायचे हे मात्र तु बघुन घे.
आँ? बरेच कोपरे आहेत आमच्या सिंहगडावर! अधिक माहितीसाठी व्यनि करावा!

In reply to by इंटरनेटस्नेही

>>>>आमच्या सिंहगडावर! ऑ ?? सिंहगड तुमचा कवा पासुन झाला..... आणि सिंहगडावर पण स्टॅमिना टेस्ट झाली काय तुमची......

In reply to by चिंतामणी

गड किल्ले? नको रे बाबा. तिथल्या ऐतिहासीक वातावरणाची अनुभुती घ्यायची सोडून एखाद्या नाजुक वळणावर स्वतःच ईतिहास रचायला लागले तर आपले "नडगी फोड कार्पोरेटर"* कुठून उपटतील भरवसा नाय. ;) तेव्हा गड किल्ले टाळलेलेच बरे अस आमच मत हां. * इच्छुकांनी अधिक माहितीसाठी धम्याला व्यनी करावा.

In reply to by चिंतामणी

अरे बाबांनो.. (मैत्रिणीसोबत) "पुणे आणि परिसरात" फिरायला मागताहेत ते माहिती.. तुम्ही त्यांना वर्तुळ विस्तारत विस्तारत साखरपा बिखरप्याला धाडताय... अशाने हळूहळू वज्रेश्वरी सापुतारा किंवा चिखलदर्‍यालाही पाठवाल..

In reply to by गवि

त्यांना वर्तुळ विस्तारत विस्तारत साखरपा बिखरप्याला धाडताय... गविंशी शमत आहे. वर्तुळं विस्तारु नका हो त्यांची. मज्जा निघुन जाइल भेटीमधली सग्ळी.

आपले लेखन वाचले. थोड्याश्या लिखाणात खूप काही सांगण्याची आपली हातोटी आवडली. आपल्या लेखावरून बरीच माहिती मिळाली व काही अंदाजही लावले गेले.
काय सांगु यार..गेले चार-पाच वर्ष कुठेच फिरलो नाही.घर ते कॉलेज बाकी वेळच नाही मिळाला कुठे फिरायला.आता कॉलेज सुरू झाले तर कुठेतरी एकटेच फिरायला जायची हुक्की आली.
गेली चार वर्षे आपण ६ वी ते १० वी असे शिक्षण पूर्ण केलेत अथवा फक्त १० वी मधून बाहेर पडण्याचे प्रयत्न केलेत. आपण अथक परिश्रमांवर विश्वास ठेवणार्‍या व्यक्तींपैकी आहात.
लगेच पुण्यात भावाला ला कॉल करुन सांगितले " मी येणार आहे पुण्याला..आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊ ! भावाने लगेच 'हो' बोलला.
आपला भाऊ देखील सध्या शिकत असावा किंवा तो रिकामटेकडा असावा. सुशिक्षीत बेकार किंवा आयटीत असल्याने दोन दिवस सुट्टी असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. कदाचित तिर्थरुपांनी बरेच काही करून ठेवले असल्याने त्याला काही करण्याची आवश्यकता देखील नसावी.
तसे एका मैत्रिणीला ही भेटायचे आहे म्हणुन जात आहे.माझी फक्त एकच मैत्रीण आहे
आपल्याला ह्या जगात केवळ एकच मैत्रिण आहे. आपण आजवरच्या आयुष्यात फक्त एकाच मैत्रिणीपर्यंत मजल मारु शकलेला आहात किंवा एकाच मैत्रिणीला टिकवून ठेवण्यात यशस्वी झालेला आहात.
आणि तिला जर मी आता पुण्यात जाऊन नाही भेटलो तर पुन्हा कधी आयुष्यात भेटु नाही शकणार..कारण (आता सांगत नाही..जावू दे ).
सदर मैत्रिण आपला मुखचंद्र पाहून नक्की ग्रहण लावणार ही तुम्हाला खात्री असावी, किंवा एकदा प्रत्यक्ष भेट झाली की मैत्रिण आपला वकूब ओळखून टांग मारणार ह्याची तुम्हाला निश्चिंती असावी. कादाचीत मैत्रिण तुमची किंवा तुम्ही मैत्रिणीची 'बिसलरी बॉटल' करण्याची तयारी ठेवलेली असावी.
)..तर मित्राणो..मला सांगा ना 'पुण्यात प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत ? तिथे कसे जायचे ? जवळपास ठिकाणे च सांगा ? किल्ले बघायला..त्यांचा इतिहास जाणून घ्यायला मला खुप आवडते.तर,पुण्यात कोणते किल्ले आहेत जवळपास ?
पुण्यात कृपया येऊ नये. आणि शनिवार रविवार तर बिलकुल येऊ नये. पुण्यात आधीच परप्रांतीयांचा शनिवार रविवार भयावह धुमाकूळ असतो, त्यात पुण्यातले काही दिडशहाणे मुंबैला जाऊन आणी मुंबैतले काही पुण्यात येऊन उतमात घालत असतातच. तेंव्हा आपल्याच गावात विश्रांती घ्यावी आणि गुगलवरती पुणे व परिसराचे फोटो बघावेत. तसेही पुण्यात एकही गड अथवा किल्ला नाही. काही सरदारांचे व सावकारांचे वाडे तेवढे शिल्लक आहेत. सिंव्हगड वैग्रे प्रकार पुण्याच्या हद्दीत नाहीत. नदी पलीकडे पुणे संपते ह्याचेच ज्ञान नसणार्‍याने तर पुण्यात बिलकुल येउ नये.
मी आता शनिवारी सकाळी पुण्यात येईन.माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीला भेटेन..खुप बोलणार आहे तीचाशी..कारण ती मला पुन्हा कधीच भेटणार नाहीये.मला तुम्ही मदत करा..मला जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे..खुप फिरायचे आहे..माझ्या गोड मैत्रिणीला पण मनभरून पाहीन ..खुप बोलेन..खुप आनंद देईन तिला.
ह्यासाठी बोंबलत पुण्याला येण्याची गरज नाही. एक वॅबकॅम तुमच्या संगणकाला लावा आणि एक त्या मुलीच्या संगणकाला लावायला सांगा. थोडक्यात आणि स्वस्तात काम होईल. ह्याचा फायदा म्हणजे आयुष्यात पुन्हा हवे तेव्हा हे सर्व अनुभवता येईल. विनाकारण प्रवास करुन पैसा, श्रम, वेळ, तेल ह्यांची बर्बादी करू नका. तसेच मुख्य म्हणजे पुणे हे सांस्कृतीक शहर आहे. मस्ती वैग्रे करण्यासाठी पनवेल सारखी ठिकाणे उपलब्ध आहेत. तसेच लखनौ सारखी शहरे देखील आहेतच. कृपया पुण्यात येऊन मस्ती, असभ्य वर्तन असले प्रकार करुन पुणेकरांना शरमेनी मान खाली घालण्यास लावू नये.
मी गेले ३ वर्षापासून मिपा चा नियमित वाचक आहे.आज जे मनात आले ते लिहिले..काहीच वाटत नाहीये..असे वाटत आहे "घरातल्यानाच विचारत आहे मी " .आणि हो मित्राणो..मी जरी बाहेर फिरत नसलो तरी मिपा वर खुप काही चांगले बघायला..वाचायला..अनुभव..संस्कार मिळत आहे मला..मी खुप मनापासुन आभार मानतो तुम्हासर्वांचे ! तुम्ही सगळे 'मिपा' कर खरेच खुप चांगले आहात..गोड आहात.
नो कॉमेंटस.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्प र्रा.... _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ /\_ कुठे फेडशील रे अबोध बालकान्ची दिशाभूल करण्याचं पाप! ;) ;) ;) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) कादाचीत मैत्रिण तुमची किंवा तुम्ही मैत्रिणीची 'बिसलरी बॉटल' करण्याची तयारी ठेवलेली असावी. हा वाक्प्रचार लई आवडल्या गेल्या आहे.... ;) ;) ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

ओऽऽऽ सदाशिवपेठी पुणेकर! का एका तरूणाच्या नाजूक भावनांची अशी चिरफाड करताय? तुमच्या घरातल्या कोणी असं विचारलं तर अशी उत्तरं देता का तुम्ही? "तुम्ही सगळे 'मिपा' कर खरेच खुप चांगले आहात..गोड आहात" लेखकाच्या या मताचा काहितरी आदर करा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

त्या शेवटच्या उतार्‍यावर... त्यानी काय पाप केलं? फक्त 'नो कॉमेंटस ' म्हणून त्याची बोळवण केली ती... अमृत

In reply to by परिकथेतील राजकुमार

फारच गोग्गोssssड प्रतिसाद :) >>>कादाचीत मैत्रिण तुमची किंवा तुम्ही मैत्रिणीची 'बिसलरी बॉटल' करण्याची तयारी ठेवलेली असावी. सेंटेंस ऑफ द इयर, कसलं भारी वाक्य आहे

In reply to by पुष्करिणी

सेंटेंस ऑफ द इयर, कसलं भारी वाक्य आहे
बिसलरी बॉटल हा शब्दप्रयोग मनापासुन आवडला गेल्या आहे. - (फक्त एकाच बॉटल मधुन पाणी पिणारा) इंट्या.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पुण्यात कृपया येऊ नये. आणि शनिवार रविवार तर बिलकुल येऊ नये. पुण्यात आधीच परप्रांतीयांचा शनिवार रविवार भयावह धुमाकूळ असतो, त्यात पुण्यातले काही दिडशहाणे मुंबैला जाऊन आणी मुंबैतले काही पुण्यात येऊन उतमात घालत असतातच. सिंव्हगड वैग्रे प्रकार पुण्याच्या हद्दीत नाहीत. नदी पलीकडे पुणे संपते ह्याचेच ज्ञान नसणार्‍याने तर पुण्यात बिलकुल येउ नये. काळजाला भिडली दोन्ही वाक्यं. :) शाब्बास, परिकथेतील राजकुमार! शनिवार रवीवार पुण्यात "मस्ती" करायला येणार्यांना आवरणं नितांत गरजेचं आहे.

आजवर मिपावर वाचलेला सर्वाधिक विनोदी धागा तो हाच..... हापिसात बसून तोंड दाबून हसावं लागतयं... सकाळि वाचल्याबरोबरच याची खात्री झाली होती... लगे रहो.. :-) :-) :-) अमृत

@ परा : हो..माझी या जगात फक्त एकच मैत्रीण आहे.बाकी..तिचाशिवाय दुसरे कुणाशी मैत्री ण म्हणून विचार पण करू शकत नाही. तुम्ही बोलताय "ह्यासाठी बोंबलत पुण्याला येण्याची गरज नाही. एक वॅबकॅम तुमच्या संगणकाला लावा आणि एक त्या मुलीच्या संगणकाला लावायला सांगा. थोडक्यात आणि स्वस्तात काम होईल. ह्याचा फायदा म्हणजे आयुष्यात पुन्हा हवे तेव्हा हे सर्व अनुभवता येईल. विनाकारण प्रवास करुन पैसा, श्रम, वेळ, तेल ह्यांची बर्बादी करू नका."..हा तुमचा नेट-कफे आहे ना..तुम्हाला चांगले वाटत असेल तुमचा मित्र-मैत्रीनसोबत 'वॅबकॅम' वरून बोलायला ! मला नाही चांगले वाटत. तुम्ही बोलता राजकुमार कि, "थोडक्यात आणि स्वस्तात काम होईल."..मी मैत्रीत कधी स्वस्तात..थोडक्यात काम होईल या अशा गोष्टींचा विचार कधीच करत नाही. राजकुमार म्हणतात, "विनाकारण प्रवास करुन पैसा, श्रम, वेळ, तेल ह्यांची बर्बादी करू नका.".."अरे..यार ! मी मैत्रीत काहीपण करायला तयार आहे..पैसा मोठा नाहीये आमचा मैत्री पेक्षा ! खरी मैत्री केलीये..मी ! तिला वचन दिले आहे " मी नेहमी माझ्या मैत्रीण सोबत असेन..दु:खात पण कधी साथ नाही सोडणार..मरेपर्यंत आपली 'मैत्री' निभावणार मी ".. धन्यवाद..परिकथेतील राजकुमार !

In reply to by बन्याबापू

खरी मैत्री केलीये..मी ! तिला वचन दिले आहे " मी नेहमी माझ्या मैत्रीण सोबत असेन..दु:खात पण कधी साथ नाही सोडणार..मरेपर्यंत आपली 'मैत्री' निभावणार मी ".. बोळा काढून पाणी वाहते करण्याची नितांत गरज आहे असं सारखं का वाटतंय? की मलाच वाटतंय? असं नको रे करु मित्रा.. काय बोलू आता ?

In reply to by गवि

पाणि वाहतं करण्याची नितांत गरज तर दिसतेच आहे... पर्याय अनेक आहेत... तुमचे आणि फारएण्डचे चित्रपट परिक्षणे वाचण्यापासून सुरुवात करावी, संजोपरावांचा "पार्टी रे पाटी" वाचावी आणि पुढील मिपा कट्ट्यावर न चुकता हजेरे लावावी असा सल्ला बन्याबापुंना द्यावासा वाटतोय... (बोळारहीत) अर्धवटराव

In reply to by गवि

>>बोळा काढून पाणी वाहते करण्याची नितांत गरज आहे असं सारखं का वाटतंय? की मलाच वाटतंय? मला पण बबांच्या प्रतिसादानंतर हेच वाटलं.. बादवे, पियुशाने काय जबरा वकिली मुद्दा मांडलाय.. है, शाब्बास.. बाकी पुढचे काही दिवस मराठी वर्त्मानपत्रांच्या "पुणे आवृत्ती"वर लक्ष ठेवावे असं वाटतयं आता..

In reply to by बन्याबापू

@ बन्या मी नेहमी माझ्या मैत्रीण सोबत असेन..दु:खात पण कधी साथ नाही सोडणार..मरेपर्यंत आपली 'मैत्री' निभावणार मी ".. मग, तुझी मैत्रीण तुला शेवट्ची भेटणार आहे अस का लिहिल आहेस तु ?

In reply to by पियुशा

मला वाटते 'भेटणार आहे' हे शब्द महत्वाचे आहेत. पुन्हा 'असे' भेटणे होणार नसेल. 'साथ' आणि 'मैत्री' राहिलंच की.

अरे..यार ! मी मैत्रीत काहीपण करायला तयार आहे..पैसा मोठा नाहीये आमचा मैत्री पेक्षा ! खरी मैत्री केलीये..मी ! तिला वचन दिले आहे " मी नेहमी माझ्या मैत्रीण सोबत असेन..दु:खात पण कधी साथ नाही सोडणार..मरेपर्यंत आपली 'मैत्री' निभावणार मी "..
हे पण तुम्हीच लिहिणार आणि हे पण :-
तसे एका मैत्रिणीला ही भेटायचे आहे म्हणुन जात आहे.माझी फक्त एकच मैत्रीण आहे आणि तिला जर मी आता पुण्यात जाऊन नाही भेटलो तर पुन्हा कधी आयुष्यात भेटु नाही शकणार..कारण (आता सांगत नाही..जावू दे ).
काय दारू खावून लिखाण करता का काय ? गवि म्हणतात ते खरंच योग्य आहे. आपला तुंबलेला बोळा निघण्याची आणि पाणी वाहते होण्याची नितांत आवश्यकता आहे. पुढे आपण म्हणता :-
मी मैत्रीत कधी स्वस्तात..थोडक्यात काम होईल या अशा गोष्टींचा विचार कधीच करत नाही.
थोडक्यात काम ? नाही म्हणजे मग नक्की काय खर्चाची अपेक्षा ठेवता आपण ? ह्यावेळी पुण्याला याच आणि आम्हाला भेटाच. तुम्हाला 'सज्ञान पुरुष' आणि 'मतदार' बनवूनच रवाना करतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुम्हाला 'सज्ञान पुरुष' आणि 'मतदार' बनवूनच रवाना करतो. 'सज्ञान पुरुष' ????????????? परा नक्की काय करणार आहेस तु? कली से फुल्ल बना दिया इथपर्यंत माहिती होते पण तु त्याला पुरुष बनवणार? अर्रे काय हे. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

स.प. रा. शेट अन् त्यांचे शिष्य (मा. बण्या) या शणिवारी बोटाला निळी शाई लावून, खिशात हिरवी पत्ती घेऊन, बिसलरीसह दगडूशेट जवळ दिसणार तर... ;)

In reply to by मृत्युन्जय

स़ज्ञान पुरुष बनवणार म्हणजे "गुलजार नार.." अथ पासुन इती पर्यंत अगदी डिट्टेल मध्ये सांगणार.. हो ना परा?? (सज्ञान) अर्धवटराव

पुण्यात अन्नेक ठीकाणे आहेत. महात्मा फुले मंडई, मालधक्का , धोबी घाट , डायस प्लॉट , मंगळवार पेठेतील जुना बाजार ,खडकी बाजार,पर्वती इम्डिस्ट्रीयल इस्टेट अशी बरीच ठीकाणे आहेत. येथे पुण्याचे एक आगळेवेगळे रूप पहायला मिळते. इथे श्रमजीवी पहावयास मिळतील पुण्यात केवळ आयटीतली जीव जगतात असे नाही ( अधीक माहिती श्री रा रा परा यांचे कडे विचारावी)

पुण्यात याल तेव्हा मोठ्ठी गाडी ( चार चाकी) घेऊन या आणि सकाळी हडपसर पासून कोथरूड ( व्हाया स्वारगेट, बाजीराव रोड, मंडई,शनिवार वाडा, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, गणेश पेठ, लक्ष्मी रोड, नळ स्टॉप, पौड फाटा) अशी पुणे दर्शनाला सुरवात करा. दोन दिवस कसे जातील हे समजणार सुद्धा नाही . स्थळेही बघायला मिळतील आणि इतर प्रबोधन होईल तो बोनस.

मोठ्ठी गाडी ( चार चाकी) घेऊन या बरे झाले खुलासा केलात ते. पुण्यात दुचाकीला देखील गाडी असेच संबोधले जाते. लुना वगैरे वापरत असेल तर त्याच्या उल्लेख मात्र बैलगाडी असा होतो

मा. स. प . रा. यांचे गुलजार नार वाचल्या पासुन अशा वाक्यांचे नाही नाही ते अर्थ ध्यानी येतात.. ( हे येशू , पापी लेकराला माफ कर ) मला जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे.. ..खुप फिरायचे आहे..माझ्या गोड मैत्रिणीला पण मनभरून पाही . खुप बोलेन.खुप आनंद देईन तिला

हिच भावना तुझ्या मैत्रिणीची आहे का? (अर्थातच तुझ्याबद्दल...) माझ्यामते तरी एखदी एखादी मुलगी कोणा एकाबरोबर खुप चं चांगली वागत असली तरी दुसर्या कोणाबरोबर ठिक-ठाक वागेल याचा काहिच नेम नाही