✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पुण्यातली प्रेक्षणीय-स्थळे ?

ब
बन्याबापू यांनी
Mon, 12/19/2011 - 23:58  ·  लेख
लेख
नमस्कार मिपा करानों ! काय सांगु यार..गेले चार-पाच वर्ष कुठेच फिरलो नाही.घर ते कॉलेज बाकी वेळच नाही मिळाला कुठे फिरायला.आता कॉलेज सुरू झाले तर कुठेतरी एकटेच फिरायला जायची हुक्की आली.म्हणुन लगेच पुण्यात भावाला ला कॉल करुन सांगितले " मी येणार आहे पुण्याला..आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊ ! भावाने लगेच 'हो' बोलला.तसे एका मैत्रिणीला ही भेटायचे आहे म्हणुन जात आहे.माझी फक्त एकच मैत्रीण आहे आणि तिला जर मी आता पुण्यात जाऊन नाही भेटलो तर पुन्हा कधी आयुष्यात भेटु नाही शकणार..कारण (आता सांगत नाही..जावू दे )..तर मित्राणो..मला सांगा ना 'पुण्यात प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत ? तिथे कसे जायचे ? जवळपास ठिकाणे च सांगा ? किल्ले बघायला..त्यांचा इतिहास जाणून घ्यायला मला खुप आवडते.तर,पुण्यात कोणते किल्ले आहेत जवळपास ? मी आता शनिवारी सकाळी पुण्यात येईन.माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीला भेटेन..खुप बोलणार आहे तीचाशी..कारण ती मला पुन्हा कधीच भेटणार नाहीये.मला तुम्ही मदत करा..मला जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे..खुप फिरायचे आहे..माझ्या गोड मैत्रिणीला पण मनभरून पाहीन ..खुप बोलेन..खुप आनंद देईन तिला.मी गेले ३ वर्षापासून मिपा चा नियमित वाचक आहे.आज जे मनात आले ते लिहिले..काहीच वाटत नाहीये..असे वाटत आहे "घरातल्यानाच विचारत आहे मी " .आणि हो मित्राणो..मी जरी बाहेर फिरत नसलो तरी मिपा वर खुप काही चांगले बघायला..वाचायला..अनुभव..संस्कार मिळत आहे मला..मी खुप मनापासुन आभार मानतो तुम्हासर्वांचे ! तुम्ही सगळे 'मिपा' कर खरेच खुप चांगले आहात..गोड आहात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32901 वाचन

💬 प्रतिसाद (153)

प्रतिक्रिया

गप्प रे. शेवटची भेट अशी

किसन शिंदे
Tue, 12/20/2011 - 10:19 नवीन
गप्प रे. शेवटची भेट अशी ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीने अनुभवण्याची गंमत तुम्हा मुंबैकरांना काय कळणार ????? एवढ्या लवकर मुंबईला विसराल याची अपेक्षा नव्हती बदलापुरकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>एवढ्या लवकर मुंबईला विसराल

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/21/2011 - 09:02 नवीन
>>एवढ्या लवकर मुंबईला विसराल याची अपेक्षा नव्हती बदलापुरकर. "बाटलेला फकीर मोठ्याने बांग देतो" अशी म्हण उगाच आहे का ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

>>"बाटलेला फकीर मोठ्याने बांग

सूड
Wed, 12/21/2011 - 09:45 नवीन
>>"बाटलेला फकीर मोठ्याने बांग देतो" अशी म्हण उगाच आहे का ? काय की !! सध्या व्हेन यू आर ईन रोम .....काहीसं म्हणतात त्याचं पालन करतोय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

म्हणजे अजून सुंता झाली नाही

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/21/2011 - 18:53 नवीन
म्हणजे अजून सुंता झाली नाही म्हणायची.. होईल होईल... :-) पण पुढे मागे जेव्हा परत याल तेव्हा आम्ही तुळशीचे पान तयार ठेऊ. अवांतर :- रोम चे नाव घेऊ नका, सध्या बदनाम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

दो आ प्र का टा आ

सूड
Wed, 12/21/2011 - 09:46 नवीन
दो आ प्र का टा आ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

@-"बाटलेला फकीर मोठ्याने बांग

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/21/2011 - 14:30 नवीन
@-"बाटलेला फकीर मोठ्याने बांग देतो" अशी म्हण उगाच आहे का ?>>> खिक्क... :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

बाटलेला फकीर मोठ्याने बांग

गवि
Wed, 12/21/2011 - 14:36 नवीन
बाटलेला फकीर मोठ्याने बांग देतो" अशी म्हण उगाच आहे का ?
मी या प्रतिसादाला धर्मनिरपेक्ष करु इच्छितो.. "धर्मबदल केलेला एक साधक मूळ धर्मीयापेक्षा मोठ्या आवाजात धार्मिक आराधनेतील उच्चारण करतो.." कसे??? ( माझ्या लहानपणी रत्नागिरी टाईम्स आणि तत्सम पेपरांत किंवा रेडिओवर दंगलीच्या बातम्या अशा यायच्या "एका धार्मिक गटाच्या मिरवणुकीमुळे दुसर्‍या धार्मिक गटाच्या प्रार्थनास्थळी प्रार्थनेच्या वेळेस शांतताभंग झाल्याने तणाव उत्पन्न झाला.. " इ इ. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गवि, एखाद्या पोलिसस्टेशनच्या

पाषाणभेद
गुरुवार, 12/22/2011 - 07:42 नवीन
गवि, एखाद्या पोलिसस्टेशनच्या शांतता समितीत आहे का तुम्ही? अशीच प्रगती करत राहिलात तर नोबेलचा शांतता पुरस्कार मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बरोबरे

मी-सौरभ
Tue, 12/20/2011 - 10:39 नवीन
ऐतिहासिक ठिकाणी ईतिहास जाणून घेण्याऐवजी स्वतःच घडवायची चांगली संधी असते असं जाणकार सांगताना ऐकलय मी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अरारा...

चिगो
Tue, 12/20/2011 - 11:54 नवीन
>>..पण शंका उरतेच मित्रा, की सर्वात आवडती, गोड इ. मैत्रीण शेवटच्यांदा भेटण्याची वेळ येईपर्यंत परिस्थिती असताना इतिहास आठवत किल्ले कसले फिरतोस..? ठार मेलो.. पुरता प्याक करुन टेंपुत बसवला गवि तुम्ही.. आणि तेही तुम्हाला (व्हाया सर्व मिपाकर) "गोड" म्हणत असतांना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

१) मैत्रिणीला मनभरुन भेटून मग

बन्याबापू
Tue, 12/20/2011 - 16:10 नवीन
१) मैत्रिणीला मनभरुन भेटून मग एकटेच फिरणार आहात की मनभरुन भेटण्यासाठीच विविध ठिकाणांचा बॅकड्रॉप हवाय? -मैत्रिणीला मनभरुन भेटणार मगच एकटा फिरायला जाणार आहे. २) सर्वात आवडती, गोड इ. मैत्रीण शेवटच्यांदा भेटण्याची वेळ येईपर्यंत परिस्थिती असताना इतिहास आठवत किल्ले कसले फिरतोस..? - तीचाशी भेटल्यानंतर एकटा काय करू म्हणता मग ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तीचाशी भेटल्यानंतर एकटा काय

पक पक पक
Tue, 12/20/2011 - 18:31 नवीन
तीचाशी भेटल्यानंतर एकटा काय करू म्हणता मग ? एरवडा एक चांगले ठिकाण आहे अशा परिस्थीतीत जायला...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्याबापू

>>मैत्रिणीला मनभरुन भेटणार

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/21/2011 - 00:52 नवीन
>>मैत्रिणीला मनभरुन भेटणार मगच एकटा फिरायला जाणार आहे. मित्रा, मग किल्ल्यावर काय, साधा पर्वतीवर पण जाऊ नकोस. नावावर जाऊ नकोस, पर्वती छोटेसे टेंगुळ आहे, पण ते असो. तर मुद्दा असा की उडी मारायचा मोह व्हावा अशी ठिकाणे टाळ. (सदर सल्ला ५०% मस्करी आणि ५०% गंभीरपणे दिला आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्याबापू

>>मैत्रिणीला मनभरुन भेटणार

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/21/2011 - 00:52 नवीन
>>मैत्रिणीला मनभरुन भेटणार मगच एकटा फिरायला जाणार आहे. मित्रा, मग किल्ल्यावर काय, साधा पर्वतीवर पण जाऊ नकोस. नावावर जाऊ नकोस, पर्वती छोटेसे टेंगुळ आहे, पण ते असो. तर मुद्दा असा की उडी मारायचा मोह व्हावा अशी ठिकाणे टाळ. (सदर सल्ला ५०% मस्करी आणि ५०% गंभीरपणे दिला आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्याबापू

सिहंगड ला वगैरै जावुन ईतर

सुहास..
Tue, 12/20/2011 - 10:32 नवीन
सिहंगड ला वगैरै जावुन ईतर प्रेक्षणीय बघण्यापेक्षा (अगदी आडबाजुला, प्रेक्षणीय आणि शांत) १ ) एम्प्रेस बॉटनिकल गार्डन, रेसकोर्स २ ) कस्तुरबा गांधी हॉल, पूणे - नगर रोड ३ ) महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड ४ ) पाताळेश्वर लेणी , जंगली महाराज रोड ५ ) ओंम नम शिवाय, येरवडा ६ ) एम.जी. रोड , कॅम्प ( तिथेच लाल देऊळ ! ) ७ ) नाला पार्क, कोरेगाव पार्क ८ ) ओशो कम्युन सेंटर, कोरेगाव पार्क जरा दुर जायचे असेल तर १ ) बनेश्वर , पुणे -बँगलोर हाय वे २ ) रांजण खळगी , शिरुर ३ ) शिवापुर दर्गा , पुणे बँगलोर हाय वे ४ ) मल्हारगड, सासवड (तिथेच दिवे घाट) ५) बोपदेव घाट, कनिफनाथ ६ ) निळकंठेश्वर , पानशेत अजुन बरेच आहेत ....
  • Log in or register to post comments

रांजण खळगी , शिरुर रांजण

किसन शिंदे
Tue, 12/20/2011 - 10:36 नवीन
रांजण खळगी , शिरुर रांजण खळगे शिरूरमध्ये नाही निघोजमध्ये आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

हो का ?? माहिती बद्दल

सुहास..
Tue, 12/20/2011 - 10:46 नवीन
हो का ?? माहिती बद्दल धन्यवाद ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

@रांजण खळगे शिरूरमध्ये नाही

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/20/2011 - 14:46 नवीन
@रांजण खळगे शिरूरमध्ये नाही निघोजमध्ये आहेत.>> असू द्या हो किसनराव....पाण्यात उतरायला मिळाल्याशी मतलब...! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

पाण्यात का खळग्यात? का

प्रचेतस
Tue, 12/20/2011 - 15:02 नवीन
पाण्यात का खळग्यात? का खळग्यातल्या पाण्यात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

वल्ली

मी-सौरभ
Tue, 12/20/2011 - 15:59 नवीन
तुला आता मंदाकिनी दिसू लागली ? की 'यमुनाजळी खेळू खेळ कन्हैय्या' हे गाणं पण ऐकू येत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नाही नाही, मला सध्या फक्त

प्रचेतस
Tue, 12/20/2011 - 16:01 नवीन
नाही नाही, मला सध्या फक्त एशियन मेलॉन्ज दिसतय डोळ्यांसमोर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

मी आधी Ménage वाचले चुकुन

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/21/2011 - 01:41 नवीन
मी आधी Ménage वाचले चुकुन :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पाण्यात का खळग्यात?का

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/20/2011 - 19:01 नवीन
पाण्यात का खळग्यात? का खळग्यातल्या पाण्यात :-D चुकलं चुकलं...वल्ली.. तुमचं बरोब्बर...खळग्यातल्या पाण्यात,तुंम्ही अनुभवी माणसं राव ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

'प्रेक्षणीय' स्थळे सांगितली

बन्याबापू
Tue, 12/20/2011 - 16:16 नवीन
'प्रेक्षणीय' स्थळे सांगितली त्याबद्दल धन्यवाद..सुहास !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

जे २ दिवस मिळाले आहेत खुप

मृत्युन्जय
Tue, 12/20/2011 - 10:55 नवीन
जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे.. हॉटेल श्रेयस - आपटे रोड हॉटेल ओकवुड - भांडारकर रोड होटेल एकांत - लवासा सिटी वरील सर्व ठिकाणी हुच्च मध्यमवर्गीयांसाठी आहेत. आपले बजेट सांगावे म्हणजे योग्य ती ठिकाणे सांगता येतील. पुण्यात मस्ती करण्याजोगी अजुनही काही छाण ठिकाणे आहेत पण आपण मैत्रिणीसोबत असल्याकारणाने कदाचित गरज पडणार नाही. खुप फिरायचे आहे.. झेड ब्रिज (हो हेच नाव आहे आणी हे नाव त्याच्या आकारामुळे पडले आहे. गैरसमज नको) खडकवासल्याची भिंत खडकवासल्याच्या पुढील मैदाने सिंहगड आणि हि छत्री न्यायला विसरायचे नाही बर का.
  • Log in or register to post comments

खडकवासल्याची

सुहास..
Tue, 12/20/2011 - 11:04 नवीन
खडकवासल्याची भिंत खडकवासल्याच्या पुढील मैदाने सिंहगड आणि हि छत्री न्यायला विसरायचे नाही बर का >>>. लई अनुभव ब्वा !! पेपर पण न्या बर का ! (नाय म्हणजे ड्रेस, कपडे मातकटले की बाप ओळखतो की कार्ट/कार्टी कुट गेल होत ते ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

>>पेपर पण न्या बर का ! (नाय

अन्या दातार
Tue, 12/20/2011 - 11:27 नवीन
>>पेपर पण न्या बर का ! (नाय म्हणजे ड्रेस, कपडे मातकटले की बाप ओळखतो की कार्ट/कार्टी कुट गेल होत ते) हा तुमचा अनुभव वाटतं ;) पण मुळात कुठंतरी मातीत लोळत जावेच कशाला? खडकवासल्याच्या आजूबाजूला हाटेलं नाहीत का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

अरे तसं नव्हे अन्या, पेपर

५० फक्त
Tue, 12/20/2011 - 11:34 नवीन
अरे तसं नव्हे अन्या, पेपर न्या म्हणजे १. तिथल्या सिन सिनेरीचे रेखा चित्रे काढुन मिपाचे कलादालन सम रुद्ध करता येईल २. उगाचच तिथला निसर्ग खराब का करा, त्यापेक्षा कागद वापरलेला चांगला ३. गेला बाजार, विमानं करुन उडवायला येतिल. आता खडकवासला आणि पेपर यावरुन एक अतिशय सालस सोज्वळ सभ्य (क्रिडारसिकांच्या भाषेत - सचिन टाईप) जोक आठवला आहे, पण जाउ दे. ......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

आता खडकवासला आणि पेपर यावरुन

मृत्युन्जय
Tue, 12/20/2011 - 12:13 नवीन
आता खडकवासला आणि पेपर यावरुन एक अतिशय सालस सोज्वळ सभ्य (क्रिडारसिकांच्या भाषेत - सचिन टाईप) जोक आठवला आहे, पण जाउ दे. ...... व्यनि करावा अशी नम्र बिनंत्यी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

+१

सोत्रि
Tue, 12/20/2011 - 12:32 नवीन
मलाही त्या व्यनित अ‍ॅडवण्याचे करावे :) - ('जोक'र) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

+१

मी-सौरभ
Tue, 12/20/2011 - 13:10 नवीन
माझ्याही मनावर कोवळे परीणाम करणारा हा व्यनी करावा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

जोक आठवला आहे,

चिंतामणी
Tue, 12/20/2011 - 13:20 नवीन
पाठवुन दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अंssssssssssअसं नै ब्वॉ,मला

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/20/2011 - 15:01 नवीन
अंssssssssssअसं नै ब्वॉ,मला पण पायजेल जोक व्यनितुन... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

पण मुळात कुठंतरी मातीत लोळत

मृत्युन्जय
Tue, 12/20/2011 - 12:12 नवीन
पण मुळात कुठंतरी मातीत लोळत जावेच कशाला? खडकवासल्याच्या आजूबाजूला हाटेलं नाहीत का? असं नाही लेका. मातीत पण मस्ती करता येतेच की. बन्याबापूंना मस्ती करायची आहे ना? बाकी सुहासराव ते पेपराचं क्लीयर केल म्हणुन बराय बर का नाहीतर आम्हाला वाटले की खडकवासल्याची भेळ खाउन अजीर्ण झाले तर बरे असेल म्हणुन सांगताय की काय. नाही म्हणजे कधीकधी गैरसोय झाली की .......... हॅ हॅ हॅ. बाकी बन्याबप्पू दिसत नाहीत कुठे, मयतरीण भेटली की काय त्यांना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

आणि हि छत्री न्यायला विसरायचे

विजुभाऊ
Tue, 12/20/2011 - 16:26 नवीन
आणि हि छत्री न्यायला विसरायचे नाही बर का मुम्बईत सेन्ट्रल लाईन वर सकाळी बर्‍याच छत्र्या दिसतात. विशेषतः ठाणे कुर्ल्या दरम्यान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

+१

इंटरनेटस्नेही
Tue, 12/20/2011 - 12:24 नवीन
पुण्यात मस्ती करण्याजोगी अजुनही काही छाण ठिकाणे आहेत पण आपण मैत्रिणीसोबत असल्याकारणाने कदाचित गरज पडणार नाही.
=)) =)) =)) हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

खडकवासल्याच्या आजूबाजूला

स्पा
Tue, 12/20/2011 - 11:33 नवीन
खडकवासल्याच्या आजूबाजूला हाटेलं नाहीत का? हा तुमचा अनुभव वाटत :D
  • Log in or register to post comments

नुसतीच चौकशी

अन्या दातार
Tue, 12/20/2011 - 11:41 नवीन
स्पा, मी आजवर एकदाही खडकवासल्याला गेलेलो नाही. सहज चौकशी केली रे. आता जर गेलो कुणाबरोबर तिथे, तर खायचे वांदे नकोत म्हणून रे :P ____________________________________________________________ अप्रसन्न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आता जर गेलो कुणाबरोबर तिथे,

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/20/2011 - 15:11 नवीन
आता जर गेलो कुणाबरोबर तिथे, तर खायचे वांदे नकोत म्हणून रे... :-D काय खाणार? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

खायचे होऊ नयेत वांदे....

प्रचेतस
Tue, 12/20/2011 - 15:39 नवीन
खायचे होऊ नयेत वांदे.... म्हणून खा कांदे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कांदे आले की पाठोपाठ

कपिलमुनी
Tue, 12/20/2011 - 16:33 नवीन
चांदीचे भांडे आनि तुळशीच्या मंजुळा येतात पळा...............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सारसबाग

दिपक
Tue, 12/20/2011 - 11:39 नवीन
ते सारसबाग का काहितरी पुण्यातच आहे ना? :-)
  • Log in or register to post comments

हो तर!! पुण्यासारखी हिरवळ

सूड
Tue, 12/20/2011 - 12:08 नवीन
हो तर!! पुण्यासारखी हिरवळ शोधून सापडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

हो तर!! पुण्यासारखी हिरवळ

सूड
Tue, 12/20/2011 - 12:08 नवीन
हो तर!! पुण्यासारखी हिरवळ शोधून सापडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

स्वातंत्र्याचा उन्मुक्त आविष्कार

इंटरनेटस्नेही
Tue, 12/20/2011 - 12:29 नवीन
पुण्यातच आहे. आणि एकदम 'खास' आहे. नवीन पिढीचा स्वातंत्र्याचा उन्मुक्त आविष्कार पाहायचा असेल तर सारसबागेला पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

पेशवे

चिरोटा
Tue, 12/20/2011 - 11:57 नवीन
पेशवे पार्क आहे का अजून? असेल तर ते ही पहा. नाहीतर हिंजवडी आय टी पार्क, मगरपट्टा सिटी आहेच.
  • Log in or register to post comments

>>नाहीतर हिंजवडी आय टी पार्क,

मनराव
Tue, 12/20/2011 - 12:49 नवीन
>>नाहीतर हिंजवडी आय टी पार्क, मगरपट्टा सिटी<<< चिरोट्या, अरे त्याला मस्ती करायला आणि मैत्रीणी बरोबर फिरायला या पेक्षा चांगल्या जागा वर दिल्या आहेत... आय टी पार्कात जाण्यापेक्षा राजीव गांधी पार्कात जा..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

वल्लींनी मार्ग दाखवला आहे. त्याचप्रमाणे इतर पर्याय उपलब्ध आहेत.

चिंतामणी
Tue, 12/20/2011 - 13:08 नवीन
>>>.मला सांगा ना 'पुण्यात प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत ? तिथे कसे जायचे ? जवळपास ठिकाणे च सांगा ? किल्ले बघायला..त्यांचा इतिहास जाणून घ्यायला मला खुप आवडते.तर,पुण्यात कोणते किल्ले आहेत जवळपास ? १)वल्लींनी मार्ग दाखवला आहे. http://www.misalpav.com/node/20144 २)नाहीतर "राजगड" गाठावा. साखरप्याला उतरून पायी चोरवाटेने गड चढावा. जमल्यास बालेकील्यावर जावे. सगळा गड फिरावा. दोन दिवस लागतील त्यासाठी. ३) गेला बाजार सिंहगड आहेच. तीथल्या गर्दीचे काय करायचे हे मात्र तु बघुन घे. :) :-) :smile:
  • Log in or register to post comments

कोपरे

इंटरनेटस्नेही
Tue, 12/20/2011 - 13:36 नवीन
३) गेला बाजार सिंहगड आहेच. तीथल्या गर्दीचे काय करायचे हे मात्र तु बघुन घे.
आँ? बरेच कोपरे आहेत आमच्या सिंहगडावर! अधिक माहितीसाठी व्यनि करावा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

>>>>आमच्या सिंहगडावर!<<< ऑ

मनराव
Tue, 12/20/2011 - 14:24 नवीन
>>>>आमच्या सिंहगडावर!<<< ऑ ?? सिंहगड तुमचा कवा पासुन झाला..... आणि सिंहगडावर पण स्टॅमिना टेस्ट झाली काय तुमची......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा