Skip to main content

|| सासूच्या नानाची टांग ||

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 19/11/2011 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहॊ आज जागतिक पुरूष हक्क दिन आहे, त्याबद्दल समस्त मिपाकर पुरूषवर्गाचे अभिनंदन! आजच्या सकाळच्या मुख्य आवृत्तीमध्ये पान ८ वर सन २००७ पासून्ची एक आकडेवारी सकाळ ने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरुष जास्त आत्महत्या करतात हे निर्विवाद सिद्ध झाले आहे. . यातून ज्याला जो अर्थ घ्यायचा तो त्याने घावा...पुरूषांच्या छळाला कायद्याचा प्रतिबंध नाही एवढेच त्यातून सिद्ध होते. नेत्रेश यांनी काढलेला धागा पण महत्त्वाचा आहे. संपत्तीच्या लोभाने लग्न करणार्‍या स्त्रीयांपासून संपत्ती कशी वाचवायची, हा प्रश्न कायद्याने कसा हाताळणार हे एक कोडेच आहे. जाताजाता: सध्या झीमराठीवर एका येऊ घातलेल्या मालिकेची (दिल्या घरी तू सुखी रहा) जाहिरात जोरदार चालू आहे. त्यात एक आई तिच्या मुलीची वेणी घालताना तिला विचारते, "लग्न झाल्यावर सासू तुझे लाड करणार आहे का गं?" त्यावर मुलीने दिलेले उत्तर ऐकून मी थंडगारच पडलो. मुलगी उत्तरते, "सासूच्या नानाची टांग!". माझी आठवीतली मुलगी मला "सासूच्या नानाची टांग" म्हणजे काय असे रोज विचारून भंडावून सोडते. सध्यातरी तिच्या प्रश्नाचे उत्तर मी देउ शकलो नाही. पण महाराष्ट्रातल्या बर्‍याच मुलीना "सासूच्या नानाची टांग".म्हणजे काय याचे उत्तर नक्की माहिती असेल. कंचुकीदहन आणि स्लट मार्चनंतर स्त्रीमुक्तीचा नवीन अध्याय महाराष्ट्रात "सासूच्या नानाची टांग" या संदेशामुळे उघडेल हे मात्र नक्की!

वाचने 22525
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

In reply to by राजेश घासकडवी

अत्यंत भडकाऊ व शिवराळ बाज असलेलं लिखाण.
कोण म्हणतं आम्हाला झेपत नाही म्हणून ?
सन्माननीय अपवादही असतातच, कधी कधी केनया वेस्टींडीज ला हरवते, बाग्लादेश पाकिस्तानला हरवतो याचा अर्थ त्या बलाढ्य टीम्स आहेत असा न्हवे. स्त्रियांना पायताण समजणार्‍यांना आम्हीही फाट्यावर मारतोच. पण त्यासाठी कमरेचं सोडून.... मोर्चे काढणार नाही.
पुरुषांवर! बिच्चाऱ्यांची (अशा बांगड्या भरण्यापासून) मुक्ती झालीच पाहिजे.
मालक, आधी पूरूषांना जाणीव तर होऊन दे हातात बांगड्या भरल्या गेल्या आहेत याची ? नंतर बघू कशी मूक्ती करायची ते. तसही असा "बांगड्या भरणे" हा शब्द प्रयोग करून तूम्ही स्त्रियांचा अपमान केलाच नसता. व पूरूषांची चूकीची प्रतीमाही प्रतीसादातून निर्माण केली नसती. :( बांगड्या भरल्याने स्त्रियांची बूध्दी काम करत नाही हा जावै शोध कोठून लावला ? बांगड्याभरूनही स्त्रिया कर्तूत्व दाखवू शकतातच की त्यात कमीपणा अथवा मर्दूमकी असतेच कूठे . डोक्यावरचा पदरही ढळू न देणारी हातात बांगडी असलेली हिना रब्बानी परराश्ट्र मंत्री आहे ते उगीच का ? लाज काढताय की राव सगळ्या बांगड्या भरणार्‍या स्त्रियांची. त्यानी इतीहास नाही का घडवला ? मग ?असा अपमान करू नका स्त्रियांचा. आणी कशाला अंडरवेअरी पेटवायची वरवरची नाटकं करायला सांगताय जर आतला दिवा/ आगच फक्कन विझलेलि अशा लिखाणातून दिसत असेल ? पैज लावतो काही कंपूसोबतच बेगडी स्त्रिमूक्ती दाखवणार्‍यांनी नाही तूमच्या या प्रतीसादाला दाद दिली तर काहीही हारेन. आणि तरीही त्यांना ही जाणीव नसेल की तूमच्या प्रतीसादाला दाद देताना ते स्त्रियांचा अप्रत्यक्शपणे अपमान करत आहेत. ( आकाशातला देव त्यांच भलं करो).

In reply to by आत्मशून्य

बाग्लादेश पाकिस्तानला हरवतो याचा अर्थ त्या बलाढ्य टीम्स आहेत असा न्हवे.
काय की ब्वॉ. बलाढ्य टीम्स असत्या तर एक मॅच हरल्यावर भिकेला का लागतील? आणि बांग्लादेशवर पुन्हा हल्ला करून पूर्वी होता तसाच पाकिस्तान सरकारने आपल्या कह्यात ठेवावा अशा मागण्या का करतील? एकंदरीत तुमचा आक्षेप 'बांगड्या भरणे' हा शब्दप्रयोग वापरण्याला आहेसं दिसतं आहे. अहो, तो तुम्हाला कळेल अशा भाषेत यावा म्हणून लिहिला होता. (ही भाषादेखील गरीब बिच्चाऱ्या पुरषांनीच बनवली आहे) त्याऐवजी क्लैब्य हा शब्दही वापरता आला असता. तोच शब्द आहे असं समजून वाचा माझा प्रतिसाद. एकंदरीत पुरुषांची चिंताच वाटायला लागली आहे. वीस वर्षांनी जेव्हा मुलं मुलींचं प्रमाण १०० ला ८० असतील तेव्हा किती पोरांना हुंडे देऊन लग्न करावं लागेल. किती मुलांना त्यांचे सासरे हुंडा दिला नाही म्हणून जाळतील... कल्पनेनेच शहारा येतो.

In reply to by राजेश घासकडवी

आपल्याकडून एका सामाजीक व अर्थशास्त्र विषयक धाग्याला अनावश्यक सांस्कृतीक व भावनीक तथा स्त्रि विरूध्द पूरूष रंग कारण नसताना दिला जातोय. पूरूष हे ताकतीने स्त्रियांपेक्षा बलवान आहेतच. स्त्रियांनी नोकरी केल्यांने पूरूषांच हे सामर्थ्य वर्चस्व संपणारही नाही, अम्रीकेत कामधाम करून पून्हा बेकार बॉयफ्रेंडचा सडकून मार खाऊन त्याला पोसणार्‍या बर्‍याच स्त्रियाही आहेतच. म्हणूनच असं भावनीक बनण्यापेक्षा इथे विषय काय चाललाय हे तर समजून घ्यायचे कश्ट घेऊया का? मूद्दा अशा भारतीयांच्या निश्पाप कूटूम्बीयांच्या आयूश्याबाबद मांडत आहे जे रस्त्यावर येण आपण टाळू शकतो. जर व्यवस्थीत कायदा केला तर. या धाग्यावरील कोणत्याही लिखाणात मी स्त्रियांना तूछ्च समजा, पायताण समजा, बंधनात ठेवा, शिकवू नका असं म्हटलेलं नाहीये. माझे मूद्दे हे नेमके वास्तववादी व जनहीतार्थच आहेत, यात कोणताही स्त्रि-पूरूष भेदभाव नाही. पूरूषाच्या कूटूंबात स्त्रिया येणारच की ? तसच माझी पॉलीसी वाइस-व्हर्सा अप्लाय करायलाही मी हरकत घेतली नाही , पण म्हणून अंडर्वेअर वगैरे जाळायची वेळ येइल असा कोणताही गोड गैरसमज मी बेगडी स्त्रिमूक्तीवाल्यांचा करून देणार नाही. तसच स्त्रियांनी काम बंद केल तर मनोरंजन सोडलं तर इतर (बहूतांश) क्षेत्रात प्रगती, कामे होणार नाहीत असा भ्रमही कोणाअला नाही. पूरूष हे सर्व सांभाळायला समर्थ होते व आहेतही. पटत नसेल तर स्त्रियांनी त्वरीत राजीनामे द्यावेत व प्रत्य घ्यावा. पूरूषांच स्त्रि विशयक असलेलं प्रेम व आदर या गोश्टीनीच त्याला स्त्रियांना समान संधी द्यायला उद्यूक्त केलं आहे, पण जर यातून काही गैरव्यवस्था तयार होतेय, स्त्रियांचे स्वतःबाबतचे भ्रम वाढत असतील तर पूरूषांनीच त्यासाठी पूढाकार घेतला पाहीजे. नाहीका ? मी मांडलेल्या मूद्यावर मूळात तूम्ही स्त्रिला कमकूवत का समजत आहात अथवा तीच अबला असं चित्र का उभ करताय हेच स्पश्ट होतं नाहीये. कोणत्याही अबला नारीबद्दल मी इथं काहीही बोललो नाहीये, मि ज्या स्त्रियांबाबत बोलतोय ते व्यवस्थीत लक्षात घ्या व त्यांच्या बाबत तरी किमान तूम्हाला असं समजायला काय हरकत आहे की (त्या) स्त्रि(या) आणी पूरूष समानच आहेत ते ? मग तर जे मी म्हणालो की ज्या सूशीक्षित घरातील स्त्रिया जॉब करतात तेथील पूरूषही जॉब करतात परीणामी हे जॉब कमी कूटूम्बीयांमधे विभागले जात आहेत. भारतासारख्या विकसनशील देशात हे योग्य आहे काय (विषेशतः जर कमावती व्यक्ती केवळ पूरूष असेल तर ? ) यातूनच आज सामाजीक विषमता वाढत नाही काय ? Nobody is ready to see the big picture ? या कूटील स्त्रियांच्याकडे असं काय आहे जे जॉब न करणार्‍या स्त्रियांकडे नाही की ह्या आता आपल्या सारासार विचारबूध्दीवरही निर्वीवाद अंकूश गाजवू पहात आहेत ?

In reply to by आत्मशून्य

दर घरामागे(विभक्त कुटुंबामागे) एकच व्यक्ती कमावती ठेवल्याने अधिकाधिक कुटुंबांना रोजगार प्राप्त होइल असे म्हणणे आहे काय? एक उदाहरण घेउन. चर्चा फक्त विवाहित स्त्री आणि पुरुषाबद्दल आहे का? एक मध्यमवयीन जोडपे आहे,त्यातला नवरा कमावता आहे; त्यांची दोन्ही मुले कमावती व अविवाहित आहेत. आता, ह्यात एकाच कुटुंबात तिघांनी जॉब केल्याने इतर तीन कुटुंबे निराधार झालीत असे वाटते का? केवळ एकानेच जॉब करावा असे म्हणणे आहे का? नसेल तर दुसरे चित्र देतो, त्यात नक्की काय खटक्ते ते सांगा:- एक मध्यमवयीन जोडपे आहे,त्यातला नवरा कमावता आहे; त्यांच्या दोन्ही मुली कमावत्या व अविवाहित आहेत. किंवा एक मध्यमवयीन जोडपे आहे,त्यातला नवरा कमावता आहे; त्यांचा एक मुलगा व एक मुलगी असे दोघेही कमावते आहेत. आता ही दोन चित्रे दाखवली तर "बाकिच्या कुटुंबांच्या उत्पन्नावर पोरी चढून बसल्या" असे काहिसे तुमेहे म्हणणार का? तीन चित्रात नक्की काही फरक जाणवतो का? मला जाणवत नाही. आपण स्प्षट केल्;यास मुद्दा कळेल.

In reply to by राजेश घासकडवी

२० वर्षे कशाला थांबताय आताच नँशनल अँव्हरेज १०००मुलांमागे९३३ मुली असे प्रमाण आहे सुदाम मुंडे सारख्याच्या कृपेने लवकरच आणखी कमी होईल गुर्जी तुम्ही पेपर नीट वाचत नाही वाटत नाहीतर इंडीयन एक्सप्रेसमधील हरयाणामधे लग्नासाठी गुजरातेतील मुली आयात ही बातमी नजरेतून सुटली नसती

In reply to by राजेश घासकडवी

अंडरवेअरी या काय फक्त पुरूषांच्या मक्तेदारीत नाहीत. सबब हा निषेधाचा मार्ग होऊ शकत नाही. पुरूषांसाठी एक्स्लूजिव जाळायला असं काय बरं असेल? या बायकांनी लुंगी,स्कर्ट्,पँट,शर्ट्,धोती असं सगळं वापरून पुरूषांसाठी एक्स्क्लूजिव असं काय ठेवलंच नाही हो.

In reply to by साती

बायकांनी shaving cream वापरल्याचे अजून ऐकले नाही. तसेच एका कुठल्याश्या जाहिरातीत एक स्त्री लाजलेली आहे, केळावर कुठले तरी आवरण चढवून त्याला झाकत असल्याचे दाखवले होते, जाहिरातीत/पोस्टरवर लाजलेली(का उत्तेजित) स्त्री दाखवली होती, तरी ते प्रॉडक्ट पुरुषांसाठीच होते म्हणे. तस्मात् स्त्रियांनी सर्वच काही वापरून टाकले असे म्हणणे पटत नाही. स्त्री ही "चांगली स्त्री" झाल्यास उत्तम. स्त्रीचा उगीच "दुसरा पुरुष" बनवू नये.

In reply to by राजेश घासकडवी

पोरांनो, ह्यो गुर्जी काय बी चिथावनी देतुया. म्हनं अंडरवेअर पेटवा. म्हागाईच्या जमान्यात ७५ रुप्याच्या खाली चांगली अंडरवेर येतीया काय? कशाला उगीच नुस्कानी करुन घेताय? उगा तेच्या नादाला लागलात तर हाय ती बी अंडरवेर हातची जायची. अंडरवेरचं महत्त्व लई हाय. ती कोनच्या तरी कंपनीची अंडरवेर घातली का गुंडाच्या छाताडावर लाथ घालता येती आन एक सुंदर बाय लगीच आपल्या कमरेभवती हात घालून आपल्याला 'माचो मॅन' आसं म्हनती. जाहिरातीत बगितलं नाय का तुमी? तसं बगाया ग्येलं तर अंडरवेर न्हाई घातली तर काई ना काई मुक्ती मिळतीच की. मंग ह्यो जाळायचा कुटाना कशापाई करायचा म्हनतो म्या? :)

In reply to by योगप्रभू

हे बघा योगप्रभूजी... तुम्ही उगाच माझ्या वाक्यांच्या अर्थाचा अनर्थ करून लोकांना माझ्याविरुद्ध भडकावू नका. कंचुकीदहनाचा जसा लोकांनी गैरअर्थ काढून स्त्रीमुक्ती चळवळ बदनाम केली तसंच तुम्ही माझ्या विधानांचा गैरअर्थ काढण्याचा प्रयत्न करत आहात. जाहिरातीचंच बोलणं चाललंय तर तुम्ही जाहिराती पाहिलेल्या नाहीत का, टॉइंग का मामला है वगैरे? जर सरकारने बायकांना नोकरी करायलाच बंदी घातली तर मग पुरुषांना टॉइंग करता येईल आणि मग न शिकलेल्या, उद्योग नसलेल्या अनेक सुंदरी तुमच्याबरोबर येतील. जर तसं झालं नाही तर मग हे सगळंच बरबाद होईल. टॉइंगही नाही, आणि त्या सुंदरी इंजिनियर होऊन तुमची नोकरी घेणार. मग कशाला तुमच्याबरोबर येतील? तुम्हाला त्या अंडरवेअरींचा काय उपयोग? जाळूनच टाका. असं म्हणायचं होतं.

In reply to by राजेश घासकडवी

गुर्जी, तुमी शिकल्याली मानसं हाय. माजा तुमच्या स्त्रीमुक्तीशी बी संबंध न्हाई आन पुरुषवर्चस्वाशी तर त्याहून न्हाई. मला काळजी अंडरवेरची हाय. 'काळोख फार झाला, पणती जपून ठेवा' आसं कुटल्याशा कवितेत म्हटलं हाय तसं आपलं मला वाटलं का ' म्हागाई लई झाली, चड्डी जपून ठिवा.' पोरांची काय आन पोरींची काय, माथी भडकावनं लई सोपं आस्तय हो. त्येच तर कारन हाय सोन्यावानी संसाराचा इस्कुट व्हायाचं. जानत्या लोकांनी चार समजुतीचं शब्द सांगून पानी व्हातं करायचं आस्तं. जाऊदे. जाळपोळीच्या राजकारणानं त्रास नेत्यांना व्हत न्हाई. समाजाला भोगावा लागतुया. आता स्वातंत्र्य आंदोलनात परदेशी कपड्यांची होळी केली आपल्या लोकांनी. फायदा काय? जाळलेलं कपडं गोर-गरीबास्नी दिलं असतं तर त्येवडाच दुवा मिळाला आसता त्यांचा. तवापासून का न्हाय मला आपलं वाटतं, का कापडं जाळणं ह्ये श्रीमंतांच फ्याड हाय. गरीबांनी त्यात पडू नै. :)

टू घासुगुर्जी अँड योगप्रभू. योगप्रभूंचा किमान शब्दात कमाल संदेश देणारा प्रतिसाद पाहून फुटलो,मेलो,पडलोय खाली.

धागाकर्ते श्री. युयुत्सु ह्यांनी धागा सुरु करून नंतरच्या चर्चेत ते कुठेच दिसत नाहिएत. असं का होत असावं? एखादा धागा सुरु करून तो सुरु केल्याबरोबर त्यातील धागाकर्त्याचे स्वारस्य लोप पावावे ह्याचे सखेद आश्चर्य वाटते. तसेच, धाग्याच्या शेवटास 'महाराष्ट्रात स्त्रीमुक्तीचा नविन अध्याय सुरु होईल' ह्या विधानात कौतुक दडलेले आहे की भिती? हे कळत नाही. स्रियांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील जागा अडवल्या म्हणून पुरुषांच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो आहे हा धडधडीत कांगावा आहे. दहावी-बारावीचे जे निकाल जाहीर होतात त्यात टक्केवारी कमविण्यात मुलांपेक्षा मुलींनीच आघाडी घेतल्याचे गेल्या काही वर्षात दिसून येत आहे. कॉलेजच्या कुठल्याहि पाठ्यक्रमात प्रवेश घेताना ह्या टक्केवारीलाच महत्त्व असल्या कारणाने जास्त टक्केवारी कमाविणार्‍या मुली, जास्त मानाच्या समजल्या जाणार्‍या अभियांत्रिकी अभ्यासक्रमात जास्त टक्क्यांनी प्रवेश मिळवितात. ह्या न्याय्य प्रक्रियेवर मुलांना आक्षेप असेल तर त्यांनी जास्त अभ्यास करून टक्केवारीत मुलींना मागे टाकावे आणि अभियांत्रिकीच्या सर्व जागा अडवाव्या. त्यांना कोणी अडविले आहे का? अभियांत्रिकी पदवी घेऊन त्याच क्षेत्रात काम करणार्‍या बहुसंख्य स्त्रिया स्वबळावर पुढे आलेल्या आहेत त्या बद्दल पोटदुखी नसावी. ज्या स्त्रिया अभियांत्रिकी पदवी घेऊन नोकरी व्यवसाय करीत नाहीत त्यांना बहुतेक वेळा त्यांच्या सासरच्यांनी नोकरी करण्यास मज्जाव केलेला असतो. त्यात नवरा आलाच. म्हणजे पुरुषच त्यांना नोकरी करू देत नसेल तर इतर पुरुषांनी अशा स्त्रिया पदवी घेऊन घरकाम करीत बसतात असे म्हणणे म्हणजे दुटप्पीपणा आहे. अशा पुरुषांनी 'त्या' पुरुषास आपल्या, अभियांत्रिकी पदवीधारक, पत्नीला घरी बसवून ठेवले ह्या बद्दल खडे बोल सुनविले पाहिजेत. त्यांच्या त्या कृत्यामुळे एक अभियांत्रिकी जागा फुकट गेली असे म्हणावे लागेल. त्या स्त्रिमुळे नाही. ती स्वेच्छेने घरकामात रमलेली नसते. अभियांत्रिकी पदवी घेऊन भलत्याच क्षेत्रात काम करणार्‍या तिघा पुरुषांना मी स्वतः ओळखतो. एकाचा, स्त्रियांची अंतर्वस्त्र (ब्रा) बनविण्याचा, कारखाना आहे. दुसरा, स्टेशनरी विकायचा आणि तिसरा उपहारगृहाच्या काउंटरला उभा असायचा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अभियांत्रिकी हा एकमेव मार्ग नाही. आज, विविध अभ्यासक्रमांच्या जाहिराती पाहता आजच्या मुलांना यशस्वी होण्यासाठी अनेक सन्माननिय अभ्यासक्रम/मार्ग उपलब्ध आहेत. वर चर्चेत हिरीरीने भाग घेतलेल्या सदस्यांपुढे माझे ह्या विषयावरिल ज्ञान बरेच तोकडे आहे. परंतु, जे मी पाहिले आहे आणि जे माझ्या विचारांना पटले आहे असे मुद्दे मी मांडले आहेत. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण तुमचे विचार इथे काही लोकांना कळतील तरी का हा प्रश्नच आहे.. मुळात स्त्री मुक्ती ही संकल्पनाच फोल आहे... प्रत्येक व्यक्ती "मुक्त" च असतो... असं जोवर त्यानी स्वतः मान्य केलेलं असतं... त्यासाठी दुसर्या कुणाच्या अनुमतीची गरजच काय? त्यामुळे स्त्री ने काय करावं, काय शिकावं, घरी बसावं की नोकरी करावी हा त्या त्या स्त्री चा प्रश्न आहे.. तिची इच्छा आहे... त्यावर इतर कुणी चर्चा का करावी? करायचच असेल काही तर नवरा बायकोनी मिळुन आपली गरज ओळखुन काय ते ठरवावे.. मी अशी अनेक घरं पाहिली आहेत जिथे बायकोला उत्तम पद मिळत आहे पण नवर्याचे कुठेही बस्तान बसत नाहीये म्हणुन नवरा घरातील सर्व पाहतो, बायकोची जिथे बदली होइल तिथे कुटुंब जाते... मी असेही घर पाहिले आहे जिथे बाइने आकशवाणी मधील मोठे पद सोडले केवळ नवरा म्हण्तो म्हणुन..मुलांची आबाळ होउ नये म्हणुन्..आणि काही वर्षानी मुले मोठी होउन दुसरी कडे शिक्षणा साठी निघुन गेली, तिला घरकामची अशी आवड नव्हतीच... अता ती कंटाळुन घरात अस्ते..लहान सहान उद्योग करते पण आपण फार मोठी संधी सोडली ह्याची रुखरुख कायम दिसते.. कारण मनापासुन तिला आकशवाणी चे काम आवडायचं... स्त्री म्हणजे घरकाम आहे पुरुष म्हणजे बाहेरची कामं हे जर समीकरण डोक्यातुन काढुन टाकलं तर स्त्रियांची प्रगती पचवणं जड जाणार नाही!!

In reply to by पिलीयन रायडर

पण तुमचे विचार इथे काही लोकांना कळतील तरी का हा प्रश्नच आहे.. हेच म्हणायला आले होते. बाकी एक किडा डोक्यात वळवळतोय.;) त्या मालिकेतल्या मुली आईत जो संवाद झाला तो त्यांच्या मनीचा नक्कीच नसणार. संवाद लेखकानं/लेखिकेनं जे लिहून दिलय तेच त्या बोलणार. युयुत्सु, मुलीला नानाची टांग म्हणजे काय हे खरं खरं सांगा. काही दिवसांनी ती चुकीच्या ठिकाणी हा 'वाक््प्रचार' ;)वापरून बसली तर गैरसमज व्हायचे.

In reply to by प्रभाकर पेठकर

एखादा धागा सुरु करून तो सुरु केल्याबरोबर त्यातील धागाकर्त्याचे स्वारस्य लोप पावावे ह्याचे सखेद आश्चर्य वाटते.
मी चर्चा बारकाईने वाचतोय, पण "सासूच्या नानाची टांग" याचा अर्थ माझ्या मुलीला काय समजावून देऊ याचे उत्तर मात्र अजून मिळाले नाही.

In reply to by युयुत्सु

नुसती "नानाची टांग" ह्याचा अर्थ कळला तरी "सासूच्या नानाची टांग" ह्याचा अर्थ कळू शकेल. उदा:- जर लहान पोरगी भूताला घाबरत असेल तर तिला म्हणावे, "घाबरू नकोस ग चिमे, धीटपणे उभी रहा.भूतच तुला घाबरून पळेल बघ. भुताच्या नानाची टांग". किंवा कुणी अनावश्यक वादग्रस्त धागे काढून पुन्हा पुन्हा नाही ते वाद घालायला उचकवत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावे आणि म्हणावे "तुला हवा असलेला वाद तुझ्या सोयीने घालित बसत नाय ज्जा.तुझ्या नानाची टांग."

In reply to by युयुत्सु

"http://www.misalpav.com/node/19803#comment-353678" तुम्हाला पटो अथवा न पटो इथे (वरील लिंक) उत्तर दिले आहे. परंतु, तुमच्या अपेक्षित मार्गावर (मुलीला उत्तर काय देऊ?) चर्चा न राहता भरकटत गेली तर मध्ये मध्ये उपस्थिती लावून चर्चा योग्य त्या मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न आपण केल्याचे दिसत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

....ज्या स्त्रिया अभियांत्रिकी पदवी घेऊन नोकरी व्यवसाय करीत नाहीत त्यांना बहुतेक वेळा त्यांच्या सासरच्यांनी नोकरी करण्यास मज्जाव केलेला असतो. त्यात नवरा आलाच....
हा हा. म्हणजे जगात साधारण ५०% स्त्रिया व ५०% पुरुष आहेत. स्त्रिया कुठलीतरी गोष्ट करू शकत नसतील तर त्याला काही कारणं (जबाबदार व्यक्ती) असतील. त्या कारणांनाही काही कारणं असतील. ही साखळी, पुरुष मध्ये आला की थांबवायची आणि पुरुषांच्या नावाने गळे काढायचे! बाकी हा धागा मौजमजा म्हणुनच घेतला आहे हे सांगायलाच पाहिजे का? :) बाकी युयुत्सुराव तुम आगे बढो हम तुमारे पिछे हयच..

In reply to by दादा कोंडके

स्त्रिया कुठलीतरी गोष्ट करू शकत नसतील तर त्याला काही कारणं (जबाबदार व्यक्ती) असतील. त्या कारणांनाही काही कारणं असतील. ही साखळी, पुरुष मध्ये आला की थांबवायची आपल्याला लागेल तो अर्थ काढण्याचे आपले स्वातंत्र्य अबाधित आहे.

'आपल्याला(च) तेवढी किती अक्कल आहे' हे दाखवण्याची स्पर्धा एका धाग्यावर सुरु असल्याचे कळाले, म्हणून डोकावल्या गेले आहे. छान छान.. धाग्यावर पसरलेल्या अगाध ज्ञानाच्या प्रकाशाने ड्वाले दिपले आमचे. अज्ञानी परा

त्यानुसार विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरुष जास्त आत्महत्या करतात हे निर्विवाद सिद्ध झाले आहे. या चे मुख्य कारण आहे : विवाहीत पुरुषाना पत्नी असते . विवाहीत स्त्रीयाना पत्नी नसते "

काय मुद्दा होता ते पाहण्यासाठी वरखाली प्रचंड स्क्रोलास्क्रोली करत आहे.. रॉकस्टार बघतानाही इतकी ओढाताण झाली नव्हती.. काय ते कळेपर्यंत शतकाचा हौद भरण्यासाठी आमचेही हे प्रतिसादरुपी पळीभर दूध..

सूशीक्षित थरामधील कूटूंबात बायको नोकरी करते म्हणून नवरा घरात बसत नाही तर तो ही कमावता असतो. परीणामी दूसर्‍या कूटूंबातील कर्त्या पूरूषाचा नोकरीचा हक्क डावलला जातो.
पुरुषांनी घरातली कामं करावीत न मग
भारतात स्त्रियांना नोकरी करण्यावर कायद्याने बंदी आणली पाहीजे
तुमच्यात आत्मा तर नाहीच . अक्कल हि शुन्य असल्याचं दाखवून दिलंत . अहो किती जळाल स्त्रियांवर . त्यापेक्षा स्वताच्या कर्तुत्वावर नोकर्या मिळवा न

बायकोच्या पणजोबांची तंगडी हे शीर्षक लेखासाठी वापरल्याने घरातच तंगडी तोडली जाण्याची शक्यता आहे. तरी सावध रहा.

चुकीच्या धर्मात जन्म घेतला,भोगा त्याची फळे. धर्म बदलावा आणि महामुघल मंत्राचा जप करावा. अकबराय विद्महे औरंगजेबाय धीमही तन्नो मुघलः प्रचोदयात बायकोच कशाला , सासूही सरळ होईल.

काय ठरलं मग? ;) हे शंभरीसाठी उगाच्च. :) धागा नेमका काय आहे ते पुनर्वाचनाशिवाय समजायचं नाही. किंवा चावून (अक्षरक्रम हुकला काय? ) पण समजणार नाही.