Skip to main content

मुलगी का नको?

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 16/08/2011 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला. मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते.पण समाजाचा मुलीबद्दल असलेला दृष्टीकोन लक्षात घेताना काही गोष्टी लक्षात येतात. ० मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो. ० मुलगी नवर्‍याचा वंश वाढवते - एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन लोकांच्या दू:खाची नेमकी कारणे हीच आहेत. एकुलती एक मुले वाढवणे जसजसे अनिवार्य होणार तसे सध्याची समाजाची मानसिकता या समस्या जास्त गंभीर बनवणार. या दोनही समस्यांची "समाधानकारक" उत्तरे समाजाला मिळत नाहीत तो पर्यंत मुलींबद्दल समाजात आकस राहणार. टीप : ही जाहीरात नाही!

वाचने 50743
प्रतिक्रिया 171

प्रतिक्रिया

In reply to by आत्मशून्य

आता या दोघींचा परस्परसंबंध काय? माझ्या माहितीत या दोन्ही स्त्रिया स्वतःला हवे तेच कपडे घालतात, जगाची काय फॅशन आहे याचा विचार (निदान जाहीरपणे) करत नाहीत. काँडी राईस तिला शोभेल ते कपडे घालतात आणि राखी सावंतही! काँडी राईसची प्रतिमा त्यांच्या कपड्यांमुळे निर्माण झालेली नाही, राखी सावंतला इंदिरा गांधींच्या फॅशनचे कपडे घातले तर ती राखी सावंत रहाणार नाही. त्यामुळे या दोघींची कपड्यांवरून तुलना करण्याचं कारण समजलं नाही. शिवाय जगातल्या बहुसंख्य स्त्रिया राखी सावंत आणि/किंवा काँडी राईस यांच्याएवढ्या प्रसिद्धही नाहीत. त्यातूनही काँडी राईस यांनी घरच्यांबरोबर पोहायला जाताना काय कपडे घालावेत हा त्यांचाच प्रश्न आहे. राखी सावंत घालते तेवढेच कपडे घालूनही सुसंस्कृत दिसणार्‍या अनेक स्त्रिया मी तरी पाहिलेल्या आहेत. तुम्ही पाहिलेल्या नसतील तर ती माझी पंचाईत नाही. माझ्या आजूबाजूच्या इतर सर्व स्त्रियांनी काय कपडे घातले आहेत यावरून मी माझे कपडे ठरवत नाही. ऋतू, बजेट, त्या-त्या वेळेस करण्याची कामं यावरून मी माझे कपडे ठरवते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

देवा देवा देवा... इथे मुली लोकांना का नकोशा झाल्या आहेत या विषयावर गंभीर चर्चा होत असताना काहींना मात्र कपडयांच्या फ्याशनची पडली आहे... इथेच तर इंडया मार खाते ;)

In reply to by धन्या

@३_१४ विक्षिप्त अदिती
आता या दोघींचा परस्परसंबंध काय? माझ्या माहितीत या दोन्ही स्त्रिया स्वतःला हवे तेच कपडे घालतात, जगाची काय फॅशन आहे याचा विचार (निदान जाहीरपणे) करत नाहीत. काँडी राईस तिला शोभेल ते कपडे घालतात आणि राखी सावंतही! काँडी राईसची प्रतिमा त्यांच्या कपड्यांमुळे निर्माण झालेली नाही, राखी सावंतला इंदिरा गांधींच्या फॅशनचे कपडे घातले तर ती राखी सावंत रहाणार नाही. त्यामुळे या दोघींची कपड्यांवरून तुलना करण्याचं कारण समजलं नाही. शिवाय जगातल्या बहुसंख्य स्त्रिया राखी सावंत आणि/किंवा काँडी राईस यांच्याएवढ्या प्रसिद्धही नाहीत. त्यातूनही काँडी राईस यांनी घरच्यांबरोबर पोहायला जाताना काय कपडे घालावेत हा त्यांचाच प्रश्न आहे. राखी सावंत घालते तेवढेच कपडे घालूनही सुसंस्कृत दिसणार्‍या अनेक स्त्रिया मी तरी पाहिलेल्या आहेत. तुम्ही पाहिलेल्या नसतील तर ती माझी पंचाईत नाही. माझ्या आजूबाजूच्या इतर सर्व स्त्रियांनी काय कपडे घातले आहेत यावरून मी माझे कपडे ठरवत नाही. ऋतू, बजेट, त्या-त्या वेळेस करण्याची कामं यावरून मी माझे कपडे ठरवते.
- अहो काकू, इथे मूद्दा तूम्ही कोणते कपडे घालता हा नाहीच आहे. आता स्पामधे मी सूध्दा काय कूर्ताघालून बसत नाही. तेव्हां कूठे काय घालयच तारतम्य तूम्हाला, राखी सावंतला, काँडीला अथवा इतर कोणाला नाही असं मी म्हणालोच नाय. आता हीना रब्बानीच उदा. घ्या, कीती मॅनर्स पाळणारी व्यक्ती वाटते ? म्हणून काय सर्व स्त्रीयांनी बूरखा घालूनच वावरायचं असा मोर्चा काढला तर मी काय त्याला पाठींबा देऊ म्हणता ? किव्हां उद्या मी केवळ जॉकी घालून स्टडवॉक आयोजीत केला तर बलात्कारांचे प्रमाण वाढेल म्हणता का ? अर्थातच नाही, स्टडवॉकचा त्याच्याशी काही संबंधच नाही. जसं की स्ल्टवॉकचाही बलात्कार घडण्या न घडण्याशी काही संबंध आहे. मग कशाला समर्थन करताय या बेशर्मी मोर्चांच ?

In reply to by आत्मशून्य

मग तोच तर मुद्दा आहे ना! त्या Michael Sanguinetti या कनेडीयन पोलिस शिपायाने "महिलांनी उत्तान कपडे घालणे टाळावे जेणेकरून त्यांचा लैंगिक अत्याचाराला बळी पडावं लागेल." असं* विधान केलं. त्या विधानाचा आणि मानसिकतेचा विरोध म्हणून स्लटवॉक ही कल्पना निघाली. मुद्दा हाच आहे की स्त्रियांच्या कपड्यांच्या लांबी रूंदीमुळे काही फरक पडत नाही. बलात्काराच्या विरोधात, बलात्कार्‍यांच्या विरोधात स्लटवॉक नाही, तेव्हा स्टडवॉकचा मुद्दा निकाली लागतो. तुम्हाला जे कपडे घालून फिरायचं आहे ते कपडे घालण्यास तुम्ही स्वतंत्र आहात, निदान भारतात तरी! लैंगिक अत्याचार ही काही पुरूषांमधली विकृती असते, पण म्हणून मुलगी नको हे म्हणणं रास्त आहे काय? (हा माझा मूळ मुद्दा होता.) काही पुरूषांमधे विकृती आहे म्हणून मुलगीच नको हा चोर सोडून संन्याशाला सुळी देण्यातला प्रकार आहे असं मला सुचवायचं होतं. तर काय बायकांचे कपडे, दुसर्‍यांच्या कपड्यांमुळे तुमच्यावर काय फरक पडतो, कुठून काँडी, हीना आणि राखी आल्या कोण जाणे. असो. *साधारण भाषांतर

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मागे एकदा कुठेतरी आणि कुठल्यातरी संकेतस्थळावर मी असं काहीसं लिहिलं होतं की पुरूषांच्या पोटाच्या वर, वर म्हणजे बर्‍याच वर, डोकं नावाचा एक भाग असतो. त्याने विचार करून आणि त्याला नियंत्रणात ठेवून काम केले तर स्त्रियांना लैंगिक शोषणाला बळी पडावे लागणार नाही. उत्तान कपडे घालणे एका बाजूला आणि उत्तान कपडे घातल्याने बाई आपल्याला आमंत्रण देते आहे हे एका बाजूला. केवळ बाईने उत्तान कपडे घातल्याने ती आपल्याला आमंत्रण देते आहे असे जर एखाद्याला वाटत असेल तर त्याने डोके तपासून घेणे उत्तम.

In reply to by प्रियाली

मागे एकदा कुठेतरी आणि कुठल्यातरी संकेतस्थळावर मी असं काहीसं लिहिलं होतं की पुरूषांच्या पोटाच्या वर, वर म्हणजे बर्‍याच वर, डोकं नावाचा एक भाग असतो. त्याने विचार करून आणि त्याला नियंत्रणा
बरं मग ? तो वरचा भाग स्त्रियांमधे मिसींग आहे का ? मग उगाच स्लटवॉकच समर्थन का केलं जातयं ? जर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही तर एखाद्या महाभागाने दोन शब्द बोलले तर त्यालाच चिकटून जाणीवपूर्वक बेशर्मी मोर्चा आयोजणे म्हणजे काय म्हणावे ?... आम्ही बेशरम न्हवतो पण तरीही थोडफार तशी कृती घडली की माझी आज्जि लगेच पूढील कविता म्हणत खिजवायची... "कोण आम्हा पूसणार.. आम्ही गटारात लोळणार". स्त्रियांवर अशी पाळी खरोखर आलीय का ? मग स्लटवॉकचं समर्थन कशाला ? तसचं बेशर्मी मोर्चांच समर्थन व या धाग्यामधे त्याचं आगमन हे मूलगी जन्मून मोठी झाल्यावर कोणते कपडे घालेल याच्याशी संबधीत असल्याने इथे घूसडणे म्हणजे धाग्याच्या मूळ विषयाची तिन_तेरा विक्षीप्त फजिती होय.

In reply to by आत्मशून्य

बरं मग ? तो वरचा भाग स्त्रियांमधे मिसींग आहे का ?
इथे संबंध कुठे आला स्त्रियांचा? स्त्रियांनी नियंत्रण सोडून पुरूषांवर अत्याचार केले असे कितींदा झाले?
जर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही तर एखाद्या महाभागाने दोन शब्द बोलले तर त्यालाच चिकटून जाणीवपूर्वक बेशर्मी मोर्चा आयोजणे म्हणजे काय म्हणावे ?...
चला तुम्ही स्वतःला कावळे म्हणून घेतले ते बरे झाले.
आम्ही बेशरम न्हवतो पण तरीही थोडफार तशी कृती घडली की माझी आज्जि लगेच पूढील कविता म्हणत खिजवायची... "कोण आम्हा पूसणार.. आम्ही गटारात लोळणार". स्त्रियांवर अशी पाळी खरोखर आलीय का ? मग स्लटवॉकचं समर्थन कशाला ?
मी समर्थन केल्याचे किंवा न केल्याचे दिसले का वरल्या प्रतिसादात. शांत व्हा! इतकं तापायला काय झालं?
तसचं बेशर्मी मोर्चांच समर्थन व या धाग्यामधे त्याचं आगमन हे मूलगी जन्मून मोठी झाल्यावर कोणते कपडे घालेल याच्याशी संबधीत असल्याने इथे घूसडणे म्हणजे धाग्याच्या मूळ विषयाची तिन_तेरा विक्षीप्त फजिती होय.
मुद्दे नसले की अस्लं काहीतरी बोललं जातं असं स्पष्ट दिसतंय.

In reply to by प्रियाली

इथे संबंध कुठे आला स्त्रियांचा? स्त्रियांनी नियंत्रण सोडून पुरूषांवर अत्याचार केले असे कितींदा झाले?
या विशयी स्वतंत्र धागाच काढावा लागेल. काय आहे उदाहरणांची संख्या फार मोठी आहे.
चला तुम्ही स्वतःला कावळे म्हणून घेतले ते बरे झाले.
आता आपण तूम्ही-आम्ही वर आलाच आहात तर सांगतो, अहो बरे झाले म्हणजे काय ? लोकांना बरे वाटावे अशाच कृती मी सदैव करत असतो. काही वैचारीक गोंधळ असलेले कम्यूनीस्ट मला विरोध करू शकतात, पण मला विश्वास आहे त्यांनी योग्य तो अ‍ॅटीट्यूड बाळगला तर त्यांचे सर्व गैर्समज मी सहजी दूर करू शकतो. असो आता मी जे म्हटलं व ते ऐकून तूम्हाला जे बरं वाटलं त्या अनूशंगाने गाइंनी स्वतःला कोंम्बड्या समजायच्या फंदात पडू नये वा तसं वर्तनही करायचा प्रयत्न करू नये अशी अपेक्षा जर ठेवली तर काय चूकलं असे मी म्हटले तर तूम्हाला त्याचा राग येणार नाही ना ? हो आधी विचारणा आवश्यक आहे, चर्चेमधे नंतर खंड नको.
मी समर्थन केल्याचे किंवा न केल्याचे दिसले का वरल्या प्रतिसादात. शांत व्हा! इतकं तापायला काय झालं?
तूमच्या वर नाही हो जे चूकीचं समर्थन करत आहे त्यांच्यावरचा हा सात्विक संताप आहे. बाकी आपण समर्थन करत नसाल तर आपली मूकसंमतीही नाही हे कृपया समर्थन करणार्‍यांना जरा ठणकावून सांगाल काय ? असो. जागेची जी कूचंबणा होत आहे त्या नादात मी ह्या परिच्छेदापूर्वी @३_१४ विक्षिप्त अदिती असे लिहायचे विसरलो हे आठवायलाच विसरलो, लक्षात आणूदिल्याबद्दल आभारी आहे. असो आपण हा परिच्छेद दूर्लक्शीला तरी चालेल. फक्त बशर्मी मोर्चाचा विरोध करत असाल तर तो इथे त्वरीत नोंदवा ही विनंती.
मुद्दे नसले की अस्लं काहीतरी बोललं जातं असं स्पष्ट दिसतंय.
इथे मात्र फारच चूकताय तूम्ही. मी मूद्दा अत्यंत व्यवस्थीत मांडलाय समजला नसल्यास पून्हा सांगतो, बेशर्मी मोर्चांच समर्थन व या धाग्यामधे त्याचं आगमन हे मूलगी जन्मून मोठी झाल्यावर कोणते कपडे घालेल कशी वागेल याच्याशी संबधीत असल्याने मूलीला जन्म देणापूर्वीच्या चर्चेमधील धाग्यात त्याचा असा अनावश्यक उल्लेख करणे संपूर्ण अप्रस्तूत होय. हे म्हणजे मूलगा जन्मला तर मी त्याला डॉक्टरच करेन असे बापाने आधीच ठरवण्यासारखे आहे. असली असंवेदनशीलता बाळगणार्‍यांचा मी जाहीर निषेध करतो.

In reply to by आत्मशून्य

या विशयी स्वतंत्र धागाच काढावा लागेल.
काढा की मग. नाहीतरी इथे प्रतिसाद फारच तिरपे झाल्येत. :) काढाच! माझी विनंती समजा पाहिजे असल्यास.
तूम्हाला त्याचा राग येणार नाही ना ?
मला कशाला राग यायचा? तुम्ही आधी गाई म्हणालात. कोंबड्या वगैरे समजतील हा तुमचा समज आहे माझा नाही.
बाकी आपण समर्थन करत नसाल तर आपली मूकसंमतीही नाही हे कृपया समर्थन करणार्‍यांना जरा ठणकावून सांगाल काय ?
मी समर्थन करत नाही म्हणजे माझी मूकसंमती नाही हे कशावरून? जे स्लटवॉक करू इच्छितात त्यांनी तो अवश्य करावा. माझी अजिबात ना नाही. कोणी काही केले तर माझ्या पोटात दुखत नाही.
मूलगी जन्मून मोठी झाल्यावर कोणते कपडे घालेल कशी वागेल याच्याशी संबधीत असल्याने मूलीला जन्म देणापूर्वीच्या चर्चेमधील धाग्यात त्याचा असा अनावश्यक उल्लेख करणे संपूर्ण अप्रस्तूत होय.
सदर मुद्दा मुलगी झाली तर तिच्यावर अत्याचार होतील या गृहितकापेक्षा फारच कमी अप्रस्तुत आहे असं मला वाटतं.

In reply to by प्रियाली

मी समर्थन करत नाही म्हणजे माझी मूकसंमती नाही हे कशावरून? जे स्लटवॉक करू इच्छितात त्यांनी तो अवश्य करावा. माझी अजिबात ना नाही. कोणी काही केले तर माझ्या पोटात दुखत नाही.
ओह! यू मीन यूव आर "असंवेदनशील" की ? म्हणजे जो पर्यंत आपल्या पोटात दूखत नाही तोपर्यंत आपण काही कृती करणार नाही हा म्हणजे कहरच आहे.
सदर मुद्दा मुलगी झाली तर तिच्यावर अत्याचार होतील या गृहितकापेक्षा फारच कमी अप्रस्तुत आहे असं मला वाटतं.
आपलं वाटण फार चूकीच आहे असं नम्रपणे नमूद करतो. कारण धागा बघता हा अस्थानी विषय ठरतो.

In reply to by आत्मशून्य

ओह! यू मीन यूव आर "असंवेदनशील" की ? म्हणजे जो पर्यंत आपल्या पोटात दूखत नाही तोपर्यंत आपण काही कृती करणार नाही हा म्हणजे कहरच आहे.
नव्हे. मी संवेदनशील कारण संवेदनशील प्राणी दुसर्‍याच्या हक्काचा, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा विचार करतात. उगीच फुकाचे विरोध करत नाहीत. आपलं वाटण फार चूकीच आहे असं नम्रपणे नमूद करतो. कारण धागा बघता हा अस्थानी विषय ठरतो. असं तुम्हाला वाटतंय कारण तुम्हाला तुमचं मत मांडता आलं नाही. बाकी, नवा धागा काढताय ना की तिथेही पल्टी?

In reply to by आत्मशून्य

>> आता आपण तूम्ही-आम्ही वर आलाच आहात तर सांगतो छ्या, ती प्रियाली. मी अजून एकेरीवरच आहे रे बाळ. तिरकसपणात मुद्दा हरवू नये.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काकू, हे म्हणजे स्टड्वॉक केल्यास बलात्काराचे प्रमाण वाढेल असं म्हणता काय तूम्ही ?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

.

In reply to by आत्मशून्य

वेगळा धागा काढ रे बाळ. या वयात असं उभं, जपानी लिपीसारखं वाचणं जमत नाही मला.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या वयात असं उभं, जपानी लिपीसारखं वाचणं जमत नाही मला.
काकू, "मिस ल्यूसी केहती है की इन्सान की उमर उतनी होते है जितना वो फिल करे. संदर्भ डी.डी.एल.जे."
वेगळा धागा काढ रे बाळ.
हे स्लटवॉकचा अनावश्यक विषय या धाग्यात विनाकारण घूसडण्यापूर्वी आपल्याला सूचलं असतं तर ते कीती बरं झालं असतं ?

In reply to by प्रियाली

>>पुरूषांच्या पोटाच्या वर, वर म्हणजे बर्‍याच वर, डोकं नावाचा एक भाग असतो. हे खरं आहे आणि पुरुषांना ते वापरायचंही असतं पण पोटाच्या वर आणि पोटाच्या खाली एकाच वेळी रक्तपुरवठा करणारी यंत्रणाच नसते हो. Genuine problem आहे हा पुरुषांचा. एकदा पोटाखाली रक्तपुरवठा सुरु झाला की डोकं गेलं... :) (अति ह. घ्या.)

In reply to by प्रियाली

>>>तुम्ही लग्नही करू नका, अत्याचार तर बायकोवरही होऊ शकतात ना. चला तेवढीच एक मुलगी वाचेल तुम्ही ??? काकू मला का सांगताय ?

In reply to by नर्मदेतला गोटा

अहो नर्मदेतले गोटेसाहेब, ते अत्याचार मुल्ं/पुरुषच करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं मुलींनाच असुरक्षित वाटतं....म्हणून मुलगीच नको असं कसं चालेल. तुमचं म्हणणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा झाल्या की! काय तरी दिवस आलेत.......

In reply to by रेवती

"मुलींवरचे अत्याचार, असुरक्षितता यामुळे मुलीची जबाबदारी नको वाटते " हे मी लिहिलेले मत, अनेक पालकांचे मत आहे काकू विषय मी काढला नाही, आजुबाजूच्या लोकांचा अनुभव मत मी मांडले -- उगाच बाणेदार पणा दाखवण्याची संधी घेऊ नका, उगाच घसेफोड करू नका (जसं काही माझ्याशी वैयक्तिक भाण्डणच आहे)

In reply to by नर्मदेतला गोटा

यामुळे मुलीची जबाबदारी नको वाटते " अच्छा! म्हणजे जबाबदारी नकोच असाच अर्थ आहे हो! (तुमच्या आजूबाजूवाल्यांचा) मुलगी असली की सुरक्षिततेची काळजी आणि स्वसंरक्षणाची जबाबदारी शिकवावी लागते कारण जबाबदारी नक्कोवाल्यांचे दिवटे नको ते प्रकार करणार. एकंदरीत पालकांना जबाब्दारीच नको असल्याने मुलग्यांनाही ती शिकवायचा प्रश्न येत नाही. म्हणजे बेजबाबदारपणा काय तो हवा, नियम आणि बांधिलकी हा प्रकार गेला चुलीत! मुलं नको असताना समाजासाठी जन्माला घातल्यासारखीच घातलेली असतात. त्यातून मुलगा झाला की कसं असतं ना एकच असला तरी कोणी तोंड उघडत नाहीत आणि एक मुलगी म्हटलं की अजून एक होऊन जाऊदे गं बै! असं असतं.

काल आयबिएन लोकमत वर "सुरेश जैन", सदाशिव अमरावपुरकर" हे निखिल वागळेंच्या कार्यक्रमात बोलत होते. ह्या (सं)वादात सुरेश जैन चिडले असतांना ते अमरावपुरकरांना बोल्ले "तुम्हि बांगड्या घाला!बांगड्या घाला!" अणि ते हे वाक्य सतत बोलत होते. माझा सांगायचा मुद्दा हाच आहे कि .. "बांगड्या घाला!" म्हणजे, तुम्हाला काय म्हणायच आहे, कि स्त्रिया दुबळया असतात, असं? जर् देशातले नेते लोकच असं बोलत वा समजत असतिल ह्या तर देशात स्त्रियांना नेहामि अशीच वागणुक मिळेल. (मि कुठ्ल्याहि पक्षाचा माणुस नाहिये, अणि सुरेश जैन बद्द्ल मला काहि माहित हि नाहि विषेश, पण काल त्यांच हे असं वक्त्यव्यं एकुन खुप वाइट वाटलं :( )

In reply to by उदय के'सागर

वरील अश्लाघ्य प्रकार मी पाहिला/ ऐकला आहे. विकृत माणसाप्रमाणे सुरेश जैन हे अमरापूरकरांना बांगड्या भरा असे तळतळून सांगत होते. खरे तर अमरापूरकरांना तसे सांगायचे काही कारणच नव्हते. केवळ अपमान व्हावा असा जैन यांचा हेतू होता. हे कळत असता चॅनेलने त्यांना वॉर्निंग द्यायला हवी होती. की अशा विकृतांनाच प्रमोट करण्याचा चॅनेलचा प्रयत्न असतो माहित नाही. तशा वागळ्यांकडून फार अपेक्षाही नाहीत म्हणा.

हा प्रतिसाद आत्मशून्य ह्या सद्स्यास आहे. प्रतिसाद तिरके होऊन वाचण्यास त्रास होत आहे म्हणुन तिथेच उत्तर दिले नाही. आत्मशून्य बाळा, एखाद्या स्त्रीने काही विशिष्ठ प्रकारचे कपडे घातल्याने तिला पुरषी अत्याचाराला बळी पडावे लागले तर ह्यात दोष त्या पुरषाचाच आहे , त्याच्यात विकृती आहे हे एव्हाना तुला समजले असेल तर वर प्रियालींनी म्हटल्याप्रमाणे 'पुरूषांच्या पोटाच्या वर, वर म्हणजे बर्‍याच वर, विचार करण्यासाठी डोकं नावाचा एक भाग असतो' तो तुला आहे असे समजण्यास वाव आहे.

In reply to by पक्या

एखाद्या स्त्रीने काही विशिष्ठ प्रकारचे कपडे घातल्याने तिला पुरषी अत्याचाराला बळी पडावे लागले तर ह्यात दोष त्या पुरषाचाच आहे ,
हे मी फार आधीच मान्य केलेले वाचलेले दिसत नाही वाटतं ? बाकी तरीही मला डोकं नाही असं आपलं मत असेल तर मी त्याचा अत्यंत विनम्रतेने स्विकार करतो. अवांतर :- किंबहूना स्त्रीने काही विशिष्ठ प्रकारचे कपडे घातलेले असो अथवा नसो जर तिला शारीरीक अत्याचाराला बळी पडावं लागलं तर दोष त्या पुरषाचाच आहे अस माझं याक्षणीही मत आहे. व ते बदलायची शक्यता फार धूसर आहे.

चालू द्या जोरात

रेवती काकू आणि प्रियाली काकी माझे आभार माना आजकाल पूर्वीसारखी युद्धे लढाया नाही होत मंग आम्हाला झाशीच्या रान्या कशा बघायला भेटनार पन यानिमित्त्याने त्या बघायला भेटल्या, तुम्हाला लढाला चानस भेटला बाकी चालू द्या, अन्याव अजाबात खपवून घ्याचा नाही मेरी झांसी नही दूंगी !