Skip to main content

मंगळ सुत्र

मंगळ सुत्र

Published on 30/11/2010 - 11:07 प्रकाशित मुखपृष्ठ
काहि मुली लहान पणी गंमत म्हणून आईचे मंगळ सुत्र गळ्यात घालतात..व आई त्यांना ओरडते..व मंगळ सुत्र काढायला लावते....कारण लहान पणी असे मंगळ सुत्र घातले तर मुलिंचे लग्न उशीरा होते असा समज आहे.. या वर आपणास काय वाटते........

याद्या 11919
प्रतिक्रिया 66

मग लवकर होण्यासाठी ?आणि मुलांसाठी काय??

In reply to by लॉरी टांगटूंगकर

मुलांसाठी किंवा मूल लवकर होण्यासाठी भातुकली किंवा घर-घर खेळताना डायपर, लाळेरे वगैरे घालावे. झालंच तर एखाद्या लहानग्याच्या दुधाच्या बाटलीची बोथीही चोखण्यासाठी घ्यावी (ह. घ्या.) (बालक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

अरे येड्या ,मुल लवकर होण्यासाठी नव्हे . मुल(male)या अर्थाने वापरत होतो . आणि लग्न लवकर होण्यासाठी असे विचारत होतो. वेड्यासारखे हसणारा

>मूल लवकर होण्यासाठी भातुकली किंवा घर-घर खेळताना डायपर, लाळेरे वगैरे घालावे संदर्भासकट स्पष्टीकरण द्यावे.

In reply to by नरेशकुमार

मला विनोद समजला हे दाखवण्याचा मी क्षीण प्रयत्न केला. तुम्हाला नसेल समजला तर हसू नका, किंवा दाखवण्यापुरते हसा किंवा कसेही*! *श्रेयअव्हेर: मेघना

असं काहिहि नाहिये.. मोलाचा दागिना..आणि त्यात सौभाग्यालंकार्...तो लहान मुलींकडुन खेळता खेळता तुटला जाउ नये..किंवा हरवला जाऊ नये..म्हणुन घालुन दिले जात नसावे..आणि मग त्यामागे उगाचच काहितरी कार्यकारणभाव लावायचा म्हणुन हे लग्न उशिरा होत वगैरे असाव!...

In reply to by सूर्यपुत्र

हो ना !! दुसरं लग्न प्लॅन केलं असलं एखादीनं, तर त्याला उगाच नाट लागू नये म्हणून लग्न झालं तरी घालत नसाव्यात बहुधा.

In reply to by सूर्यपुत्र

मंगळसूत्र घालणे म्हणजे संकट
आज मंगळसूत्र घालणे संकट वाटतंय उद्या बांगड्या घालणे, नथ घालणे, पैजण घालणे, हे घालणे, ते घालणे, काहिहि घालणे म्हणजे संकटच वाटेल की !

In reply to by नरेशकुमार

उद्या बांगड्या घालणे, नथ घालणे, पैजण घालणे, हे घालणे, ते घालणे, काहिहि घालणे म्हणजे संकटच वाटेल की !
नथ उतरवणे हे देखील बर्‍याच लोकांना संकटाचे जाते असे मिपावरील जेष्ठ जाणकार म्हणतात.

In reply to by सूर्यपुत्र

दमा असलेल्यांनी नको तिकडे नाके खुपसावीत का?

In reply to by विनायक प्रभू

>>दमा असलेल्यांनी नको तिकडे नाके खुपसावीत का? अवश्य. पण तत्पूर्वी "नथ उतरवणे " (नथीचा अडथळा होतो म्हणून ) आवश्यक असावे..

In reply to by विनायक प्रभू

पूजेच्या पथ्यात सांगितल्याप्रमाणे पूजा सुरू करण्यापुर्वीच्या व पूजा करतानाही करावयाच्या आचमनांत नथीचा अडथळा होतो म्हणून नथ उतरवावी लागते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>>नथ उतरवणे हे देखील बर्‍याच लोकांना संकटाचे जाते असे मिपावरील जेष्ठ जाणकार म्हणतात. नथ उतरवण्याची बोली तगडी असते बाप्पा ! लाला खेमचंद (शिमेट के ब्यापारी)

In reply to by परिकथेतील राजकुमार

आघाडीवर लढण्याची सवय असणार्‍याने असे नथीतून तीर मारण्याचे काय कारण आहे ? हा कुणाच्यातरी दम्बाजीचा परिपाक दिसतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

आघाडीवर लढण्याची सवय असणार्‍याने असे नथीतून तीर मारण्याचे काय कारण आहे ? हा कुणाच्यातरी दम्बाजीचा परिपाक दिसतो.
जौ दे भौ, नका मेंदूला शिणवु. आघाडीवर लढणे आणि जी-टॉकवर लेस्बियन असल्याचे सांगत चाट करणे ह्यात खुप फरक आहे :)

उद्या बांगड्या घालणे, नथ घालणे, पैजण घालणे, हे घालणे, ते घालणे, काहिहि घालणे म्हणजे संकटच वाटेल की ! उद्याचा काय बोलताय राव....... हे सगळं आधीच सोडलं होत.... शेवटचा number मंगळसूत्राचा होता

एखाद्याचा केवढा पचका होऊ शकतो... उदा. : जिच्यासाठी --- "राबलो" तिचे लग्न झाल्याला --- वर्षे झाली आहेत हे जेव्हा कळते.... (--- च्या जागी आपल्याला हवा तो time-frame)

In reply to by सूर्यपुत्र

जिच्यासाठी --- "राबलो" तिचे लग्न झाल्याला --- वर्षे झाली आहेत हे जेव्हा कळते....
कोणाला कशाचं तर ध्येयहीनांना मंगळसूत्राचं!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

घेतलं, घेतलं..... अति झालं आणि हसू आलं... म्हणून चांगलच हसून घेतलं....

असते बाबा कुणाकुणाला घाई त्याला काय करणार?

मुलीचे लग्न "लवकर" होणे हे तिच्या सौंदर्यावर अवलंबून असून ते दुर्दैवाने नसल्यास मंगळसूत्रघालण्याचे टाळले काय किंवा त्याउलट बापाचे जानवे घातले काय, लवकर लग्न होणार नाही.

In reply to by गवि

असं नाय काय. ती बिच्चारी ऐश्वर्या राय बघा. ३४व्या वर्षी लग्न झाले तिचे. झाले तेव्हा पण किती कटकटी निर्माण झाल्या होत्या माहिती आहे ना? तिने बहुधा आईचे मंगळसुत्र आणि वडिलांचे जानवे दोन्ही घातले असावे लहानपणी.

In reply to by मृत्युन्जय

लग्नाआधी आईचे मंगळसुत्र , मुंजीआधी वडिलांचे जानवे घातले असावे. त्यात तो ग्रह, म्हणून लग्नाच्या बाबतीत (टंगळ) मंगळ झाले असावे. फारच त्रांगडं....

In reply to by मृत्युन्जय

तिने बहुधा आईचे मंगळसुत्र आणि वडिलांचे जानवे दोन्ही घातले असावे लहानपणी. आणि तरूणपणी सलमान आणि विवेक ओबेरॉय यांचे जानवे घातले असावे..

In reply to by गवि

सलमान कधीही शर्ट घालत नसल्याने आणि घातलाच तर क्षणोक्षणी काढत असल्यामुळे जानवे उघड दिसायला हवे होते नाही का? त्याचे जानवे जर ऐश्वर्याने घातले असेल तर ते कसे काय दिसणार..?

In reply to by योगी९००

सलमान आणि जानवे?????? >>त्याचे जानवे जर ऐश्वर्याने घातले असेल तर ते कसे काय दिसणार..? नाहीच दिसणार, कारण ऐश्वर्याने जानवे घातलेलेच नाहीये..

काहि मुली लहान पणी गंमत म्हणून आईचे मंगळ सुत्र गळ्यात घालतात..व आई त्यांना ओरडते या वाक्यावरुन काही प्रश्न पडतात. मुळात आईने म॑गळसुत्र का काढले?तिने काढल्याशिवाय मुलगी घालणार नाही. आईला म॑गळसुत्राचा एवढा बोजा वाटतो का? आपली जी गत झाली ती मुलीची होउ नये म्हणून रागावते का? येवढेच नव्हे तर काही स्त्रिया॑ना सहज चाळा म्हणून म॑गळसुत्र ओठात धरण्याची सवय असते. ते पाहून वाटते- म॑गळसुत्र धरुन मुखी रुबाब कोणा महिलेचा वाटे हि॑स्त्र श्वापदाच्या मुखी घास गरीब प्राण्याचा!!

In reply to by kamalakant samant

म॑गळसुत्र धरुन मुखी रुबाब कोणा महिलेचा वाटे हि॑स्त्र श्वापदाच्या मुखी घास गरीब प्राण्याचा!!> पाशवीपणाची हद्द हो अगदी! ;-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

अरे वा!!! तुम्ही तुमच्या नानुडीला सकाळी सकाळी ब्रेकफास्टसुद्धा बनवून देता? छान हो..