Skip to main content

दिवाळी अंक २०२४ - गावातील घर

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

किती दिवसांनंतर, महिन्यांनंतर, वर्षांनंतर उमटलीत माझी पावलं गावच्या मातीवर जिथे बहरलेलं असतं माझं बालपण वसलेल्या असतात आठवणी इथल्या कणाकणात. पण हा गाव आज ओळख दाखवत नाही. येऊन उभा राहतो घरासमोर तुटू पाहणाऱ्या वाश्याला बांबूचा आधार घेऊन उभं असलेलं घर पाहून आठवतो कमरेत वाकलेला बाप हातात काठीचा आधार घेऊन उभा असलेला....

दिवाळी अंक २०२४ - मेन विल बी मेन...

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मेन विल बी मेन वटपौर्णिमा, आतून आवाज आला, पूजा करू का? ऐकताच पोटात गोळा आला त्याचं काय आहे, म्हणत असाल तर बुकिंग करते नाहीतर मी बापडी दुसरा गडी शोधते. राहू दे, मीच करतो पूजा, मीच तुला मागतो कशाला गुडघ्यांना त्रास, मनात मांडे भाजू लागतो, हळद, कुंकू, बुक्का, पूजेची थाळी सजते, तेरड्यासोबत चार आंब्यांची वर्णी लागते. वड...

दिवाळी अंक २०२४ - फटाके, काही फुसके, काही?

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

सैनिक असल्यामुळे मला फक्त एवढेच माहीत होते, Do or die, soldier never ask why! कवी अल्फ्रेड लाॅर्ड टेनिसन यांच्या 'द चार्ज ऑफ द लाइट ब्रिगेड'वर अधारित या प्रसिद्ध ओळी आजही सैन्यात प्रचलित आहेत. The Charge of the Light Brigade 'Theirs not to reason why, theirs but to do and die.' The poem tells of the famous and brutal...

दिवाळी अंक २०२४ - भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास

लेखक भटकीभिंगरी यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास देवादिकांमध्ये श्रीकृष्ण हे सर्वजनांत अतिशय प्रिय असे दैवत आहे. अर्जुनाचा परममित्र, आपल्या लाडक्या बहिणीचा - सुभद्रेचा अर्जुनाशी विवाह करणारा भाऊ, सुदामा या गरीब ब्राह्मणाचा मित्र, संकटात द्रौपदीच्या कायम पाठीशी असणारा तिचा सखा, नरकासुराच्या तुरुंगातून हजारो स्त्रियांना मुक्त करून...

दिवाळी अंक २०२४ - गातंया एक मन

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

गातंया एक मन काय देखलं भोगलं आलं खपली होऊन बघ एकदा येऊन कोण गातंया कुठून? बसलेला कोण एक गावापल्याड माळावर गवतात कुसळांत काळ्या काळ्या शिळंवर जिथं लाविलं जिवाला दगा दिला त्या जिवानं त्यानं पिळलं काळीज गळ्यातून गळलं सोनं रान कामात गुतलं पाखरं भिरी पिकावर मोट हाकी एक गडी बैलजोडी हिरीवर गर्दी तिथंच करून पोरं पव्हती...

दिवाळी अंक २०२४ - कमान ओलांडून अठरावी

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

कमान ओलांडून अठरावी अधीर आलो अनंग(§)-देशी इथल्या अणु-रेणूवर अविरत प्रथम-रसाची(#) झाक जराशी पर्वत इथले अवघड, दुस्तर घळीत त्यांच्या नजर न ठरते चेटूक त्यांचे नजरबंदीचे स्वप्नातही ना पाठ सोडते गुहा निसरड्या, फसव्या इथल्या दुर्लभ अतिशय त्यांचे दर्शन गारूड गूढाचे पण त्यांच्या पंचप्राणा छळते निशिदिन अनंगदेशी एक उमजले नाद...