मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२४ - कमान ओलांडून अठरावी

अनन्त्_यात्री · · दिवाळी अंक
कमान ओलांडून अठरावी अधीर आलो अनंग(§)-देशी इथल्या अणु-रेणूवर अविरत प्रथम-रसाची(#) झाक जराशी पर्वत इथले अवघड, दुस्तर घळीत त्यांच्या नजर न ठरते चेटूक त्यांचे नजरबंदीचे स्वप्नातही ना पाठ सोडते गुहा निसरड्या, फसव्या इथल्या दुर्लभ अतिशय त्यांचे दर्शन गारूड गूढाचे पण त्यांच्या पंचप्राणा छळते निशिदिन अनंगदेशी एक उमजले नाद खुळा पर्वत कुहरांचा हात अपुला जगन्नाथ - जो मुठीत दे अनुभव तुष्टीचा :) ================= (§): अनंग = मदन (#): नवरसांतील प्रथम रस = शृंगाररस

वाचन 2270 प्रतिक्रिया 0