मी पाहिलेले मस्कत - भाग १ - सलालाह
गेली ३२ वर्षे मी व्यवसायानिमित्त सल्तनत ऑफ ओमान उर्फ मस्कत येथे राहातो आहे. ह्या वास्तव्यात ह्या देशाच्या नयनरम्य प्रदेशांचे दर्शन घेतले आहे. त्यावरच एक लेखमाला लिहावी अशा विचाराने आज कळफलक बडवायला घेतला आहे.
भारताच्या पश्चिमेस १६०० कि.मी. वर आणि दुबईपासून ३५०-४०० कि.मी. अंतरावर अरबस्थानात हा देश आहे. 'मस्कत' हे ह्याचे पूर्वापार आणि रुढ नांव असले तरी कागदोपत्री 'सल्तनत ऑफ ओमान' हे नांव आहे. संक्षिप्तपणे ह्याला 'ओमान' असेही म्हणतात. 'ओमान' (मस्कत)च्या सीमा उत्तरेस युएई (दुबई), पश्चिमेस सौदी अरेबिया आणि दक्षिणेस येमेन ह्या देशांना जुळलेल्या आहेत. एकेकाळच्या रखरखीत वाळवंटात मनुष्यनिर्मित निसर्ग खूप आहे. ओमानची राजधानी मस्कत आहे. पूर्वीच्या काळी मस्कतच्या दक्षिणेस असलेले 'सलालाह' हे शहर देशाची (मस्कतची) राजधानी होते. परंतु, सध्याच्या राजाने राज्यभार स्विकारल्यावर (१९७०) आपली राजधानी 'मस्कत' ह्या शहरी केली. लोकसंख्येच्या दृष्टीने 'मस्कत' क्रमांक १ वर आहे तर 'सलालाह' क्रमांक २ वर. संपूर्ण देशभर वाळवंटी रखरखाट असला तरी मधे मधे 'ओअॅसिस' म्हणजे गोड्यापाण्याचे साठे आहेत. बहुतेक अशा पाण्याच्या साठ्यांच्या अवतीभवती शहरं वसली आहेत. परंतु ह्याला अपवाद 'सलालाह' हे शहर. इथे हिरवा निसर्ग आणि गोडे पाणी तुरळक नाही तर, मुबलक प्रमाणात आणि सर्वत्र आढळते. त्याचे कारण म्हणजे ह्या एकमेव प्रदेशाला लाभलेले 'पावसाळा' ह्या ऋतुचे वरदान. सलालाहचे ऐतिहासिक महत्व आणि राजाचे जन्मगाव म्हणून आपण आपल्या मालिकेची सुरुवात 'सलालाह' पासून करीत आहोत.
सलालाह विमानतळाबाहेर पडल्या पडल्या नजरेस पडणारा आखीवरेखीव हमरस्ता







आज बकरीईदच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी आहे आणि म्हणून बोटी समुद्रात गेल्या नाहीत.









दिवाळी अंक वर्ष
वाचने
10393
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
खरच नयनरम्य !
खरच नयनरम्य !
छान सचित्र वर्णन.
मी काम करतोय त्या शापूरजी पालनजी कंपनीने ओमानच्या राजाचा राजवाडा ७१ च्या आसपास बांधलाय.
कधीतरी फिरायला यायला नक्की आवडेल. :)
जबराट वर्णन!!! चित्रे अन माहिती दोन्हीही मस्त. हिरवाई टिप्पिकल कोंकणी-केरळी छाप वाटतेय. :)
अगदी इस्पिक एक्का करतात तस्सेच परफेक्ट!
जुन्या आठवणी ताज्या केल्यात राव ! सलालाहमध्ये पावसाळ्यात जरूर जा, तो एक वेगळाच अनुभव आहे. पहिल्यांदा सलालाहला गेलो तेव्हा मित्राने फिरत फिरत गाडी हाफा विभागात नेली आणि केरळमध्ये असल्याचा भास झाला ! त्याकाळी (१९८२) तेथे परदेशी लोकांत मल्याळी लोक बहुसंख्य होते आणि तसेच लुंगी-बनियनमध्ये फिरत होते, ते बघून तर केरळमध्येच गेल्याची खात्री पटली होती ;) बाजारातही काउंटरवर मल्याळीच जास्तकरून होते... "मल्याळीमध्ये बोलले तर जास्त डिसकाऊंट, हिंदिवाल्याला बरा डिसकाऊंट तर अरबीत बोलले तर नो डिसकाउंट" असा एक विनोद त्यावेळेस सांगितला जायचा. नंतर काही वर्षांनी सतत साडेचार वर्षे राहायचा योग आला. तिथल्या महाराष्ट्र मंडळात आणि इंडियन क्लबमध्ये धमाल मजा केलेली आठवली.
आजही सलालाह म्हटले की काय वाटते हे वर इतके लिहीले यावरून समजले असेलच ! आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद !
In reply to मस्त ! by डॉ सुहास म्हात्रे
ऐंशीच्या दशकात सलालाह मराठी मंडळात आणि मराठी हस्तलिखितात 'देव कुटुंबा'चे वर्चस्व होते. मेहनती कुटुंब होते. मला तेवढे एकच नांव लक्षात आहे.
त्या नंतर सलालाह बरेच बदलले आहे.
In reply to जुने सलालाह. by प्रभाकर पेठकर
१९८८ ते १९९१ या सलग काळात खुद्द सलालाह मध्ये होतो. त्यातल्या शेवटच्या दोन वर्षांत महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष होतो. चाळीस पन्नास कुटूंबे आणि अनेक एकांडे शिलेदार असा लवाजमा होता. मुख्य म्हणजे महाराष्ट्र मंडळात इतर राज्यांचेही काही कायमस्वरूपी सदस्य होते. पावसाळ्यात सगळे वातावरण थंड आणि हिरवेगार झाले की दर आठवड्याच्या सुट्टीला हमखास जवळच्या हिरव्या झालेल्या डोंगरांवर नाहीतर समुद्रकिनार्यावर सहल असायची... फोनाफोनी झाली की सहज कमीतकमी ५०-६० जण तयार असायचे. दिवाळी, गणपतीचे सण जोरात साजरे व्हायचे... सणातला एक दिवस कोणाच्या तरी टेरेसवर १००-१२० लोकांची जंगी पार्टी असायची. सणाच्या पार्टीला सगळे पारंपारिक पदार्थ मंडळातल्या गृहिणी आगत्याने नियोजन करून वाटून घेऊन घरी बनवून आणत असत. कोणत्याही सणाच्या पार्टीला विकतचे पदार्थ आणलेले गृहिणींना आवडत नसे. सगळ्यांच्या अशाच सहृदयपूर्ण वागणूकीमुळे ते दिवस अजूनही स्मरणात ताजे आहेत. इंडियन क्लबमध्येही अनेक वर्षे बस्तान ठोकून बसलेल्या मल्याळी गँगला टशन देऊन "भारतीय" पॅनेल निवडून आणले होते त्यात भाग घेतला होता ती मजा काय वेगळीच होती. एक वर्ष सांस्कृतीक सचिव होतो... सलालाह म्ह्टले की बर्याच गोष्टी आठवतात. असो.
तुमचे मस्कतचे अनुभवही वाचायची उत्सुकता आहे. तेथेही व्यतीत केलेल्या काळातील आठवणींना उजाळा मिळेल. लवकर टाका पुढचे भाग. ओमान खूप जिव्हाळ्याचा देश आहे :)
पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत....
वाळवंटातले ओअॅसिस बघून मस्त वाटले!
ट्रीप चान चान झाली. पण एक महत्वाचे स्थळ पहायचे राहिले.
पेठकर काकांचे हाटेल.
हिरवागार निसर्ग दिसला कि किति पाहु अन किति नको असं होउन जातं. नशिबवान आहात.
लेख आणि फोटो.. सर्वच छान! पुढील लेखाची वाट पहात आहे.
वाचूनच जावेसे वाटले. तिथे एवढी झाडे पाहून आश्चर्यच वाटले. धूपांच्या झाडोर्यात गंध कसा दरवळत असेल? पूर्वी व्हायोलीनच्या गजाच्या केसांना चोळत तो डिंक याच झाडांचा असतो का? आता वापरतात की नाही ठाऊक नाही.
अलीकडेच आपल्या उत्तर पूर्व राज्यांतल्या पर्यटनाबद्दल माहिती जमवीत होतो. त्रिपुराची राजधानी अगरतळा इथे `लोबान' ज्या झाडांपासून काढतात ती झाडे आहेत अशी माहिती जालावर वाचली. ते सहज आठवले.
पुभाप्र
धन्यवाद.
सचित्र वर्णन आवडले. समुद्राची निळाई अगदी छान!
छान ! लिहित राहा .
फारच छान माहीती. आता दुसरा भाग कधी?
किती मस्त वर्णन केलय हो काका तुम्ही!!! अगदी सुंदर वर्णन आनि तितकीच सुंदर छायाचित्रे!! आता पटापट पुढचा भाग येउद्या!!!
मला इतके वर्ष वाटत होते की अरब देशात समुद्र नाहीच आहे.
त्या देशात पान खायला बंदी का आहे? काही विशेष कारण आहे का?
In reply to मला इतके वर्ष वाटत होते की by त्रिवेणी
पान खायला बंदी का आहे?नक्की कारण मलाही माहित नाही. (कारण मी स्वतः पान खात नाही) पण पान खाऊन इथे-तिथे थुंकणे, त्यातून निर्माण होणारी अस्वच्छता आणि रोगराई पसरण्यास कारणीभूत ठरण्याची भिती ही कारणे असावीत असे वाटते. तरीही चोरुन पान आणि गुटखा मिळतोच आणि खाणारे शौकीनही आहेत.
पेठकर साहेब, मस्कत मालिका रंगतदार होणार यात काही वाद नाही. सलालाहचा सचित्र वर्णनासहित असलेला भाग आवडला.
खडकाच्या पोकळीत दबावाने उडणारे कारंजे, यक्षाने घोळ घातला आणि अर्धाच ठेवलेल्या राजवाड्याची कथा, निसर्गरम्य सलालाह...स्पेशलच.
-दिलीप बिरुटे
पेठकर काका, मिपा दिवाळी अंकातला हा लेख मला खुपच आवडला आहे. दिवाळी अंकात भाग १ आल्यावर भाग २ ची जवळपास २ महिने आतुरतेने वाट पहात आहे. तुमच्या सोयीनुसार पुढचा भाग २ लवकर लिहावा हि नम्र विनंती. मस्कतमध्ये कधी जायची संधी मिळेल का ते माहित नाही. पण तोपर्यंत किमान तुमच्या लिखाणामधुन तरी तो अनुभव घ्यायची ईच्छा आहे. आपल्या कामातुन वेळ काढुन कृपया मस्कत मालिका पुढे चालु करावी हि नम्र विनंती.
खरच नयनरम्य !