Skip to main content

दिवाळी अंक २०१३

खंत

लेखक पद्मश्री चित्रे यांनी रविवार, 27/10/2013 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
मैफिली सजल्या तुझ्या पण मी तिथे वळलोच नाही चांदणे खुणवीत होते चंद्र मी झालोच नाही वेदना त्या जीवघेण्या क्षीण ना कण्हलो कधी वार तू केले जिव्हारी मी तरी हरलोच नाही भोवताली गाव सारे मी तरीही एकटा तुटलो तुजसाठी असा की मी पुन्हा वसलोच नाही सागराच्या मी किनारी दूर तू क्षितिजाकडे हरवूनी बसलो तुला अन मी मला दिसलोच नाही उध्वस्त मी झालो तरीही दु:ख ना त्याचे मला खंत ही की मी तुला किंचितही कळलोच नाही

पाकातले चिरोटे

लेखक रेवती यांनी रविवार, 27/10/2013 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: तीन मोठ्या वाट्या मैदा, सहा ते सात टीस्पून्स साजुक तूप/डालडा,तीन टेबलस्पून्स् तांदूळ पिठी , कक्ष तापमानाचे पाणी, चवीपुरते मीठ, दीड मोठ्या वाट्या साखर, वेलदोडा पूड, केशर, आवडत असल्यास केशरी रंग, लिंबूरस, सजावटीसाठी उपलब्ध असलेले नट्स, तळणीसाठी तेल. कृती: प्रथम परातीत साडेतीन टीस्पून्स तूप कणी मोडेपर्यंत हाताने फेसावे. मीठ घालून फेसावे. त्यात मोजलेला मैदा घालून त्यास तूप चोळावे. मुटका वळता आला पाहिजे असे मिश्रण झाले म्हणजे थोडे थोडे पाणी घालून पोळीच्या कणकेइतपत घट्ट भिजवावे. हा मैद्याचा गोळा झाकून ठेवावा.

चंपाकळी

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 26/10/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी मैदा १/४ वाटी तेल १ टीस्पून कलौंजी १ टीस्पून कुटलेली काळीमिरी मीठ चवीप्रमाणे . पाकृ: मैद्यात कलौंजी, काळीमिरी व मीठ घालून एकत्र करावे.गरम तेलाचे मोहन घालून, पीठ घट्ट भिजवावे.भिजवलेले पीठ तासभर झाकून ठेवावे. मैदा चांगला मळून घ्यावा व त्याचे छोटे-छोटे गोळे तयार

मी पाहिलेले मस्कत - भाग १ - सलालाह

लेखक प्रभाकर पेठकर यांनी शनिवार, 26/10/2013 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
गेली ३२ वर्षे मी व्यवसायानिमित्त सल्तनत ऑफ ओमान उर्फ मस्कत येथे राहातो आहे. ह्या वास्तव्यात ह्या देशाच्या नयनरम्य प्रदेशांचे दर्शन घेतले आहे. त्यावरच एक लेखमाला लिहावी अशा विचाराने आज कळफलक बडवायला घेतला आहे. भारताच्या पश्चिमेस १६०० कि.मी. वर आणि दुबईपासून ३५०-४०० कि.मी. अंतरावर अरबस्थानात हा देश आहे. 'मस्कत' हे ह्याचे पूर्वापार आणि रुढ नांव असले तरी कागदोपत्री 'सल्तनत ऑफ ओमान' हे नांव आहे. संक्षिप्तपणे ह्याला 'ओमान' असेही म्हणतात. 'ओमान' (मस्कत)च्या सीमा उत्तरेस युएई (दुबई), पश्चिमेस सौदी अरेबिया आणि दक्षिणेस येमेन ह्या देशांना जुळलेल्या आहेत.

दंतकथा

लेखक अजया यांनी शनिवार, 26/10/2013 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
नात्यात नुकतेच एक लग्न झाले. वर-वधू दोघेही चेपु व्यसनी! लग्नाला जाता आले नाही तरी फोटो बघावे म्हणून चेपु उघडले, तर फक्त वधूचेच फोटो. नवरदेवाचा एकही नाही! नवऱ्याला फाट्यावर मारायला लग्न होताच शिकली का काय बया, म्हणून तिला फोन करून कारण विचारले; तर सायबांच्या झिजून बुटक्या झालेल्या दातांचा त्यांना जाम कॉम्प्लेक्स आणि त्रास आहे, म्हणून त्याचे फोटो टाकायचे नाहीत, असे त्यांचे ठरले होते. चौदा वर्षाचा राहुल शाळेत जायला टाळाटाळ करतो, कारण त्याच्या दातांमुळे मित्र 'फावड्या' म्हणून त्याला चिडवतात. राजसीच्या वेड्यावाकड्या दातांमुळे तिचे लग्न जमत नाहीये.

बेबी कॉर्न सिगार्स

लेखक दिपक.कुवेत यांनी शनिवार, 26/10/2013 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना उत्तम आरोग्याची, सुख-समृद्धीची जावो हिच ईश्वर चरणी प्राथर्ना. तर मंडळी दिवाळीचं खाउन तोंड गोग्गोड झालं कि ही चटपटीत डिश बनवा आणि घरच्या सगळ्यांना खाण्यात जरा वैविध्य द्या.  साहित्यः १. बेबी कॉर्न - ५ ते ६ २. पिझ्झा सिझनींग - १ चमचा (हे रेडिमेड मिळतं) ३. तिखट - १/२ चमचा ४. लसूण पेस्ट - १/२ चमचा ५. साधं तेल किंवा ऑलिव्ह ऑईल - १ चमचा ६. लिंबाचा रस - १ चमचा ७.

इतिहास ट्रान्झिस्टर्सचा..

लेखक नानबा यांनी शनिवार, 26/10/2013 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
१९व्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली आणि मानवी आयुष्याला नवीच कलाटणी मिळाली. जगणं सुकर करणारे अनेकानेक शोध पुढल्या काळात लागू लागले. त्यापैकी महत्त्वाचा एक शोध होता ट्रान्झिस्टरचा. इलेक्ट्रॉनिक सर्किटमधील सिग्नलला आणि इलेक्ट्रिकल पॉवरला amplify म्हणजेच वाढवणारं साधन म्हणजे ट्रान्झिस्टर. आजच्या काळातल्या जवळपास प्रत्येक इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये ट्रान्झिस्टरचा वापर केला जातो. संगणक, लॅपटॉप, मोबाईल, mp3 प्लेयर – कुठलंही साधन घ्या, ट्रान्झिस्टरशिवाय त्याची कल्पना करणं निव्वळ अशक्य आहे.

'नरकचतुर्दशी: मदनकेतू आणि सोळा हजार एकशे आठ स्त्रियांची कथा '

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 26/10/2013 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
. चित्र १. प्राग्ज्योतिषपुरातील मंदिरात श्रीकृष्ण-सत्यभामेचा गरुडासह प्रवेश नेपाळ, इ.स. १७७५-१८०० भागवत पुराण पोथीतील चित्र. (लॉस एन्जेलिस काऊंटी म्यूझियम मध्ये संग्रहित) मदनकेतु उवाच: परवा नारदमुनी भेटले, तेंव्हा त्यांच्याकडून द्वारकेबद्दल ऐकून मी सुन्नच झालो.

नको

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 26/10/2013 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
एक व्हावी भरारी ही भिन्न आसमंत नको माझ्या आणि माझ्यामधे आरशाची भिंत नको नीज यावी शांत रोज कशाचीही भ्रांत नको असे त्याचा गर्व नको नसे त्याची खंत नको परा कामी येत जावे; स्वत:प्रत निश्चिन्त नको सूज्ञ व्हावी मने मात्र जगाला या संत नको ठेवुनी जावे स्वत:ला घेवुनी जावे जरी भुवनी इथल्या अपूर्व, अस्त व्हावा अंत नको ११-७-१२ अपूर्व ओक

गफलत

लेखक चाफा यांनी शनिवार, 26/10/2013 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
"डोन्ट वरी, आता मी काम हातात घेतलंय, म्हणजे तुम्ही फक्त सेलिब्रेट करायचं." मी पूर्ण आत्मविश्वासाने म्हणालो. "तूच एक शेवटची आशा आहेस.. आता मी करण्यासारखं काहीच उरलं नाहीये." प्रख्यात बिझनेसमन म्हणून ओळख असलेला एजाज अली माझ्या विनवण्या करत होता. जग जरी त्याला बिझनेसमन वगैरे म्हणून ओळखत असलं, तरी त्याच्या यशामागचं खरं कारण मला चांगलंच माहीत होतं. साला, स्मगलर होता. ड्रग्ज ते व्ह्युमन ट्रॅफिकिंगपर्यंत सगळ्या धंद्यांमध्ये होता तो. गेल्याच आठवड्यात उतरलेल्या आर.डी.एक्स.च्या साठ्याशीसुद्धा याचे लागेबांधे असल्याची, इव्हन यानेच ते कुठेतरी दडवल्याची खबर अंडरवर्ल्डमध्ये होती..