Skip to main content

चंपाकळी

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 26/10/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी मैदा १/४ वाटी तेल १ टीस्पून कलौंजी १ टीस्पून कुटलेली काळीमिरी मीठ चवीप्रमाणे . पाकृ: मैद्यात कलौंजी, काळीमिरी व मीठ घालून एकत्र करावे.गरम तेलाचे मोहन घालून, पीठ घट्ट भिजवावे.भिजवलेले पीठ तासभर झाकून ठेवावे. मैदा चांगला मळून घ्यावा व त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करुन घ्यावे.गोळ्याची पातळ पुरी लाटावी व त्यावर कातण्याने किंवा सुरीने कडेला न लावता चिर्‍या पाडाव्यात.अलगद पुरी दोन्ही बाजूंची टोके धरून गंडाळून घ्यावी व हलकी पिळून घ्यावी. कढईत तेल गरम करायला ठेवावे.तेलात हलके सोडून तांबूस रंगावर तळावी.पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवावे. champa1 champa2 चंपाकळी गोडाचीही बनवतात. मैद्यात काही न घालता फक्त मोहन घालून घट्ट भिजवून घ्यावा. चंपाकळी तळताना तुपात तळावी व दोनतारी पाकात बुडवून काढावी.
दिवाळी अंक वर्ष

वाचने 7172
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

चंपाकळी सुंदर झालिय. सानिकाताई, चंपाकळी पिठीसाखरेत घोळवतात का हो गोड व्हावी म्हणून?

कृतीच फोटो आलाच नाहिये :( @ अनन्या हो चंपाकळी गोडाची ही बनवतात, मैद्यात फकत मोहन घालून घट्ट भिजवून घ्यावा. चंपाकळी तळताना तूपात तळावी व दोन तारी पाकात बुडवून काढावी.

फोटो बघीतलाच नाही. मी तुमच्या पा.क्रु. वाचत नाही. त्यामुळे जळजळ कमी होते.

अवांतर - ते चमचे आणि भांडीबिंडी लयच सुंदर हायत. स्वयंपाक आणि छायाचित्रण हे सेमच असतं. फक्त स्वयंपाक करणार्‍याला तुम्ही कोणती भांडी वापरली हा प्रश्न कोणी विचारत नाहीत. ;)