मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गज़ल

स्नेहदर्शन · · दिवाळी अंक
सदैव उघडे मज दुःखाचे दार नको फक्त वेदना आयुष्याचे सार नको कोण खेळला कैसा येथे पाहून घे, मला कुणाची जीत नको वा हार नको!!! का विसरावी प्रीत माणसा मनातली जगात कोणी इतकाही लाचार नको मला झेलता यावे इतके पदरी दे, मला पाहिजे ते ही काही फार नको माझा व्हावा मीच दिलासा कायमचा, कोणाचाही खांदा वा आधार नको. --स्नेहदर्शन
दिवाळी अंक वर्ष

वाचने 3020 वाचनखूण प्रतिक्रिया 3