मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कॉकटेल लाउंज : ब्लु गोवन हेवन

सोत्रि · · पाककृती
Taxonomy upgrade extras
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे ब्लु गोवन हेवन पार्श्वभूमी: काजु फेणीच्या चवीवर एक्सपेरीमेंट्स करताना ही कॉकटेल रेसिपी हाती लागली. ब्लु कुरास्सो वापरुन निळ्या रंगाची समुद्राची निळाई ह्या कॉकटेलला आकर्षक आणि दिलखेचक बनवते. ही रेसिपी माझे इंप्रोवायझेशन आहे. कंप्लीट, नावासकट.
प्रकार काजू फेणी बेस्ड कॉकटेल
साहित्य
काजू फेणी 2 औस (60 मिली)
ब्लु कुरास्सो 0.5 औस (15 मिली)
लिंबाचा रस 10 मिली
बर्फ
मीठ (ग्लासच्या रिमवर लावण्यासाठी)
ग्लास कॉकटेल ग्लास
कृती: सर्वप्रथम कॉकटेल ग्लास फ्रॉस्टी करुन घ्या. त्यासाठी ग्लासमध्ये बर्फाचे खडे आणि पाणी टाकून फ्रीझरमध्ये 15-20 मिनीटे ठेवून द्या. ब्लु गोवन हेवन - काजु फेणी त्यानंतर फ्रॉस्टी ग्लासच्या रीमवर मीठ लावून घ्या. ब्लु गोवन हेवन - काजु फेणी आता काजू फेणी, ब्लु कुरास्सो आणि लिंबाचा रस कॉकटेल शेकर मध्ये बर्फ घालून व्यवस्थित शेक करून घ्या. ते मिश्रण कॉकटेल ग्लास मध्ये ओतून घ्या. हे कॉकटेल डबल स्ट्रेन करायचे आहे, त्यासाठी हॉथ्रोन स्ट्रेनर वापरावा लागेल. ब्लु गोवन हेवन - काजु फेणी हॉथ्रोन स्ट्रेनर वापरुन कॉकटेल ग्लास मध्ये मिश्रण गाळून घ्या. 1 ब्लु गोवन हेवन - काजु फेणी अफलातून चवीचे आणि समुद्राच्या निळाईचे ब्लु गोवन हेवन कॉकटेल तयार आहे :) ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

वाचन 8636 प्रतिक्रिया 0