मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाचणीचे शेंगोळे

manguu@mail.com · · पाककृती
नाचणीचे शेंगोळे १. एक वाटी नाचणीचे पीठ घेऊन, तेल, पाणी, मीठ , थोडे तिखट घालून मळून घ्यावे. त्याचे शेंगोळे करुन ताटात ठेवावेत. २. वरण करण्यासाठी अर्धी वाटी तुर डाळ कुकरमधून अर्धवट शिजवून घ्यावी. ३. पॅनमध्ये फोडणी करावी. त्यात आले, लसुण, कांदा , कढीपत्ता , कोरड्या मिरच्या वापराव्यात. नंतर अर्धवट शिजलेली डाळ घलुम्न थोडे घोटावे, पाणी वाढवून शेंगोळे सोडावेत व भरपूर शिजवावेत. शेवटी चिंचेचा कोळ व गूळ घालून हलवुन पुन्हा शिजवावे. sh

वाचने 6327 वाचनखूण प्रतिक्रिया 5

उगा काहितरीच 22/05/2018 - 20:12
शेंगोळे हा प्रकार अजिबातच आवडत नाही . माफ करा , पण वरचा फोटो पाहून असलेली ०.००१२% इच्छा पण मरून गेली.
नाचणीच्या त्याही तुरडाळीमध्ये, हा प्रकार माहीत नव्हता. काहीसा चकोल्या (वरणफळे) सारखा प्रकार दिसतोय. आमच्याकडे कुळीथाच्या (हुलगे) केल्या जातात व खुप आवडीने खाल्या जातात.