मटण करताना आईने शिकवलेल्या काही गोष्टी
“तांबडा पांढरा रस्सा” यावरची स्वातीतैंचा पाकृ वाचत होते आणि त्यांनी पहिली स्टेप अशी लिहिलेय.
” १.प्रथम मीठ, आले, लसूण, थोडे पाणी घालून मटण शिजवून घ्यावे.”
मला उगाच लगेच आईचा सल्ला आठवला म्हणजे फुकनी किंवा लाटणंच आठवले. आई मटण शिजवताना तेल गरम झाल्यावर कांदा, लसून आलं पेस्ट(ऐच्छिक), हळद, मीठ आणि मटण शिजत घालायची. हळदी मिठाने त्याला पाणी सुटते, त्याच पाण्यात मटण पहिले शिजवायचे, पण त्यात वरून पाणी घालायचे नाही. पुर्ण अंगच्या पाण्यात मटण शिजवून पुर्ण पाणी आठले कि मगच वरून पाणी घालायचे. ते ही पाणी मटण ज्या पातेल्यात शिजत घातले आहे ते पातेले खोलगट थाळी ठेवून झाकायचे. त्यात पाणी घालायचे. तेच गरम पाणी, पहिले पाणी आठले कि त्यात घालायचे. वरून थंडपाणी अजिबात घालायचे नाही. जर मटण अंगच्या पाण्यात शिजवले नाही तर त्याची चव जाते अशी सक्त ताकीद असायची. शिवाय पाणी घातले नाही तरीही सतत त्यावर लक्ष ठेवून असायचे कारण जर मटण लागले तर ते अजिबात चांगले लागत नाही. शिवाय मटणात मांदे असेल तर ते मटण शिजत टाकताना तेलाबरोबर घालायचे , त्याचेही तेल सुटते आणि मटण जास्ती चवीला लागते. थोडक्यात काय मांद्याची फुले रस्यावर तरंगली पाहिजेत. मांद्याचा तेलकटपणा हाताला लागला पाहिजे. नंतर मटण शिजवल्यावर फोडणी टाकायच्या अगोदर अळणी रस्सा थोडा काढून घ्यायचा. वेगळ्या चवीचा अतिशय रुचकर पौष्टिक असा तो अळणी रस्सा लहान मुलांना भातावर घालून चारला कि त्यांना आपोआपच मटणाची चव लागते.
तिलवी म्हणजे लिव्हर गरम पातेल्याला वरून चिकटवायचे म्हणजे ते खरपूस आणि छान लागते, रस्स्यात किंवा सुख्यात त्याला एवढी चव येत नाही. बकर्याचे कान भाजून छान लागतात. काळीज आदीच फोडी करून शिजत घालायचे नाही, सर्वाना तुकडा मिळत नाही म्हणून तो तसाच एक तुकडा शिजवायचा आणि मग वाढताना सर्वाना तुकडा तुकडा वाढायचा.
मसाला करताना कांदा कच्चा घातलेला कधीच चालायचा नाही तर कांदे चुलीत किंवा gas वर भरीताला वांगे भाजतो तसा भाजायचा. त्यामुळे छानच चव येते. ओल्याखोबर्यापेक्षा सुख्या खोबऱ्याने रंग छान येतो, ओल्याखोबर्याने रस्सा थोडापांढरा होतो. सुख्या मटणात तीळ खसखस वाटून पाहिजेच. त्याशिवाय त्याला जास्तीची चव येत नाही, शहाजीर्याने पण जास्तीची चव येते.मटणाला कोल्हापूर सांगली भागातला कांदालसून मसालातर मस्ट आहे.
मटण शिजवताना ते कधीही कुकरला शिजवू नये नाहीतर ते जास्ती शिजून काला होतो असे तिचे म्हणणे. मटण जर चुकून जून असले आणि मटण शिजवायला वेळ लागत असेल तर त्यात सुपारीचे खांड घालावे.
इथे कोल्हापूर भागातल्याना रक्ती हा पदार्थ माहित असेल तर ती रक्ती बनवण्यासाठीही थोड्या मटणाचा हलक्या प्रतीचा भाग घालावा जसे कि आतडे, बारीक कापलेल्या नळ्या वैगरे त्याने रक्ती मिळून येते. आतडे, नळ्या वैगरे वेगळे काढून त्याला कडकडीत उकळलेल्या पाण्यात टाकून द्यावे. मग त्याच्या चरचरीत, खरभरीत भाग खरडून काढावा आणि नळ्या स्वच्छच करून घ्याव्यात मगच शिजत टाकाव्यात.
इति मटण पुराण...
वाचने
66062
वाचनखूण
प्रतिक्रिया
73
आतड्याच्या भागाला वझडी
In reply to आतड्याच्या भागाला वझडी by एस
हो, धन्यवाद!
In reply to आतड्याच्या भागाला वझडी by एस
हो
वाचूनंच तोंपासु
In reply to वाचूनंच तोंपासु by गामा पैलवान
तुम्हीच शिकवा मग लोकांना बोकड
भारी लेखन !
In reply to भारी लेखन ! by प्रसाद गोडबोले
चरबी!
काय छळ चाललाय सध्या पाककृती
छान टिप्स दिल्यात.
In reply to छान टिप्स दिल्यात. by शाली
ते मुंडी बरोबर मिळतात....
"मांद्याची फुले रस्यावर
छान टिप्स.
चपखल टिप्स !
In reply to चपखल टिप्स ! by सस्नेह
तर्री?
In reply to तर्री? by लई भारी
कट तुम्हा-आम्हाला हो !
In reply to कट तुम्हा-आम्हाला हो ! by सस्नेह
अडकली का कॅसेट? =))
मिळत्या जुळत्या टीप्स आहेत...
In reply to मिळत्या जुळत्या टीप्स आहेत... by फुटूवाला
हे बघा
In reply to हे बघा by लई भारी
माफी ..
कर्मदरिद्री म्हंजी ह्यो आसं
In reply to कर्मदरिद्री म्हंजी ह्यो आसं by गामा पैलवान
हाहाहा, कर्मदरिद्री , पुण्यात
कच्ची पपई
In reply to कच्ची पपई by कपिलमुनी
हो. कच्च्या पपईच्या गराने
In reply to कच्ची पपई by कपिलमुनी
कच्च्या पपईत पॅपेन (papain)
In reply to कच्च्या पपईत पॅपेन (papain) by डॉ सुहास म्हात्रे
हे माहिती नव्हते
लई भारी ! जेवण झाल्यावरसुद्धा
मसाला करताना कांदा कच्चा घातलेला कधीच चालायचा नाही तर कांदे चुलीत किंवा gas वर भरीताला वांगे भाजतो तसा भाजायचा. त्यामुळे छानच चव येते.हे एकदम मस्टं आहे... आणि त्याबरोबर आईकडे दोन जास्तीचे कांदे भाजायचा हट्ट असे... त्यांची चव काय अप्रतिम असते !In reply to लई भारी ! जेवण झाल्यावरसुद्धा by डॉ सुहास म्हात्रे
खरयं, भाजलेल्या कांद्याची चव.
छान माहिती, तोंपासु, हे वे
In reply to छान माहिती, तोंपासु, हे वे by पक्षी
हे वे सां न ला?
In reply to हे वे सां न ला? by जेडी
हेवेसांनला...
विदर्भात मटन बनवताना.
In reply to विदर्भात मटन बनवताना. by नीलकांत
मराठवाड्यात बंजारा लोक याच
In reply to मराठवाड्यात बंजारा लोक याच by अभ्या..
तुमचा मटणाचा अभ्यास एकदम
In reply to मराठवाड्यात बंजारा लोक याच by अभ्या..
अतिशय उत्तम माहिती
In reply to अतिशय उत्तम माहिती by नीलकांत
मालक तुम्हाला ह्या
In reply to मराठवाड्यात बंजारा लोक याच by अभ्या..
उमरग्यापाशी एक कसगी/खसगी नामक
In reply to उमरग्यापाशी एक कसगी/खसगी नामक by अभिजीत अवलिया
मंगळवार..
In reply to मंगळवार.. by फुटूवाला
धन्यवाद. एकदा सोलापूर
In reply to धन्यवाद. एकदा सोलापूर by अभिजीत अवलिया
७५ किमी
In reply to ७५ किमी by फुटूवाला
लै आभारी हावोत बरका फटूवाले.
In reply to मराठवाड्यात बंजारा लोक याच by अभ्या..
कंदुरी
पाककृतींचे दस्तऐवजीकरण
In reply to पाककृतींचे दस्तऐवजीकरण by राही
++१११११
मिपाने मटणाच्या पाककृतीवर काही दिवस बंदी आणली पाहिजे....
वजडी म्हणजे किडनी असं ऐकलं
वजडी म्हणजे आतडी
अरे माझ्या कर्मा...
In reply to अरे माझ्या कर्मा... by अर्धवटराव
तसं काही नसतं अरा,
In reply to तसं काही नसतं अरा, by अभ्या..
थँक्यु :)
In reply to अरे माझ्या कर्मा... by अर्धवटराव
अगदी असंच झालंय माझ्या बाबतीत
In reply to अगदी असंच झालंय माझ्या बाबतीत by उगा काहितरीच
समाधान आहे अजून
In reply to समाधान आहे अजून by जेडी
चिकनपेक्षा मटण चवीला चांगले
बरोबर.
In reply to बरोबर. by पद्मश्री चित्रे
सवताळून
In reply to बरोबर. by पद्मश्री चित्रे
चवताळून
मटण रान
In reply to मटण रान by कपिलमुनी
रान कँपातल्या ईस्ट
In reply to रान कँपातल्या ईस्ट by गणामास्तर
उरूस
In reply to मटण रान by कपिलमुनी
रान
In reply to रान by तुषार काळभोर
रान हा काय प्रकार असतो? (मटण
In reply to रान हा काय प्रकार असतो? (मटण by एस
बोकडाचा लेग पीस
मटनात गोडे किम्वा गोडाचे मटन
हे सोलापूरचं लै काळ सहन करत
माननीय नीलकांत मालक किंवा कोणीही
In reply to माननीय नीलकांत मालक किंवा कोणीही by जेम्स वांड
मिपावरच्या काही पाकृ
In reply to माननीय नीलकांत मालक किंवा कोणीही by जेम्स वांड
पाककृती छान आहे
In reply to पाककृती छान आहे by नीलकांत
हे
सोलापूर चिकन
एक फक्कड रेसिपि येउ द्यात
मटण
कृपया मटण रस्सा रेसिपी
कुकर मध्ये मटण शिजवल्यास
वजरी