Skip to main content

(प्रातःध्वनि)

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 09/03/2009 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठल्यावर अंथरूणातून आरश्यासमोर तोंड धुताना ब्रश मला म्हणाला "घास रे मेल्या घास, लवकर घास" आळस देताना अंग मोकळं करताना चुकून पोट म्हणालं ढम ढम ढम... ट्रेनच्या बाकड्यावर शेजारच्या भय्याचा घामट दर्प घेताना चष्मा म्हणाला "तरी मी तुला सांगत होतो भलतीकडे बघू नको"
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3921
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

हि:हि:हि:! होळी साजरी करण्याचा याहून चांगला प्रकार कुठला असणार? धमाल येतेय!

In reply to by मेघना भुस्कुटे

खरं आहे मेघना! भांगेची गरजच नाही आहे, 'हायपर' होण्यासाठी!! ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

मस्त होळीच्या शुभेच्छा =D> -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मिपावरच्या नवे लेखनातुन शरुवैनीची नवकविता प्रकटताना पाहून सहज म्हणाला बोंबला रे बोंबला हास्यसुनामी येतेय कंपुतला गोतावळा सरसावत कोपच्यात कविता घेताना पेटून टोळी म्हणाली ऍटॅक आक्रमण आक्रमण बेंबीतल्या देठापासुन, गोठलेल्या मेंदुमधे वेदनेचा स्फोटअर्क कळवळताना मंडळी म्हणाली तेच्या आयला बास की आता

इतकी लोटपोट होळी याआधी कधीच नव्हती झाली. मस्त मजा येतेय. लगे रहो विडम्बक कम्पनी! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}