आऊटलँडर
.
.
Sing me a song of a lass that is gone,
Say, could that lass be I?
Merry of soul she sailed on a day
Over the sea to Skye.
Billow and breeze, islands and seas,
Mountains of rain and sun,
All that was good, all that was fair,
All that was me is gone.
.
.
वर्ल्डवॉर २ मधे कॉम्बॅट नर्स म्हणून काम केलेली क्लेअर आपल्या इतिहासतज्ञ नवर्यासोबत (फ्रॅंक) स्कॉटलंड फिरायला आली आहे. नवर्याचा पुर्वज जॅक रँडलबद्दल अधिक माहिती जमा करणे आणि दुसरा हनिमून असे दुहेरी उघड उद्देश या ट्रिपमागे आहेत. युद्धामुळे ४-५ वर्ष एकमेकांपासून दूर राहील्यावर बदलेल्या साथीदाराला जाणून घेणे आणि मुलासाठी प्रयत्न करणे असे छुपे उद्देश.
बॉटनी/झुडुपपाल्याचा औषधी उपयोग याची आवड असणारी क्लेअर अपघाताने २०० वर्ष मागे जाते. १९४५ मधून १७४३ मधे. गाई चोरणारे स्कॉटिश हायलँडर आणि त्यांचा पाठलाग करत गोळीबार करणारे ब्रिटिश सैनिक यांच्यापासून बचाव करत पळताना ती भरकटते आणि स्कॉटिश टोळीच्या तावडीत सापडते. आधी ते हिला ब्रिटिश हेर समजतात. पण मग तिचे वैद्यकीय ज्ञान बघून हिलर म्हणून नजरकैदेत ठेवून घेतात. काही घटनांमुळे तिला टोळीतल्या जेमी फ्रेजरशी लग्न 'करावे' लागते. पण नकळत ती त्याच्या प्रेमात पडते.
स्कॉटिश कॅथलिक किंग जेम्सला त्याच्या 'हक्काच्या' इंग्लंडच्या गादीवर बसवण्यासाठी होणारे जॅकोबाईट राइजिंग, दोन वर्षानंतरचे १७४५ कलोडन युद्ध, स्कॉटिश क्लॅन पद्धतीचा आणि एकंदरच हायलँडर संस्कृतीचा अंत या सगळ्यापासून ती जेमीला आणि तिच्या जिवाभावाचे मैत्र झालेल्या इतरांना वाचवू शकते का? इतिहास बदलता येतो का? प्रेमासाठी मनुष्य काय काय करू शकतो? हे जाणून घेण्यासाठी आऊटलँडर मालिका नक्की बघा!
पूर्ण मालिका जिच्यावर अवलंबून आहे त्या क्लेअरची भूमिका Caitriona Balfe ने अतिशय उत्तमरीत्या निभावली आहे. Sam Heughan अभिनीत जेमीने तिला तोलामोलाची साथ दिली आहे. दोघांमधील केमिस्ट्री जबरदस्त! पण मला स्वतःला फ्रॅंक आणि जॅक रँडल अशा दोन टोकाच्या दोन व्यक्तिरेखा जिवंत करणाऱ्या Tobias Menzies चे फार कौतुक वाटले. बाकी सगळ्यांचा अभिनयदेखील उत्तम. कास्टिंग डायरेक्टरचे कौतुक.
१९४०, १७४० मधले स्कॉटलंड, १७४० मधले फ्रांस, त्याकाळची वेशभूषा,भाषा, शस्त्रास्त्र, खानपान संस्कृती, प्रवासाची साधनं वगैरे बघायला फार छान वाटते. पिरियड ड्रामा बघायला आवडत असेल तर चुकवू नये अशी सिरीज. मी नुकतंच या सिरीजच बिन्ज केलं. ३ सीझन - ४२ एपीसोड प्रत्येकी १ तासाचे - ८ दिवस मधे बघून झाले.
दोनेक वर्षांपूर्वी आऊटलँडर सिरीजमधली पुस्तकं वाचायला सुरुवात केली होती. ६६५ + ७४७ + ९९९ + ९१६ + (१३३०/२) अशी ४००० पानं ie ४.५ पुस्तक वाचून मग ब्रेक घेतला होता. पुस्तकांत फारच डिटेल वर्णन आहेत त्यामुळे सलगपणे वाचल्यास कंटाळा येऊ शकतो. पण एवढी मोठी पुस्तकं मालिकेच्या १६ किंवा १३ भागात बसवल्याने फक्त महत्वाच्या घटना घेऊन बाकीचा फापटपसारा काढून टाकला आहे. आतापर्यंत पहिल्या तीन पुस्तकांवर तीन सीझन आलेत. चौथा यावर्षी येईल.
टाईम ट्रॅव्हल, इतिहास, युद्ध, साहस, प्रेम, फेमिनिझम वगैरेची छान भेळ जमून आलीय मालिकेत. त्यामुळे नक्की बघा!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रोचक. ओळख आवडली.
कुठे बघू?
ओळख आवडली
पद्मावति, नितीन आभार :)
धन्यवाद.
वाह भाई वाह
अरेच्चा ही तर imdb top 250
ही मालिका ..
गॉडलेस
Netflix
मला हि आधी खूप आवडली, नंतर
ते फ्रान्स ला जातात ना
चौकटराजा, कपिलमुनी आभार :)
मी बिंज केल इतकी आवडली मला .
बिंजवर्दी?
इन्ना,