अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
मंडळी नमस्कार,
नमस्कार म्हणजे काय त्रिवार दंडवत नमस्कार हो, कारण मिपावर आल्या दिवसापासून बघतूया. एकेक सुपरस्टार हायेत राव हितं. आपले मिपाकर म्हणून नाते जुळत जातंया आणि अचानक कळतंया हे माणूस लै वल्ली है. इथं आपल्यासारखा मिपाकर म्हनून वावरतंय पन असली दुनियेत लैच नाव कमवून हाये. ज्या गोष्टी उगा आपण पेपरात बिपरात वाचतांव, टीव्हीवर बघताव ती माणसे चक्क मिपावर हायेत आपल्या संगं. मला तर कवाबवा असंबी वाटतंय की आपन लैच चिल्लर हाय राव. पण मिपाकरांनी अशा अटकेपार रवलेल्या झेंड्याचे कवतिक तर असणारच ना भौ. एकतर आपलं माणूस असतंय. आपलं मराठी माणूस.
आता हेच बघा की, आपले बिकामालक, म्हणजे आपले बिपिन कार्यकर्ते हो. भारी लिहितेत आणि लै भारी माणूस हायेत म्हणून ऐकलेले. भेटले एकदा आवर्जून आमच्या गावात येऊन. एकदम सिंपल माणूस हो. प्रेमाने बोलणारा, तेवढ्याच प्रेमानं आपलंसं करणारा. आपले प्राडॉ. बिरुटे सर घ्या, जयंतकाका घ्या नायतर मालक नीलकांत प्रशांत घ्या. ते बी तसेच. आपुलकीने जीव लावणारच. मिपावरचा स्नेह तर असणारच शिवाय प्रत्यक्ष आयुष्यातील अडचणीसाठी पाठीवर विश्वासाने हात ठेवणारी माणसे ही.
तर मी काय सांगत होतो तर आपले बिकामालक हो. बिपिनदादांचा लिहिता हात काय वर्णावा. त्यांचे खोबार वर्णनापासून आम्ही चाहते त्यांच्या लिखाणाचे. तर मनोविकास प्रकाशनातर्फे उर्वशी बुटालिया लिखित संपादनांचा 'हे शांतततेचे बोलणे' काश्मीरी स्त्रियांचा आवाज हा अनुवाद आपल्या बिपिनदादांनी केलेला प्रकाशित होतोय.
मान्यवर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या अशा लेखनांबद्दल बिपिनदादांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या आगामी लेखनासाठी सर्वच मिपाकरांतर्फे मनापासून शुभेच्छा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाह,मस्तच. बिपिन कार्यकर्ते
अरे वा! अभिनंदन!
अभिनंदन बिकाशेठ. मिपावरचे
अरे वा ! अभिनंदन बिकाशेठ !!
त्रिवार अभिनंदन
क्या बात!
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
काका अभिनंदन हो
अभिनंदन बिका...
अभिनंदन! चित्र दिसत नाहीए.
हार्दिक अभिनंदन
बिकांचे अभिनंदन !
अभिनंदन
लौ यू...!
बिपिन कार्यकर्ते यांचे
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन बिपीन
बिपिनदादांचे हार्दीक अभिनंदन
अरे वा! अभिनंदन!!
अभिनंदन
सर्वांचे मनापासून धन्यवाद! _/
बिपिनदा, अभिनंदन!
मस्त बातमी...
अभिनंदन बिका !!!!! आनंद वाटला
परत एकदा धन्यवाद!
आदरणीय बिकाशेठ यांचे त्रिवार अभिनंदन!!
झकास बिका! अभ्याने आवर्जुन
अरे वा!!!
अभिनंदन
अभिनंदन बिका
अभिनंदन
अभिनंदन बिकाशेठ. लिहित राहा.
बिकाशेठचं हार्दिक अभिनंदन..
बिपीन कार्यकर्ते हार्दिक आभिनंदन!
हे शांततेचे बोलणे मराठीत
अभिनंदन हो बिकाशेठ !!
"अभ्या"नंदन बिपिनसेठ!
अभिनंदन!!
मनापासून अभिनंदन. खोबार अतिशय
अभिनंदन, चित्र दिसत नाही
सहर्ष अभिनंदन..
अभिनंदन
अरे वा!
पुस्तकाची प्रस्तावना
त्रिवार अभिनंदन!
बिकादादांचे हार्दिक सुपर