हॅलेचा धुमकेतु आणि त्याचे शेपुट
युरोपमध्ये १५ व्या शतकात एकदा, १६ व्या शतकात एकदा आणि सतराव्या शतकात दोनदा धुमकेतु दिसल्याच्या नोंदी एडमंड हॅले या शास्त्रज्ञाला सापडल्या. हॅले ने एकुण २४ अशा धुमकेतुंच्या सांस्कृतिक नोंदी तपासल्या व त्या २४ पैकी वरील ४ नोंदींमध्ये त्याला साम्य जाणवले. इस वी १७०५ मध्ये त्याने, केवळ वरील निरिक्षणांच्या ऐकीव नोंदीचा आधार घेऊन, व न्युटोनियम भौतिकशास्त्राच्या सिध्दांताच्या मदतीने, एक नवीनच मत मांडले. त्याच्या ,मते, वरील चार धुमकेतु हे वेगवेगळे नसुन तो एकच धुमकेतु आहे व तो दर ७६ वर्षांनी पृथ्वीच्या जवळुन जातो. हॅले च्या सिध्दांतानुसार त्या धुमकेतुची पुढची पृथ्वी फेरी इसवी १७५८ होणार. अगदी ठामपणे त्याने हे भाकित केले होते. त्याने केलेले भाकित खरे की खोटे हे पाहण्यासाठी मात्र तो राहिला नाही. १७४१ मध्ये तो अनंतात विलीन झाला. १७५८ साल उजाडले. आणि हॅले ने केलेली भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली.
जगभरातील खगोल अभ्यासकांनी एकमुखाने, ह्या धुमकेतुचे नाव हॅलेचा धुमकेतु ठेऊन, एडमंड हॅलेला अजरामर केले.
या धुमकेतुची पुढची पृथ्वी फेरी २०६२ साली होणार आहे. आपण तो पर्यंत जगलो तर पाहुच आपण तो धुमकेतु.
धुमकेतुला एक शेपुट असते. त्यात असंख्य छोटे छोटे बाष्प-वायु-धुळ आणि खडक जनित वाळुच्या आकाराचे घटक असतात. ही शेपटी करोडो किमी लांबीची असते. हॅलेचा धुमकेतु जरी पुढे निघुन गेला असला तरी, त्याच्या शेपटाचा भाग दरवर्षी पृथ्वीच्या कक्षेशी मिळतो. शेपटीतील ज्या घटकांतील बाष्प निघुन जातात, ते मोकळे होऊन पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या योगाने पृथ्वीच्या वातावरणात खेचले जातात. त्यांचा आकार अगदी छोटा असतो. सगळ्यात मोठा आकार शेगदाण्या एवढा असु शकतो. पृथ्वीच्या वातावरणात येताणा, वातावरणाशी घर्षणाने हे घटक जळु लागतात व पडताना व जळताना असे दोन्ही एकाच वेळी आपणास दिसले तर आपण त्यास उल्का म्हणतो.
असाच उल्का वर्षाव , ५ मे २०१८ (५ तारखेची रात्र आणि ६ तारखेची पहाट), ला होणार आहे. चंद्रप्रकाशाचा उल्का दिसण्यावर विपरीत परीणाम होईल. तासाला किमान ३०० उल्का पाहण्याची संधी हा उल्का वर्षाव देतो, पण या चंद्रप्रकाशामुळे तितकेसे दिसणार नाहीत.
पुर्व दिशेकडुन, उगवत्या कुंभ (aquarius) राशी मधुन या उल्का वर्षावाचा उद्भव होणार आहे.
हेमंत ववले,
निसर्गशाळा, पुणे
याद्या
3458
प्रतिक्रिया
8
वर्गीकरण
मिसळपाव
उल्कावर्षावाची न विसरता
अरेरे....हुकणार यावेळी
हॅले अचाट माणूस होता.
वल्ली होता ब्वा त्यो
In reply to हॅले अचाट माणूस होता. by manguu@mail.com
नक्कीच पहाण्याचा प्रयत्न करेन
वा वा
In reply to नक्कीच पहाण्याचा प्रयत्न करेन by दुर्गविहारी
हॅलेचा धूमकेतू बघण्यात आला
ह्या धुमकेतुवर