Skip to main content

खगोलशास्त्र

हॅलेचा धुमकेतु आणि त्याचे शेपुट

लेखक हेमंत ववले यांनी बुधवार, 02/05/2018 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
युरोपमध्ये १५ व्या शतकात एकदा, १६ व्या शतकात एकदा आणि सतराव्या शतकात दोनदा धुमकेतु दिसल्याच्या नोंदी एडमंड हॅले या शास्त्रज्ञाला सापडल्या. हॅले ने एकुण २४ अशा धुमकेतुंच्या सांस्कृतिक नोंदी तपासल्या व त्या २४ पैकी वरील ४ नोंदींमध्ये त्याला साम्य जाणवले. इस वी १७०५ मध्ये त्याने, केवळ वरील निरिक्षणांच्या ऐकीव नोंदीचा आधार घेऊन, व न्युटोनियम भौतिकशास्त्राच्या सिध्दांताच्या मदतीने, एक नवीनच मत मांडले. त्याच्या ,मते, वरील चार धुमकेतु हे वेगवेगळे नसुन तो एकच धुमकेतु आहे व तो दर ७६ वर्षांनी पृथ्वीच्या जवळुन जातो. हॅले च्या सिध्दांतानुसार त्या धुमकेतुची पुढची पृथ्वी फेरी इसवी १७५८ होणार.