उपक्रम चांगला आहे..पण आज ईंटरनेट च्या जमान्यात ह्या विषयावर विपुल लेखन आहे..तसेच म.टा. व अनेक वर्तमान पत्रे हि हा उपक्रम राबवित आहेत..पुर्वि ह्या विषय ताब्बु होता आता तसा राहिला नाहि..या विषयावर अनेक पुस्तके लिहिलि गेली आअहेत..र.धो.चा जमाना निराळा होता..आता जग या बाबतित खुप हुशार झाले आहे १३-१४ वर्षाच्या मुलाम्नाहि सारे ठावुक असते.
लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव या वर वाद होतात. लैंगिक समस्या तज्ञांकडे २३ -२४ वर्षांच्या मुलांमध्येही अज्ञान असलेल्या केसेस दिसुन येतात. १३ - १४ वर्षाच्या मुलाला जे ठाउक असत ते बर्याचदा अर्धसत्य व अवैज्ञानिक असते असे तज्ञांना दिसुन आले आहे. संदर्भ म्हणुन विठठल प्रभु. शशांक सामक लीना मोहाडीकर इ. ची पुस्तके पाहता येतील.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
१३-१४ वर्षाच्या मुलांनाच काय ४० -४५ वर्षाच्या माणसाना दोन मुले झाल्यावरही बरेच अज्ञान असते असे सर्व डॉक्टर तुम्हाला सांगतील.१३-१४ वर्षाच्या मुलांना असलेले ज्ञान अर्धवट असते आणि अर्धवटज्ञान हेधोक्याचे असते.लिंग शैथिल्य आणि मुदतपूर्व स्खलन हा १०० टक्के पुरुषांनी एकदातरी अनुभवलेला प्रकार आहे तरीही ९५ टक्के पुरुषांचे( किंवा ९९ %) त्याबद्दल अज्ञान दिसून येते.लोकांनी आत्मपरीक्षण करून पाहावे आणि मग बोलावे हा विषय अतिशय गहन आणि गुप्त आहे त्यातून आपले संस्कृती रक्षक यावर काही बोलले तर संस्कृती बुडेल असा टाहो फोडतात. त्यामुळे हा विषय बासनात गुंडाळून ठेवला गेला आहे. आपला इमेल चा स्पॅम फोल्डर उघडून बघा किती वेगवेगळ्या वाजीकरणच्या जाहिराती दिसतील.मुळात वाजीकरण( घोड्या सारखी कामशक्ती) हेच एक मिथक आहे म्हणजे गैरसमज किती खोलवर रुजला आहे ते कळेल. दुर्दैवाने काम शिक्षण म्हणजे पोर्नोग्राफी हा गैरसमज समाजात सर्वत्र रूढ आहे आणि त्यामुळे शाळात त्याबद्दल शिक्षण देण्याचे नाव काढले तर लगेच सर्व जण टाहो फोडतात. र धो हा एक द्रष्टा पुरुष होता आणि तो काळाच्या १०० वर्षे पुढे होता म्हणून त्यांचे विचार आजच्या काळातही लागू होताना दिसतात.
उपक्रमाला शुभेच्छा
कर्व्यांनी चालू केलेलं कार्य आज इतक्या वर्षांनी परत अंगावर घेणार्या त्रयीचं मनापासून कौतुक आणि शुभेच्छा!!!
अवांतर: र. धों. सारखा जबरदस्त माणूस होऊन गेल्यावरही जवळ जवळ ८०-९० वर्षांनी अजूनही या कार्याची गरज भासावी हे वाईटच!!!
बिपिन कार्यकर्ते
अवांतर: र. धों. सारखा जबरदस्त माणूस होऊन गेल्यावरही जवळ जवळ ८०-९० वर्षांनी अजूनही या कार्याची गरज भासावी हे वाईटच!
अगदी सहमत. पण या त्रयीचं मनापासून कौतुक आणि शुभेच्छा.
१३-१४ व्या वर्षापासून काय अगदी जन्मापासून माहित असलं तरी दुसर्यांदा शिकलं तर काही फरक पडत नाही. पण अज्ञान आणि अर्धज्ञान घातक आहे.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
विवाहापुर्वी लैंगिक स्वातंत्र्य देणारे आदिवासींचे अनेक समुह भारतात व भारताबाहेर आहेत. वयात आलेल्या व येउ पहाणार्या मुलामुलींना लग्नाआधी रात्रीचे एका मध्यवर्ती निवारागृहात (घोटुल) ठेवण्याची व तेथे त्यांना लैंगिक शिक्षणासह जीवनाचे (जगण म्हणतो बाबा ) सगळे व्यवहार शिकवण्याची सगळी व्यवस्था या समुहात आहे. मध्यप्रदेशातील बस्तर व महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात बडा माडिया व माडिया जमातीतील या व्यवस्थांचे अवशेष अजुन टिकुन आहेत. लैंगिक व्यवहारांचे स्वातंत्र्य असतानाही या समाजातील मुलामुलीत अनाचार बोकाळल्याचा पुरावा नाही. त्याचा हा फोटो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
कालच कोथरुड येथील वसंत व्याखानमालेत डॊ प्रदीप पाटील यांचे स्त्री पुरुष बदलते नाते संबंध यावर व्याखान झाले. विशेषत: किशोर व तरुण वयीन संबंधावर अधिक फोकस होता.
किंबहुना केवळ चांगला नाहि, तर अत्यावश्यक उपक्रम आहे. हार्दीक शुभेच्छा.
अवांतरः तसं पाहिलं तर आपल्याला सर्वच शिक्षण क्षेत्रांत रॅडीकल, मूलभूत बदल करणे अनिवार्य आहे. इतक्यात मला (माझ्याच) अडाणीपणाची जाणिव फार तिव्रतेने व्हायला लागलीये.
अर्धवटराव
प्रतिक्रिया
शुभेच्छा !
प्रकल्पाला
हेच
हेच
उपक्रम
तरिही
तरीहि
१३-१४ वर्षाच्या मुलांना सारे ठावुक अस् ते
शुभेच्छा!!!
+१
मुखपृष्ठाविषयी
स्त्री पुरुष बदलते नाते संबंध
चांगला उपक्रम आहे