Skip to main content

एवढ्यात काय खरेदी केलंत?- ३

लेखक रेवती
Published on रवीवार, 02/04/2017
नमस्कार मंडळी, माझ्या आधीच्या धाग्याला भरपूर प्रतिसाद देऊन, मुख्य म्हणजे फक्त प्रतिसाद देण्यासाठी खरेदी करून तुम्ही मोठे काम केले आहे. "आता पुरे" म्हटल्यानंतरही तुम्ही न थांबण्याचे ठरवले आहे. मग विचार केला की आता तिसरा भाग काढूयात व तोही असाच यशस्वी करुयात. मागीलवेळी ज्यांना काही खरेदी करायची नव्हती त्यांनी मीठ मिरच्या का होईना घेतल्यात व त्याची नोंद इथे केलीत म्हणून आभार. हे धागे जतन केले गेले पाहिजेत म्हणजे अजून धा वीस वर्षांनी अमूक दिवशी तुम्ही भाजी खरेदी केलीत असे सिद्ध करता येईल. पूर्वी भाजीच्या किमती किती होत्या हे आपल्या पुढील पिढ्यांना कळणे सोपे जाईल. या धाग्यावर तुम्ही नवी खरेदी नमूद कराल या आशेसह प्रसिद्ध करीत आहे. माझी आजची अ‍ॅमेझॉन ऑर्डर साधारणपणे अशी असेल- मुलाच्या सेलफोनचा स्क्रीन व केस, माझा लेनोव्हो, ड्रायरच्या व्हेंटमध्ये पक्षी जातात म्हणून बर्ड स्टॉपर, ईअर रिंग्जचे सेफ्टी बॅक्स किंवा फिरक्या, डिशवॉशरचे डोअर सील. धन्यवाद.

याद्या 49138
प्रतिक्रिया 177

प्रतिक्रिया

माझ्या आईचा वाढदिवस झाला... पण तिला कुठल्याच प्रकारची भेट वस्तू मी दिली नव्हती,तिला आवडेल आणि ती आवडीने वापरेल अशी कोणती तरी वस्तू मला तिला द्यायची होती ! तिला साडी देण हा पर्याय मला नको होता,तसहीं आता तिच्याकडे इतक्या आहेत कि त्यात तिला काही वेगळा आनंद मिळेल असं त्यात काही नव्हतं. तिला मी सांगितले कि मला तुला आवडेल अशी भेट वस्तू मला सुचेल तेव्हाच मी ते देइन. तिने ते मान्य केले. काही दिवसांनपूर्वीच तिच राहिलेल भेट वस्तू मला देता आली... :) ते गिफ्ट म्हणजे सारेगम कारवां म्युझिक प्लेअर... P1 तिला गाण्यांची फार आवड आहे हे मला पक्के ठावूक होते,त्यामुळे ही भेट तिला आवडली. :) जुन्या काळातील ५००० गाणी या प्लेअर मध्ये बिल्टइन आहे शिवाय गीतमाला देखील यात आहे. स्वंयपाक घरात काम करत असताना गाणी ऐकत तिचा वेळ जातो. :) अ‍ॅमेझॉनवर हा रेडियो उपलब्ध आहे आणि तो मी बराच आधी पाहुन ठेवला होता, पण त्यावर निर्णय घेतला नव्हता.हल्लीच माझ्या एका मित्राने याचे लेटेस्ट मॉडल जे एका रिमोट सकट उपलब्ध आहे त्याचा फोटो कायअप्प वर पाढवला आणि माझ्या मनाने उचल खाल्ली.परंतु याची साउंड क्वालिटी मला जाणुन घ्यायची होती, म्हणुन अ‍ॅमेझॉन वरुन मी हे न घेता दुकानात आधी जाउन आवाज ऐकुन मगच घ्यावयाचे असे ठरवले.मला आवाज ठीक-ठाक वाटल्यावर मी तो घेतला. सकाळी सकाळी उठल्यावर रेडियोवर गाणी ऐकण्याची मजा काही वेगळीच आहे... :) जाता जाता :- आज्जे तुझी "रुम्बा" इस्टोरी वाचल्यावर मला मी हल्लीच पाहिलेला व्हिडियो आठवला, तो इथे देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल की बातें दिल ही जाने... :- Roop Tera Mastana (1972)

फ्लिपकार्टने ५ ऑक्टोबरपर्यंत वाट पहा अश्या चारपाच धमक्या देऊन झाल्यावर काल दसर्‍याच्या मुहुर्तावर हे मिळाले...

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी नोक्या ६ कसा काय आहे? परफॉर्मन्स वगैरे? साउंड आणि डिस्प्लेचे बरेच कौतुक ऐकलेय. कसाय?

In reply to by अभ्या..

नोकिया-६ खूपच चांगला आहे. परफॉर्मन्स व डिस्प्ले उत्तम आहे. क्यामेरा क्वालिटी खूपच छान आहे.

दोन गुडडे ची दहावाली आणि एक पार्लेजीचे पाचचे, चितळे म्हशीचे दूध अर्धाला लिटर आणि सोबत २ १२ किलोचे डायपर घेतले. उगाच मस्ती म्हणून ४०रु किलोचा कोलम तांदूळ घेतला.. होऊ दे खर्च म्हणून. :) *बाप झाल्यावर कळते पैसे कोठे व कसे खर्च करावेत असे कोणीतरी मला म्हणाले होते येथेच मिपावर, आता अनुभव घेतोय :P

बरी अर्धीसाठी चिनी बनावटीचा नसलेला चतुर भ्रमणध्वनी संच शोधत होतो. चिनी बनावटीच्या वस्तू शक्य तिथे टाळायच्या असे ठरविले आहे. शेवटी सॅमसंग जे ७ मॅक्स हा संच १६,८०० ला मिळाला. कोरिअन कंपनीच्या या संचाचे उत्पादन भारतात झाले असून चार्जर व इएरफोन्स व्हिएटनाममध्ये बनलेले आहेत. वायफायसाठी जिओचे डोंगल घेतले (रू. १०००). पहिल्या ९० दिवसांसाठी (१ जीबी प्रतिदिन) ६०० रूपये दिले. पहिले ९० दिवस संपल्यानंतर पुढील प्रत्येक ९० दिवसांसाठी ५०० रूपये भरावे लागतील. डोंगल खिशात घालून कोठेही नेता येत असल्याने अतिशय सोयिस्कर आहे.

In reply to by श्रीगुरुजी

वायफायसाठी जिओचे डोंगल घेतले
वायपॉड म्हणा गुर्जी.... डाँगल नाही, . बरं जिओ चे वायपॉड चायनीज की कोरियन ?

कोणी ऍमेझॉनवरून किंवा online स्टील थाळी आणि वाट्या असे सेट्स घेतले आहेत का? कोणता चांगल्या qualityचा आहे. मला १०-१५ थाळीसेट घेण्यासाठी कृपया लिंक द्या. जास्त heavy नको आहे पण एकदमच तकलादूपण नको. अंदाजे १५ थाळी , १५ ग्लास आणि ७५ छोट्या वाट्या असा विचार आहे.

In reply to by कंजूस

आमच्या इथे हा ब्रँड मिळत नाही. माझी कालची खरेदी. १ किलो कांदे १५ रू. १ किलो बटाटे २२ रू. ६ किलो कलिंगड ९० रू १ किलो वांगी ३० रू ५ किलो दावत बासमती ६० तुकडा २४० रू

In reply to by पैसा

चहा उत्तम आहे*१. पंधरा वर्षांपासून ( बाजारात आल्यापासून) हाच वापरतो. गेले दीड वर्ष काहीना काही वस्तू फ्री देतातच. यावेळची बॅाटलमात्र अफलातून आहे. *-१ चहाला ( आणि श्रीखंडासाठी ) गायीचे दूधच उत्तम.

In reply to by प्रचेतस

घराजवळच एकजण आहेत. काश्मिरी का सिमला ते पाहिले नाही. सध्या बाजारात सफरचंदे कमी दिसतात. मी भाजीपाला, फळे इ. च्या भावासाठी शक्यतो घासाघीस करीत नाही. विकणारे बहुतेक साधारण परिस्थितीतले असतात. पाचदहा रू. कमी दिल्याने आपल्याला फार फरक पडत नसला तरी त्यांना बराच फरक पडू शकतो. त्यामुळे जर त्यांनी सांगितलेला भाव खूप जास्त असेल तर मी न घेता पुढे जातो किंवा भाव फार जास्त नसेल तर अजिबात घासाघीस न करता खरेदी करतो. पण भाव पाडून मागत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

शेम हिअर! भाव न विचारता हव्या त्या भाज्या घेतो, किती झाले विचारतो, तेवढे पैसे देतो आणि चालायला लागतो.

भोर तालुक्यातून 100 किलो इंद्रायणी तांदूळ घेतला. ५२ रु/किलो + वाहतूक खर्च (१२ जणांचा प्रत्येकी १०० किलो छोटा हत्ती मध्ये आणला, अजून भाडं नाही दिलं) २०० किलो घ्यायचा होता, पण शिल्लक नव्हता. दुकानात मिळतो तो, आणि हा थेट शेतकऱ्याकडून घेतलेला... वासात लै फरक आहे.