नाव : इस्रायलची मोसाद
लेखक : पंकज कालुवाला
प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन
'गुप्तचर यंत्रणा' , एखाद्या साम्राज्याचा किंवा देशाचा अविभाज्य घटक. या विषयाबाबत जनमानसांत प्रचंड कुतूहल असले तरी नावाप्रमाणे गुप्तपणे कार्यरत असलेल्या 'गुप्तचर विभागावर' तुलनेने लिखाण कमी झाले आहे. बऱ्याच काळापासून 'ज्यू' समाज कायम चर्चेत राहत आला आहे. दुसऱ्या महायुद्धात हिटलरने केलेला 'ज्यू' हत्याकांडानंतर सावरलेल्या लोकांनी 'इस्राईल' देशाची स्थापना केली.
__________________________________
'इस्राईल' जगाच्या नकाशावर पाहिल्यास चटकन लक्षात येईल की, बलाढ्य अरबी शत्रूराष्ट्रांच्या , दहशदवाद्यांच्या गराड्यात इस्राईल छाती ठोकून उभं आहे.इस्राईलला हे शक्य झाले ते त्यांच्याकडे असलेल्या 'मोसाद' सारख्या प्रभावी गुप्तचर यंत्रणेमुळे. आणि हाच विषय हाती घेऊन 'पंकज कालुवाला' यांनी अभ्यासक वृत्तीने 'मोसादचा' आढावा घेतला आहे. मुठभर देशाची चिमुटभर संघटना हे 'मोसाद' चे खरे स्वरूप. मात्र जगभरात केलेल्या गुप्त कारवाया प्रचंड विलक्षण आहेत.
__________________________________
पुस्तकाची सुरवात होते 'ज्यू' लोकांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीने. 'ज्यू' संस्थापक 'अब्राहम' पासून दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या इस्राईलच्या आणि मोसादच्या स्थापनेपर्यंतचा प्रवास अत्यंत वाचनीय आहे.परंतु पुस्तकाला मूळ सुरवात होते 'मोसादच्या कारवायांपासून (Operations), जो या पुस्तकाचा मूळ गाभा आहे. पुढे तब्बल २६ ऑपरेशन्सचा प्रवास वाचताना वाचक नक्कीच थक्क होतील अशी पंकज यांची लेखनशैली. ऑपरेशन थीफ, ऑपरेशन इंजिनियर , ऑपरेशन टायगर क्लब, ऑपरेशन ओपेरा अशा प्रचंड थ्रीलर प्रवासात मोसादबद्दल प्रचंड आदर मनात तयार होतो.
__________________________________
पुस्तकातील एका ऑपरेशनचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे 'ब्लैक सप्टेंबर विरुद्ध मोसाद' , १९७२ साली ऑलंपिक खेळांचे आयोजन जर्मनीतील 'म्युनिक' शहरात करण्यात आले होते. यात इस्राईल खेळाडूंचादेखील सहभाग होता. इस्राईलला कट्टर शत्रू मानणाऱ्या पेलेस्टाइन दहशदवादी संघटना 'ब्लैक सप्टेंबर' ने २२ इस्राईल खेळाडूंवर आक्रमण करून त्यांना ओलीस ठेवले , काहींना ठार मारले.संपूर्ण देश या घटनेने हळहळला. परंतु काही दिवसातच मोसादने या घटनेच्या सूत्रधारांची यादी केली. तब्बल १० वर्षात या संघटनेशी संबधित एकेकाला यमसदनी धाडले आणि संपूर्ण जगात मोसादबद्दलचा आदरपूर्वक दबदबा प्रचंड वाढला.
काही पुस्तकं अशी असतात की, वाचायला हातात घेतल्यावर पूर्ण होईपर्यंत ठेवावीशी वाटत नाहीत. अशाच काही पुस्तकांपैकी एक 'इस्राईलची मोसाद' नक्कीच संग्रही असावे.
( मिपा वर माझा हा पहिलाच प्रयत्न , चूकभूल द्यावी घ्यावी )
-सटकाजी

वाचने
6263
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुस्तकपरिचय लिहिण्याचा चांगला
++११
In reply to पुस्तकपरिचय लिहिण्याचा चांगला by एस
चरफडः मोस्सादचा नवा भाग घेऊन बोकाशेठ कधी येणार काय माहित..
In reply to ++११ by पुंबा
पंकज कालुवाला
हम्म
आवडले
मिपावरील पहिलं लेखन आहे
सद्ध्या हे पुस्तक वाचत आहे.
मोसाद हे चांगले आहेच
भारतीय गुप्तचर यंत्रणा
In reply to मोसाद हे चांगले आहेच by जेम्स वांड
+१०,०००
In reply to भारतीय गुप्तचर यंत्रणा by एस
सिक्कीम विलिनीकरण ही पण एक
In reply to +१०,००० by जेम्स वांड