✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आधुनिक दृष्टिकोनातून रामायण

स
स्वीट टॉकरीणबाई यांनी
Fri, 03/23/2018 - 15:20  ·  लेख
लेख
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात ज्या आप्पांचा (माझ्या सासर्यांचा) उल्लेख आहे त्यांनी गेल्या महिन्यात ASCOP साठी एक लेख लिहिला होता. 'आधुनिक दृष्टिकोनातून रामायण'. तो मी इथे पोस्ट करीत आहे. पण त्या आधी थोडी प्रस्तावना. आप्पा आता सत्त्याण्णव वर्षांचे झाले आहेत पण तोच उत्साह आणि स्पष्ट विचारशक्ती तशीच कायम आहे. माझ्यासारख्या साधारण वाचकांनी वाचलेल्या व ऐकलेल्या रामायणात बर्याच उपकथा आहेत. मात्र मूळ संस्कृत रामायणात काय लिहिलेलं आहे हे आपल्या पैकी फारच थोड्या जणांना माहीत असेल. माझ्या सासूबाई (आई) संस्कृत पंडिता. सासरे (आप्पा) यांचं संस्कृत अतिशय उत्तम. दोघांनी मिळून मूळ संस्कृतमधलं वाल्मीकि रामायण वाचलं. हे मूळ रामायण आहे की नाही याबाबत संस्कृत विद्वानांमध्ये वाद नाही त्या अर्थी तेच मूळ असं मी समजते. (आपल्यासारख्या ज्यांना संस्कृत अजिबात वाचता येत नाही त्यांच्यासाठी देखील ते उपलब्ध आहे. त्याचं मूळ संस्कृत काव्य व वाक्य बाय वाक्य मराठीत अनुवाद 'विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे' यांनी प्रकाशित केला आहे.) वाचकांच्या प्रतिक्रिया मी आप्पांपर्यंत पोहोचवीनच आणि त्यांचं स्पष्टीकरण तुमच्यापर्यंत. आधुनिक दृष्टिकोनातून रामायण आधुनिक दृष्टिकोनातून रामायणाचा विचार करायचा म्हणजे शास्त्रीय दृष्टीनं. धार्मिक अगर श्रद्धाळू दृष्टीनं विचार करतांना कोणत्याही व्यक्तीच्या विशिष्ट कृतीवर अगर एखाद्या घटनेवर “असं का?” असा प्रश्न विचारता येत नाही किंवा त्याची योग्यायोग्यता ठरवता येत नाही. फक्त शास्त्रीय दृष्टिकोनांत हे स्वातंत्र्य आपल्याला मिळू शकतं. रामायणाबद्दल पहिला प्रश्न हा आहे की हा इतिहास आहे की वाल्मीकि ऋषींच्या अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेली कथा आहे? अर्थात हा इतिहास असो अथवा कल्पित कथा असो, त्यामध्ये त्या काळच्या राजे लोकांचं, तसंच सामान्य लोकांचं जीवन वास्तववादी पद्धतीनं रंगवलेलं आहे. त्या काळच्या समाजपद्धती, धार्मिक प्रथा, रूढी अशा सर्व गोष्टींवर उत्तम प्रकाश टाकलेला आहे. असं सर्व असूनही वाल्मिकींनी ती अत्यंत रंजक केलेली आहे. साहित्यिक कृति म्हणूनही तिच्याकडे पाहिलं तरी सर्व जगातल्या विद्वानांनी तिला वाखाणलं आहे. त्या कथेत मनुष्यस्वभावाचे विविध कंगोरे पहायला मिळतात. प्रेम, द्वेष, राग, लोभ, तिरस्कार अशा विविध अगदी टोकाच्या भावना बघायला मिळतात. शास्त्रीय दृष्टीनं बघायचं तर अयोध्येपासून लंकेपर्यंतच्या भूगोलाचं आणि त्यांत राहणार्या वेगवेगळ्या समाजांचं सविस्तर चित्र लेखकानं कसं रंगवलं याचं आश्चर्य वाटतं. कारण त्याकाळी सर्वत्र वन पसरलेलं, रस्ते नाहीत, दळणवळणाची कोणतीही साधने नाहीत, एकट्यादुकट्यानं प्रवास करणं अत्यंत धोक्याचं, अशा सर्व अडचणींवर मात करून राम, सुग्रीव व त्याचे वानरसैन्य यांच्या मदतीनं समुद्रावर सेतू बांधून लंकेत जाऊन रावणाचा वध करून सीतेला सोडवतो हे सर्व चित्र विलक्षण आहे यात शंका नाही. रामायणाची कथा सर्वांनाच उत्तम माहीत आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलण्याची गरज नाही. पण त्यातल्या विविध घटना आणि विविध व्यक्तिमत्वं ही मात्र अभ्यासण्यासारखी आहेत. पहिली कथा त्रटिकेची : विश्वामित्र ऋषी रामलक्ष्मणाला घेऊन वनातून जात असतांना पहिली गाठ त्राटिकेशी पडते. त्राटिका ही राक्षसीण अत्यंत सामर्थ्यवान आणि भयंकर जुलमी. तिनं वनावर पूर्ण ताबा मिळविलेला. तिला तोंड द्यायची कोणाचीही छाती नव्हती. पण राम धनुर्विद्येत अत्यंत पारंगत आणि बलवान म्हणून तिला ठार मारू शकत होता. तरीसुद्धा वीर पुरुषांनी स्त्रीला ठार मारायचं नाही हा दंडक. अशा वेळेला विश्वामित्र ऋषी रामाला सांगतात की ही स्त्री असली तरी समाजाची अत्यंत घातक शत्रू आहे. तिचा नाश करण्यात पाप नाही. याचा अर्थ असा की “कोणतेही तत्व पालन करतांना ते समाजाच्या कल्याणाच्या आड येत असेल तर त्याचा वेगळा विचार करावयाचा” असं ऋषी सांगतात. तत्वाचे अवडंबर माजविणार्या लोकांना हे उत्तम उत्तर आहे असं म्हणावंसं वाटतं. श्रावणाची कथा: श्रावण हा ब्राम्हण नव्हता. व तो अंध आई वडिलांना कावडीत घालून काशीला जायला निघाला नव्हता. हा ऋषी होता व तो एका तळ्याच्या काठी आपल्या अंध आईवडिलांना घेऊन रहात असे. तो तपश्चर्या करीत असे. याचे वडील वैश्य व आई शूद्र होती. असे आंतरजातीय विवाह समाजाला मान्य होते असे दिसते. कारण अशा आंतराजातीय विवाहातून जन्मलेल्या मुलाला म्हणजे श्रावणाला तपश्चर्या करण्याचा अधिकार मिळालेला होता. आज मात्र अशा विवाहितांना कित्येक वेळेला समाजाच्या बहिष्काराला (उघड अगर गुप्त) अगर क्वचितप्रसंगी मृत्यूला सुद्धा तोंड द्यावं लागतं. तेव्हा सुधारलेले कोण? तेव्हांचे की आजचे - असा प्रश्न पडतो. सर्वसाधारणपणे समाजात गाजलेली कथा अहिल्येची. (तिला सती अहिल्या असंही कधीकधी संबोधलं जातं.) या अहिल्येला “अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्यान् स्मरेन् नित्यम्” म्हणजे आदरणीय व पवित्र स्त्रियांच्या यादीत तिला बसवण्यात आलेलं आहे. तिची खरी कथा काय आहे? अहिल्या ही एक असाधारण सुंदर तरूण स्त्री. तिचे पती गौतम ऋषी हे एकदा नदीतीरी स्नानाला गेलेले असतांना इंद्र गौतम ऋषींचं रूप घेऊन अहिल्येकडे येतो व मला तुझ्याशी संग करण्याची इच्छा आहे असं सांगतो. हा गौतम ऋषी नसून इंद्र आहे हे अहिल्येच्या लक्षात येतं पण तरीही देवराजाशी रत होण्याचा मोह तिला पडतो आणि ती त्याला संमती देते. समागम झाल्यानंतर “मी कृतार्थ झाले” असं समाधान व्यक्त करते म्हणजे हे आपण काही पापकर्म करतो आहोत असं तिला वाटत नाही. इतकंच नाही तर हे गौतम ऋषींना समजू नये म्हणून इंद्राला “तू आता इथून जा” असे सांगते. पण तिच्या व त्याच्या दुर्दैवाने इंद्र पळून जाण्याच्या आतच गौतम ऋषी परत येतात. काय घडलं हे त्यांच्या लक्षांत येतं, व ते त्या दोघांनाही शाप देतात. अहिल्येला ते “याच आश्रमांत तू वायू भक्षण करून अदृष्य व निराहार अशी राहशील, राम वनात येईल त्यावेळी तुझा उद्धार होईल” असा शाप देतात आणि हिमालयात तपश्चर्येकरता निघून जातात. मात्र सर्वसाधारण समजूत आहे त्याप्रमाणे “तू शिळा होशील” असा शाप तिला देत नाहीत. वास्तविक अहिल्येने व्यभिचाराचं पाप केलं होतं आणि ते आपल्या पतीपासून दडवण्याचाही प्रयत्न केला होता. असं असूनही गौतम ऋषींनी तिला मर्यादित काळापर्यंतचीच शिक्षा दिली आणि नंतर तिचे समाजात पुनर्वसन व्हावे अशी व्यवस्था केली. तिला आयुष्यातून उठवलं नाही. आजचा समाज अशा स्त्रीकडे अशा उदार दृष्टीने पाहील का? दुसरी गोष्ट. अहिल्यामध्ये असा कुठला गुण होता की ज्याकरता तिला “पंचकन्यान् स्मरेन् नित्यम्” या यादीत बसवावी? रामायणातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे सुग्रीव. सुग्रीव हा वानरांचा राजा. त्याची त्याच्या वानरसेनेवर अत्यंत जरब होती असं दिसतं. सीतेच्या शोधाकरिता वानरांचे वेगवेगळे गट करून त्यानं चारही दिशांना पाठवले होते. त्यात हनुमान, जांबुवंत वगैरेंचा गट दक्षिण दिशेला पाठवला होता. त्या गटानं सारी दक्षिण दिशा पालथी घातली तरी त्यांना सीतेचा शोध लागला नव्हता. शेवटी निराश होऊन दक्षिण किनार्यावर ते बसले असतांना त्यांच्यात बोलणं निघालं की सीतेचा शोध न लावता आपण परत गेलो तर सुग्रीव आपणां सर्वांना ठार मारील. तेव्हा परत जाण्याऐवजी आपण इकडेच जीव देऊ. हनुमान, जांबुवंत यांच्यासारख्यांची ही स्थिती. यावरून सुग्रीवाची सर्व सैन्यावर किती जरब होती हे दिसून येते. अर्थात त्या गटाच्या सुदैवाने तिथे जटायूचा भाऊ संपाती त्यांना भेटला. त्यानं त्यांचं आपसातलं बोलणं ऐकलं आणि त्यानंच रावणानं सीतेला पळवून लंकेत नेऊन ठेवल्याची माहिती त्यांना दिली. ती महिती मिळाल्यामुळे हनुमान लंकेत गेला व सीतेला प्रत्यक्ष भेटून तिची माहिती घेऊन आला. पण या गटाला जर संपाती भेटला नसता तर ते परत सुग्रीवाकडे जायला भीत होते हे उघड आहे. असा हा सुग्रीव. त्याची बायको तारा वालीनं पळविली होती त्यामुळे त्याची व रामाची समस्या एकच होती. रामाची व सुग्रीवाची भेट होण्याला कारण एक कबंध ठरला. राम लक्ष्मण अरण्यातून प्रवास करीत असतांना कबंध त्या दोघांवर धावून गेला म्हणून रामानं बाण मारून त्याला ठार केलं. त्याला जाळून टाकतांना त्यातून एक सुंदर पुरुष बाहेर पडला व त्यानं रामाला “सुग्रीवाची व तुझी समस्या एकच आहे म्हणून तू सुग्रीवाला भेट” असा सल्ला दिला. मग रामाची सुग्रीवाशी भेट झाली तेव्हां रामानं वालीला मारण्याचं वचन सुग्रीवाला दिलं आणि सुग्रीवानं सीतेला शोधून काढण्याचं. वाली हा प्रचंड शक्तिमान असल्याचं सुग्रीवानं रामाला सांगितलं तेव्हा रामानं एका प्रचंड राक्षसाचं शरीर वनात पडलेलं होतं ते आपल्या पायाच्या अंगठ्यानं उचलून कित्येक योजनं दूर फेकून देऊन सुग्रीवाची आपल्या सामर्थ्याविषयी खात्री करून दिली होती. त्या दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे, सुग्रीवानं वालीला आव्हान देऊन द्वंद्वयुद्धाला बोलावलं. त्यांचं युद्ध चालू असतांना रामानं झाडाआड उभं राहून वालीला बाण मारला व तो खाली पडला. तो मरणासन्न असतांना त्यानं रामाला विचारलं “तू स्वतःला न्यायी राजा समजतोस. मी सुग्रीवाशी युद्धात गुंतलेला असताना तू झाडाआडून मला बाण मारलास हा न्याय झाला का? आणि मी तुझा काय अपराध केला होता म्हणून तू मला मारावंस?” त्यावर उत्तर म्हणून “तू सुग्रीवाची बायको पळविलीस म्हणून मी तुला शिक्षा केली. सुग्रीवानं मला मदत मागितली म्हणून मी तुला मारलं. शिवाय मी माणूस आहे व तू वानर म्हणजे पशू आहेस. माणसाला पशूंची शिकार करण्याचा हक्क आहे. त्यामुळे मी तुला मारण्यात अन्याय केला असं होत नाही.” हे त्याचं उत्तर न्यायाच्या निकषावर टिकणारं नाही आणि हा रामाच्या चारित्र्यावर एक डाग आहे असेच म्हणायला पाहिजे. रामानं वालीला मारल्यामुळे सुग्रीवाला आपली बायको परत मिळाली. त्याचं काम झालं. त्यानं आता रामाला मदत करावयाची. पण आता पावसाळा सुरू होत आहे त्यामुळे रावणाविरुद्धची मोहीम आता आपल्याला सुरू करता येणार नाही असं सांगून सुग्रीव रामाच्या संमतीनं आपल्या राजधानी - किष्किंधेला परत गेला. तिकडे तो आपल्या बायकांच्यात इतका रमला की पावसाळा संपला तरी रामाकडे जाण्याचं तो पूर्ण विसरून गेला. शेवटी रामानं लक्ष्मणाला त्याला बोलावण्याकरता त्याचेकडे पाठवलं. त्यावेळचा प्रसंग लक्ष्मण, सुग्रीव व सुग्रीवची पत्नी तारा या तिघांच्या स्वभावावर उत्तम प्रकाश टाकणारा आहे. लक्ष्मण स्वभावानं अत्यंत संतापी. पूर्वी दशरथानं रामाला चौदा वर्षे वनवासात पाठवायचं ठरवलेलं त्याच्या कानावर गेलं तेव्हा तो दशरथाला ठार करायला निघाला होता. रामानं त्याला वाटेत अडवून शांत केलं होतं. आता सुग्रीवच्या वर्तनाचा त्याला राग आला होता. तो सुग्रीवाला बोलवायला गेला त्यावेळी सुग्रीव आपल्या बायकांच्यात पूर्ण रमून गेला होता. लक्ष्मण आला आहे ते कळताच तो खूप घाबरला. आपण रामाला दिलेलं वचन मोडल्याची त्याला आठवण झाली. लक्ष्मण संतापी आहे, आता तो आपलं काय करील कोणास ठाऊक! अशी भीती वाटून तो स्वतः बाहेर न येता त्यानं आपल्या पत्नीला - ताराला “ बाहेर पाठवलं. तारानं बाहेर येऊन लक्ष्मणाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तिनं त्याला मुत्सद्दी सल्ला दिला. “अरे लक्ष्मणा, माणसंसुद्धा दिलेलं वचन विसरतात. सुग्रीव हा तर वानर आहे. तो विसरला तर त्यात आश्चर्य काय? पण तो आता जागा झाला आहे. तो तुमचं काम करील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव. सुग्रीवाजवळ असंख्य वानरांची फौज आहे. त्याच्या मदतीशिवाय तुम्हाला सीतेला शोधून काढता येणार नाही. त्यामुळे तू त्याच्याशी सबूरीनं बोल. त्याला एकदम टाकून किंवा रागावून बोलू नकोस.” लक्ष्मणाला शांत केल्यानंतर सुग्रीव व लक्ष्मण रामाकडे गेले. त्यानंतर सुग्रीव आपल्या वानरांना चारी दिशांना पाठवतो त्यावेळी तो विविध बेटांचं वर्णन करतो व तिथे काय काळजी घ्यावयाची याच्या सुचना आपल्या वानरांना देतो. त्यानं वानरांना पाठवलं त्यात जावा, सुमात्रा, जंबुद्वीप या आजच्या नावांचा उल्लेख येतो. त्यावेळी राम त्याला विचारतो, "या आर्यावर्ताच्या बाहेरच्या बेटांची इतकी सविस्तर माहिती तुला कशी?" त्या वेळी सुग्रीव रामाला सांगतो की ज्यावेळी वालीचं आणि त्याचं भांडण झालं आणि वाली त्याच्या मागे लागला त्यावेळी तो या बेटांवरून त्या बेटावर पळत होता त्यावेळी त्याला या बेटांची व प्रदेशाची माहिती झाली. आपल्याला आज आश्चर्य वाटतं की ही जर कल्पित कथा असेल तर वाल्मीकि ऋषींना या सर्व भागाची इतकी सविस्तर माहिती कशी? त्यानंतर हनुमान सीतेला शोधून काढतो. त्यानंतरच राम वानरांचं सैन्य घेऊन रावणाच्या लंकेवर हल्ला करायचे ठरवतो आणि त्याप्रमाणे सर्व वानरसेना भारताच्या दक्षिण दिशेला प्रवासाला निघते त्या वेळी रामानं या प्रवासात सर्व सैन्याची कशी काळजी घ्यायची, रात्रीच्या वेळी कांही वानरांना पहार्याच्या कामावर ठेवावयाचे, रावणाचे हेर आजूबाजूला फिरतील त्यांच्यापासून सावध राहाणं इत्यादी अत्यंत वास्तववादी सूचना व अर्वाचीन इतिहासात सैन्य इकडून तिकडे जात असताना काय काय करावं लगलं असेल याची वास्तववादी जाणीव करून देणारा आहे. सेना समुद्रापर्यंत आली. आता समुद्र कसा पार करावयाचा हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी आपल्यामध्ये नल नावाचा वानर आहे व तो सेतू बांधण्यातला तज्ञ आहे असे वानरांनी रामाला सुचवले. त्याप्रमाणे सर्व वानरांनी झाडं, शिळा, दगड इत्यादी साधनं गोळा करून नलाला आणून दिली व त्यानं त्यांच्या सहाय्यानं सेतू बांधला. आता हे सर्व प्रत्यक्षात कसं घडलं असेल? भारत व लंका हे दोन जमिनीचे प्रदेश एकमेकाच्या खूपच जवळ, त्यांचे मध्ये जरी समुद्र दिसत असला तरी या दोन जमिनींना पाण्याखालून जोडणारा जमिनीचा उथळ भाग असणार ह्याची शक्यता खूपच आहे. त्याचा नलाला सेतू बांधताना उपयोग झाला त्यामुळे पाण्यात दगड तरंगले वगैरे आख्यायिकात काही अर्थ नाही. विशेष म्हणजे खुद्द वाल्मीकि रामायणांत दगड पाण्यावर तरल्याचा उल्लेख कुठेही नाही. हल्ली हल्ली काही लोकांनी या समुद्रात मधे उभं राहून फोटो काढून ते प्रसिद्ध केले आहेत. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवर काहीही होऊ शकतं. त्याबद्दल न बोलणं बरं. राम रावणाचं युद्ध संपतं. रामाच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मण अशोकवनातून सीतेला घेऊन येतो. त्यानंतर राम सीतेला म्हणतो, "मी रावणाला शिक्षा केली. त्याच्या कैदेतून तुला सोडवलं. पण तू परपुरुषाकडे राहिलेली असल्यामुळे तुझ्या पावित्र्याबद्दल खात्री देता येत नाही. तेव्हा तू हवं तिकडे जाऊ शकतेस." हे शब्द कानावर पडताच सीतेला काय वाटलं असेल? तिच्या कोणत्या अपराधाकरता तिला ही शिक्षा मिळावी? राम रावणाला मारील, आपल्याला त्याच्या कैदेतून सोडवील आणि आपण रामाबरोबर आनंदानं अयोध्येला जाऊ अशा कल्पनेत असलेल्या सीतेवर हे शब्द अगदी वज्रासारखे कोसळले असतील. तिनं अग्निप्रवेश करायचं ठरवलं पण अग्निनं स्वतःच रामाला ग्वाही दिली की "सीता पवित्र आहे. तू तिचा स्वीकार कर." पुराणकाली स्त्रियांना फार मानानं वागवलं जात असे असा काही लोकांचा दावा आहे. ते अजिबात खरं नाही. सीतेसारखीला ही वागणूक, मग सामान्य स्त्रियांचं काय? अग्नीच्या आश्वासनामुळे सीतेचा स्वीकार झाला व ती बहुमानानं अयोध्येला गेली खरी. पण पुन्हा अयोध्येच्या नागरिकांत कुजबूज सुरू झाली. रामानं एका धोब्याचं बोलणं ऐकलं. धोबी म्हणाला, "माझ्या बायकोच्या चरित्र्याबद्दल मला शंका आली म्हणून मी तिला घराबाहेर काढली. सीता तर इतके महिने रावणाच्या कैदेत राहिलेली. रामानं तिचा परत कसा स्वीकार केला?" हे ऐकून राम पुन्हा अस्वस्थ झाला. शेवटी त्यानं लक्ष्मणाला सांगितलं, "हिला वनांत सोडून ये. मला जास्त काही विचारू नकोस." लक्ष्मणानं त्याप्रमाणे सीतेला वनात नेऊन सोडलं. सीतेला जाताना कल्पनाही दिली नव्हती. त्यामुळे तिला लक्ष्मणानं वनात सोडल्यावर तिचा धीरच सुटला. तिनं लक्ष्मणाला विचारलं, "या भयंकर अरण्यात मी एकटी कुठे जाऊ?" लक्ष्मणाकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्यानं तिला सोडतांना इतकीच काळजी घेतली होती की तिला त्यानं वाल्मीकि ऋषींच्या आश्रमाच्या अगदी जवळ सोडलं, हेतू हा की आश्रमात जे कोणी असतील ते तिला आत घेऊन जातील आणि ती सुरक्षित राहील. आणि तसंच झालं. वाल्मीकींचा एक शिष्य बाहेर आला असतांना त्यानं तिला पाहिलं आणि तो तिला आश्रमांत घेऊन गेला. त्यावेळी सीतेला दिवस गेलेले होते याचाही रामानं विचार केला नाही. थोड्याच दिवसांत लव आणि कुश तिच्या पोटी जन्माला आले. आश्रमात सीतेचे पुत्र लहानाचे मोठे झाले. वाल्मीकींनी त्यांना सर्व तर्हेचं शिक्षण दिलं. त्याच काळात त्यांचं रामायण काव्य लिहून पुरं झालं होतं. ते त्यांनी त्या मुलांच्याकडून पाठ करून घेतलं व उच्च स्वरांत (आपल्याकडे पोवाडे गातात तसे) म्हणायला शिकवलं. मग त्यांना ते गाण्याकरिता अयोध्येला पाठवलं. हेतु हा होता की राम स्वतः ते केव्हातरी ऐकेल. त्याप्रमाणे रामानं एक दिवस ते ऐकलं. ‘ती मुलं कोण?’ असं विचारलं. पण वाल्मीकि ऋषींनीं पढवल्याप्रमाने आपण रामाचीच मुलं आहोत हे त्यांनी रामाला सांगितलं नाही. रामानं त्यांना ते काव्य राजदरबारात म्हणायला सांगितलं. सगळ्या दरबारानी ते ऐकलं. तेच जगप्रसिद्ध 'रामायण'. आप्पा गोडबोले
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
मत

प्रतिक्रिया द्या
44695 वाचन

💬 प्रतिसाद (122)

प्रतिक्रिया

ओके

दीपक११७७
Sun, 03/25/2018 - 12:32 नवीन
ओके, पण लक्ष्मण रेषा हे वाक्य खुप प्रचलित आहे असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

धन्यवाद गा.पै.

गवि
Sun, 03/25/2018 - 09:24 नवीन
धन्यवाद गा.पै. खालील भाग:
प्रबळ रामसेवक हनुमान आल्यावर तिने टोपी फिरवली, असा आरोप करता येऊ शकतो. तो नाहीसा करण्यासाठी रामाने रावणास ठार मारणं जरुरी होतं.
प्रबळ रामसेवक आल्यावर त्याच्यासह परत येणं हे टोपी फिरवणं असेल तर प्रत्यक्ष श्रीराम आल्यावर आणि रावणाचा युद्धाने पाड़ाव केल्यावर त्यांच्यासह परत येणं यात टोपी फिरवणे असा संशय का नाही? म्हणजे आता इलाजच राहिला नाही, यावंच लागलं असा भाव नाही का येणार? उलट हनुमानासोबत आली असता पहिल्या संधीत दुष्ट रावणापासून सुटका करुन घेतली, अर्थात रावणाकडे राहण्याची अजिबात इच्छा नव्हती उलट सुटकेसाठीच आतुर होती असं दिसलं असतं. तुम्ही म्हटलेलं लॉजिक उलट असं दर्शवतं की शक्यतो (म्हणजे खुद्द श्रीराम येईपर्यंत) परतायची इच्छा नव्हती. जर तुमचं उपरोक्त लॉजिक अचूक असेल तर तो संशय कोणालाही येऊ नये अशी काळजी घेऊन श्रीरामांनी हनुमानाला मुळात पाठवलेच नसते. असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

छान

manguu@mail.com
Sun, 03/25/2018 - 09:07 नवीन
रामाला सेतू बांधावा लागला. रावण , शूर्पणखा व इतर राक्षस ये जा कसे करत होते ?
  • Log in or register to post comments

रावणाचा मायावी रथ उडायचा ना?

अभिजीत अवलिया
Sun, 03/25/2018 - 11:11 नवीन
रावणाचा मायावी रथ उडायचा ना? शूर्पणखा व इतर राक्षस कसे ये जा करायचे ते माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

मिपाकरांच्या , रामायणावरील

सस्नेह
Sun, 03/25/2018 - 10:48 नवीन
मिपाकरांच्या , रामायणावरील बालसुलभ शंका वाचून वारल्या गेले आहे =))
  • Log in or register to post comments

का?

इरसाल
Tue, 03/27/2018 - 15:31 नवीन
इतक्या सगळ्या वारल्या कुठे गेल्या? वारली डिजाईन काढायला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आधुनिक दृष्टिकोनातून शंका

मार्मिक गोडसे
Sun, 03/25/2018 - 11:04 नवीन
आधुनिक दृष्टिकोनातून शंका विचारल्या गेल्या आहेत.
  • Log in or register to post comments

मुळात रामायण हे काल्पनिकच

प्रचेतस
Sun, 03/25/2018 - 11:37 नवीन
मुळात रामायण हे काल्पनिकच समजावे, त्यातील गोष्टी उत्कृष्ट फँटसी कथा म्हणून वाचल्या तर असल्या शंका येत नाहीत. महाभारत मात्र इतिहास असू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

काल्पनिक कथा नसून सत्य आहे

सतिश गावडे
Sun, 03/25/2018 - 11:49 नवीन
काल्पनिक कथा नसून सत्य आहे रामायण, हे फोटो सिद्ध करतात सत्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जटायू पक्षी टाकेद (इगतपुरी)

मार्मिक गोडसे
Sun, 03/25/2018 - 12:16 नवीन
जटायू पक्षी टाकेद (इगतपुरी) येथे जखमी अवस्थेत रामाला आढळला व त्याने रावण सीतेला घेवून कोणत्या मार्गाने गेला ह्याचे मार्गदर्शन केले व तेथेच प्राण सोडला असताना लेपाक्षी मंदिर जटायू जेथे पडला त्याठिकाणी बांधले ,हे कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हे तुम्ही दिव्य मराठीच्या वेब

सतिश गावडे
Sun, 03/25/2018 - 12:32 नवीन
हे तुम्ही दिव्य मराठीच्या वेब आवृत्तीला पत्र पाठवून विचारु शकता. वरच्या प्रतिसादात "shared as it is" हा इशारा लिहायचा राहीला त्याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

काल्पनिक कथा नसून सत्य आहे

गवि
Sun, 03/25/2018 - 12:20 नवीन
काल्पनिक कथा नसून सत्य आहे रामायण, हे फोटो सिद्ध करतात सत्य
पूर्वीच्या इंडिया टीव्हीची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

महाभारत मात्र इतिहास असू शकतो

पगला गजोधर
Sun, 03/25/2018 - 12:19 नवीन
महाभारत मात्र इतिहास असू शकतो.
माझ्यामते महाभारत रामायण इतिहास असूच शकत नाही. व्यास नामक क्रिएटिव्ह रायटर ने "जय" नामक साहित्य तयार केले. तत्कालीन बेस्टसेलरच म्हणाना जणू. आणि आज सुपरहिट कलाकृती चे काय होते, ती सुपरहिट झाल्यावर?? तिचे पार्ट 2, 3....निघतात. किंवा स्पिनऑफ निघतात, किंवा प्रिल्युड निघतात... लॉर्ड ऑफ रिंगस => हॉबीट, पायरेट्स ऑफ कॅरेबियन..... खूप उदा देता येतील. त्याप्रमाणे जय मध्ये अनेक अपेंडीक्स प्रक्षेपित झाले, त्याचे अनेक स्पिन ऑफ निघाले असतील, वेग वेगळी व्हर्जन्स निघाली असतील....त्या सर्वांचे कंसॉलिडेशन, म्हणजे आजचे महाभारत... लिहीणार्या माणसाने समजा तत्कालीन शहरांची नावे जशीच्या तशी त्याच्या कथेत वापरली (उदा. एका चित्रपट दाखवतो की न्यू यॉर्क शहरात एलियन्सने हल्ला केला), तर 1000 वरश्यानी, कोण्या एका काळी न्यू यॉर्क शहर होते, आणि या कथेत त्या शहाराबाबत उल्लेख आहे म्हणून तो इतिहास आहे, असा दावा केला तर्, हस्तभालयोगमुद्रा करावी लागेल. रामायणाचा लेखक कदाचित भारतभर फिरला असेन, एखाद्या सागरी बंदराजवळ त्याची धर्मशाळा असेल, अनेक पूर्व व दक्षिण प्रदेशांशी व्यापार करणारे नाविक त्याच्या संपर्कात आलेली असतील, त्यांच्याकडून त्याला वेगवेगळ्या देशाबद्दल प्रदेशाबद्दल समुद्रबद्दल माहिती मिळाली असेल, ती त्याने त्याच्या कथा रचनेत फिट केली असेल... म्हणून काय रामायण व महाभारत या उपखंडात इतिहास म्हणून होऊ शकत नाही... बाकी इतिहास हा घटना झाल्यावर, तत्कालीन पत्रव्यवहार, शिलालेख, राजपत्रे , उत्खनन वै होऊन लिहिला जात असावा.... इथे तर व्यास एकरकमी सर्व कथा डिक्टेट करताना दिसतात, गणपती बिचारा खाली मान घालून शॉर्टहँड प्रकारचे डिक्टेशन घेत आहे.... कसा असू शकतो इतिहास ????? रामायण महाभारत या साहित्याला, बहुजनांच्या माथी इतिहास / संस्कृती म्हणून थोपवण्याचे कारस्थान अनेक शतके होत आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुम्ही तुमच्याच समजात आनंदाने

प्रचेतस
Sun, 03/25/2018 - 12:34 नवीन
तुम्ही तुमच्याच समजात आनंदाने राहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

धाग्याच्या विषय कोणताही असला

श्रीगुरुजी
Sun, 03/25/2018 - 14:47 नवीन
धाग्याच्या विषय कोणताही असला आणि आपल्याला त्यात काहीही गम्य नसले तरीही तिथे जाऊन त्याच त्याच पिचका-या टाकण्याच्या आपल्या कौशल्याला व सातत्याला सलाम! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

आज श्रीराम नवमी आहे

धर्मराजमुटके
Sun, 03/25/2018 - 11:58 नवीन
आज श्रीराम नवमी आहे. सगळ्यांना श्रीराम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

मी तर् असेही वाचलंय,

पगला गजोधर
Sun, 03/25/2018 - 12:54 नवीन
मी तर् असेही वाचलंय, भारताचा बौद्धधर्मीय सम्राट अशोक यांचा पणतू (बहुदा पणतूच, पण चू भू दे घे) हा राजसिंहासनावर होता (तो काही आपल्या पणजोबा सारखा हुशार व सावध व पराक्रमी नसावा), त्याला त्याच्याच वैदिक ब्राम्हण धर्मीय सेनापती, पुष्यमित्र शुंग याने, छद्मीपणे सैन्य संचलन कार्यक्रमात हत्या करून , (इजिप्तच्या अन्वर सादात यांची आठवण होते का ?)स्वतः स राज्य घेतले. इतर सरदार व जनतेस, मागील काही वर्षे जो अनागोंदी कारभार चालला होता, त्याचा बंदोबस्त करतो, असे सांगुन त्यांचा पाठिंबा मिळवला, (काही जणांना कर्तृत्ववान नेहरू व पणतू राहुल आणि साध्याला भारतातील एक प्रसिद्ध गुजराती मनुकश्य, यांची आठवण झाली तर् निव्वळ योगायोग समजावा) असो एकदा सत्ता हातात आल्यावर पुष्यमित्रने, कठोरपणे नॉन-वैदिकब्राम्हण, यांना दाबून दडपून, त्यांनी पुन्हा डोके वर काढू नये मगणून अनेक योजना राबविल्या) मनुस्मृतीची निर्मिती किंवा प्रसिद्धी याच कालावधी आसपास आहे, असे काहींचे मत आहे. असो पुष्यमित्रने वैदिक ब्राम्हण धर्माच्या प्रसाराठी जे योगदान दिले, त्याचा परतावा म्हणून, पुष्यमित्र ला केंद्र स्थानी ठेवून एका साहित्याची रचना केली गेली ती म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित आहे.
  • Log in or register to post comments

तुम्हाला प्रत्येक ठिकाणी

प्रचेतस
Sun, 03/25/2018 - 13:34 नवीन
तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ब्राम्हण, नॉन ब्राम्हण असा जातीयवाद काढायला आनंद होतो असे दिसते तेही पुराव्यांशिवाय. मिपा मालक, मिपा संपादक वरील विधानांची दखल घेतील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

महाभारत हा इतिहास आहे, याचा

पगला गजोधर
Sun, 03/25/2018 - 13:55 नवीन
महाभारत हा इतिहास आहे, याचा पुरावा , वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

स्वतः व्यासांनीच ग्रंथारंभी

प्रचेतस
Sun, 03/25/2018 - 14:09 नवीन
स्वतः व्यासांनीच ग्रंथारंभी लिहिलेलं आहे की हा 'जय नावाचा इतिहास आहे'. वैशंपायनांनी त्याचे भारत व तदनंतर सौतीने त्यात अजून भर टाकून त्याचे महाभारत केले. अर्थात हे केवळ तिघांनीच केले असेही नव्हे, इतरांनीही भर घालत आजचे महाभारत आकाराला आले. महाभारताच्या क्रिटिकल प्रतीने त्याचा काळ जास्तीतजास्त इस १० व्या शतकापर्यंत आणून ठेविला आहे. हा काळ म्हणजे ह्या प्रतितली भर ही जास्तीत जास्त १० व्या शतकापर्यंत घातली गेली ह्याची सिद्धता. मूळ कथा बुद्धपूर्वकालीन आहे ह्यात काहीच शंका नाही कारण तत्कालीन साहित्यात महाभारतातील काही वर्णने आहेत. मात्र भारतीय युद्ध झाले असावे ह्याला पुरातत्वीय पुरावा नाही (शिलालेख, नाणी वगैरे) मात्र मौखिक परंपरा आणि भौगोलिक पुरावा भरपूर आहे. स्थळ काळाचे वर्णन अतिशय अचूक आहे अर्थात त्यात काही त्रुटी आहेतच. त्याचमुळे महाभारताची मूळ कथा हा इतिहास असावा ह्यात निश्चितच तथ्य आहे. तुम्ही मात्र नीट चर्चा न करता जातीयवाद जाणूनबुजून घुसडत आहात असे खेदाने म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

तुम्ही मात्र नीट चर्चा न करता

शलभ
Sun, 03/25/2018 - 14:40 नवीन
तुम्ही मात्र नीट चर्चा न करता जातीयवाद जाणूनबुजून घुसडत आहात असे खेदाने म्हणावेसे वाटते.
तेच तर त्यांचं काम आहे. बाकी चर्चा चांगली चालली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी तर् असेही वाचलंय,

पगला गजोधर
Sun, 03/25/2018 - 16:13 नवीन
मी तर् असेही वाचलंय,
हे वाक्य कंटेक्स्टमधे न घेता, आपण खेद व्यक्त केला, त्याबद्दल मला खेद आहे, असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ

प्रचेतसजी आपल्या प्रति आदर

पगला गजोधर
Sun, 03/25/2018 - 16:30 नवीन
प्रचेतसजी आपल्या प्रति आदर बाळगून, व पूर्ण जबाबदारीने लिहितोय, आपल्यासारखे ज्ञानभांडार व विद्वत्ता व शब्दप्रभुत्व, यासारख्या बाबींचे आम्ही मालक नाही, त्यामुळे कदाचित आपल्याला अपेक्षित चर्चा मला जमत नसावी, आम्ही जे आजूबाजूला माहिती उपलब्ध आहे ती वाचून प्रकटलो. त्यातली जी लगेचच सापडली ती खाली दिली आहे, बाकीची खूप शोध घेऊन, आंतरजालावर उपलब्ध झाली तर देईन, नाहीतर दुसऱ्या प्रकारे रेफ देईन, तोपर्यंत जरा वेळ द्या, रेफ: https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97 पुष्यमित्र शुंग हा मगध साम्राज्याचा मौर्यांच्या पाडावानंतरचा शासक होता. इतिहासात याने बौद्ध धर्मियांच्या पाडावासाठी अनेक क्रौर्यपूर्ण कृत्ये केली. त्यामुळे इतिहासात हा क्रूरकर्मा म्हणून ओळखला जातो. पुष्यमित्र हा सुरुवातीला मौर्य साम्राज्याचा सेनापती होता. अशोकानंतर ५० ते ६० वर्षातच मौर्य साम्राज्य लयाला गेले. अशोकानंतर कोणताही मौर्य शासक प्रभावी नव्हता. पुष्यमित्र शुंगने शेवटचा मौर्य सम्राट बृहदत्त याची एका लष्करी कार्यक्रमाच्या वेळेस दगाफटका करून हत्या केली व स्वतः मगध साम्राज्याचा शासक बनला. अश्या प्रकारे शुंग वंशाची स्थापना झाली. शुंग वंशाने मगधवर व उत्तर भारतावर पुढील दीड शतक राज्य केले. इतिहासकारांची पुष्यमित्र शुंग बद्दल अनेक मते आहेत. एका मतप्रवाहानुसार एक महान सेनानी होता ज्याने डेमेट्रीयसचे ग्रीक आक्रमण परतावून लावले तसेच शक राज्यकर्ते व सातवाहनांबरोबर युद्धे करून शुंग साम्राज्य वाढवले. तसेच इतरांच्या मते पुष्यमित्र ब्राम्हणवादाच्या अतिरेकी विचारांचा होता व आपल्या कारकीर्दीत बौद्ध धर्माचे वाढलेले स्तोम कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपल्या आक्रमणांदरम्यान बौद्ध स्तूपांना लक्ष्य केले. अशोकाच्या कारकीर्दीत बांधलेल्या अनेक बौद्ध स्तूपांचा पाडाव केला तसेच बौद्ध धर्मियंना मिळणार्‍या राजकीय सुविधा बंद केल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

रेफ:https://www.forwardpress

पगला गजोधर
Sun, 03/25/2018 - 17:33 नवीन
रेफ:https://www.forwardpress.in/2015/10/bahujan-reading-of-festivals-hindi/ दस मुंह का आदमी – रावण, इन दस मौर्य बौद्धवादी राजाओं का प्रतीक है। दशहरा मतलब दस मुख वाला हारा हुआ। इस प्रकार मौर्य साम्राज्य को नष्ट करने वाले पुष्यमित्र शुंग को राम का किरदार बनाया गया और दशमुखी रावण मतलब इन 10 राजाओं को जलाने की प्रतीकात्मकता खड़ी की गई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

हिदीतही ब्रिगेडी दिसताहेत.

श्रीगुरुजी
Sun, 03/25/2018 - 17:39 नवीन
हिदीतही ब्रिगेडी दिसताहेत. गुढीपाडव्याच्या फिरणा-या पोस्टप्रमाणे वरील लेखन सुद्धा विकृत मानसिकतेचा आविष्कार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

रेफ:http://www

पगला गजोधर
Sun, 03/25/2018 - 17:43 नवीन
रेफ: http://www.pratibhaekdiary.com/ramayn-aur-ram-ki-aitihasik-pdtal/ रामायण और महाभारत एक काल्पनिक साहित्य रचना है, न कि कोई इतिहास की गाथा. पर हम यह भी जानते हैं कि कोई भी रचना वगैर वस्तु केन्द्रित नहीं हो सकती है अर्थात्, कल्पना की उड़ान भी वस्तु की तुलना में ज्यादा ऊंची नहीं उड़ सकती. यही कारण है कि रामायण और महाभारत की कोई भी ऐतिहासिक तथ्य सीधे तौर पर नहीं मिल सकी. पर इतिहास खुद को हमेशा साबित करता है, चाहे वह कल्पना की कितनी भी उंची उड़ान क्यों नहीं हो. विगत दिनों सोशल मीडिया पर वायरल हो रही इसी एक जानकारी को हम यहां अपने पाठकों को देना चाहेंगे. सोशल मीडिया व्हाट्सअप के द्वारा वायरल हो रही इस तथ्य को शब्दशः यहां लिख रहा हूं: ‘‘जिस मगध की राजधानी पाटलिपुत्र में चक्रवर्ति सम्राट अशोक के वंशज मौर्य वंश के बौद्ध सम्राट राजा बृहद्रथ मौर्य की हत्या उसी के सेनापति ब्राह्मण पुष्यमित्र-शुंग ने धोखे से कर दी थी और खुद को मगध का राजा घोषित कर लिया था. उसने राजा बनने पर पाटलिपुत्र से श्यालकोट तक सभी बौद्ध विहारों को ध्वस्त करवा दिया था तथा अनेक बौद्ध भिक्षुओं का कत्लेआम किया था. पुष्यमित्र-शुंग, बौद्धों पर बहुत अत्याचार करता था और ताकत के बल पर उनसे ब्राह्मणों द्वारा रचित मनुस्मृति अनुसार वर्ण (हिन्दू) धर्म कबूल करवाता था. उत्तर पश्चिम क्षेत्र पर यूनानी राजा मिलिंद का अधिकार था. राजा मिलिंद बौद्ध-धर्म के अनुयायी थे. जैसे ही राजा मिलिंद को पता चला कि पुष्यमित्र-शुंग, बौद्धों पर अत्याचार कर रहा है तो उसने पाटलिपुत्र पर आक्रमण कर दिया. पाटलिपुत्र की जनता ने भी पुष्यमित्र-शुंग के विरुद्ध विद्रोह खड़ा कर दिया. इसके बाद पुष्यमित्र-शुंग जान बचाकर भागा और उज्जैनी में जैन-धर्म के अनुयायियों के बीच शरण ली. जैसे ही इस घटना के बारे में कलिंग के राजा खारवेल को पता चला तो उसने अपनी स्वतंत्रता घोषित करके पाटलिपुत्र पर आक्रमण कर दिया. पाटलिपुत्र से यूनानी राजा मिलिंद को उत्तर-पश्चिम की ओर धकेल दिया. इसके बाद ब्राह्मण पुष्यमित्र-शुंग ने अपने समर्थकों के साथ मिलकर पाटलिपुत्र और श्यालकोट के मध्य क्षेत्र पर अधिकार किया और अपनी राजधानी साकेत को बनाया. पुष्यमित्र-शुंग ने इसका नाम बदलकर अयोध्या कर दिया. अयोध्या अर्थात, बिना युद्ध के बनायी गयी राजधानी. राजधानी बनाने के बाद पुष्यमित्र-शुंग ने घोषणा की कि जो भी व्यक्ति, भगवाधारी बौद्ध भिक्षु का सर (सिर) काट कर लायेगा, उसे 100 सोने की मुद्राएं इनाम में दी जायेंगी. इस तरह सोने के सिक्कों के लालच में पूरे देश में बौद्ध भिक्षुओं का कत्लेआम हुआ. राजधानी में बौद्ध भिक्षुओं के सर आने लगे. इसके बाद कुछ चालाक व्यक्ति अपने लाये सर को चुरा लेते थे और उसी सर को दुबारा राजा को दिखाकर स्वर्ण मुद्राएं ले लेते थे. राजा को पता चला कि लोग ऐसा धोखा भी कर रहे हैं तो राजा ने एक बड़ा पत्थर रखवाया और राजा, बौद्ध-भिक्षु का सर देखकर उस पत्थर पर मरवाकर उसका चेहरा बिगाड़ देता था. इसके बाद बौद्ध-भिक्षु के सर को घाघरा नदी में फेंकवा देता था. राजधानी अयोध्या में बौद्ध भिक्षुओं के इतने सर आ गये कि कटे हुये सरों से युक्त नदी का नाम सरयुक्त अर्थात ‘सरयू’ हो गया. इसी ‘सरयू’ नदी के तट पर पुष्यमित्र-शुंग के राजकवि वाल्मीकि ने ‘रामायण’ लिखी थी, जिसमें राम के रूप में पुष्यमित्र-शुंग और रावण के रूप में मौर्य सम्राट का वर्णन करते हुए उसकी राजधानी अयोध्या का गुणगान किया था और राजा से बहुत अधिक पुरस्कार पाया था. इतना ही नहीं रामायण, महाभारत, स्मृतियां आदि बहुत से काल्पनिक ब्राह्मण धर्मग्रन्थों की रचना भी पुष्यमित्र-शुंग की इसी अयोध्या में ‘सरयू’ नदी के किनारे हुई. बौद्ध भिक्षुआंे के कत्लेआम के कारण सारे बौद्ध विहार खाली हो गए. तब आर्य ब्राह्मणों ने सोचा कि ‘‘इन बौद्ध विहारों का क्या करे कि आने वाली पीढ़ियों को कभी पता ही नही लगे कि बीते वर्षों में यह क्या थी ?’’ तब उन्होंने इन सब बौद्ध विहारों को मन्दिरों में बदल दिया और इसमें अपने पूर्वजों व काल्पनिक पात्रों को भगवान बनाकर स्थापित कर दिया और पूजा के नाम पर यह दुकानें खोल दी. ध्यान रहे उक्त ब्रह्द्रथ मौर्य की हत्या से पूर्व भारत में मन्दिर शब्द ही नहीं था और ना ही इस तरह की संस्कृति थी. वर्तमान में ब्राह्मण धर्म में पत्थर पर मारकर नारियल फोड़ने की जो परंपरा है यह परम्परा पुष्यमित्र-शुंग के बौद्ध-भिक्षु के सर को पत्थर पर मारने का प्रतीक है. पेरियार रामास्वामी नायकर ने भी ‘सच्ची रामायण’ नामक पुस्तक लिखी है जिसका इलाहबाद हाई कोर्ट केस नम्बर 412/1970 में वर्ष 1970-1971 व सुप्रीम कोर्ट में 1971 -1976 के बीच केस अपील नम्बर 291/1971 चला. जिसमें सुप्रीम-कोर्ट के जस्टिस पी0 एन0 भगवती, जस्टिस वी0 आर0 कृष्णा अय्यर, जस्टिस मुतजा फाजिल अली ने दिनांक 16.9.1976 को निर्णय दिया की सच्ची रामायण पुस्तक सही है और इसके सारे तथ्य वैध हैं. सच्ची रामायण पुस्तक यह सिद्ध करती है कि ‘रामायण’ नामक देश में जितने भी ग्रन्थ हैं वे सभी काल्पनिक हैं और इनका पुरातात्विक कोई आधार नहीं है अर्थात् फर्जी है.’’ प्रस्तुत तथ्य के आलोक में रामायण और महाभारत साहित्य की रचना का समय और तथ्य सही प्रतीत होती है क्योंकि अयोध्या की पुरातात्विक विभाग द्वारा करवाई गई खुदाई से वहां जीवन का अवशेष भी इसी समय से मेल खाता है. अयोध्या के से प्राप्त पहली शताब्दी के एक शिलालेख में पुष्यमित्र-शुंग के एक वंशज का उल्लेख है. पर्याप्त उत्खनन और अन्वेषण के बाद भी हम वर्तमान अयोध्या को गुप्तकाल से पूर्व कहीं भी राम के साथ नहीं जोड़ सकते. शेष आस्था पर विषय है, जिसका इतिहास के किसी भी तथ्य से कोई मेल नहीं और पुष्यमित्र बाल्मीकि द्वारा रचित रामायण में ‘‘राम’’ के रूप में अमर हो गया और बौद्ध बृहद्रथ मौर्य ‘‘रावण’’ के रूप में कुख्यात हो कर इतिहास में दर्ज हो गया. राम और रावराा जैसे काल्पनिक पात्र, जो बाल्मीकि के कल्पना की उपज थी ठीक वैसे ही थे जैसे विभिन्न रचनाकारों के द्वारा रचित काल्पनिक पात्र रोमियो-जुलियट, हीर-रांझा, लैला-मजनू, देवदास आदि जैसे जीवन्त पात्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

हिंदीतले ब्रिगेडी

श्रीगुरुजी
Sun, 03/25/2018 - 18:03 नवीन
हिंदीतले ब्रिगेडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

आरारारारारा.

गब्रिएल
Sun, 03/25/2018 - 18:11 नवीन
आरारारारारा. व्हास्साप राज्कारनात्ली पीयच्डी देतय म्हाय्ति व्हतं. पन आता तितं राजकार्नाच्या रस्त्यानं इतिहास आनि धर्मकारनात्ली पीयच्डी मिळ्तिया आसं दिस्तंय ! LLRC, LLRC, LLRC (यकच LLRC कमी पडतिया बगा, म्हनून !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

+११११

पैसा
Sun, 03/25/2018 - 17:23 नवीन
अतिशय उत्तम आणि खेळीमेळीने चर्चा सुरू असताना हा आयडी फक्त जातीय विष ओकायला तिथे येतो. दर वेळी तेच वाचून आता मिपावर यायचाही कंटाळा यायला लागलाय. वातावरण बिघडवणे याची अजून काय वेगळी व्याख्या आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+ १

श्रीगुरुजी
Sun, 03/25/2018 - 17:42 नवीन
+ १ धाग्याच्या विषय कोणताही असला आणि आपल्याला त्यात काहीही गम्य नसले तरीही तिथे जाऊन त्याच त्याच पिचका-या टाकणे हे अशांचे व्यवच्छेदक कौशल्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

प.ग. दशरथ जातक नावाचे

माहितगार
Sun, 03/25/2018 - 15:39 नवीन
प.ग. दशरथ जातक नावाचे बौद्धधम्रीय रामायण आहे, दशरथ जातकाचा काळ तुम्ही पुष्यमित्र शुंगाच्या आधी लावा बरोबर लावा किंवा नंतर लावा तुमची थेअरी खोडली जाते. आत्ताच थिरी रामायण म्हणजे सिरि रामायण नावाची मयन्मारची गाथा गुगल पुस्तकावर वाचत होतो. पूर्व आशियायी देशात बौद्ध धर्म बहुसंख्य होऊन बरीच शतके झाली तरी रामायणाचे कार्यक्रम आवर्जून होतात. मयन्मारचे बौद्ध धर्मीय एरवी किती हट्टी असू शकतात हे तुम्ही सध्या बातम्यातून पहातच असाल. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

>>> एकदा सत्ता हातात आल्यावर

श्रीगुरुजी
Sun, 03/25/2018 - 17:12 नवीन
>>> एकदा सत्ता हातात आल्यावर पुष्यमित्रने, कठोरपणे नॉन-वैदिकब्राम्हण, यांना दाबून दडपून, त्यांनी पुन्हा डोके वर काढू नये मगणून अनेक योजना राबविल्या) मनुस्मृतीची निर्मिती किंवा प्रसिद्धी याच कालावधी आसपास आहे, असे काहींचे मत आहे. असो पुष्यमित्रने वैदिक ब्राम्हण धर्माच्या प्रसाराठी जे योगदान दिले, त्याचा परतावा म्हणून, पुष्यमित्र ला केंद्र स्थानी ठेवून एका साहित्याची रचना केली गेली ती म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित आहे. पुष्यमित्र शृंग यांच्या महान कार्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

प्रमाण ऐतिहासिक साधनांचा आग्रह एकतर्फी का ?

माहितगार
Sun, 03/25/2018 - 18:05 नवीन
@ प.ग. ; इतिहास म्हणून वर्गीकरण करण्यासाठी ईतिहासाच्या प्रमाण साधनांचा आग्रह आपल्या ठिकाणी योग्य असला तरी काऊंटर नॅरेटीव्ह (विरोधी कथासूत्र) मांडतानाही ईतिहासाच्या प्रमाण साधनांचा वापर करावयास हवा ; तेव्हा मात्र हे बहुतांश तथाकथित विद्रोही प्रमाण साधनांचा वापर टाळून संशयवाद पेरण्यासाठी कल्पनांचे पंतंग हवे तसे उडवतात हे स्मितीत करणारे पण तर्कांच्या कसोट्यांवर न टिकणारे असते किंवा कसे. प्रमाण ऐतिहासिक पुरावे देण्याची त्यांची जबाबदारी कमी होते किंवा कसे ? या मंडळींकडे पुरोगामी धर्मजात निरपेक्ष म्हणवून घेण्याचा कोणताही नैतीक अधिकार शिल्लक कसा काय राहू शकतो या बाबत दाट शंका निर्माण होते किंवा कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

येस्सार....

पगला गजोधर
Sun, 03/25/2018 - 18:24 नवीन
येस्सार.... परंतु वरील एका प्रतिसादात .
महाभारतातील काही वर्णने आहेत. मात्र भारतीय युद्ध झाले असावे ह्याला पुरातत्वीय पुरावा नाही (शिलालेख, नाणी वगैरे) मात्र मौखिक परंपरा आणि भौगोलिक पुरावा भरपूर आहे. स्थळ काळाचे वर्णन अतिशय अचूक आहे अर्थात त्यात काही त्रुटी आहेतच. त्याचमुळे महाभारताची मूळ कथा हा इतिहास असावा ह्यात निश्चितच तथ्य आहे.
असे वाचले, त्यामुळे, ईतिहासाच्या प्रमाण साधनांमधे 'मौखिक परंपरा व स्थळ नाम निर्देश व काळ निर्देश यांचे वर्णन जुळणे', यांचा समावेश असू शकतो काय किंवा कसे ? आपल्या ला अप्रिय भासणारी मते (पक्षी : विरोधी कथासूत्र), यांवरच सुक्ष्म दृष्टी कटाक्ष टाकणे, म्हणजे बॅलन्स व्हिव म्हणवून घेण्याचा कोणताही नैतीक अधिकार शिल्लक कसा काय राहू शकतो या बाबत दाट शंका निर्माण होते किंवा कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

असो

माहितगार
Sun, 03/25/2018 - 21:01 नवीन
एखाद्या गोष्टीस प्रमाण ऐतिहासिक साधनांचा पुरावा नाही याचा अर्थ केवळ 'माहित नाही' आणि ऐतिहासिक प्रमाण साधन मिळेपर्यंत सिद्ध करता येत नाही, एवढाच होतो. ( माहित नसलेल्या गोष्टींवर आधारलेल्या तर्कांना मर्यादा असते) अबकड दंत(लोक)कथेत इतिहास आहेच आणि इतिहास नाहीच . यातील 'च' हा प्रत्यय विवाद्य असतो. मग तो प्रत्यय मी आपण प्रचेतस किंवा अजून कुणी लावला तरी त्यास क्रेडीबल म्हणता येईल असे वाटत नाही.
ईतिहासाच्या प्रमाण साधनांमधे 'मौखिक परंपरा व स्थळ नाम निर्देश व काळ निर्देश यांचे वर्णन जुळणे', यांचा समावेश असू शकतो काय किंवा कसे ?
नक्कीच पुरेसे नाही. प्रमाण ऐतिहासिक साधनांची गरज शिल्लक रहातेच. प्रचेतस "स्वतः व्यासांनीच ग्रंथारंभी लिहिलेलं आहे की हा 'जय नावाचा इतिहास आहे'." या गोष्टीवर भर देत असावेत -याचा अर्थ रामायणाच्या तुलनेत महाभारताच्या घडले असण्याची शक्यता त्यांना अधिक वाटते एवढाच असावा' असा माझा कयास आहे, अर्थात त्यांनी मी काढलेल्या महाभारत विषयक धाग्यात महाभारतात प्रक्षीप्त भाग बर्‍याचपैकी मोठा असलेले मान्य केलेले आहे. प्रचेतस त्यांचा तो विचार बदलत असतील अशी शक्यता तुर्तास कमी वाटते. ज्यात प्रक्षिप्त भाग खूप मोठा आहे आणि नेमका कोणता भाग प्रक्षिप्त आहे हे ओळखणे बर्‍या पैकी कठीण आहे . मी त्यांच्या प्रमाणे कयास करण्या पेक्षा माहित नाही घडले असू शकते किंवा घडले नसू शकते असे म्हणेन. (मी महाभारतातील प्रक्षिप्त भागाच्या संदर्भाने घेतलेल्या चर्चेस पहिला प्रतिसाद आपलाच होता असे दिसते)
आपल्या ला अप्रिय भासणारी मते (पक्षी : विरोधी कथासूत्र), यांवरच सुक्ष्म दृष्टी कटाक्ष टाकणे, म्हणजे बॅलन्स व्हिव म्हणवून घेण्याचा कोणताही नैतीक अधिकार शिल्लक कसा काय राहू शकतो या बाबत दाट शंका निर्माण होते किंवा कसे ?
प्रियता आणि अप्रियता या भावनिक आणि सब्जेक्टीव गोष्टी आहेत मी माणूस आहे म्हटल्यावर आजीबातच प्रभावीत होत नसेन असे नसावे पण तरीही सर्वसामान्यपणे सर्व सामान्य लोकांपेक्षा खूप अधिक तर्कप्रधान आहे असा किमान माझा माझ्या बद्दलचा समज आहे (आणि कदाचित काही जणांना चुकीचा वाटत असू शकत असलेला समज असावा) आणि यामुळे प्रसंगी क्लिष्ट बोजड अशी विशेषणांनी माझा बर्‍ञापैकी सत्कार होत असतोच :) अप्रिय आहे म्हणून नव्हे तार्कीक दृष्ट्या न पटलेले म्हणून त्याकडे माझा सुक्ष्म कटाक्ष किंवा त्यास आधी अधोरेखीत केले जाऊ शकते. अगदी या धागा लेखात रामायणाच्या एकाच व्हर्शनचा उल्लेख आहे , त्याबद्दल शंका दाखवून इतर गोष्टींसोबत मी बौद्धधर्मीय दशरथ जातकाचाही हवाला दिला आणि त्या बद्दल विरुद्ध बाजूचे मत दुवाही दिला. मनात कोणतीही अढी न ठेवता मी रामवामी पेरीयारांचे मत वाचलेले असते . टिपू सुल्तान विषयावर धागा काढण्यापुर्वी कन्नड इतिहासकार अली आणि त्यांच्या विरुद्ध बाजू दोन्हीही शक्यतो पुर्वग्रहा शिवाय, मुख्य म्हणजे निष्कर्ष आधी न काढता वाचलेल्या असतात. प्रमाण साधने आणि तर्कपूर्णता यांचा आग्रह सहसा सर्वांसाठी सारखाच वापरतो . प्रमाण साधने आणि तर्कपूर्णता यांचे निकष पूर्ण न करताही आमचेच दृष्टीकोण बॅलन्स्ड म्हणा हे कथित पुरोगाम्यांचा दृष्टीकोण कथित पुर्वी तथा हा उपसर्ग जोडून तथाकथित हे विशेषण योग्य असल्याचे सिद्ध करत असतात असा माझा बर्‍याचदा अनुभव आहे. आपले इमले पोकळ असू नयेत याची नैतीक जबाबदारी तथाकथित सनातनी तसेही घेत नाहीत, सनातन्यांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे पोकळपण दाखवून देणे हा उद्देश पुरोगामी ठेवत असतील तर त्यांचे स्वतःचे इमले पोकळ असणे भूषणावह नसावे . मुरोगाम्यांचा पोकळपणा सनातन्यांना आपला पोकळपणा जपण्यास अधिक मदतच करत असावा त्यामुळे आपल्या लेखनात पोकळपणा नाही हे बघण्याची समतोलाची जबाबदारी पुरोगाम्यांची अधिक असावी किंवा कसे आणि म्हणूनच कदाचित माझा पुरोगाम्यांकडे अधिक कटाक्ष असेल तर तो आक्षेप मला मान्य आहे आणि त्यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही ही माझी भूमिका असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

अप्रिय आहे म्हणून नव्हे

पगला गजोधर
Sun, 03/25/2018 - 21:52 नवीन
अप्रिय आहे म्हणून नव्हे तार्कीक दृष्ट्या न पटलेले म्हणून त्याकडे माझा सुक्ष्म कटाक्ष किंवा त्यास आधी अधोरेखीत केले जाऊ शकते.
. अगदी म्हणुनच, समोरच्याला (मिपावरील एका मोठ्या गटाला प्रिय) म्हणून तार्कीक दृष्ट्या न पटलेले निर्देशित न करणे अथवा , फक्त वाचनमात्र डॉर्मंट राहणे कधीकधी शक्य होत नाही, असो, इकडे तौलनिकदृष्टया अलीकडील इतिहासातील शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेबद्दल अनेक मतप्रवाद आहेत, तर इतक्या प्राचीन कालीन साहित्यात केवळ लेखक/व्यास म्हणतोय की हा इतिहास आहे, त्यावर मी झटकन विश्वास ठेवण्यास धजावू शकत नाही, कदाचित "जय पुस्तिका हा इतिहास आहे" , असे लेखकाचे विधानाच प्रक्षेपित असू शकते, कदाचित व्यासांनी असे काही लिहिलेच नसेल, कोणी सांगावे ? बौद्ध विद्यापीठे ज्ञान संपदा अचानक जळली/जाळली गेली ? हा योगायोग होता का ? असूही शकतो, नसुही शकतो एका गोष्टीची आपण जाणीव ठेवण्यास हवी, की ज्ञान/माहितीच्या भांडाराची प्रवेशिका व कुलूप किल्ल्या ह्या कित्येक शतके नव्हे हजारो वर्षे फक्त एकाच छोट्या लोक समूहाकडेच होता, दे वर द सोल कस्टडीअन, त्या समूहाव्यतिरिक्त कोणालाही ज्ञान मिळवणे दुरापास्तच नव्हे तर मृत्यस आमंत्रक होते, (रेफ: रामायणातील एका व्हर्शन मधे, एका शूद्राने तप केले त्यास मृत्यू दंड दिला होता रामाने),त्यामुळे महाभारत रामायणात जर काही प्रक्षेपित माहिती अथवा फेरबदल केलेली माहिती असेल, तर माझ्या दृष्टीने प्रमुख संशयित कोण असेल ? हे विचारण्याची तसदी कोणाला घ्यावी लागणार नाही. . इट्स एलमेंटरी माय डिअर वॉटसन ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

माझे प्रांजळ मत

माहितगार
Sun, 03/25/2018 - 18:16 नवीन
............ म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित आहे.
@ प.ग. आपण जबाबदार पुरोगामी असाल तर या वाक्यास ऐतिहासिक प्रमाण साधने उपलब्ध करावीत किंवा हे वाक्य मागे घ्यावे असे माझे प्रांजळ मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

मी तर् असेही वाचलंय,

पगला गजोधर
Sun, 03/25/2018 - 18:30 नवीन
मी तर् असेही वाचलंय,
असे स्पष्टपणे लिहून, पुढे कुठे वाचलंय, त्याच्या त्यातल्यात्यात लगेच सापडणाऱ्या लिंक देऊनही, आपण त्याचे पितृत्व माझ्या वर लादणे, हा माझ्यावर आपण अन्याय तर करत नाही ना अनाहूतपणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

प.ग. ंनी आणलेल्या चित्राच्या निसटत्या बाजू १

माहितगार
Sun, 03/25/2018 - 21:52 नवीन
उसने आणलेले कांद्याचे चित्राच्या काही बाजू फसव्या आहेत हे कुणी निदर्शनास आणल्यावर, कांद्याचे चित्र माझे नाही म्हटले तरी उसना आणायचे काम करताना फसवे नाहीएना हे बघण्याची प्राथमिक जबाबदारी पार पाडायचे राहून गेले हे सुटत नसावे. त्यांना बास्केटमध्ये कांद्याचे चित्र दिसले होते त्यांनी कांच्याचे चित्र नेमक्या कोणत्या बास्केट मधन उचलला ते त्यांना नेमके सांगता येत नाही आता त्यांनी दाखवलेल्या दोनचार बास्केटमध्ये आपण वाकून पहाणे आले. ते पुढच्या प्रतिसादातून एक एक करुन पाहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

उसना आणायचे काम करताना फसवे

पगला गजोधर
Sun, 03/25/2018 - 21:56 नवीन
उसना आणायचे काम करताना फसवे नाहीएना
.... याचा तुमच्यामते काय क्रायटेरिया आहे सर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

प.ग. ंनी आणलेल्या चित्राच्या निसटत्या बाजू २

माहितगार
Sun, 03/25/2018 - 23:11 नवीन
प.ग. यांचा http://www.misalpav.com/comment/988611#comment-988611 हा प्रतिसाद माझा हा उपप्रतिसाद लिहिताना जसा दिसला.
......इस प्रकार मौर्य साम्राज्य को नष्ट करने वाले पुष्यमित्र शुंग को राम का किरदार बनाया गया .......
दस मुंह का आदमी – रावण, इन दस मौर्य बौद्धवादी राजाओं का प्रतीक है। दशहरा मतलब दस मुख वाला हारा हुआ। इस प्रकार मौर्य साम्राज्य को नष्ट करने वाले पुष्यमित्र शुंग को राम का किरदार बनाया गया और दशमुखी रावण मतलब इन 10 राजाओं को जलाने की प्रतीकात्मकता खड़ी की गई प.ग. यांनी दिलेला संदर्भ दुवा रेफ:https://www.forwardpress.in/2015/10/bahujan-reading-of-festivals-hindi/
या उपरोक्त हिंदी वाक्याच्या इतर निसटत्या बाजू आपण नंतरच्या प्रतिसादातून पाहू, ......इस प्रकार मौर्य साम्राज्य को नष्ट करने वाले पुष्यमित्र शुंग को राम का किरदार बनाया गया ....... या हिंदी वाक्याचा सर्वसाधारण मतितार्थ राम आधी पासून होता, पुष्यमित्र शुंगाने रामाचा किरदार म्हणजे रोल / भूमिका (पुन्हा) वठवली असा काहीसा हा आक्षेप आहे, आक्षेपाच्या बाकी भागाकडे आपण नंतर येऊ या हिंदी वाक्याचा सर्वसाधारण मतितार्थ राम आधी पासून होता असा होत असावा. (हिंदी वाक्याचा मराठी अर्थ लावण्यात मी चुकत असल्यास हिंदीभाषा जाणकारांनी मला दुरुस्त करावे.) आता प.ग. त्यांच्या मराठी वाक्यात काय म्हणतात ते पाहू "............ म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित आहे." यात पुष्यमित्र आधी आहे आणि त्याच्यावरुन रामाचे पात्र नंतर प्रेरीत झाले आहे. राम हे पात्र पुष्यमित्राच्या आधीतरी झाले असेल अथवा नंतर तरी (किंवा सोबत तरी पण इथे प.ग. ंचे मराठी वाक्य आणि हिंदी संदर्भ आधी किंवा नंतरचा पर्याय देताहेत सोबतचा पर्याय देताना दिसत नाहीत) तेव्हा आधी आणि नंतर या दोन्ही शक्यता एकदम शक्य नसाव्यात. एकतर सदहूर हिंदी वाक्याचा अर्थ प.ग. साहेबांनी सरळ सरळ उलटा लावला (त्यांना कबुल करावयाचे नसले तरी हि शक्यता टाळता येते का या बाबत मी साशंक आहे) किंवा उसणवारी केलेल्या कांद्याच्या फसव्या चित्राची अजून एखादी बास्केट त्यांना गवसली असावी. उसणवारी केलेल्या कांद्याच्या फसव्या चित्राची अजून एखादी बास्केट त्यांना गवसली असेल तरी त्यांनी स्वतःच दिलेला हिंदी संदर्भ राम पुष्यमित्राच्या आधीचा असल्याचे संकेत देतो . म्हणजे स्वतःचे वाक्य खोडण्यासाठी स्वतःच संदर्भ प.ग, साहेबांनी दिला असल्यास आपण त्याम्नी केलेल्या self goal साठी आभारच मानले पाहिजेत . त्यांनी स्वतःच्याच संदर्भाने स्वतःस खोडले असे म्हणता येते का ? त्यांना इतर काही म्हणावयाचे असल्यास आपण त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

:)

पैसा
Sun, 03/25/2018 - 23:19 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

त्यांनी स्वतःच दिलेला हिंदी

पगला गजोधर
Mon, 03/26/2018 - 15:34 नवीन
त्यांनी स्वतःच दिलेला हिंदी संदर्भ राम पुष्यमित्राच्या आधीचा असल्याचे संकेत देतो . म्हणजे स्वतःचे वाक्य खोडण्यासाठी स्वतःच संदर्भ प.ग, साहेबांनी दिला असल्यास आपण त्याम्नी केलेल्या self goal साठी आभारच मानले पाहिजेत . त्यांनी स्वतःच्याच संदर्भाने स्वतःस खोडले असे म्हणता येते का ?
. "खेळीमेळीने चर्चा " अशाप्रकारचे शब्द वरील प्रतिसादात वाचून, आता एकदम सेल्फगोल वैगरे शब्द वाचून अंमळ धक्का बसला. गोल वैगरे शब्द युद्ध जरी दर्शवित नसले तरी, स्पर्धात्मकता दर्शवित आहेत काय ? खेळ = स्पर्धा , असे जर असेल तर माहितीगार साहेब मी आपणाला आताच विजयी घोषित करतो, कारण हि स्पर्धा तशी एकतर्फी होणार (इन योर फेवर अफकोर्स), कारण आपला माहितीचा ज्ञानसागर एका बाजूला , आमचे बापुडे गबाळे शब्दचाळे दुसऱ्या, शिवाय माझ्या विरुद्ध किरकिर करणारे अनेक महामाया +अवदसा+ मुंजे (तुम्ही त्यांना आमंत्रण न देन्याची शक्यता गृहीत धरून) आहेतच ते गोल पोस्ट सारखा सरकावण्यात मदत करतीलच) असो त्यामुळे अजिबात तुल्यबळ नसलेला , असा हा सामना , आपणच जिंकला आहात. मला वाटत होतं, या मिपा समुद्रकिनाऱ्यावर वाळूत आपण काही अक्षरे रेघोट्या उमटवू, व माहितीचा-सागर त्याच्याकडून भरतीवेळीच्या लाटेने, ती अक्षरे मिटवेल, आपण परत पुन्हा नवीन काही शब्द लिहू परत समुद्र ते मिटवेल , असा स्वच्छंदी खेळ मी समजलो होतो... असो. ============================== सांकृत्यायन ने यह बताने का प्रयास किया है कि भगवान राम कोई और नहीं बल्कि मौर्य साम्राज्य के सेनापति पुष्यमित्र थे जिन्होंने मौर्य वंश के आखिरी सम्राट बृहदत्त मौर्य को मारकर खुद को राजा घोषित कर दिया था. माना जाता है कि पुष्यमित्र ने ही साकेत को सबसे पहले राजधानी का दर्जा दिया था. (सेकंडपार्टी रेफेरेंस: Page 116, Complete Indian History for IAS Exam:Highly Recommended for IAS, PCS and ... By Praveen Kumar अयोध्या इन्स्क्रिप्शन - धनादेव द्वारा पुष्यमित्राने दोन अश्वमेध केले इत्यादि ... The Ayodhya Inscription of Dhandeva mentions that he performed two Ashwamedha Yagyas (Horse Sacrifices).) दूसरे व्यक्ति हैं महापंडित राहुल सांकृत्यायन जिन्होंने अपनी किताब ‘वोल्गा से गंगा’ के ‘प्रभा’ नामक अध्याय में स्पष्ट संकेत दिया है कि भगवान राम असल में कौन थे. सांकृत्यायन लिखते हैं कि (पुष्यमित्र से पहले) साकेत (अयोध्या) कभी किसी राजा की प्रधान राजधानी नहीं बना. उन्होंने लिखा है, ‘पुष्यमित्र या उसके शासन काल में रामायण लिखते हुए वाल्मीकि ने (साकेत की जगह) अयोध्या नाम का प्रचार किया. कोई ताज्जुब नहीं कि वाल्मीकि शुंग वंश (पुष्यमित्र का वंश) के आश्रित कवि रहे हों जैसे कालिदास चंद्रगुप्त विक्रमादित्य के.’ सांकृत्यायन बताते हैं कि महाकवि कालिदास ने अपने काव्य में चंद्रगुप्त विक्रमादित्य को रघुवंश का रघु और उनके पुत्र कुमारसंभव को कुमार कहकर उनकी ख़ूब प्रशंसा की है. इसी आधार पर राहुल सांकृत्यायन लिखते हैं, ‘शुंग वंश की राजधानी की महिमा बढ़ाने के लिए ही उन्होंने (वाल्मीकि न) जातकों के दशरथ की राजधानी वाराणसी से बदलकर साकेत या अयोध्या कर दी और राम के रूप में शुंग सम्राट पुष्यमित्र की प्रशंसा की.’ जातक शब्द बौद्ध कथाओं के लिए उपयोग किया जाता है जिनमें बुद्ध के पूर्वजन्मों की बातें होती हैं. कहा जाता है कि रामायण बुद्ध के बाद ‘दशरथ जातक’ से प्रेरणा लेकर लिखी गई. राहुल सांकृत्यायन की किताब के मुताबिक़ पुष्यमित्र के शासनकाल में शुरुआती दिनों में अयोध्या का ख़ासा महत्व था और उस समय भी इसका नाम अयोध्या नहीं बल्कि साकेत था. जानकारों के मुताबिक जब यवन (यूनान) के राजा मिनांडर ने साकेत पर घेरा डाला तो पुष्यमित्र के गुरु पतंजलि ने भी इसी नाम (साकेत) से उसका ज़िक्र किया था.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

संपादक कुठे आहेत?

पैसा
Mon, 03/26/2018 - 16:10 नवीन
मिपा सदस्यांना उद्देशून वरील आयडीने जे अपशब्द वापरले आहेत तीच यापुढे मिपाची भाषा असणार आहे का? तर आमच्यासारख्या लोकांना नारळ दया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

अतिरेकी चुकीचीच

सुखीमाणूस
Tue, 03/27/2018 - 17:47 नवीन
विचारसरणी असणार्‍या लोकांकडून आणखी काय अपेक्शा करणार. तरी बर राम हा क्शत्रिय व रावण हा ब्राम्हण होता म्हणे. https://en.m.wikipedia.org/wiki/Ravana मग बहुजनांन एका ब्राम्हणाला मारले त्याची पूजा सगळे हिन्दु करत आहेत हे सुद्धा यांच्या पोटात कळ आणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

निसटत्या बाजू ३

माहितगार
Mon, 03/26/2018 - 23:50 नवीन
वेल या क्षणी, गोलपोस्ट शीफ्ट न करता मुद्द्यावर येतो ........... म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित होण्याचा प्रश्न येत नाही. सत्ता काबीज करण्यासाठी शस्त्र उचललेल्या वरुन, सत्तेचा मोह वडीलांच्या इच्छेखतर दूर ठेवणारे पात्र प्रेरीत आहे म्हणणे विरोधाभास करणारे होते. खास करुन इतिहास विषयक प्रमाण संदर्भ उपलब्ध नसताना. श्री गुरुजींनी त्यांच्या तुम्हाला दिलेल्या एक वाक्याच्या "पुष्यमित्र शृंग यांच्या महान कार्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन!" या प्रतिसादातून एका वाक्यात बरीच ध्येय प्रथम दर्शनी सहज साध्य केली असे वाटले तरीही सत्ता काबीज करण्यासाठी शस्त्र उचललेल्या वरुन, सत्तेचा मोह वडीलांच्या इच्छेखतर दूर ठेवणारे पात्र प्रेरीत आहे म्हणणे अगदी सार्कॅझम म्हणून असेल अथवा पुष्यमित्र त्यांचा म्हणून असेल एका वाक्याचा शॉर्टकट मारण्या पेक्षा मुद्दा प्रमाण संदर्भ मागून क्लिअर केला असता तर त्यांच्या आणि इतरांच्या श्रद्धेची अधिक काळजी घेण्याची संधी त्यांना वापरता आली असती का ? राहुल सांकृत्यायनांचे काही मुद्दे पुढच्या वेगळ्या प्रतिसादातून खोडेन पण मुख्य म्हणजे; त्याम्चे संदर्भ दिलेले लेखन ऐतिहासिक कथा ललैत साहित्य या प्रकारात मोडते त्या मुळे त्यांचे कथन ऐतिहासिक प्रमाण साधन म्हणून स्विकारणे कठीण जाते. कोणतेच ललित साहित्य कथा कादंबर्‍या ऐतिहासिक साधन अथवा संदर्भ ग्रंथ म्हणून न स्विकारण्या बाबत ईतर सर्वच ग्रंथांचे सम्दर्भ पडताळातना मी जसा सजग असतो तसाच इथेही सजग आहे. ललित साहित्याचा भाग असेल किंवा हिंदी साहित्याचे वाचन कमि म्हणून असेल राहुल सांकृत्यायनांचे सदर वाचन माझ्या वाचनात आलेले नव्हते. पण इथे संदर्भ आलेला पाहून संदर्भ दिलेली कथेतील संबंधीत भाग अक्षरशः दहा वेळा वाचला आहे आणि त्याचा उहापोह पुढच्या प्रतिसादातून करेन . या निमीत्ताने चर्चेत सहभाग घेता आला या बद्दल आभार . बाकी पै ताई म्हणतात तसे कारण कोणतेही असो चर्चेत सहभागी होणार्‍या इतरांसाठी व्यक्तिगत लक्ष्य करणारे शब्द या चर्चेत प्रस्तुत असण्या जोगे वाटले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

कोणतेच ललित साहित्य कथा

पगला गजोधर
Tue, 03/27/2018 - 14:08 नवीन
कोणतेच ललित साहित्य कथा कादंबर्‍या ऐतिहासिक साधन अथवा संदर्भ ग्रंथ म्हणून न स्विकारण्या बाबत ईतर सर्वच ग्रंथांचे सम्दर्भ पडताळातना मी जसा सजग असतो
, (तुम्ही "माझ्या"सारख्या समोर गीता वाचता, असा काही आयडी समज करण्याची रिस्क गृहीत धरून ), तुम्हास परत एक मूलभूत प्रश्न विचारतो की, तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या, रामायण आणि महाभारत , "ललित साहित्य कथा कादंबर्‍या" मानता की ऐतिहासिक पुरावा म्हणून पहाता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

...तुम्ही स्वतः

माहितगार
Tue, 03/27/2018 - 14:17 नवीन
...तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या, रामायण आणि महाभारत , "ललित साहित्य कथा कादंबर्‍या" मानता की ऐतिहासिक पुरावा म्हणून पहाता ?
प्रमाण ऐतिहासिक साधनांचे पुरावे उपलब्ध नसलेले लोकसाहित्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

तर मग

पगला गजोधर
Tue, 03/27/2018 - 14:48 नवीन
तर मग एका लोकसाहित्यातील बाबींचा उहापोह करण्यासाठी , त्या लोकसाहित्याशी साहित्यिक-बंध असलेल्या दुसऱ्या एका लोकसाहित्याचा रेफरन्स दिला, तर सभ्य चर्चेच्या मर्यादेचे उल्लंघन झालेच नाही व सेल्फ गोल तर दुरकी बात. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

सेल्फ गोल संदर्भ स्वतःचे एक

माहितगार
Tue, 03/27/2018 - 16:07 नवीन
सेल्फ गोल संदर्भ स्वतःचे एक म्हणणे स्वतःच दुसरा विरुद्ध संदर्भ देऊन खोडणे हा होय . माझा या धाग्यावर तुम्हाला दिलेले आधीचे काही प्रतिसाद आपल्या नजरेतून सुटले आहेत का ? त्यातील एका प्रतिसादाचा भाग खालील प्रमाणे आपल्या माहितीसाठी पुन्हा एकदा
एखाद्या गोष्टीस प्रमाण ऐतिहासिक साधनांचा पुरावा नाही याचा अर्थ केवळ 'माहित नाही' आणि ऐतिहासिक प्रमाण साधन मिळेपर्यंत सिद्ध करता येत नाही, एवढाच होतो. ( माहित नसलेल्या गोष्टींवर आधारलेल्या तर्कांना मर्यादा असते) अबकड दंत(लोक)कथेत इतिहास आहेच आणि इतिहास नाहीच . यातील 'च' हा प्रत्यय विवाद्य असतो. मग तो प्रत्यय मी, आपण, प्रचेतस किंवा अजून कुणी लावला तरी त्यास क्रेडीबल म्हणता येईल असे वाटत नाही.
@ प.ग. ; इतिहास म्हणून वर्गीकरण करण्यासाठी ईतिहासाच्या प्रमाण साधनांचा आग्रह आपल्या ठिकाणी योग्य असला तरी काऊंटर नॅरेटीव्ह (विरोधी कथासूत्र) मांडतानाही ईतिहासाच्या प्रमाण साधनांचा वापर करावयास हवा ; तेव्हा मात्र हे बहुतांश तथाकथित विद्रोही प्रमाण साधनांचा वापर टाळून संशयवाद पेरण्यासाठी कल्पनांचे पंतंग हवे तसे उडवतात हे स्मितीत करणारे पण तर्कांच्या कसोट्यांवर न टिकणारे असते किंवा कसे. प्रमाण ऐतिहासिक पुरावे देण्याची त्यांची जबाबदारी कमी होते किंवा कसे ? या मंडळींकडे पुरोगामी धर्मजात निरपेक्ष म्हणवून घेण्याचा कोणताही नैतीक अधिकार शिल्लक कसा काय राहू शकतो या बाबत दाट शंका निर्माण होते किंवा कसे ?
इथे पुरोगाम्यांसमोरचा प्रश्न सभ्यतेचा नव्हे आपली विश्वासार्हता गमावली जाण्याचा आहे. आणि जे पुरोगामी हे लक्षात घेत नाहीत ते 'तथाकथित' या विशेषणास पात्र होत जातात. असो. आपल्या इतर काही सदस्यांना उद्देशून वापरलेल्या शब्दांबद्दलचा सभ्यतेचा मुद्दा मात्र रास्त आहे. आपल्या नजरेतून सुटले असल्यास आपण स्वत:च पहावे. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा