माझी वैयक्तिक माहिती कुणी मागत असेल. आणि ती ही मोठ्या प्रमाणावर जाहिर होणार असेल तर जरा अवघड वाटतय.
म्हणजे, मी कदाचित प्रथम भेटित माझी कुठलिच माहिती सहसा उघड(डिसक्लोज) करत नाही.
आता मिपा वरुन ज्यांच्याशी परिचय आहे त्यातिल काही थोरा मोठ्यांकडे म्या पामराची माहिती असेलही,(किंवा चेहर्यानं ओळखतही असावेत.)
पण मी पुरेसा(मला पुरेसा वाटणारा(भले ही आंतर जालिय असेल)) परिचय असल्याशिवाय ती उघड करु इच्छित नाही.
कुठल्याही कलाकाराला, आणि आपले "हट के" विचार असणार्याला मनापासुन सतावणारी शंका:-
एखाद्याची कलाकारी निनावी रुपात अधिक प्रभावी असु शकत नाही का?
एखाद्याला आपण कोण आहोत हे सांगुन मग आपल्याला काय सांगायचं आहे ते सांगायला संकोच वाटत असला तर?
म्हणजे, तेच दर्जेदार लेखन त्यानं बनावट नावानं लिहिलं आणि कित्येकांना ते आवडलं असही होउ शकतं.
कदाचित माझ्या सारखी दीर्घ काळ एका लोअर मिडल क्लास वातावरणात राहिलेली व्यक्ति अंगात भिनलेल्या संकोचामुळं काही विशिष्ट "विषयां"वर लिहु /बोलु शकत नसेल पण तेच दुसर्या आय्डी चा आश्रय घेउन एखादी धमाल चावट कथा(हीन दर्जाची नाही.) किंवा आण्खी चार चौघात बोलता न येणारा विषय धाडासानं मांडत असेल तर काय?
इतके दिवस त्यांना जे मिपा-छत्र उपलब्ध होतं आता ते नाहिसं होइल.
त्यांची क्रीएटिविटि किंवा खरे /प्रामाणिक विचार इतरांपर्यंत पोहोचु शकणार नाहित.
कारण सगळ्यांमध्येच धनंजय ("कोणार्क च्या मंदिरातील शिल्पे") इतकी मानसिक कणखरता असेल असे नाही.
तुर्तास इतकच.
काही मुद्दे विस्तारनं नंतर कधी जमल्यास सांगेन.
वेळेअभावी जास्ती काही लिहिता येत नाहिये.
पण बाकी वाचतो सगळं आहे.
आपलाच,
खर्या आय डी ने "किंग एडिपस" / " राजा ओयदीपौस" याबद्दल बोलायला संकोचणारा
मनोबा
मी म. सं. च्या दुनियेत आलो तेव्हा मला कोणीच ओळखीचे नव्हते. आता इथे खूप मजा वाटते. कित्येक आयड्यांशी ओळखीसारख्या ओळखी झाल्या आहेत.
(त्यावेळच्या) माझ्यासारखे कोणी आता नवीन मि.पा.वर आले, तर बिना ओळखीने त्या नव्याला सदस्य कसा होईल?
असो. मि.पा.ला बनावट किंवा खोडसाळ आयडींच्या वादळातून स्वतःचा बचावही करायचा आहे. म्हणून सूचनेचे स्वागत, अनुमोदन वगैरे करतो आहे.
अडचण आली आहे.
मला कुणाला खरडी व व्यनी पाठवता येत नाही आहे , माझे अधिकार काढून घेतले आहेत असा मॅसेज येत आहे
You are not allowed to post in this guestbook. हा संदेश येत आहे ?
माझ्या कडून काही चुकले का ?
मलाच कळत नाही आहे काय झालं :(
प्रतिक्रिया
विचार तर आवडला !पण......
स्वागतार्ह, अनुमोदन, पण
अडचण आली
काही काम,