Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २५

लेखक गामा पैलवान यांनी रविवार, 11/03/2018 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274 याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले? याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/ मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं. एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन. जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही. आ.न., -गा.पै.

वाचने 51422
प्रतिक्रिया 265

प्रतिक्रिया

शेतकरी मोर्चातली बहुसंख्य जनता ही पेठ आणि सुरागण्यातील आदिवासी आहे. यांची सर्वात जुनी मागणी म्हणजे ज्या वन जमिनी कसतात त्या नावावर करून द्या. मुळात ही मागणी ६० च्या दशकापासून आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा लग्नानंतर अद्याप त्यांच्या मुंबईतल्या नव्या घरात शिफ्ट झालेले नाहीत. सध्या त्यांनी भाड्याच्या घरातच संसार सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. विराटने वरळीतील एका इमारतीत ४० व्या मजल्यावर घर भाड्याने घेतले आहे. या घराचे महिन्याचे भाडे १५ लाख रुपये आहे. २०१६ मध्ये विराटने वरळीतील 'स्काय बंगलो' या प्रकल्पात ८ हजार रुपये चौरस फुटांचा फ्लॅट बुक केला होता. हा फ्लॅट अद्याप तयार होत आहे. याची किंमत ३४ कोटी रुपये आहे. या फ्लॅटचा ताबा विराट-अनुष्काला २०१९ पर्यंत मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी २४ महिन्यांसाठी भाडेतत्वावर घर घेतलं आहे. या फ्लॅटचं डिपॉझिट १.५ कोटी रुपये आहे. २,६७५ चौरस फुटांचं हे घर वरळीच्या अॅनी बेझंट रोडवरील 'लिजंड' इमारतीत ४० व्या मजल्यावर आहे. या फ्लॅटसाठी १ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आहे. विराट कोहलीने टि्वटरवर या फ्लॅटमधून बाहेर दिसणाऱ्या दृश्याचा फोटो पोस्ट केला आहे. त्याने म्हटलंय की 'जर तुमच्या घरातून असं सुंदर दृश्य दिसत असेल तर तुम्हाला आणखी काय हवं?' (सौजन्यः मटा)

सुपरस्टार रजनीकांत यांचं इन्स्टाग्राम अकाऊंटही आता चालू झालंय. इन्स्टावर त्यांची एंट्री होताच तिथे त्यांच्या चाहत्यांची संख्या झटपट लाखोंच्या घरात पोहोचली. या थलैवानं त्याच्या चित्रपटामधला एक झकास फोटो त्यानं शेअर केला. अनेक चाहत्यांनी तो ठिकठिकाणी शेअर केला. आपल्या लाडक्या कलाकाराचा फोटो लाइक करत त्यांचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. a (सौजन्य : मटा)

शिवणे (पुणे) : येथे औद्योगिक क्षेत्र परिसरात 11 हजार किलोवॅट क्षमतेची वीज वाहिनी (लाईटची तार) रस्त्यावर पडल्याने जाणाऱ्या वाहन चालकांना शॉक बसला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. शिवणे गावातील कालव्याच्या रस्त्याने खान वस्तीकडे रस्त्या जातो. त्या रस्त्याच्या वरून औद्योगिक क्षेत्र परिसराला 11 हजार किलोवॅट क्षमतेची वीज वाहिनी (लाईटची तार) जाते. आवाज होऊन ती वीज वाहिनी या रस्त्यावर अचानक खाली पडली. घटना सोमवारी सकाळी आठ वाजता घडली. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख सागर शिर्के दुचाकीवरून तेथून जात होते. तू व्हीलर थांबा पुढे जाऊ नका. असे काही लोक त्यांना ओरडत होते. ते थांबले त्यांनी पाहिले असता. वीज वाहिनी रस्त्यावर पडली होती. त्यावेळी टेम्पो व दुचाकी चालक तेथून जात होते. त्यांना शॉक लागल्याची माहिती यावेळी नागरिकांनी सांगितल्याचे शिर्के यांनी 'सकाळ' शी बोलताना ही माहिती दिली. (सौजन्यः सकाळ)

शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत.>>> ==> अशा असंवेदनशील वाक्याला मिपावर कोणीच निषेद नोंदवला नाही, याचे सखेद दुःख वाटले. असो..

In reply to by शलभ

तो वाढावा अशीच तर अंध विरोधकांची इच्छा आहे, नाही का? मग उलट अशा वक्तव्याना समर्थन द्यायला नको का? =============================== हा राजकीय मोर्चा नाही म्हणणार्यांनी त्या सिपीआयच्या झेंड्याबद्दलही दोन शब्द व्यक्त करावेत. अशानेच सामान्य माणसांच्या शेतकऱ्यांच्या संवेदनांना छेद जात नाही का? सामान्य शेतकऱ्यांच्या मागे सामान्य माणूस नेहमी उभा राहतो असं इतिहास सांगतो.

In reply to by विशुमित

माझ्या दृष्टीने सर्व सजीवांच्या जीवाला किंमत आहे. मुक्या जनावरांवर क्रूर अत्याचार करण्यास माझा विरोध आहे.

In reply to by विशुमित

सहमत. अतिशय खेदजनक. हे पण नेहमीचेच का ? https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MumbaiMirror/ -------------------------------------- ह्याच चालीवर , "लोकल ची बेसुमार गर्दी, त्यातुन पडणारे लोक", "पावसाळ्यात रस्त्यावरचे खड्डे, तुंबणारे रस्ते" इत्यादी इत्यादी हे पण नेहमीचेच असेही म्हणता येईल

In reply to by विशुमित

हो ना. वर १ लाख लाल टोप्या, १ एक लाख लाल झेंडे. ६ तारखेपासून ३ वेळेसचं जेवण. परतीचा प्रवास. कित्ती तो खर्च्च. आणि ७ दिवसाचं उत्पन्नाचं नुसकान! बिचारे गरीब शेतकरी इतका खर्च कसा उचलणार?

In reply to by विशुमित

शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत.>>> ==> अशा असंवेदनशील वाक्याला मिपावर कोणीच निषेद नोंदवला नाही, याचे सखेद दुःख वाटले. असो.. https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/the-farmers-will… आणखी एक आंदोलन! ___________________ किसान सभेच्या यशस्वी मोर्चानंतर आता राज्य शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. किसान सभेचा मोर्चा हा त्या पक्षाचा होता, त्या मोर्चाशी आमचा संबंध नाही. सभेचा मोर्चा यशस्वी झाला पण काही प्रश्नांची पूर्ण तड लागलेली नाही. त्यामुळे विविध प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आम्ही आंदोलनाची हाक दिली आहे, असा युक्तिवाद समितीने केला आहे. मंगळवारी यासदंर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार झाला. शेतकरी सभेच्या मोर्चाला तुम्ही पाठिंबा का नाही दिला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोन मोर्चे का काढता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या संघटनांमध्ये एकी नाही का, तुमच्यातच फूट पडली आहे का, अशी प्रश्नांची सरबत्ती झाली. त्यावर समितीने भूमिका मांडली. यावेळी रघुनाथदादा पाटील, सिद्धप्पा कलशेट्टी, सुशीला मोरोळे, किशोर ढमाले आदी उपस्थित होते. शेतकरी कामगार सभेचे अजित नवले मात्र अनुपस्थित होते. ___________________________________ हे शेतकरी नेते अत्यंत निर्लज्ज आहेत. अजित नवलेला महत्त्व मिळाल्याने या इतर नेत्यांना मिरची लागलेली दिसते. यांना शेतक-यांविषयी काहीही देणेघेणे नाही. स्वत:चे महत्त्व वाढविणे, जनतेला उपद्रव देणे एवढेच यांना जमते.

In reply to by श्रीगुरुजी

फडणविसांसारखे संवेदनाशील व कार्यक्शम मुख्यमंत्री मिळण्याची शेतक-यांची पात्रताच नाही. त्यांना काहीही न देता पार्श्वभागावर लाथा घालणारी खांग्रेस/भ्रष्टव्याधीच हवी.

In reply to by विशुमित

तुमच्या साहेबांप्रमाणेच तुम्हीसुद्धा खजील होऊन ओशाळवाणे हसण्यापलिकडे दुसरे काहीही करू शकणार नाही.

शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत. २०१९ साली २००४ ची पुनरावृत्ती होणार असे दिसू लागले आहे. त्यावेळी शायनिंग इंडिया चालू होते.नितिन गडकरींबद्दल काय बोलणार ?हसत हसत वेळ मारून नेणे म्हणजे चातुर्य असे त्यांचा समज.

स्मिता पटवर्धनांच्या लेखाचा प्रतिवाद करता येइल , पण त्या इथे नाहीत त्यामुळे त्यांच्या पर्यंत पोचणार नाही. बाकी कम्युनिस्ट लोकांना शिव्या देण्याची किंवा प्रवाहा बाहेर ठेवणार्यांचि गंमत वाटते . नाहि रे वर्गातले लोक नेहमी कम्युनिझम कडे आकर्शित होतात , आणि आहे रे वाले भांडवल शाहि कडे ! १०० % भांडवल शाही आणि १०० % कम्युनिझम दोन्हि प्रॅक्टिकल नाहि.

In reply to by कपिलमुनी

भांडवलशाहीने (सामान्य लोकांचही, सर्वांचं नव्हे) भलं झालेलं अनेक देश दाखवू शकतो, कम्युनिझमनं भलं झालेले कुठले देश आहेत?

In reply to by प्रचेतस

शेतकर्‍यांचे हक्क, कामगारांचे हक्क , सोयि , मेडिकल , पेन्शन , हक्काच्या रजा अशा अनेक गोष्टी या तून उदयास आल्या आहेत. मी १०० % कम्युनिझमचा समर्थक नाहि. पण भांडवल शाहि मध्ये आहे रे आणि नाहि रे यातील दरी वाढत जाते ,

In reply to by कपिलमुनी

शेतकर्‍यांचे हक्क, कामगारांचे हक्क , सोयि , मेडिकल , पेन्शन , हक्काच्या रजा अशा अनेक गोष्टी या तून उदयास आल्या आहेत.
आणि अस्तालाही पावलं आहे.

In reply to by कपिलमुनी

अगदी बरोबर. हे समजणे पूनम महाजनच्या आवाक्याबाहेरचे आहे. म्हणून मोर्च्यामागे नक्षल्वाद्यांचा हात असे तर्कट मांडून ती मोकळी झाली.

In reply to by कपिलमुनी

....बाकी कम्युनिस्ट लोकांना शिव्या देण्याची किंवा प्रवाहा बाहेर ठेवणार्यांचि गंमत वाटते
जी गोष्ट करून पाहिली नाही त्याचे आकर्षण वाटत असणेही शक्य आहे. कम्युनीझमचे नुसतेच समर्थन करण्यापेक्षा काही काळ कम्युनीझमचा अनुभव घेऊन पहाण्यास काय हरकत आहे आणि ते कम्युनीस्ट पक्षानेच केले पाहीजे असे नाही इतर पक्षांनी सुद्धा काही काळासाठी शेतीचे राष्ट्रीयीकरण करून पहाण्यास काय हरकत आहे. शेतकर्‍ञांच्या मुलांना त्यांच्याच शेतात नौकर्‍याही देता येतील . कर्ज काढण्याचे , पुन्हा माफ करण्यासाठी आंदोलनांचे आत्महत्या इत्यादींचे चक्रही रहाणार नाही. आत्महत्या टळल्याने आणि आंदोलने थांबल्याने उत्पादकताही वाढेल. *** मी नेता झालोतर शेतीचे राष्त्रीयीकरण कधीही करणार नाही, मला माझ्या हातचे आंदोलनाचे काम जाऊन शेतात कष्ट करणे जमणारे नाही ! :)

In reply to by माहितगार

घराला आग लागली तर काय होईल याचा अंदाज येण्यासाठी स्वतःच्या घराला आग लावायची गरज नाही. इतरांच्या घराला लागलेल्या आगीने काय झाले हे अभ्यासले तर जास्त चांगले होईल :) उदा: कम्युनिझम प्रेरित "सुधारणांचा" चीन, रशियाचा, कंबोडिया, येमेन आणि अनेक आफ्रिकन देश यांच्यातील अनुभव कानठळ्या बसतील इतका बोलका आहे ! आज कम्युनिझमने शंभरी गाठूनही, सर्वसामान्य नागरिकाचे जिणे आनंदी तर सोडाच, पण कमीत कमी स्वतंत्र आणि सुसह्य झालेला एकही कम्युनिस्ट देश दाखवणे शक्य झालेले नाही. हे पुरेसे बोलके नाही का ? कम्युनिझमचे सगळे तथाकथित युटोपियन वायदे, केवळ भोळ्या पुस्तकी संकल्पना राहिल्या आहेत आणि प्रत्यक्षात गरीब-शेतकरी-कामकरी यांना खोटी प्रलोभने दाखवून, वर वर "पिपल्स हे, पिपल्स ते" असे फसवे पांघरूण घालून त्याखाली प्रत्यक्षात सरंजामी-लष्करी हुकुमशाह्या तयार केल्या गेल्या आहेत. आणि त्याला होणारा जरासाही विरोध हिंसेने/हत्येने नष्ट केला गेला आहे. हे दुर्दैवी आहे पण सत्य आहे ! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुख्य म्हणजे... लेखनावरून तुम्ही विचारी दिसता. कम्युनिस्ट राजवटीत सर्वात प्रथम, विचारी माणसांची रवानगी शेतावर किंवा गुलागमध्ये किंवा रशियामध्ये सायबेरियात केली जाते. तेव्हा, असा काही विचार करताना सांभाळून असा ! ;) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुख्य म्हणजे... लेखनावरून तुम्ही विचारी दिसता. कम्युनिस्ट राजवटीत सर्वात प्रथम, विचारी माणसांची रवानगी शेतावर किंवा गुलागमध्ये किंवा रशियामध्ये सायबेरियात केली जाते. तेव्हा, असा काही विचार करताना सांभाळून असा ! ;) =))
असे काही झाले आप, अशा काही निमीत्ताने तरी आपल्या दोघांच्या भेटीचा योग येईल. मेहनतीने तब्येत बरी रहाते असे तुम्ही डॉक्टर लोकच सांगताना :) पण ज्या कम्यूनीस्ट मिपाकरांना जरा बदल म्हणून त्यांच्या बाजूने प्रतिसाद लिहिला तर त्यांच्या पैकी शेती च्या राष्ट्रीयीकरणाच्या प्रस्तावाच्या समर्थनार्थ कुणीच कसे पुढे आलेले नाही . तोट्यातील शेती सरकारला देऊन सरकारकडे नौकरी करण्यासारखी खरेतर ला जवाब कम्यूनीस्ट आयडीया दुसरी कोणती नाही . प्रतिसादापुरते कम्युनीस्ट होऊन पाहीले तरी कुणी कम्युनीस्ट समर्थनार्थ अद्याप पुढे कसा आला नाही बरे ! ;)

In reply to by कपिलमुनी

स्मिता पटवर्धनांच्या लेखाचा प्रतिवाद करता येइल , पण त्या इथे नाहीत त्यामुळे त्यांच्या पर्यंत पोचणार नाही.>>> ==>> स्मिता पटवर्धन व्यक्ती नाही वृत्ती आहे, इथून आरामशीर पोहचेल त्यांच्या पर्यंत.

In reply to by कपिलमुनी

१०० % भांडवल शाही आणि १०० % कम्युनिझम दोन्हि प्रॅक्टिकल नाहि.
मग काय, आपला शिक्का - पंजावर पक्का?

In reply to by कपिलमुनी

बाकी कम्युनिस्ट लोकांना शिव्या देण्याची किंवा प्रवाहा बाहेर ठेवणार्यांचि गंमत वाटते .
सहमत आहे. प्रत्येक विचारधारेचा आदर झाला पाहिजे. शेवटी विचारधारा इ सर्व बकवास असतं, माणसं कशी आहेत हे महत्त्वाचं.

In reply to by कपिलमुनी

तुमच्यासारख्या लोकांमुळं भाजपचा सायबर सैनिक बनायला अनेकांना प्रेरणा मिळते. ============== आणि हो, अगदी खरंच, निरव मोदीच्या मॅटरमधे पडती बाजू घ्यायचं कारण नाही. संपूर्ण केसमधे मोदी पळाला हेच्च नि एवढ्ढंच पाहणारे गाढव असतील तर त्यांचं निर्गाढवीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे.

माईसाहेब,
अगदी बरोबर. हे समजणे पूनम महाजनच्या आवाक्याबाहेरचे आहे. म्हणून मोर्च्यामागे नक्षल्वाद्यांचा हात असे तर्कट मांडून ती मोकळी झाली.
त्याचं काय आहे की ग्रामीण व मागास भागांतून नक्षलवाद्यांची पीछेहाट चालू आहे. म्हणून त्यांनी शहरांवर लक्ष केंद्रित केलंय. कोरेगाव भीमा निमित्ताने झालेली सणसवाडी इथली दंगल हे या नव्या व्यूहरचनेचंच अपत्य आहे. मुंबईत साधारणत: मोर्चाचा मुख्य घोळका निघून गेल्यावर शांतता असते. यंदा मात्र एकापाठोपाठ एक असे घोळके हिंडत होते. हे कशाचं लक्षण आहे ते आम्हांस चांगलं समजतं. तेंव्हा जरा वस्तुस्थितीवर भाष्य केलंत तर बरं पडेल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

राणीच्या गावात राहून कोरेगाव भीमा बद्दल तुमच्याकडे असणारी माहिती वाखाणण्याजोगी आहे. (हा. घ्या )

In reply to by विशुमित

विशुमित, अहो जग जवळ आलंय : https://www.bbc.com/marathi/42541030 मुंबईत ९० बशी आणि राज्यभरात १६७ फोडण्याची प्रकाश आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाची ताकद वा नियोजन आहे का? साधा प्रश्न आहे. याउलट नक्षलवादी पद्धतशीरपणे हिंसाचार करतात. प्रकाश आंबेडकरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणतरी चाप ओढतोय ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

इंजिनवाल्यानीही मुंबईत बशी फोडल्या होत्या की . त्याना शिकवायला नक्षली आले होते का ? किंबहुना , बहुजनांची आधी कुरापत काढून नंतर त्यांच्या reaction चा गवगवा करून त्याना नक्षली ठरवण्याचा प्लॅन तर नसेल ?

In reply to by manguu@mail.com

अहो मंगू, इंजिनवाल्यांची ताकद किती? प्रकाश आंबेडकरांची ताकद किती? जरा तुलना करून पाहता का! आ.न., -गा.पै.

नवपरिणीत भाजपा नेत्याची खास लिंक तुमच्यासाठी नरेश अगरवाल ! काही मतासाठी भाजपने नुकतेच पावन केलेत. सर्व हिंदू लोकांनी ऐकावी .

In reply to by श्रीगुरुजी

नुसताच चुकीचा निर्णय नाही तर बाद कॅटेगरीतील निर्णय! भाजप जर कधी रसातळाला गेलंच तर ते असल्या बाद निर्णयांमुळेच!!

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनी, दुव्याबद्दल धन्यवाद! जेटलींनी चांगलाच समाचार घेतलाय. असेच छानछान चलचित्रं पाठवीत चला. आ.न., -गा.पै.

In reply to by कपिलमुनी

आपण ह्यावर श्रीगुरुजींचे विश्लेषण घेऊया, नारायण राणे भाजपात आला नाहीये तर भाजपने राणेंना फक्त पाठिंबा दिलाय हे त्यांनी मला कालच नीट समजवले आहे (अन मला ते पटलेले ही आहे) , फक्त पाठिंबा देणे म्हणजे पक्षात घेणे नसते (मग तो पाठिंबा राज्यसभेवर जायला असला तरीही) , आता काल त्यांनी इतकं उत्तम विश्लेषण दिल्यावर मला तरी अजून काही प्रश्न नाहीयेत, तुम्ही पण वाट पहा ही विनंती.

In reply to by कपिलमुनी

सगळी घाण प्रमुख राष्ट्रिय राजकीय पक्षांत असायला हवी. हे लोक पक्षाच्या रोलवर नसताना समाजासाठी खूप जास्त खतरनाक असतात. ज्यांना जेल मधे टाकता येत नाही त्यांना राष्ट्रीय पक्षांत टाकावे. उदा. केजरीवाल काँग्रेसमधे असता तर खूप बरं राहिलं असतं. त्याचा सवता सुभा असल्यानं त्यानं केलेली घाण अतीच आहे.

In reply to by arunjoshi123

हे तुम्ही भाजप ,काँग्रेस इत्यादींच्या राष्ट्रीय कार्यकारणीना समजावून सांगा न प्लीज, म्हणजे त्यांनी उजळ माथ्याने राष्ट्रीय कारणांनी राष्ट्रहितासाठी आम्ही ही घाण पार्टीत घेत आहोत असे एकदाचे (काहींच्या मते कोडगेपणाने) सांगून टाकले की भेंडी डोक्याला शॉटच नाही लागणार मीडियाचा, आज काय दिवसभर नारायण राणे पहा, उद्या काय दिवसभर नरेश अग्रवाल पहा असले आयटमच नको तेज्यायला. इथे निवडणुकी डोळ्यासमोर ठेऊन घाण पवित्र करून घेतली जातेय तिला नैतिक अधिष्ठान पण मिळेल, मी तर म्हणतो गंगा स्वच्छ करण्यावर करोडो कश्याला खर्च करा! गंगा नदीच भाजप मध्ये घेऊन टाका! राणे अग्रवाल प्रमाणे ती पण 'साफ' होऊन जाईल.

In reply to by जेम्स वांड

नाही पण मी काय म्हणतो, हे पवित्र करणे, साफ करणे म्हणजे नेमके काय? म्हणजे भाजप मध्ये कोणी प्रवेश केला कि पवित्र करून घेतले वगैरे का म्हणतात? ============================== ते नवज्योतसिंग सिद्धू, नाना पटोले वगैरे पवित्र होतात कि घाण?

In reply to by बिटाकाका

नवज्योतसिंह सिद्धू किंवा नाना पटोलेंपैकी कोणी प्रभू रामचंद्राबद्दल अक्षरशः हीन वक्तव्य केलंय काय? नरेश अग्रवालचा इतिहास तुम्हाला माहिती नाही का? प्रत्यक्ष सदनात तो काय बोललाय हे मी तरी एक धर्माभिमानी हिंदू म्हणून मी अवाक्षरही परत लिहू बोलू चर्चा करू इच्छित नाही, तुम्हांस गरज असल्यास तुम्ही ते शोधून पहा. तुम्हाला भाजप प्यारी असेल अन तिच्या उडत्या पडत्या बाजूनेही वाद घालायचाच असेल तर निरुपाय, पण मी तुम्हाला माझ्याप्रमाणेच धर्माभिमानी गृहस्थ मानत होतो. तुमच्यासाठी भाजप पहिला असेल माझ्यासाठी रामलल्ला आहे. इतकेच :)

In reply to by जेम्स वांड

वांड साहेब, गल्लत होतीय साहेब! माझा प्रश्न नरेश अग्रवालबद्दल नाही तर कोणीही भाजप मध्ये आलं (उदा. आख्खी पिंपरी चिंचवड वगैरे) कि तेच तुणतुणं वाजवलं जातं त्याबद्दल आहे. माझं नरेश अग्रवालला घेण्याबद्दलचं मत वरच मांडलं आहे, तुमच्या वाचनसोयीसाठी खाली लिंक देतो. http://www.misalpav.com/comment/986470#comment-986470 ========================= या स्पष्टीकरणासह परत तोच प्रश्न विचारतो - भाजपमध्ये घेऊन पवित्र करणे म्हणजे नेमके काय करणे?

In reply to by बिटाकाका

तर पवित्र करणे ह्यावर माझा टेक मांडतो, पटला तर बघा काही वेगळं वाटत असेल तर निःशंकपणे सांगा मी माझे विचार बदलून घेईन. पवित्र करून घेणे म्हणजे, समजा क्ष ह्या मतदारसंघात भाजपला जिंकायचा चान्स कमी आहे, पण तिथला विरोधीपक्ष सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्ट आहे, तिथे त्यांनी (विरोधकांनी) जिंकू शकणारा उमेदवार सोडून तिसऱ्याच उमेदवाराला तिकीट दिलंय तर अश्या उमेदवाराला भाजप मध्ये घेऊन , स्थानिक जुन्या कार्यकर्त्यांना डावलून, ह्या आयात उमेदवाराला तिकीट देणे. बऱ्याचवेळी हे उमेदवार भूतकाळात भाजपवर घणाघाती टीका करून चुकलेले असतात, किंवा त्यांच्या पूर्वपक्षात त्यांनी केलेल्या काही भ्रष्टाचार, अनैतिक वक्तव्यावर भाजपने ही (भूतकाळात) यथेच्छ टीका केलेली असते, पण ते सगळे विसरून फक्त ती सीट मिळवायला भाजपने त्या बाहेरच्या उमेदवाराला स्थानिक प्रामाणिक कार्यकर्ते डावलून फक्त जिंकायचे म्हणून तिकीट दिले की त्याला पवित्र करून घेणे म्हणले जात असावे.

In reply to by जेम्स वांड

हम्म ओके, मी या (टाईपच्या) पवित्र करण्याला मग राजकारण असेच म्हणेन. --------------------------------------- मला वाटतं हि भाजपला अनेक निवडणुका हरल्यानंतर आलेली उपरती असावी. सत्तेत येण्यासाठी नुसती नैतिकता ठेऊन चालत नाही. वाजपेयींच्या बाजूने सर्वसाधारण मत असताना (वाजपेयींच्या वेळी) देखील फक्त प्रत्येक दोलायमान मतदारसंघ टार्गेट एरिया ठरवून तिथे जिंकणारे उमेदवार दिल्याने काँग्रेस सत्तेत येऊ शकली असे मला वाटते. भाजपची आताची स्ट्रॅटेजीहि अशीच दिसतेय. -------------------------------------- पण तरीही स्थानिकांना, निष्ठवंतांना डावलून वगैरे मुद्दा मला पटत नाही. अशी टिका टाळायची असेल तर १००% निष्ठावंतांना तिकीट देणे हा एकच मार्ग उरतो. हि अशी निष्ठावंतांना डावलल्याची टिका करताना त्या डावलण्याचे प्रमाण काय हे पूर्णपणे विसरून हवेत गोळीबार केला जातो असे मला वाटते.

In reply to by बिटाकाका

इत्यादींवर मी ताज्या घडामोडी -२६ वर कॉमेंट केलीये काका, त्याची इथे द्विरुक्ती टाळतो, तिकडे ह्या उपरतीवर माझे विचार मी मांडले आहेत. :)

In reply to by चिर्कुट

भाजप निर्लज्ज असेल. पण मी केलेलं विधान फक्त भाजपसाठी नाही. =================== अ चे ८ मुले आहेत. त्यात एक गुंड आहे. तर तो देखील एकत्र कुटुंबात राहावा असं जनरल म्हटलंय. त्या कुटुंबाला इज्जत सांभाळायची असते नि गुंड मुलगा कुणाचं ना कुणाचं काही ना काही ऐकत असतो. तो शहरातल्या खोलीवर राहून सुसाट सुटल्यापेक्षा बरं. =================== बाकी सलज्ज पक्ष कोणते ते आम्हालाही सांगा. मतदानासाठी माहीती कामी येईल.

In reply to by श्रीगुरुजी

कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या गरीब शेतक-याकडे बराच मोठा चतुर भ्रमणध्वनी संच दिसतोय.

In reply to by श्रीगुरुजी

बरं झाले म्हणायचं शेतकऱ्यांनी ४०-४० हजाराची बैलं आणली नाहीत मोर्च्याबरोबर नाही.

In reply to by विशुमित

म्हणजे बैलांनी गरीब बिच्चा-या शेतक-यांसाठी अपार यातना सहन करून खच्चीकरण करून घ्यायचे, नाकात वेसण घालून घेऊन भर उन्हात नांगर ओढायचा, प्रचंड ओझे लादलेली गाडी ओढायची, प्रचंड अत्याचार व छळ सहन करीत शर्यतीत तोंडाला फेस येईपर्यंत उरापाड धावून गरीब बिच्चा-या गांजलेल्या कर्जबाजारी शेतक-यांचे मनोरंजन करायचे, वय झाल्यावर खाटकाची सुरी मानेवर फिरवून घ्यायची आणि गरीब बिच्चा-या गांजलेल्या शेतक-यांच्या मोर्चातही तंगडतोड करायची. वा!