समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता....
कथा, कादंबऱ्या, काव्य, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, लघुनिबंध, नाटकं, लोकसाहित्य, समीक्षा इत्यादी विविध प्रकारांचा साजशृंगार चढवून आपली मराठी भाषा सजली आहे, नटली आहे. पण बहुधा फक्त महाराष्ट्रात आणि मराठी संस्कृतीतच आढळणाऱ्या एका प्रथेत सादर होणारा साहित्य प्रकार म्हणजे - शुभप्रसंगी उखाण्यात नाव घेणं. साहित्य प्रकार म्हणून जरी याची विशेष गणना होत नसली, तरीही मराठी भाषेच्या साजशॄंगारातील हा एक छोटासा पण सुबक दागिना. उखाण्यात पतीचं नाव घेण्याची सुरुवात सहसा मुलीच्या लग्नापासून होते. (अर्थात नाव घेण्यात पुरुषांचाही समावेश असतोच). त्यानंतर गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन, कंकण सोडणं, डोहाळे जेवण, बारसं अशा अनेक प्रसंगी ही परंपरा चालूच राहते. पूर्वी मुलींची लग्नं लहान वयात होत असत आणि नवऱ्याचं नाव उघडपणे घेण्याची वा नवऱ्याला नावाने हाक मारायची पद्धत नव्हती. शिवाय अनेकदा वधु-वरांनी एकमेकाला लग्नाआधी पाहिलेलंसुद्धा नसायचं. त्यामुळेच अशा प्रकारे आपल्या पतीचं नाव घेण्याची प्रथा पडली असावी. अनेकदा वधुवरांना एकमेकाचं नावही माहीत नसे आणि मग पुलंनी लिहिल्याप्रमाणे एखादी नववधू बिनदिक्कतपणे ’बेंबटेरावांचं नाव घेते....’ असा उखाणा घेऊन मोकळी व्हायची. पण काहीही म्हणा, आपल्या जीवनात नव्याने प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची इतकी चांगली ओळख करून देण्याची रीत फक्त मराठीतच असावी. आजच्या काळात एक गंमत या पलीकडे उखाण्याचं महत्त्व उरलं नसलं, तरीही उखाणे हे स्त्रीचं भावविश्व व्यक्त करतात. काळ बदलला तरी आजही मुलीच्या, स्त्रीच्या भावना त्याच आहेत, कदाचित आविष्कार बदलला असेल. असेच काही उखाणे आपण पाहू या. काही उखाणे दोन घरांच्या वा कुटुंबांच्या मिलनाची ग्वाही देतात - - एका मातीतली तुळस दुसऱ्या मातीत रुजवली, ---- रावांची माणसं मी आपली मानली. - माहेरचं निरांजन सासरची वात, ---- रावांचं नाव घेऊन करते संसाराची सुरुवात. - ---- रावांच्या बरोबर जाताना मन गेलं गांगरून, आई-बाबांच्या आशीर्वादाची शाल घेते पांघरून. तिच्या नवीन विश्वात तिच्या जोडीला असतो तो तिचा जीवनसाथी. त्याच्याकडून ती आनंदी व सुखी जीवनची स्वप्नं रंगवते. त्याबरोबरच त्याच्यावरचा विश्वासही व्यक्त करते आणि त्याच्या क्षेमकुशलाची प्रार्थना करते. - शुभ मंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी, ---- राव आता माझे जीवनसाथी. - कळी हसेल, फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध, ---- च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद. - स्वाती नक्षत्रातील थेंबाने शिंपल्यात होतो मोती, ---- च्या संगतीत उजळेल जीवन ज्योती - मंगल देवी, मंगल माते वंदन करते तुजला, ---- रावांना आयुरारोग्य लाभो हीच प्रार्थना तुला. - बकुळीचा बकुल गंध, मातीचा मृद्गंध, ---- ची साथ हा रेशमी ऋणानुबंध. लग्नानंतर ती फक्त पतीशीच नाही, तर सासरशी संबंधित सर्वांशी आपलं नातं जोडते. त्यांचा मान राखते, सासरचं घर आपलं मानून स्वत:चं घर कसं असावं हेही सांगते. - लग्नासारख्या मंगल दिनी नका कुणी रागवू नी रुसू, ---- ना घास भरवताना मला येते गोड हसू - नाव घे नाव घे आग्रह पडला सर्वांचा, ---- चं नांव घेते मान राखून प्रेमाचा - श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य, ---- आणि माझ्या संसारात होईल सर्वांचे आदरातिथ्य - सुख, समाधान तिथे लक्ष्मीचा वास, अशा घराची माझ्या मनी आस, ---- ला/ना भरवते जिलबीचा घास - अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा, ---- आणि माझ्या पाठीशी सदैव राहोत हीच माझी इच्छा सुखी संसाराची पुढची पायरी म्हणजे बाळाची चाहूल. ही गोड बातमी सांगताना ती म्हणते, - सूर्य मावळतो चंद्र उगवतो रजनी टाकते हळूच पाऊल, ----- आणि ---- च्या संसारात लागली बाळाची चाहूल ही गोड बातमी कळल्यावर पहिलटकरणीचा थाट मांडला जातो. तेव्हा आपल्या कौतुकाचं वर्णन कराताना ती म्हणते, - सासूबाई आहेत प्रेमळ, वन्सं आहेत हौशी ---- चं नाव घेते डोहाळ जेवणाच्या दिवशी. - चांदीच्या भांड्यांना नाशिक घाट, ---- चं नाव घेते आज डोहाळ जेवणाचा थाट. उखाण्यांशी जरी स्त्रीचं भावविश्व जोडलेलं असलं, तरी या उखाण्यांच्या रचनेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यमक जुळवणं. मग आगदी भावनांची मांडणी असायलाच हवी असं नाही आणि पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी अर्थाअर्थी काही संबंध असायला हवा असंही नाही. यामुळेच यमक जुळणीचे असे असंख्य नमुने पाहायला मिळतात, उदा., - हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, ---- चं नाव घेते ---- च्या दिवशी - महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, ---- च नाव घेते सर्वांचा मान राखून असेच काही उखाणे पुरुष वर्गाच्या मदतीला हमखास धावून येणारे - - भाजीत भाजी मेथीची, ---- माझ्या प्रीतीची - देवाची करणी नारळात पाणी, ---- च आहे माझी राणी - वन टू थ्री वन टू थ्री, ---- चं नाव घेतो मला करा फ्री - डेलचा पीसी, सीगेटची डिस्क, ---- शी लग्न केलं घेतली मोठी रिस्क - नाशिकची द्राक्षं नागपूरची संत्री, ---- झाली माझी गृहमंत्री ग्रामीण उखाण्यांचा बाज थोडा वेगळा असतो, त्याचे काही नमुने - - हंड्यावर हंडे सात, त्यावर साखरेची परात, ---- भर्ताराचं नाव घेते येऊ द्या मला घरात - दारात होती तुळशी घालत होते पाणी, आधी होते आईबापाची तानी, आता झाले ---- रावांची राणी - काळी साडी काळं झंपर, निऱ्या घालते ठासून, ---- चं नाव घेते त्यांच्या मांडीवर बसून - झाड झुमक्याचं, पान उमक्याचं, कढी ताकाची, लेक बापाची, नाजूक नार ---- भर्ताराची काही ठिकाणी हौशी बायका जनपद - म्हणजे मोठे उखाणे घेतात. उदा., - घरापुढे अंगण, अंगणापुढे ओसरी, ओसरीपुढे माजघर, माजघरात फडताळ, फडताळात चांदीचं भगुलं, भगुल्यात होती रवी, ---- रावांची साथ मला हवी सध्याच्या काळात जरी हे कालबाह्य वाटलं, तरीही 'एफ़बी'वर आणि 'व्हॉट्स अॅप'वर ’अपलोड’ करण्यासाठी तरी ’उखाण्यात नाव घेणं’आपलं अस्तित्व टिकवून आहे, हेही नसे थोडके. उखाण्यासाठी यमक जुळवणं त्याहीपेक्षा परस्परांशी जुळवून घेणं अधिक महत्त्वाचं आहे, नाही का? . .
वाचने
26764
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
बाबौ ! =))
In reply to :) by पैसा
मॅराथॉन उखाणा... गिनेस बुक ऑफ
In reply to :) by पैसा
=))
In reply to मॅराथॉन उखाणा... गिनेस बुक ऑफ by डॉ सुहास म्हात्रे
धन्य आहे.
In reply to :) by पैसा
हा ऐकलाय आधी थोड्याफार फरकाने
In reply to :) by पैसा
तुमचा आता त्यावर भरपूर अभ्यास
In reply to हा ऐकलाय आधी थोड्याफार फरकाने by अभ्या..
प्रचंड, टूसन लूं?
In reply to तुमचा आता त्यावर भरपूर अभ्यास by प्रचेतस
मी नै ऐकलं ब्वॉ तुला उखाणा
In reply to प्रचंड, टूसन लूं? by अभ्या..
दागिन्यांची आवड आणि
In reply to :) by पैसा
अरे देवा!
In reply to :) by पैसा
धोक्याचा इशारा :-) :-)
In reply to अरे देवा! by पिवळा डांबिस
बाकी स्वतःच्या लग्नातल्या
In reply to अरे देवा! by पिवळा डांबिस
अगग्ग...
In reply to :) by पैसा
वाह. काही उखाणे उपयोगी आहेत.
वाह, मस्त लेख.
मस्तच!
छान लेख.
उखाणे जोरात आहेत :-)
सय्यद भाई
In reply to उखाणे जोरात आहेत :-) by अनिंद्य
असाच ऐकलाय. मामाची मुलगी असेल
In reply to सय्यद भाई by कपिलमुनी
छानच
ग्रामीण उखाण्यांचा बाज थोडा
मस्त उखाणे
दाढीवाल्या नवर्यांसाठी
=))
In reply to दाढीवाल्या नवर्यांसाठी by सर्वसाक्षी
ऑल टाईम सुपरहिट उखाणा !
In reply to दाढीवाल्या नवर्यांसाठी by सर्वसाक्षी
सरबत
धन्यवाद
वा! झकास !!!....
मस्त उखाणा!
@ आर्या१२३,
In reply to मस्त उखाणा! by आर्या१२३
हा असाच उखाणा मी माझ्या लग्नात घेतला होता
In reply to मस्त उखाणा! by आर्या१२३
वाह!
In reply to हा असाच उखाणा मी माझ्या लग्नात घेतला होता by श्वेता२४