Skip to main content

मी तृषार्त भटकत असता

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 03/03/2018 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी तृषार्त भटकत असता मृगजळास भरते आले मी मला गवसण्या आधी वैफल्य विकटसे हसले शब्दांच्या इमल्यापाशी सावली शोधण्या गेलो पण शब्दांचे केव्हाचे धगधगते पलिते झाले क्षण क्षणास जोडित जाता वाटले काळ संपेल पण वितान हे काळाचे दशदिशा व्यापुनी उरले
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3769
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

अहाहा! अतिशय आवडली कविता!
शब्दांच्या इमल्यापाशी सावली शोधण्या गेलो पण शब्दांचे केव्हाचे धगधगते पलिते झाले
हे तर खासच!

प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

छानच !!

आवडली... बरेच दिवसांनी वितान हा शब्द भेटला. पैजारबुवा,

In reply to by अनन्त्_यात्री

मी तृषार्त ढोसत असता मी तृषार्त ढोसत असता मित्रांस भरते आले मी काही बोलण्या आधी सगळे विकटसे हसले ताटलीच्या तळापाशी मी दाणे शोधण्या गेलो पण दाणेतर केव्हाचे पोटात गायबसे झाले पेग पेगास जोडित जाता वाटले रात्र संपेल पण मिसकॉल हे बायकोचे दशदिशा दणाणत सुटले (छोटा छत्री) पैजारबुवा,