Skip to main content

परीचे पशुधन

लेखक धनंजय यांनी शनिवार, 09/02/2008 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
परीचे पशुधन ***************** परीच्या गोठ्यात गोगलगाय तिच्या दुधाची चंदेरी साय शिंगे मऊमऊ म्हणून काय धोक्याचे तिच्या पोटातले पाय *** परीच्या छतातलं चिमणीचं घरटं लखलख काचेचं चकचक करतं चिमणीच्या चालतो आराम मस्त गरजेच्या वेळी तेलच नसतं *** परीच्या पागांत बंदुकीचा घोडा बाबड्याला लागतो खुराक थोडा लगाम न लागे, कधी न ओढा उधळे तेव्हा, कधी न झोडा *** परीच्या झाडावर पराचा कावळा नका रे समजू कावळ्याला बावळा कोकलतो कोहळा असल्यास आवळा मागून माजतो गोंधळ सावळा *****************
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4506
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

हि दोन्ही पद्ये खूप खूप आवडली... :)) एकदम मस्त!!! शब्द इतके सहज, नादमय, सोपे आहेत की लगेच तोंडात बसतात :) पुलेशु -ऋषि़केश

मानव या पशुसाठी असलेले हे विचारधन आहे. प्रकाश घाटपांडे

शिंगे मऊमऊ म्हणून काय धोक्याचे तिच्या पोटातले पाय हा हा हा! मस्तच... :) तात्या.

परीच्या गोठ्यात गोगलगाय तिच्या दुधाची चंदेरी साय शिंगे मऊमऊ म्हणून काय धोक्याचे तिच्या पोटातले पाय आवडले लै भारी. :)

परीच्या पागांत बंदुकीचा घोडा बाबड्याला लागतो खुराक थोडा लगाम न लागे, कधी न ओढा उधळे तेव्हा, कधी न झोडा खूपच छान... एकदम छानच. - प्राजु