Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by खिलजि on Wed, 02/28/2018 - 17:02
त्यांचं प्रेम दुधासारखे सफेद होते मस्त पैकी उतू जात होते आनंदाची साय जाऊन जाऊन भांडण एवढे वाढते कि त्याचे घट्ट दही होते विचारांची पकड सैल होतं जाते रंगवलेलं काय वेगळंच पण घडत मात्र दुसरंच असते आता प्रेम, प्रेम नसते , तर त्याच ताक झालेलं असते हेवेदावे मांडले जातात , वादावर वाद घातले जातात भावना घुसळून घुसळून वर येतात " शिल्लक राहिलेल्या आठवणी " प्रेम आता प्रेम नसतं, तर बनतं त्याचं लोणी असंच काही काळ साठवलं जातं "मी कशाला जाऊ ? ती येईल हवंतर " असं काहीसं लिहून पाठवलं जातं वाट बघून बघून हळूहळू लोणीपण चामट होत जातं इतकं कि नंतर त्याचं मेण बनत जातं आजकालच प्रेम हे असं पहिलं दुधावानी असतं नंतर नंतर त्याचं शेण बनत जातं सिद्धेश्वर विलास पाटणकर
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 02/28/2018 - 18:02

Permalink

एकच लंबर.

एकच लंबर. मस्त रंगलीय प्रेमाची डेअरी.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 03/01/2018 - 13:25

In reply to एकच लंबर. by अभ्या..

Permalink

डेअरीत शेण आणि मेण पण मिळतं

डेअरीत शेण आणि मेण पण मिळतं का अभ्याभौ ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 03/01/2018 - 15:05

In reply to डेअरीत शेण आणि मेण पण मिळतं by सस्नेह

Permalink

ते उपपदार्थ आहेत.

ते उपपदार्थ आहेत. सब्सिडेअरी ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 03/01/2018 - 15:20

In reply to ते उपपदार्थ आहेत. by अभ्या..

Permalink

:D

:D
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on गुरुवार, 03/01/2018 - 20:05

In reply to :D by सस्नेह

Permalink

खरंय , उपपदार्थ तेही

खरंय , उपपदार्थ तेही प्रेमातल्या डेअरीतले :D सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 02/28/2018 - 18:27

Permalink

लीलाधराची साय

लीलाधराची साय ही अजरामर कविता आठवली.
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on गुरुवार, 03/01/2018 - 13:13

Permalink

धन्यवाद

अभ्या शेट आणि पैसा ताई .. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2081 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com