✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझी खाद्ययात्रा..

भ
भाग्यश्री यांनी
Fri, 03/06/2009 - 01:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13589 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

मस्त चवदार

विसोबा खेचर
Fri, 03/06/2009 - 01:09 नवीन
मस्त चवदार लेख..! :) एक वि.सू : आम्ही हे सगळं वर्षभरात खाल्लं आहे याची नोंद घ्यावी! जियो..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

मस्तच !

मिथिला
Fri, 03/06/2009 - 01:36 नवीन
भाग्यश्री... छान लिहिले आहेस .... आम्ही हे सगळं वर्षभरात खाल्लं आहे याची नोंद घ्यावी! :)
  • Log in or register to post comments

खासच आहे लेख

संदीप चित्रे
Fri, 03/06/2009 - 01:49 नवीन
>> इथली साउथवेस्टर्न एग रोल्स ही डीश जर तुम्ही नाही खाल्लीत तर काहीच अर्थ नाही! कालच रात्री चिलीज मधे साउथवेस्टर्न एग रोल्स खाऊन आलो :) तसेच बफेलो विंग्जही मला चिलीजइतके बाकी कुणाचेच आवडत नाही ! तू चिलीजमधे मॉर्ल्टन चॉकोलेट केक हे डेझर्ट खाल्ले आहेस का? नसशील तर खाऊन बघ....... आणि नक्की कळव मला !!! -------- रूबी ट्युसडेमधेही तिलापिया बेष्ट मिळतो. जरूर ट्राय कर. -------- तुमच्या इथे मॅकरोनी ग्रिल किंवा बर्टुचीज ही इटालियन रेस्टॉरंट्स आहेत का? त्यांचे अनुक्रमे 'पेने रस्टिका' आणि 'टस्कन चिकन विंग्ज' खाऊन बघ :) --------- टिरामिझु हे डेझर्ट आवडतं का? मग 'ऑलिव्ह गार्डन'ना पर्याय नाही !!! ---------
  • Log in or register to post comments

ओटीबी

संदीप चित्रे
Fri, 03/06/2009 - 02:20 नवीन
अग हो... ऑन द बॉर्डर (ओटीबी) राहिलंच की यादीत ! आधी मार्गारिटा प्यायची आणि मग मेक्सिकन फूड एन्जॉयायचं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

सही

नंदन
Fri, 03/06/2009 - 01:50 नवीन
खाद्ययात्रा मस्त जमली आहे. कोबीचं पिठलं वाचून गंमत वाटली :). डेनीज खरोखर रात्रीच्या वेळी गप्पा हाणायला चांगली जागा आहे. कॉलेजात रात्री बसून लॅबमध्ये एखादं मोठं प्रोजेक्ट संपेपर्यंत सकाळचे ३-४ वाजत. अशा वेळी, डेनीजचाच सहारा असे. डेनी सोडलं तर, त्या काळात जॅक इन द बॉक्स बरोबर खिशाला परवडणारं म्हणजे टॅको बेलच. १.०७ डॉलर्स इतक्या मोठ्या रकमेत अनेक वेळची जेवणं तेव्हा पार पडली होती :) चिलीज मधल्या मेन डिशेसबरोबर त्यांचा 'मोल्टन चॉकलेट केक'ही बेश्ट असतो. फक्त खाताना कॅलरीजचा विचार करू नये ;). वुड रांचबद्दल प्रथमच ऐकलं. एकदा ट्राय करायला हवं. तात्या म्हणतो, तसा मस्त चवदार लेख झाला आहे!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मस्तच..

नाटक्या
Fri, 03/06/2009 - 01:58 नवीन
पण अजूनही काही वैशिष्ठ्यपुर्ण ठिकाणं राहीली आहेत. अर्थात कदाचित ती लोकल असावीत. पण ह्यात माझीही भर.. १. ऑलिव्ह गार्डन / पास्टा पोमोडोरो / मकॅरोनी ग्रिल - इटालियन २. थाय क्युजीन्स.. बे एरियात असंख्य. त्यातल्या त्यात माझे फेवरिट "माय थाई" ३. पी. एफ. चँग जरी चायनिज असले तरी तितके ऑथेंटिक नाही. सॅन फ्रान्सीस्को मध्ये चायना टाऊन मध्ये उत्तम चायनिज मिळते. कुंग-पॉ चिकन आणि फिश फिले माझे फेवरिट.. ४. बे एरिया मध्ये काही ईंडो-पाकिस्तानी रेस्टॉरंट्स आहेत, शान, शालिमार, पाकवान इ. बिर्यानी आणि तंदूर चिकन तर लाजवाब. आठवड्यातून एकदा तरी जातोच तिथे.. ५. सुप्प्लॅन्टेशन सारखेच स्विट टोमॅटो आणि फ्रेश चॉइस - मुलांचे आवडते ६. टॅको बेल सारखेच "चिपोतले", मेक्सीकन मध्ये चिलीज, शेवीज ही दोन मोठी नावं.. ७. अमेरिकन फूड साठी: कोकोज, एलिफंट बार सारखे रेस्टॉरंटस.. ८. मलेशियन रेस्टॉरंटस: बे एरिया मध्ये 'बनाना लिफ' इथला रोटी-प्राठा (हो रोटी-प्राठा) अप्रतिम. ह्याचा मालक पुर्वी सॉफ्टवेअर इंजिनियर होता नंतर त्याने हे रेस्टॉरंट काढले, आता १० इंजिनियर इतके कमवतो. शुक्रवार-शनिवार या ठिकाणी ३०-४५ मिनिटे वाट बघायला लागते. ९. बे एरियातील असंख्य 'फो' रेस्टॉरंटस, 'फो' म्हणजे तांदळाच्या शेवया, भाज्या आणि कुठल्याही प्रकारचे मांस/मासे या पासून बनवलेले सूप. हा व्हिएटनामी प्रकार आहे. खुप छान लागतो. http://en.wikipedia.org/wiki/Pho १०. असंख्या भारतीय रेस्टॉरंटस: साऊथ इंडियन (यात उडूपी/मद्रास आणि हैद्राबादी असे दोन उपप्रकार पण आहेत), गुजराथी, नॉर्थ इंडियन, (नेपाळी सुध्दा होते ते बंद झाले). फक्त नाही ते एकही मराठी रेस्टॉरंट!!! :-( त्यामुळे त्या जेवणासाठी सौ. वर अवलंबून रहावे लागते... :-) - नाटक्या
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Fri, 03/06/2009 - 02:02 नवीन
उत्तम यादी. अन्नपूर्णा नावाचे एक नेपाळी रेस्टॉरंट होते ना बे एरिआत? इथे 'रेड सी' आणि 'हरार' नावाची दोन इथिओपियन हाटेले आहेत. तीही (वारंवार) भेट देण्याजोगी. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

अन्नपुर्णा

नाटक्या
Fri, 03/06/2009 - 02:37 नवीन
बहुतेक बंद झाले.. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

नाटक्या,

भाग्यश्री
Fri, 03/06/2009 - 02:49 नवीन
नाटक्या, उत्तम यादी ! मी बरीच विसरले यातले.. मराठी जेवण किंवा सद्ध्यातरी स्नॅक्स खायचे असतील तर आर्टेशिया मधे 'मुंबई की गलीओंसे' ला जाऊ शकता.. साबुदाणा वडा अप्रतिम असतो.. शिवाय कच्छी दाबेली, पावभाजी, बाँबे सँडविच, आपलं इंडो-चायनिज स्टाईल मांचुरिअन.. उत्तम मेनू आहे.. पदार्थ, जेवण उत्तम असते.. पण सद्ध्याच सुरू झाल्याने तो मालक सतत मार्केटींग करून प्रचंड पकवतो.. त्याही पेक्षा तुमच्या जागेपाशी येऊन बडबडबडबडबड बडबड करत बसतो ! एक घासही जात नाही त्यामुळे नीट.. असो.. पण पदार्थ चांगले असतात तसे.. आर्टेशिया मधले तर बरेच रेस्टॉ. आहेत.. राजधानी ए१!! प्रॉपर आपली इंडीयन थाळी.. अप्रतिम जेवण आहे तिथले.. सुदैवाने (तुम्हा सर्वांना जळवायला माझ्याकडे फोटो आहे !) :) Image removed. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

मेलो, खपलो,

टिउ
Fri, 03/06/2009 - 02:52 नवीन
मेलो, खपलो, ठार झालो! तात्या फोटो बघुन असं का म्हणतात नेहमी हे आज मला कळालं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

अस्सल मर्‍हाठी पदार्थ ...

नाटक्या
Fri, 03/06/2009 - 02:56 नवीन
तसे मुंबईतले इतर पदार्थ मिळतात इथे (वडापाव, पाणीपुरी इ) पण अस्सल मराठी पदार्थ नाही मिळत. पुरणपोळी आणि कटाची आमटी, थालीपिठ, साबुदाणा वडा, सुरळीच्या वड्या, पिठलं-भात, मुगवड्यांची भाजी, अळूचं फतफदं, कोंबडी वडे, कोलंबीच हुमणं, ज्वारी/बाजरी/कळणाची भाकरका, ठेचा/झुणका, मसाले-भात, शेंगोळ्या, खमंग काकडी आणि मुख्य म्हणजे झणझणीत मिसळ, तर्री आणि पाव हे कुठे मिळणार? - नाटक्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

चर्चा

बेसनलाडू
Fri, 03/06/2009 - 02:57 नवीन
नाटक्या, तुमच्या घरच्या बे एरिया मिसळपाव कट्ट्याच्या वेळी मी हा मराठी हाटेलाचा मुद्दा बोललो होतो, ते लक्षात आहे का? ;) भांडवलदार शोधायला घेऊयात का? ;) (धंदेवाईक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

हो चालेल...

नाटक्या
Fri, 03/06/2009 - 02:59 नवीन
आहे का कोणी? माझी तयारी आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

ह्म्म..

भाग्यश्री
Fri, 03/06/2009 - 02:58 नवीन
ह्म्म.. घरीच.. :| http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

बास्स्स्स

टिउ
Fri, 03/06/2009 - 03:05 नवीन
बास्स्स्स्स! हा आमचा या विषयावरचा शेवटचा प्रतिसाद. आता इथे फिरकणार देखील नाही आम्ही. फोटो बद्दल आणि वरच्या लिस्टबद्दल भाग्यश्री आणि नाटक्या यांचा निषेध!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

राजधानी मस्तच

स्वप्निल..
Fri, 03/06/2009 - 06:00 नवीन
शाकाहारींसाठी एकदमच मस्त.. बाकी युनिअन सिटी मध्ये एक कबिला नावाचे भारतिय रेस्टॉरंट आहे..तिथले चिकन कबाब अप्रतिम असतात.. स्वप्निल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

बिर्याणी

बेसनलाडू
Fri, 03/06/2009 - 02:55 नवीन
शान, शाहनवाज, शालिमार आणि पक्वान बरोबर खास हैद्राबादी दम बिर्यानी साठी अतिथी (वोल्फ्-ओल्ड् सॅन् फ्रान्सिस्को इन्टर्सेक्शन्), जाफ्रान् (एल् कमिनो), पीकॉक् (एल् कमिनो आणि डाउन् टाउन् सॅन होजे) आठवल्याशिवाय राहत नाहीत :) मात्र २६/११ नंतर मी शालिमार, जाफ्रान्, शाहनवाज वगैरे पाकिस्तानी हॉटेलांत खाणे बंद केले आहे. बिर्यानी क्।आयची तीव्र इच्छा झाली की गाडी घेऊन अतिथी गाठतो :) थाय् जेवणासाठी कॅस्ट्रो स्ट्रीट् वरचे ऍमरिन् थाय् आवडते. मकार्थी रान्च च्या रान्च मार्केटकडचे थाय् कॅफे ही ठीक. त्याच भागातले पनांग प्यालेस् सिंगापूर-मलाय् जेवणासाठी आवडते. बनाना लीफ् ची तर बातच न्यारी! डेनीज् म्हणहे खरोखरच 'कट्टा' आहे; पण सगळेच फूड जन्क् या एकमेव क्याटेगरीमधले! पिझा पापा जॉन्स आणि पिझा हट् यांचा आवडतो. पदव्युत्तर शिक्षणाच्या नॉर्थ कॅरोलायनामध्ये काढलेल्या दिवसांत (दोन वर्षांत) बर्गर किंग, टाको बेल् आणि रकस् पिझा, पापा जॉन्स्, आय् लव् एन् वाय् पिझा हे अन्नदाते होते. भाग्यश्री, बिगर भारतीय जेवाणाची भूक तुम्ही चाळवलीत! ती सुद्धा दुपारचे जेवण जेवून आल्यावर! निषेध निषेध!!! :D (खवय्या)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

बेस्ट लिस्ट..

एक
Fri, 03/06/2009 - 04:03 नवीन
नाटक्या , बेला लिस्ट बेस्ट आहे. सॅन फ्रान्सिस्को मधल्या नान-करी ची बिर्याणी पण टेस्ट करून बघ. मी २ तिथेच खाऊन एक घरी पॅक करून येतो. ज्यांना चिकन मट्ण पेक्षा अजून चालत असेल त्यांच्यासाठी चेलोकबाबी हा सुद्धा पर्याय उत्त्म आहे. बेला, धंध्याची आयडीया बेश्ट आहे. जागा शोधावी लागेल. थोडं भांडवल गुंतवायला तयारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

एकोजी राव..

नाटक्या
Fri, 03/06/2009 - 04:21 नवीन
जागा आहे माझ्या कडे. भांडवलाचं बघा!!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

छान लिहले आहेस!

चकली
Fri, 03/06/2009 - 02:17 नवीन
डेनीज् आणि तिकडे केलेला टाइमपास खूप आठवला...छानच लिहलस! नूडल्स आणि कं , ओल्ड शिकागो, चिपोटले लिहून भाग २ पण लिहून टाक. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

मस्तं

अनामिक
Fri, 03/06/2009 - 02:28 नवीन
मस्तं लेख... इथल्या स्कूलमधले दिवस टॅको-बेल, सब वे, चिपोटले, वेंडीज्, बर्गर किंगमधेच काढलेत. सोबतीला सगळे पिझ्झे होतेच! चिपोटलेतर दररोच असले तरी चालते... इथली ग्वॉकामोली फ्रेश आणि छान असते! चिलीज् चा मोल्टन लावा म्हणजे "लै भारी".... आम्हा मित्र-मैत्रीणींचा कट्टा रात्री १० नंतर आणि आम्हाला हाकलेपर्यंत इथेच भरायचा.... ८-१०जणात ३ मोल्टन लावावर ताव मारायला आणि सगळं चिलीज् डोक्यावर घ्यायला काय मज्जा यायची. आतापर्यंत ज्या-ज्या डेनीज् मधे गेलोय तिथे ३०मिनीटाआधी कधीच ऑर्डर आली नाही... पण इथे हॉट चॉकलेट मस्तं मिळतं... तसचं भरपूर गप्पा मारायच्या असतील, रात्रही असेल तर हे हॉटेल उत्तम आहे. रुबी ट्युसडे आणि टि.जी.ऍफ मधे माझ्यासारख्या पापापा (पाव-पाला-पाचोळा) खाणार्‍याला जास्त काही मिळतच नाही! पी. एफ्. चॅग आणि ऑलिव गार्डनही आवडीचे आहेत.... ऑलिव गार्डन्मधे एकवेळ 'तिरामीसु' खावून बघा.... जन्नत आहे अगदी! इथं ऍटलांटात 'स्वीट टोमॅटो' नावाचा एक सॅलर्ड बार आहे - के व ळ अ प्र ति म !! नान नावाचं एक (जरा हाय्-एंड वाटावं असं) थाय-फुड हॉटेल आहे... सगळ्याच ऑनट्रे मस्तं असतात! आणि हो हॉटेल नाही पण स्टार-बक्सला विसरुन कसे चालेल.... इथे भरवलेले कट्टेही मिसतोय! तुमचा लेख वाचून भूक लागली :)! -अनामिक
  • Log in or register to post comments

मस्त लेख...

टिउ
Fri, 03/06/2009 - 02:29 नवीन
वाचुनच भुक लागली...पण यातली बरीचशी रेस्टॉरंट्स इथे ईस्ट कोस्टला नाहीत बहुतेक... आय-हॉप मधले ऑम्लेट्स पण वेड असतात.
  • Log in or register to post comments

ओहो...

भाग्यश्री
Fri, 03/06/2009 - 02:33 नवीन
ओहो... मिपाकर रसिक आणि खवैय्ये आहेत याची पावतीच ही!! तुमच्या सगळ्यांच्या ऍडीशन्स बद्दल धन्यवाद.. मी लेख लिहीताना नंतर विचार कर-करून ब्लँकच झाले होते, की अजुन कुठले रेस्टॉ. राहीले आहे?.. आठवेचना काही! बरीच विसरले आहे हे दिसतच आहे ! मी मुद्दाम आपली इंडीयन रेस्टॉ. नाही दिली, कारण आपलंच फुड, वेगळ्या देशातले, वेगळे पदार्थ / हॉटेल्स एकत्र जमवावेत असं वाटून लिहीलं आधी.. पण आता आपण इथे हीसुद्धा हॉटेल्स टाकून लिस्ट परिपूर्ण करूयातच! :) तसंही आमच्या इथे आमच्या दुर्दैवाने आम्हाला आवडेल असं भारतीय जेवण नाहीच मिळत.. काय वाट्टेल ते करतात.. एकच रेस्टॉरंट आहे इथे उल्लेखण्यासारखे ते म्हणजे वुडलँड हिल्स भागातले "अनारबाग" .. इथला चिकन टीक्का आपल्याला थेट भारतात नेऊन सोडतो ! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अगं हे

वर्षा
Fri, 03/06/2009 - 07:06 नवीन
अगं हे अनारबाग आहे कुठे? आम्ही वुडलँड हिल्समध्ये होतो तेव्हा त्या भागाला सतत नावं ठेवायचो एक धड भारतीय रेस्टॉ नाही म्हणून आणि मग अर्टेशियाला जायचो. त्यातल्या त्यात थाऊजंड ओक्समध्ये (की चॅट्स्वर्थ्मध्ये...?)मध्ये वुडलॅंड्ज नावाचं मस्त साऊथ इंडियन रेस्टॉ सापडलं होतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

http://www.anarbaghindiancuis

भाग्यश्री
Fri, 03/06/2009 - 07:38 नवीन
http://www.anarbaghindiancuisine.com/ इथे बघ गं.. आणि असशील इथे जवळपास तर येऊन जा तिथे.. जाताना आम्हालाही घे बरोबर ! :) तू म्हणतेस ते वुडलँड्स चॅट्सवर्थला असावे... http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा

तुम्ही

रेवती
Fri, 03/06/2009 - 02:52 नवीन
तुम्ही सगळेजण अगदी....... जाऊ दे आत्ता भावनेच्या भरात काही टंकायला नको.... लेख लई भारी! रेवती
  • Log in or register to post comments

उत्तम

घाटावरचे भट
Fri, 03/06/2009 - 02:55 नवीन
उत्तम खाद्ययात्रा!!! बाकी मंगोलियन हॉट पॉट मिळणारी हाटिलंसुद्धा उल्लेख करण्याजोगी आहेत.
  • Log in or register to post comments

खाद्ययात्

सूर्य
Fri, 03/06/2009 - 03:00 नवीन
खाद्ययात्रा छान आहे. बरीच नावे कळली. विकेन्डला कुठे कुठे जायचे ते ठरवुन ठेवतो. ;) - सूर्य.
  • Log in or register to post comments

अजून

अनामिक
Fri, 03/06/2009 - 03:02 नवीन
अजून एक... प्रवासात, म्हणजे लाँग-ड्राईव, असताना वॉफल हाऊस किंवा क्रॅकर-बॅरलला मुद्दाम जा.... वॉफल हाऊस मधले हॅश ब्राऊन्स्, वॉफल्स् आणि अर्थात रेग्युलर कॉफी काय मस्तं कॉम्बीनेशन आहे... प्रवासातला सगळा थकवा जातो! आणि एक - पनेरा ब्रेडचे सॅंडविचेसपण उत्तम... इथे एका मोठ्ठ्या पावात एक होल करुन सूप मिळतं... अगेन एकदम मस्तं कॉम्बो! अनामिक
  • Log in or register to post comments

मस्तच.

शितल
Fri, 03/06/2009 - 04:23 नवीन
भाग्यश्री, तुझी खाद्ययात्री वेस्ट कोस्ट कडुन ईस्ट कोस्ट कधे कधी सरकणार आहे.. ;) मस्त लिहिले आहेस. :) मी व्हेजिटेरिअन असल्याने खरे तर येथे माझी उपासमार होते आहे का असे वाटते कधी कधी. :(
  • Log in or register to post comments

अगं मी

भाग्यश्री
Fri, 03/06/2009 - 04:31 नवीन
अगं मी इस्ट कोस्टला आलेच नाहीए.. पण नवरा सांगत असतो एक एक नावं! एक सद्ध्या इंट्रेस्टींग वाटतंय ऐकून , बहामा ब्रीझ... पण आमच्या इथे नाहीए ते कॅरेबिअन रेस्टॉ.. आणि अगदी खरंय.. व्हेज जरा कमीच ऑप्शन्स आहेत.. मी निदान चिकन,मासे खाते म्हणून बरंय.. एक, नाटक्या, बेसनलाडू...(हे स्वल्पविराम धरूनच वाचणे.. अन्यथा निघणार्‍या अर्थाबद्दल मी जबाबदार नाही! :)) ) .. तुम्ही नक्की हॉटेल सुरू करा.. आम्ही नक्की येऊ! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

एक, नाटक्या, बेसनलाडू!!

नाटक्या
Fri, 03/06/2009 - 04:38 नवीन
एक, नाटक्या, बेसनलाडू...(हे स्वल्पविराम धरूनच वाचणे.. अन्यथा निघणार्‍या अर्थाबद्दल मी जबाबदार नाही! बेलाशेठ कळले ना तुमच्या बद्दल मिपाकरांना काय वाटते ते? - नाटक्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

ओये.. मी मजा

भाग्यश्री
Fri, 03/06/2009 - 04:52 नवीन
ओये.. मी मजा करतीय बरका.. तीन शब्द एकत्र आले आणि कॉमेडी अर्थ निघत होता म्हणून लिहीले.. आय होप तुम्हीही हच घेताय! ( हे असं काही कशाला वाटेल , मी न ओळखणार्‍या माणसाबद्दल! :) ) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

मी पण

नाटक्या
Fri, 03/06/2009 - 05:22 नवीन
आय होप तुम्हीही हच घेताय! हो मी हलकेच घेतोय आणि लिहीले पण मजेतच होते. :-) बेसनलाडूचे माहीत नाही :-( - नाटक्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

काळजी नसावी

बेसनलाडू
Fri, 03/06/2009 - 09:31 नवीन
जड लागणार्‍या गोष्टी जगात कमी आहेत आणि मराठी संकेतस्थळांवर नाहीतच, हे मला माहीत आहे. तेव्हा भाग्यश्री, नाटक्याशेठ, काळजी नको. (निश्चिंत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

अरे व्वा

आनंदयात्री
Fri, 03/06/2009 - 09:50 नवीन
अरे व्वा हे साद-प्रतिसाद वाचलेच नव्हते .. शोभतो बरं नाटक्या बेसनलाडु तुला .. (हवे तिथे स्वल्प किंवा कोणतेपण विराम घालुन घ्यावेत) :) - (फाटक्या) आंद्यालाडु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

ईस्ट कोस्ट..

नाटक्या
Fri, 03/06/2009 - 04:36 नवीन
ईस्ट कोस्टच्या बद्दल तुम्हीच लिहा कि आम्हालाही कळेल :-) - नाटक्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

मस्त लेख..

प्राजु
Fri, 03/06/2009 - 05:25 नवीन
ऍप्पल बी.. हे एक मस्त रेस्टॉ मस्त आहे.. बाकी पिझ्झांबद्दल काय बोलावं... मॅक ग्रील.. ऑलिव्ह गार्डन.. सुखोथाई.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुरेख ..!!!

छोटा डॉन
Fri, 03/06/2009 - 07:13 नवीन
भाग्यश्रीची खाद्ययात्रा अगदी सुखेख जमली आहे. खोटे नाय बोलत पण बरीच वर्णने वाचुन हेवा वाटला किंवा "काय ऐश करतायत भौ " असे वाटुन गेले. लिखाणातला फ्लो ही छान आहे ... बाकी आपण जिकडे जातो तिकडचे अन्न हे पुर्णब्रम्ह मानावे म्हणजे हालही होत नाहीत आणि खाण्यातली मजाही लुटता येते. मस्त ...!!! असेच अजुन येऊद्यात , आम्ही वाचतो आहोत ... बाकी ह्या निमीत्ताने तात्यांच्या अशाच एका जुन्या लेखाची आठवण झाली. ( तात्यांच न ? का अजुन कोणी ? ) ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments

रुचकर ..

मनीषा
Fri, 03/06/2009 - 07:33 नवीन
खाद्ययात्रेची कथा खूपच रुचकर आहे... आणि वारकर्‍यांसाठी मार्गदर्शनसुद्धा
  • Log in or register to post comments

लॉरेन्स, अल् कमिनो रियाल, कॅस्ट्रो आणि सेंट्रल

विंजिनेर
Fri, 03/06/2009 - 08:27 नवीन
पी एफ चॅंग, चायना बिस्त्रो... आहा! इथे जायचं म्हण्जे एक्दम साग्रसंगीत असतं..
पी एफ चॅंग चेच ओलाँग मरिअनेटेड सी बास हा अगदी जिभेवर विरघळतो(व्हाईट राईस बरोबर तो अधिक चांगला लागतो. फडफडीत ब्राउन राइसने मजा जाते असं मला तरी वाटतं). शेवटी मुखवास म्हणून बनाना-स्प्रिंग रोलस् पाहिजेतच! लॉरेन्स वरचं कोरियन बार्बेक्यु आणि सेंट्रल ला अगदी लागून असलेले पुष्पा हे अफलातून आहेत. पुष्पा (हे जुने नाव आहे. सध्या मालक आणि नाव दोन्ही बदललेलं आहे पण जुन्या बे एरियनकरांना पुष्पाच माहिती आहे) एका आंधप्रदेशी मालकाने चालविले आहे. त्यात मिळणारा अफलातून डोसा, चटणी आणि सांबार हे थेट भारतातले !! झालंच तर रस्सम सुद्धा डोळयातून पाणी काढणारं असतं नंतर शेवटी लुसलुशीत गुलाबजाम+व्हॅनिला आईसक्रिम (खास हैदराबादी इष्टाईल!!) किंवा त्या यंत्रा मधून भुसुभुसू गळणारं आंबा आईस्क्रिम!! अल् कमिनो रियाल वरचं "टेस्ट ऑफ इंडिया" कसं काय विसरलात भाग्यश्री तै? "अफगाण" हे अस्सल अफगाणी रेस्टॉरंट. तिथले कबाब/व्हेनशन् किंवा सी-फुड राईस हे भरपूर आणि अफलातून असतात! पाश्चिमात्य जेवणासाठी कॅस्ट्रो वरून व्हिला स्ट्रिट वर वळल्यावर टोकाशी टाईड हाउस ही मायक्रो ब्रुअरी आहे. त्यातले पोर्क रिब्स किंवा बर्गर जरूर खाऊन पहा! जोडीला (चालत असेल तर) ताजी ताजी अँबर बियर पाहिजेच! कॅस्ट्रोवर ग्रँडमास् एन्शिलाडास पण अफलातून मिळतात. माझ्या मेक्सिकन मित्राने सांगितले की तिथे तो गेल्यावर त्याला त्याच्या मूळ गावातल्या चवीची आठवण येते!! थोडं दक्षिणेला सॅन डियेगोत "सरवणा भवन" राहिलंच की तै... तिथला उत्तपा आणि मसाला डोसा थेट चेन्नई!!
  • Log in or register to post comments

वाह सही

भाग्यश्री
Fri, 03/06/2009 - 08:53 नवीन
वाह सही लिस्ट आहे.. मी बे एरिआत नाही राहत हो.. तेव्हा मला तिथले काही माहीत नाही.. ऐकून आहे ते फक्त अंबर आणि टर्मरिक.. टर्मरिक मधे जेवले आहे.. उत्तम आहे ते.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

अफगाण

नाटक्या
Fri, 03/06/2009 - 09:07 नवीन
कसे विसरलो. "अफगाण" हे अस्सल अफगाणी रेस्टॉरंट. तिथले कबाब/व्हेनशन् किंवा सी-फुड राईस हे भरपूर आणि अफलातून असतात! फ्रिमॉन्ट मध्ये 'सलांग पास" नावाचे अफगाण रेस्टॉरंट आहे. तिथे बोलानी नावाची डिश मिळते, असते आपल्या आलू-पराठया सारखी पण चव अगदी लाजवाब... तसेच इटालियन मध्ये आणखी एक नाव म्हणजे "चिज केक फॅक्टरी". नावाप्रमाणेच इथले चिज केक अतिशय सुंदर. वेगवेगळ्या प्रकारचे पास्टे तर आहाहा!! आणि सगळ्यात लाजवाब म्हणजे 'बफेलो ब्लास्ट' म्हणजे 'बफेलो विंग्ज' सारखाच प्रकार पण बोनलेस चिकनने बनवलेला. तसेच पी एफ चॅंगचे 'लेट्यूस व्रॅप' पण सुंदर.. काय आहे ही लिस्ट संपता संपत नाही. काय करणार आमचे ब्रिदवाक्यच आहे "खाण्यासाठी (पिण्यासाठी सुध्दा) आम्ही कुठेही आणि कधीही जातो" - नाटक्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

नमस्कार

सहज
Fri, 03/06/2009 - 08:46 नवीन
माझे नाव सहज आहे . मी देखील glutton आहे.
  • Log in or register to post comments

एक नंबर !!

आनंदयात्री
Fri, 03/06/2009 - 09:21 नवीन
>>, तव्यावरून काढतानाच पोळि खायला सुरवात केलीत तर तुमचे दात शाबूत.. नाहीतर! अरे देवा.. त्यातून हो.. माझी गोल्डन टेंपल >>नामक मैद्याची कणीक! Sad जाऊदे.. संपले ते दुष्ट दिवस! एक नंबर !!
  • Log in or register to post comments

छान!

चित्रा
Fri, 03/06/2009 - 10:31 नवीन
लेख फारच मजेशीर आहे. :) लिहीण्याची मनमोकळी शैली आवडली. अवांतर - नवर्‍याला दहा (आपल्याला न जमणार्‍या) गोष्टी करून घालण्याचा प्रत्येक मुलीला का सोस (सुरूवातीला) असावा, हे एक आश्चर्यच आहे. (म्हणजे मलाही होता - एकेकाळी. पण नवर्‍यांना असते का असे काही लग्नाआधी वाटत की, अमूक एक गोष्ट मी माझ्या बायकोला करून देणार(च), करून खायला घालणार(च) किंवा असेच काही?! काय कोण जाणे? )
  • Log in or register to post comments

असते ...

छोटा डॉन
Fri, 03/06/2009 - 10:36 नवीन
पण नवर्‍यांना असते का असे काही लग्नाआधी वाटत की, अमूक एक गोष्ट मी माझ्या बायकोला करून देणार(च), करून खायला घालणार(च) किंवा असेच काही?! काय कोण जाणे? )
का नाही ? भरपुर असते अशी इच्छा आणि त्यात मज्जाही आहे आणि मला जरा हे रोमँटिक वाटते ... :) माझ्या लग्नानंतर हवे तर माझ्या बायकोला विचारा की मी काय काय करुन खाऊ घातले ते ;) मला ज्याम इंटरेस्ट आहे अशा गोष्टीत ... ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

डाण्या

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 03/06/2009 - 16:55 नवीन
डाण्या मेल्या तुला भुर्जी सोडून अजूनही काही काही बनवता येतं हे सांगितलं नाहीस गधड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

सुष्टपणा

प्रकाश घाटपांडे
Fri, 03/06/2009 - 10:53 नवीन
नवर्‍याचा दुष्ट्पणा किती ?? लग्गेच मला झोंबणारं ऍंटीसेप्टीक लावायला घेऊन यायचा! आणि मी जी काही आरोळी ठोकायचे..... नंतर मला कळलं त्यात काळजी वगैरे जरा कमीच आहे, नुस्ता दुष्टपणा आहे त्याचा !! Big Grin :D:D:D:D
आमी हळद लावायचा सुष्टपना करायचो.)) :-)) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

मस्तच झाला

मेघना भुस्कुटे
Fri, 03/06/2009 - 18:01 नवीन
मस्तच झाला आहे लेख. तू म्हणालीस तसं अमेरिकेतल्या हाटेलांबद्दल काहीही माहीत नव्हतं, तरी जाम धमाल आली वाचायला (याचा अर्थ मी खवैयी आहे!!!!). आता असंच तिथली ग्रोसरी शॉप्स आणि भारतीय प्रकार मिळवायला करावी लागलेली यातायात, त्यात हाताला लागलेल्या काही अनमोल आणि अनपेक्षित चिजा याच्याबद्दल लिही ना. धमाल येईल. (जीव हावरा हावरा!!!!)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा