निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला
जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्यांना आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. ( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.) जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत.
" ईश्वर अस्तित्वात नाही." हे ठामपणे सांगणारे निरीश्वरवादी भारतात अगदी वेदकाळापासून आहेत. आता या विज्ञानयुगात त्यांची संख्या वेगाने वाढते आहे.
सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान असा देव जर आहे तर तो आपल्या अस्तित्वाची प्रचीती सर्व माणसांना येईल असे कांहीच का करीत नाही ? इतका लपून-छपून का राहतो ? आपले अस्तित्व दाखविण्यात त्याला कोणती अडचण आहे ? तसेच त्याचे जे गुणवर्णन आहे त्यांतील एकाही गुणाचा अनुभव कधीही येत नाही. संकटात देव धावून आला आहे असे कधीही घडत नाही. हे कसे ? दीन-दुबळ्यांवर अन्याय होतो, निष्पाप बालिकेवर अत्याचार होतो या प्रत्यही घडणार्या घटना तो करुणासागर देव निष्क्रियपणे पाहात कसा राहातो?
आस्तिक लोक अशा घटनांविषयीं विचार करीतच नाहीत. त्यांना त्यांची श्रद्धा टिकवून धरायची असते. ती अशा घटनांनी डळमळली तर काय करायचे ? आपल्याला कोणाचा आधार आहे ? अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे अन्यायपीडित व्यक्ती पूर्वजन्मीच्या पापाचे फळ भोगतात असले बुद्धीला न पटणारे काहीतरी भोंगळ तत्त्व श्रद्धेने खरे मानून मनाचे समाधान करतात. आपण देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली, देवासाठी जी कर्मकांडे परंपरे अनुसार करीत आहोत ती सोडून दिली तर देव आपल्यावर कोपेल. शिक्षा करील. अशी भीतीही त्यांना वाटत असावी. या संदर्भात डॉ.र.धों.कर्वे यांचे एक विधान आहे. ते म्हणतात, "माणूस देवाला नमस्कार करतो तो "दुर्जनं प्रथमं वन्दे ।" या न्यायाने. म्हणजे देवाने आपल्यावर कोप करू नये, आपले कांही वाईट करू नये म्हणून. हे पटण्यासारखे आहे.
यावर आस्तिकांनी थोडा विचार करावा. जगात निरीश्वरवादी माणसे पूर्वीपासून आहेत; हे आस्तिकांना ठावूक आहेच ते नास्तिक देवा-धर्माचे कोणतेही कर्मकांड करीत नाहीत. देवाला हात जोडून त्याच्यापुढे नतमस्तक होत नाहीत. एवढेच नव्हे तर देवाचे अस्तित्वसुद्धा नाकारतात . आता प्रश्न असा पडतो की त्या नास्तिकांना देव शिक्षा का करीत नाही ? देव सर्वज्ञ आहे. जगात निरीश्वरवादी लोक आहेत. ते कधी माझी पूजा-अर्चा-प्रार्थना करीत नाहीत. मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील. देवाचे अस्तित्व मुकाट्याने मानतील. त्याची पूजा-अर्चा करू लागतील. आस्तिक-नास्तिक वाद मिटून जाईल. हे देवाला नको आहे का? नास्तिकांना कडक शासन करणे देवाला अशक्य आहे का? तो सर्वशक्तिमान आहे ना ? मग त्याच्या दृष्टीने एवढी सोपी असलेली गोष्ट तो स्वत: का करीत नाही ?
देवदर्शनाला जाणार्या तसेच दर्शन घेऊन परत येणार्या भक्तांच्या वाहनांना अपघात का होतात ? त्यात अनेक भक्त का मरतात ?
कोणी म्हणतील -आस्तिकांच्याच वाहनांना अपघात होतात का ? नास्तिकांच्या वाहनांना होत नाहीत ? -- होतातच. गाडीत कोण बसले आहेत ? आस्तिक का नास्तिक ? भूकंपात जखमी झालेल्या माणसांवर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर का घरफोडीसाठी जाणारे दरोडेखोर ? याचा अपघाताशी कांही संबंध नसतो. अपघाताची कारणे वेगळी असतात.नास्तिकांच्या वाहनांना अपघात होऊ शकतो हे सत्यच आहे. प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्या नास्तिकांना तो शिक्षा का करत नाही ? आणि या प्रश्नाचे सत्य उत्तर असे आहे की,ईश्वर अस्तित्वातच नाही.
वास्तव काय आहे ? सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. आस्तिकांवर येतात तसे नास्तिकांवरही येतात. श्रीमंतांवर येतात. गरिबांवर येतात. आस्तिक लोक देवाचे भजन-पूजन करतात, नामस्मरण करतात म्हणून त्यांच्यावर दु:खाचे प्रसंग क्वचितच येतात तर नास्तिक लोक देवाचे काहीच करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर सतत दु:खाचे डोंगर कोसळतात असे मुळीच दिसत नाही. जगन्नियंता देव अस्तित्वात असेल तर असे घडायला हवे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही. यावरून कोणता निष्कर्ष निघतो ?
अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते.
अनेक सद्विचारी, सदाचारी, सज्जन आस्तिकांना आयुष्यात मोठे दु:ख भोगावे लागले. देवाने त्यांच्यावर कांही कृपा केली नाही. दोन उदाहरणे द्यायची तर तुकाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रात लागोपाठ चार वर्षे दुष्काळ पडला. तुकारामांच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली. त्यांची पहिली पत्नी भूकबळी ठरली. त्यांनी लिहिले आहे,
"दुष्काळे आटले द्रव्य गेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता गेली.
आता काय खावे कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥
विठ्ठलाच्या या निष्ठावंत भक्ताची अशी अवस्था झाली.
रामकृष्ण परमहंस कालीमातेचे परम भक्त होते. "स्वत: माता माझ्याशी बोलते " असे ते सांगत. त्यांना घशाचा कॅंन्सर झाला. अन्नाचा घास गिळता येईना. भक्तांनी विनवले की, " तुम्ही कालीमातेला साकडे घाला. ती तुमचा आजार बरा करील." परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. इतर लोक जेवतात त्याने रामकृष्ण परमहंस यांचे पोट भरते का ? त्यांना भूक लागणार नाही का ? तात्पर्य एवढेच की आस्तिक माणसांना, देवभक्तांना सुद्धा दु:खे भोगावी लागतात. त्यांच्यासाठी देव काहीच करू शकत नाही. तो अस्तित्वाच नाही तर काय करणार ?
पण अशा सुप्रसिद्ध आस्तिकांचाच विचार का करायचा ? शंभर वर्षांपूर्वीच्या हिंदु समाजाचा विचार करावा. त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती. चौथा वर्ण शूद्र . ते सगळे आस्तिकच होते. इतर तीन वर्ण त्यांना अस्पृश्य मानत. हे लोक निरक्षर होते. अज्ञानी होते. अत्यंत दीनवाणे अपमानास्पद जीवन जगत होते. जो देव आहे असे ते मनापासून मानत होते त्या देवाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. करुणासागर देवाला त्यांची दया आली नाही. देश स्वतंत्र झाला. प्रजासत्ताक स्थापन झाले. संविधान लागू झाले. तेव्हा कागदोपत्रींतरी अस्पृश्यता गेली. या दलितांचा उद्धार देवामुळे झाला नाही. डॉ.आंबेडकरांमुळे झाला. कांहीजण बाबासाहेबांनाच देव मानतात. तसे मानणे हा त्यांचा अपमान आहे हे त्या दलितांच्या ध्यानी कसे येत नाही ? कवि विंदा करंदीकर म्हणतात, "देवातुनी समाजा ज्याने विमुक्त केले । त्यालाच देव करिती याला इलाज नाही. ॥"
तर अशा या देवाचे अस्तित्व खरे कसे मानता येईल ? देव अस्तित्वात नाही हेच बुद्धीला पटणारे सत्य आहे.
देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. मात्र परंपरेने आलेले जे सण-सुदिन आहेत ते समाजाचे आनंद सोहळे आहेत. ते अवश्य साजरे करावे. त्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. अन्यथा जीवन एकसुरी, नीरस होईल.
.................................................................................
वर्गीकरण
वाचने
82936
प्रतिक्रिया
247
मिसळपाव
प्रतिक्रिया
निरीश्वरवाद्यांना वाटते ईश्वर
ईश्वर म्हणत असेल: कुठं
मागील जन्मी केलेल्या
तुमच्या आयडीला अत्रुप्त
In reply to मागील जन्मी केलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
मिपाच्या सगळ्याच आयड्यांना
In reply to तुमच्या आयडीला अत्रुप्त by प्रचेतस
कधी कधी
In reply to मिपाच्या सगळ्याच आयड्यांना by डॉ सुहास म्हात्रे
निरीश्वरवाद्यांना ईश्वर
सर...
चिकाटी ची शेकोटी
छान आहे पुस्तक
In reply to चिकाटी ची शेकोटी by मारवा
निरीश्वरवाद्यांना ईश्वर
निरीश्वरवाद्यांना ईश्वर
असं अधिकार वाणीने लिहीलेले
In reply to निरीश्वरवाद्यांना ईश्वर by क्रिप्ट
नमस्कार करा.
In reply to असं अधिकार वाणीने लिहीलेले by सतिश गावडे
नास्तिकांच्या अस्तित्वावर देवाचा
नास्तिकांच्या अस्तित्वावर देवाचा
In reply to नास्तिकांच्या अस्तित्वावर देवाचा by अनन्त अवधुत
उत्तर तुम्हीच लिहीले आहे की
हम्म
साक्षीदार
नास्तिक!
निरीश्वरवाद्यांना ईश्वर
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावालाकदाचित् निरीश्वरवाद्यांकडे लक्ष द्यावे इतकेही त्यांचे महत्व इश्वराला वाटत नसावे ! मात्र, यनावाला कळत नकळत ईश्वराची सतत इतकी आठवण काढत असतात की स्वर्गाच्या लाईनमध्ये त्यांचा नंबर सगळ्या आस्तिकांच्या पुढे असेल* असेच वाटते ! :) * : संदर्भ : कुठल्याश्या कथेत सांगितले आहेच ना की, "शिकारीची वाट पहात बेलाच्या झाडावर बसलेल्या एक पारधी केवळ वेळ घालवण्यासाठी बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला, ती झाडाखालच्या शंकराच्या पिंडीवर पडत राहिली आणि काही वेळाने शंकराने प्रसन्न होऊन पारध्याला दर्शन दिले."* : संदर्भ : कुठल्याश्या कथेत
In reply to निरीश्वरवाद्यांना ईश्वर by डॉ सुहास म्हात्रे
लागुंचा एक किस्सा आठवला.
बाय द वे, विचारीन विचारीन म्हणतो.
In reply to लागुंचा एक किस्सा आठवला. by प्रकाश घाटपांडे
तुमचा देवावर विश्वास आहे का?
In reply to बाय द वे, विचारीन विचारीन म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचे सर्वच प्रतिसाद खूप
In reply to तुमचा देवावर विश्वास आहे का? by प्रकाश घाटपांडे
वरचा आणि हा, दोन्ही प्रतिसाद
In reply to तुमचा देवावर विश्वास आहे का? by प्रकाश घाटपांडे
हाहाहा.
In reply to तुमचा देवावर विश्वास आहे का? by प्रकाश घाटपांडे
उद्या माझ्या मेंदुत जैवरासायनिक बदल झाले तर माझे म्हणणे बदलेलही.
मान्य.
अर्थात ते कुणाचेही बदलेल.
हं. जीवनात संकटं. आली की मतं बदलतात, असं एक निरिक्षण आहे.
अगदी यनावालांचेही.
यनांचे आता मत कधीच बदलनार नाही, बदलूही नये असं माझं ठाम मत आहे. जालावर माझे दोन सर आदर्श आहेत, एक दैववादी जे आहे ते आहे असं मानणारे शरद सर, आणि कंप्लेट दैव नाकारणारे वालावलकरसेठ. बाकी, सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. एकदा भेटूया....! -दिलीप बिरुटेयनांचे आता मत कधीच बदलनार
In reply to हाहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त
In reply to यनांचे आता मत कधीच बदलनार by प्रकाश घाटपांडे
जो अद्भूत सृष्टीतल्या चराचर
In reply to हाहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण..
In reply to जो अद्भूत सृष्टीतल्या चराचर by arunjoshi123
मिपावर सर्वच गोष्टी सर्वांना
In reply to आपण.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
केव्हाच माफ केलंय.
In reply to मिपावर सर्वच गोष्टी सर्वांना by arunjoshi123
आपण हा नियम सर्वत्र लावायची
In reply to केव्हाच माफ केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जाऊ द्या ना सोडा.
In reply to आपण हा नियम सर्वत्र लावायची by arunjoshi123
बाकी मस्त. आमच्या उदगीरला
In reply to जाऊ द्या ना सोडा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
-१
In reply to हाहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दैव वाद व देव वाद
In reply to -१ by विकास
प्रा. डॉ. दिलिप बिरुटे,
In reply to बाय द वे, विचारीन विचारीन म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिक्षा?.....छे.....
यनावाला , नमस्कार ....
नवग्रह फळ जरा चुकीचे टंकले म्हणून परत लिहीत आहे
निरीश्वरवाद्यांना ईश्वर
निरीश्वरवाद्यांना ईश्वर
In reply to निरीश्वरवाद्यांना ईश्वर by arunjoshi123
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही
देतो ना. पण निरीश्वरवाद्यांना
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?
बापरे
बापरे
देव बाप्पा कान कापेल म्हणून
In reply to बापरे by सुबोध खरे
यनावाला सरांच्या मनात देवाने घर केले आहे
लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय.
In reply to यनावाला सरांच्या मनात देवाने घर केले आहे by सप्तरंगी
आधुनिक समाजात वावरताना
In reply to लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बुवा झोपा आता.
In reply to आधुनिक समाजात वावरताना by arunjoshi123
तुम्हाला त्यांच्या
In reply to बुवा झोपा आता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विचित्रविचारधारी
In reply to तुम्हाला त्यांच्या by बिटाकाका
गर्दी, त्याचा तुच्छतादर्शक
In reply to विचित्रविचारधारी by arunjoshi123
न बिथरलेले असतानाही लोकांना
In reply to बुवा झोपा आता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समाजात वावरतांना लोक देवधर्माचे प्रचंड बळी ठरतात
In reply to लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण उच्चशिक्षितांचं प्रबोधन
In reply to लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आराम खुर्चीतून चळवळ
In reply to लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
In reply to आराम खुर्चीतून चळवळ by विकास
प्रचंड सहमत! प्रतिसाद आवडला!
In reply to आराम खुर्चीतून चळवळ by विकास
आवडला प्रतिसाद.
In reply to आराम खुर्चीतून चळवळ by विकास
बुडते हे जन देखवे न डोळा, म्हणूनी कळवळा येत असे.
In reply to आराम खुर्चीतून चळवळ by विकास
बिरुटे सर
In reply to बुडते हे जन देखवे न डोळा, म्हणूनी कळवळा येत असे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रबोधन काही वेळा आंजारुन
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
भूमिका
In reply to प्रबोधन काही वेळा आंजारुन by प्रकाश घाटपांडे
काही अतिशयोक्त वक्त्यव्ये
In reply to बुडते हे जन देखवे न डोळा, म्हणूनी कळवळा येत असे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे