Skip to main content

एखादा दिवस

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 05/03/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
(|: एखादा दिवस एखादा दिवस असा रेंगाळतो, एकेक क्षण युगासारखा नुसते नगारे वाजवणा-या कोरड्या पोकळ ढगासारखा सकाळ सरता सरत नाही; विस्कटलेले किरण सांडून सुस्तावलेला सूर्यही दिसतो उनाड, हट्टी मुलासारखा कंटाळवाणी दुपार पसरते, कातावलेली नागीण जशी दिवस बिचारा वाट चुकलेल्या, भांबावलेल्या पिलासारखा संध्याकाळचा तोच पसारा; धूसर, धुरकट रंग उधळून भरकटलेला वारा फिरतो ओढाळ, नाठाळ गुरासारखा रात्रही तशीच मरगळलेली; पेंगुळलेल्या मंद चांदण्या धुक्यात गुरफटलेला चंद्र कोमेजलेल्या फुलासारखा पुन्हा उद्याची वाट पहाणारा एकेक क्षण युगासारखा परीकथेतील राजकन्येच्या स्वप्नामधल्या जगासारखा क्रान्ति
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2129
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

जबरदस्त लय आहे कवितेला, आणि पहिल्या शेरातच मनाची पकड घेते कविता. :) मस्तच.. नाठाळ गुरासारखा, कोमेजलेल्या फुलासारखा, हट्टि मुलासारखा... सगळेच मस्त!! जियो!! खूप सुंदर!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

कंटाळवाणी दुपार पसरते, कातावलेली नागीण जशी बर्‍याच दिवसांनी एक छान उपमा वाचायला मिळाली. बाकी कवितेविषयी आमचे ज्ञान अगाध आहे, लोकांनी केलेल्या सुंदर काव्याचे विडंबन करणे ह्या पुढे आमची बुद्धी धावत नाही ;) स्वगत :- काय पश्या मग लिहितो का आता 'एखादा पेग' ?? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य